श्री XXXX,
……………….आपल्या केस मध्ये मी फक्त जन्मकुंडलीचा वापर केला आहे. आपल्या बाबतीत प्रश्नकुंडली का वापरली नाही याचे थोडक्यात उत्तर म्हणजे : प्रश्नकुंडली केव्हा वापरायची या बाबत मी काही वेगळे निकष वापरतो, ते माझा आजवरचा अभ्यास व अनुभव यांवर आधारीत आहेत. आपल्या प्रश्नां बाबतीत मला प्रश्नकुंडली साठीचे म्हणून काही संकेत असतात ते मिळाले नाहीत , अशा परिस्थितीत प्रश्नकुंडली मांडणे मला प्रशस्त वाटले नाही.
………………..मी केलेली भाकिते कोणत्या आधारावर केली अशी उत्सुकता बर्याच जणांना असते, आपण तसे विचारले यात गैर काहीच नाही. त्यातल्या त्यात ज्यांचा ज्योतिषाचा थोडा फार अभ्यास आहे अशांची तर विस्तृत तपशीलात्मक वर्णनाची अपेक्षा असते. काही जणांना मी ब्लॉग वर केसस्ट्डीज लिहल्या आहेत त्या प्रमाणे स्टेप – बाय – स्टेप, खुलासे वार उत्तराची अपेक्षा असते. पण इथे हे लक्षात घ्या की ब्लॉग वर केसस्ट्डीज मांड्ताना माझ्या हेतु ‘शिकवणे’ असा असतो त्यामुळे सगळे सविस्तर लिहलेले असते जेणे करुन ह्या विषयाचा अभ्यास करणार्याला त्याचा काही उपयोग होऊ शकेल. आपल्या रिपोर्ट मध्ये असे सविस्तर लिहले नसले तरी उत्तर मिळवताना मी अगदी तीच पद्धत अवलंबलेली असते त्यात कोणतीही काटकसर / चाल ढकल केलेली नसते. जातकाला “लग्न कधी होईल?” , ‘नोकरी कधी मिळेल?” अशा प्रश्नांची नेमकी उत्तरें हवी असतात तेच मी रिपोर्ट मध्ये लिहतो. तुमचा गुरु अमुक राशीत / घरात आहे, यंव योग आहे , त्यंव दशा चालू आहे , हा ग्रह वक्री आहे आणि तो नीच राशीत आहे , असली अनावश्यक तांत्रिक माहीती देऊन रिपोर्ट्ची पाने भरुन काय उपयोग, किती जणांना ते समजणार आहे?
मी के.पी बरोबरच पारंपरीक व पाश्चात्य ज्योतिष प्रणालींचा ही वापर करतो. या शिवाय काही मेथड्स ज्या गुरु शिष्य परंपरेतून चालत आलेल्या आहेत त्यांचाही मी वापर करत असतो, यातल्या काही गोष्टीं समजायला अत्यंत किचकट आहेत आणि काही गोष्टी माझी व्यावसायीक गुपितें आहेत ती उघड करुन सांगणे शक्य होणार नाही. तुम्ही ‘कोकाकोला’ चे पैसे देता तेव्हा तुम्हाला ‘कोकाकोला’ मिळतो पण त्याची ‘साहित्य आणि कृती’ पण त्या सोबत मिळत नाही !
………………आपल्या प्रश्नां संदर्भात दुसर्या कोणा ज्योतिर्विदाने व्यक्त केलेल्या मतां बद्दल माझ्याक्डून खुलासा मागीतला आहे , आपल्या प्रश्नां संदर्भात दुसर्या ज्योतिर्विदांची मते वेगळी असू शकतात, अशा वेगळ्या मतांचा मी आदर करतो, पण त्यावर कोणतेही मत प्रदर्शन करणे अथवा त्यांच्या भाकितांशी माझ्या निष्कर्षां शी तुलना करुन चर्चा करणे मला शक्य होणार नाही. असे करणे माझ्या ‘व्यावसायीक नितिमत्तेच्या’ विरुद्ध आहे. कोणावर विश्वास ठेवायचा हा सर्वस्वी तुमचा निर्णय आहे. कोणाचे बरोबर , कोण चुकला हे आगामी काळच ठरवेल. (तेव्हा बघू !)
