कृष्णमुर्ती पद्धती चांगली समजण्यासाठी व त्याचा प्रभावी वापर करण्यासाठी ज्योतिष शास्त्राच्या मूलभूत संकल्पना अत्यंत भक्कम असल्या पाहिजेत, त्याच बरोबर राहू व केतू या दोन छाया ग्रहांचाही सांगोपांग अभ्यास झाला पाहिजे, कारण या दोन्हीं छाया ग्रहांना कृष्णमुर्ती पद्धती मध्ये कमालीचे महत्व दिले गेले आहे. नक्षत्रे हा तर कृष्णमुर्ती पद्धतीचा आत्मा आहे, त्यामुळे नक्षत्रांचा अभ्यास ही अत्यावश्यक ठरतो. शिवाय मुहुर्तशास्त्रात नक्षत्रांचे महत्व किती आहे ते वेगळे सांगायला नकोच. आज मी राहू व केतू आणि नक्षत्रे या दोन विषयांवरच्या काही उत्तम ग्रथांची यादी सादर करत आहे. पण याच विषयांवर इतर अनेक ग्रंथ असे आहेत की जे या यादीत मानाचे स्थान मिळवू शकतात, तूर्तास…