जगात सर्व गोष्टी योग्य वेळेलाच होतात.. जन्माला येण्याची एक निश्चीत वेळ असते तशी तुमच्या मृत्युची ही वेळ ठरलेली आहे. रोप लावायची ही एक वेळ असते आणि ते उखडून टाकायची पण एक वेळ असते. मर्मावर घाव घालण्याची वेळ असते, जखमांवर फुंकर घालण्याची ही एक वेळ असते. विनाशाची वेळ ठरलेली असते तिथे पुन:श्च हरी ओम म्हणायची पण वेळ असते. अश्रु ढाळायची वेळ असते तशी हसायची पण एक वेळ असते, दु:खात बुडायची वेळ असते तिथे आनंदाला उधाण यायची पण वेळ येतेच. हातातले शस्त्र टाकायची वेळ असते आणि हाती धरण्याची पण वेळ असते. कोणालातरी जवळ करण्याची एक वेळ असते आणि दूर लोटण्याची पण वेळ…