……………………आपल्या भविष्यात चांगले किंवा आपल्या मनात जे आहे तेच घडावे अशी अपेक्षा सगळ्यांचीच असते, तशी ती असणे ही गैर नाही, प्रतिकूल भाकिते स्विकारणे , पचवणे त्यामुळेच बर्याच जणांना काहीसे अवघड जाते असा माझा अनुभव आहे पण मी मला माझ्या अभ्यासातून जे काही दिसते ते मी स्पष्ट्पणे समोर ठेवत असतो, त्यात कोणत्याही शुगर कोटींग नसते. केवळ एखाद्याला (त्याने पैसे दिले आहेत ना!) बरे वाटावे म्हणून मी काही खोटेनाटे सांगणार नाही , कारण असे करणे म्हणजे शास्त्राशी प्रतारणा करणे असे माझे मत आहे.
………………………मी माझे काम अत्यंत मन लावून , माझ्या ज्ञानाचा , अनुभवाचा जास्तीत जास्त वापर करुन , सचोटीने करत असतो. तसे पाहीले तर एखाद्याच्या प्रश्नावर मी जेव्हढा वेळ खर्च करतो त्या तुलनेत मी घेत असलेले मानधन नगण्य आहे (५% सुद्धा नाही !). माझा व्यवहार स्वच्छ , सरळ आहे, उपाय – तोडग्यांच्या नावाखाली फसवणूक / लूट्मार माझ्याकडे नाही. मी भविष्य विषयक मार्गदर्शन लेखी स्वरुपात देतो. किती ज्योतिषी लेखी भविष्य देतात हो ? ते तसे देत नाहीत कारण उघड आहे उद्या खरे-खोटे ठरवायची वेळ आली तर कोणता लेखी पुरावा मागे रहायला नको ! किती ज्योतिषी मनधन मिळाल्याची पावती देतात ? मी मानधन बँके मार्फत स्विकारतो , रोखीचा व्यवहार असेल तर रितसर पावती देतो, सगळा, स्वच्छ व्यवहार, सगळा व्हाईटमनी आणि हो , या व्यवसायातून मिळालेल्या उत्पन्नावर जो काही असेल तो इन्कम टॅक्स प्रामाणिक पणे भरतो. किती ज्योतिषी हे सगळे करताना दिसतील ?
………………भविष्यकथन जन्मपत्रिकेच्या आधारावर केले जाते आणि अचूक जन्मवेळ हा कोणत्याही जन्मपत्रिकेचा पाया आहे. पण किती ज्योतिषी दिलेली जन्मवेळ बरोबर आहे का नाही याचा शहानिशा करुन घेतात? जातकाने दिलेली वेळ बरोबरच आहे असे समजून धाडधाड ज्योतिष कथन केले जाते. काही के.पी. वाले ‘रुलिंग प्लॅनेट’ नामक पद्धतीचा आधार घेतात आणि या पद्धतीने शुद्ध केलेली जन्मवेळ अगदी अचूक असते अशी राणा भीमदेवी थाटात गर्जना करतात. पण हीच वेळ बरोबर कशी याचा ताळा-पडताळा मात्र देत नाहीत . कोणी विचारले तर अंगावर येतात. नुसती फटकळच नव्हे तर अत्यंत शिवराळ / गलिच्छ, कमरे खालच्या भाषेत तुसडी उत्तरें देतात असा अनुभव आहे. मी प्रत्येक जन्मवेळ तपासून पारखूनच घेतो , त्यासाठी जादाची मेहेनत घेतो आणि मी शुद्ध केलेली जन्मवेळ कशी बरोबर आहे याचे ताळे-पडताळे देतो. किती ज्योतिषी हे सगळे करताना दिसतील ?
