या लेखमालिकेतले आधीचे भाग इथे वाचा: पत्रिकेतले ग्रहयोग भाग - ३ पत्रिकेतले ग्रहयोग भाग - २ पत्रिकेतले ग्रहयोग भाग - १ तर मागच्या भागात काही लोकांनी विचारले होते: ग्रहयोग अगदी अंशात्मक आहे का? ग्रहयोग होऊन गेलाय की होणार आहे? आता हे जे काही नविन खुळ उभे केलेय त्याबद्दल या भागात थोडी माहीती घेऊ. भाग २ मध्ये आपण पाहीले आहे की जेव्हा दोन ग्रहांत ‘०’ अंशाचा कोन होतो तेव्हा त्यांच्यात ‘युती योग’ झाला आहे असे आपण म्हणतो किंवा ह्या दोन ग्रहांची युती झाली आहे असे म्हणले जाते . ‘०’ अंशाचा कोन होणे याचा अर्थ असा होतो की युती योगात असण्या…