श्री. उदयजी, नाशकातल्या एका बड्या उद्योगातले वरिष्ठ अधिकारी. व्ही.आर.एस. चे वारे आता त्यांच्या कंपनीतही वाहू लागले होते. पहिल्या एक दोन फेर्यात बर्याच कामगार वर्गाची ‘हकालपट्टी’ झाली आणि आता मिडल मॅनेजमेंट मधल्या लोकांवर ही त्सुनामी येऊन आदळली होती! उदयजी उत्साही होते, हुषार होते, आपल्या कामात चलाख होते,सगळ्यांशी मिळून मिसळून वागणारे होते , ते स्वत:ला खास मॅनेजमेंट्च्या आतल्या गोटातले समजतही होते. “मी सेफ आहे, मला कोण हात लावतेय!” असे म्हणणार्या उदयजींच्या दारावर पण एक दिवशी ‘गोल्डन हॅंडशेक’ ची थाप पडली आणि उदयजींचे अनेक भाबडे गैरसमज दूर झाले! ज्या कंपनीची गेली पंधरा वर्षे इमाने ईतबारे सेवा केली त्या कंपनीला आता आपली जरुरी राहीली…