जप , पोथी याबद्दल आपण पाहीले आता पाहू या इतर काही लोकप्रिय उपाय / तोडगे जप / पोथी पेक्षाही जास्त लोकप्रिय असे काही उपाय / तोडगे आहेत , हे निरुपद्रवी आणि कमी खर्चाचे असतात. बर्याच वेळा हे तोडगे 'लाल किताब' नामक एक भंगार चोपडे फार लोकप्रिय आहे त्यातूनच उचललेले असतात. ह्या 'लाल किताब' इतके आचरट ज्योतिष विषयक पुस्तक मी अद्याप पाहीले नाही. पुढे मागे या 'आचरटा' पणावर काही लिहतो, मस्त करमणूक होईल. देवळाला ‘क्ष’ वेळा भेटी देऊन वस्तू अर्पण करणे: (लाल) फूल / लवंग – दालचिनी- बदाम – काळे तीळ – उडीद , मूग डाळ, गुळ (आणि मागे वळून न…