………………….आरोग्य विषयक प्रश्न मी हाताळत नाही, कारण ज्योतिषशास्त्र हे सध्याच्या आधुनिक वैद्यकशास्त्राच्या पासंगाला ही पुरणार नाही, उगाच आपले पत्रिका घेऊन अकलेचे तारे तोडत आरोग्य विषयक प्रश्नांना उत्तरें देत बसणे म्हणजे एखाद्याच्या जीवाशी खेळणे आहे. अहो, जिथे जन्मवेळेतल्या केवळ दोन मिनिटांच्या फरकाने ‘सबलॉर्ड’ बदलतो तिथे हे के.पी. वाले , जन्मवेळेच्या अचुकतेची कोणतीही खात्री नसताना, ह्या असल्या (?) ‘सबलॉर्ड’ वरुन कशाचीही / काहीही उत्तरें देताना आढळतात. केवळ ९ ग्रहाच्या माध्यमातून लाखो आजार आणि त्यांची लक्षणें यांचा वेध अचुकतेने कसा घेता येईल बरे ? जरा स्वत:शीच विचार करु पहा ! सबब आरोग्य विषयक प्रश्नासाठी ज्योतिषशास्त्राचा आधार घेऊ नका , वेळ न दवडता एखाद्या तज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा असे मी सुचवतो.
…………………..नुकतीच एकाने , एका मुलीची जन्मरारीख इ तपशील देऊन ह्या मुलीचे लग्न कधी होईल ही विचारणा केली , प्रश्न विचारणारे ‘कुलकर्णी’ , मुलीचे आडनाव ‘खिंवसरा’ , एक महाराष्ट्रीयन ब्राह्मण तर दुसरी राजस्थानी कशाचा काही मेळ नाही. ह्या कुलकर्ण्यांच्या त्या खिवसरांशी काय संबंध असावा ? मला प्रश्न पडला. मी त्या कुलकर्णींना तसे विचारले, पण समाधान कारक उत्तर मिळाले नाही. मी त्या कुलकर्ण्यांना सांगीतले, प्रश्न खासगी आहे , त्या खिंवसरा मुलीला किंवा तिच्या पालकांना माझ्याशी संपर्क करु देत. कुलकर्णी गायब झाले ! का? मी अर्थातच अशा ‘प्रॉक्सी’ प्रश्नांची उत्तरें सहसा देत नाही. त्यातही विवाहा सारख्या नाजुक प्रश्नांबाबतीत तर मी जास्तच काळजी घेतो.
………………..आता हे शक्य आहे माझे भविष्यकथन चूकू शकते , मी कायमच बरोबर असेन असा दावा कधीच करत नाही. या शास्त्राच्या मर्यादेची तसेच एक व्यक्ती म्हणून माझ्या स्वत:च्या मर्यादांची मला पूर्ण जाणीव आहे. त्यामुळे मी उगाचच पोकळ दावे करणार नाही. अशुभ भविष्य सांगताना तर मी नेहमीच स्वत:शी म्हणत असतो ” माझे भविष्यकथन चुकीचे ठरुन जर का एखाद्याचे चांगले होणार असेल तर माझे भविष्य चुकावेच !.”
………………..ज्योतिष हे दिशादर्शक शास्त्र आहे, त्याचा सुयोग्य वापर केला तर प्रयत्नांना योग्य दिशा देता येते जेणे करुन वेळ, पैसा व मेहेनत यांची बचत तर होते, त्याच बरोबर काय अपेक्षां ठेवायच्या , किती अपेक्षा ठेवायच्या याचा काहीसा अंदाज आल्यामुळे अपेक्षाभंगातून येणार्या निराशेचे प्रमाण ही मोठ्या प्रमाणात कमी होते. पण ज्योतिषशास्त्राचा असा वापर फार कमी होताना दिसतो (भारतात).
नोकरी कधी लागेल ह्या पेक्षा त्या नोकरीत मला समाधान लाभेल का हा खरा मह्त्वाचा प्रश्न , विवाह कधी या पेक्षा तो सुखाचा होईल का हा खरा मह्त्वाचा प्रश्न पण असे मह्त्वाचे प्रश्न कोणीच विचारत नाही ही एक शोकांतिकाच म्हणावी लागेल.
आपल्या भावी वाटचाली करता माझ्या कडून शुभेच्छ. आपल्या प्रयत्नांना यश लाभो हीच ईश्वर चरणीं प्रार्थना.
