माझ्या मागच्या ‘यक्षप्रश्न’ या पोष्ट्ला आपण सार्यांनी जो उदंड प्रतिसाद दिलात त्याबद्दल मी आपला अत्यंत आभारी आहे. या ब्लॉग पोष्ट च्या निमित्ताने वेगवेगळी मते , विचारसरणीं नोंदवल्या गेल्या आहेत. एकाच प्रश्नावर वाचक किती वेगवेगळ्या पद्धतीने आणि सखोल असा साधक बाधक विचार करु शकतात हे पाहून खरेच थक्क व्हायला झाले. ‘कॉमेंट्स’, ‘संपर्क फॉर्म’, ‘ईमेल’, ‘फोन’, ‘एसेमेस’, ‘फेसबुक’ अशा अनेक मार्गांनी वाचकांनी संपर्क साधला आहे, नव्हे पाऊस पाडला आहे!!! मत नोंदवणार्या माझ्या सर्व वाचकांना मी व्यक्तीश: पोहोच दिल्या आहेत. काही जणांच्या बाबतीत, त्यांनी इमेल अॅड्रेस देताना टायपिंग च्या चुका केल्याने त्यांना पाठवलेल्या ईमेल्स बाऊंस झाल्या आहेत. त्यांनाही या ब्लॉग पोष्ट्च्या माध्यमातून पोहोच…