शुभं भवतु
- ऑन लाईन (लाईव्ह स्ट्रीमिंग) ज्योतिष क्लास - March 24, 2020
- पुण्यात क्लास सुरु ! - February 29, 2020
- Lost & Found ! - February 26, 2020
- बासरीवाला ! - February 6, 2020
- निशाणी बदला… भाग्य बदला – ३ - February 6, 2020
- निशाणी बदला… भाग्य बदला – २ - February 5, 2020
- ‘निशाणी बदला… भाग्य बदला’ - February 5, 2020
- विठ्ठला कोणता झेंडा घेऊ हाती – भाग २ - January 23, 2020
- विठ्ठला कोणता झेंडा घेऊ हाती – भाग १ - January 22, 2020
- प्रश्नकुंडलीची वेळ - January 21, 2020
Khup chhan Gokhale saheb. Thanks
श्री. अशोकजी,
अभिप्राया बद्दल धन्यवाद
सुहास गोखले
Gokhale sahen aapan likhan chalu thewawe, Kaurav 100 hote aani pandav 5 pan te 100 tya 5 chi barobari karu shakat nawhate tar bhaale hi tumhala muthbhar lokancha pratisad milat asel pan to changlach aahe. Tari aamchi ichcha aahe ki apan likhan chalu thewawe.
श्री. अषोकजी,
अभिप्राया बद्दल धन्यवाद .
मी वाचकांच्या प्रतिसादा बद्दल लिहले नव्हते .. प्रतिसाद आले तर हवेतच पण मूळात लिहलेले वाचले गेले तर कोठे तरी प्रतिसादाची शक्यता निर्माण होईल ना ? मी पेज व्हू काऊंटर तपासतो, कोणते लेखन वाचले जाते आहे हे पण कळते , त्या सगळ्यातून एकच दिसते की लिहलेले वाचलेच जात नाही , हीच खरी खंत आहे.
सुहास गोखले
छान स्पष्टीकरण … पण
कोणा एकाची…???
वाट बघतोय..
धन्यवाद गौरवजी , नवी मालका येत आहे लौकरच , थोडे ग्राफिक्स टचअप करतोय
सुहास
Namsakar suhasji
Mastach vyavsayashi pramamik pana .
Chan
Tumacya lekhatu kup chagale margdarshan milage. Sir grah gochari cha abhas Karanyasathi konati pustake chagali aahet tyachi naave sagavi aapala vachav aani aapale class kadhi suru karat aahat.
श्री. उमेशजी,
अभिप्रयाबदल धन्यवाद. ग्रहगोचरीच्या अभ्यासासाठी मराठीत एकही चांगले पुस्तक नाही हे दुर्दैव आहे. इंग्रजीत म्हणजेत पाश्चात्य पद्धतीत ग्रह गोचरी ज्याला ते ट्रांसीट म्हणतात बरीच चांगली पुस्तके आहेत. रॉवर्ट हँड यांचे पुस्तक त्यातल्या त्यात बरे आहे. क्लासेस चालू करयाला जरा वेळ लागेल कारण मी सध्या एका सॉफ्ट्वेअर प्रकल्पा मध्ये जास्त व्यस्त आहे , त्यातून जरा मोकळा झालो कि क्लासेस चालू करेन , आपल्याला तसे कळवेन.
सुहास गोखले
Thanks sir dilelya mahiti baddal .
श्री. उमेशजी ,
धन्यवाद
सुहास गोखले
श्री. सुहासजी ,
फारच छान. व्यवसायाशी प्रामाणिक असणारे फार थोडे असतात , आपण त्यापैकी एक आहात.
जे ऐकायला आवडेल यापेक्षा जे बरोबर आहे ते सांगणारे आहात, आणि हे सर्व नम्रपणे – कुठेही उद्धट पणा किंवा आपल्या ज्ञानाचा गर्व याचा लवलेश ही नाही.
धन्यवाद,
अनंत
श्री. अनंतजी,
अभिप्राया बद्दल धन्यवाद.
सुहास गोखले