“म्हणजे मुद्दाम केलेला अंधार, छता पासुन जमीनी पर्यंत टांगलेले पडदे, चित्र विचित्र आकृत्या चितारलेल्या भिंती, मुखवटे, लोलक, कवटी, हाडे, क्रिस्ट्ल बोल, मॅजीक वँड असे काहीही नाही “

“नाही तसे काहीही नव्हते, साधी एखाद्या ऑफीस केबीन सारखी केबीन“

“अगदी एखादेे काळे मांजर सुद्धा नाही ?”

“मी पाहिले नाही ”


“मिलॉर्ड  कृपया हा मुद्दा नोंद करुन घ्यावा” जॉर्डन ने जज्ज ना सांगीतले..

पुढे चालू …

जॉर्डन ने आपली उलट तपासणी पुढे चालू केली …

“आता मला सांगा आरोपी आपल्याला भेटल्या त्यावेळी त्या कशा होत्या”

“कशा म्हणजे”

“म्हणजे त्यांचा पेहेराव, वागणे , बोलणे  ई.”

“पेहेराव एखाद्या ऑफीस एक्सेक्युटीव्ह सारखा होता, ब्लाऊज, लांब स्कर्ट , केसांना रिबीन ”

“म्हणजे लांबलचक काळा किंवा एखाद्या भडक रंगाचा रोब, गळ्यात माळा , हातात अंगठ्या असे काही नव्हते ?”

“छे छे असे काहीही नव्हते “

“आश्चर्य आहे , आपण एका फॉरच्युन टेलर ला भेटतोय की एखाद्या बिझनेश एक्सेक्युटीव्ह ला असा प्रश्न पडला असेल  ना?”

“मला सांगता येणार नाही”

“असे कसे म्हणता आपण एकंदर १८ फॉरच्युन टेलिंग करणार्‍या व्यक्ती चा तपास केला आहे  ना?”

“हो”

“मग आरोपी कोणत्याही प्रकारे या १८ फॉरच्युन टेलिंग करणार्‍या व्यक्तीं शी साम्य राखून होत्या”

“नाही”

“मिलॉर्ड हा कृपया मुद्दा नोंद करुन घ्यावा”
जॉर्डन ने जज्ज ना सांगीतले.

“तरीही तुम्हाला आश्चर्य वाटले नाही, शक करायचा आपला पेशा असला तरी ही नाही”

“नाही”

“ठीक आहे , आता आपले आणि आरोपींचे काय बोलणे झाले या कडे वळूया , चालेल?”

“चालेल”

“तर मग सांगा पुढे काय झाले?”

“सुरवातीचे हाय हॅलो झाल्यावर मी आरोपींना माझा प्रश्न सांगीतला”

“कोणता”

“आर्थिक बाबी बद्दल”

“म्हणजे नेमका काय प्रश्न विचारला ?”

“प्रश्न असा होता ‘माझी आर्थिक स्थिती कधी सुधारेल? ”

“वा अगदी नेमका प्रश्न विचारला म्हणायचा”

‘मला असे वाटत नाही, काहीतरी विचारायचे म्हणून एक प्रश्न विचारला इतकेच”

“ठीक आहे , मग पुढे काय झाले”

“आरोपीने  माझी काही माहीती विचारली”

“कोणती माहीती”

“माझी जन्मतारीख, जन्मवेळ आणि जन्मगाव”

“बस इतकेच?”

“इतकेच,  जास्त काही त्यांनी विचारले नाही आणि मी काही जादाचे सांगीतले नाही”

“तुम्ही दिलेली माहीती खरी होती?”

“हो”

“आणि प्रश्न?”

“तो ही खरा”

“आश्चर्य आहे , बरे ते असो, मग पुढे काय झाले”

“आरोपीने कागदाच्या पॅड वर एक आकृती काढली आणि नंतर काही गणिते करुन त्या आकृतीत काही सिम्बॉल्स काढले “

जॉर्डन ने एका कागदावर टाइप केलेली एक सँपल जन्मपत्रिका अ‍ॅडली समोर धरली आणि म्हणाला ..

“हे असे काही होते का”

“हो अगदी असेच दिसणारे काहीतरी त्यावेळी एका कागदावर चितारले होते”

“मिलॉर्ड कृपया हा मुद्दा नोंद करुन घ्यावा”

जॉर्डन ने जज्ज ना सांगीलते..

“बरे पुढे काय झाले”

“आरोपींने थोडा वेळ विचार केला , हातच्या बोटावर काही गणीते केली “

“काही मंत्र म्हणले का?”

“नाही’

“मग किमान तुमच्या डोक्यावरुन काही वस्तु फिरवली ?”

“नाही”

“आकाशा कडे हात करुन कोणाला आवाहन करत आहे किंवा कोणाशी संवाद साधत आहे असा अभिनय केला”

“नाही”

“कोणा देवाची प्रार्थना केली”

“नाही’

“क्रिस्ट्ल बॉल मध्ये बघितले?”

“नाही, तिथे क्रिस्ट्ल बॉल नव्हताच”

“ऊत्तम, यातले काहीही आरोपी करत नव्हता तर मग नेमके काय चालू होते त्या वेळी”

“असे काहीही नाही, आरोपी ने फक्त समोरच्या कागदा कडे बघुन काही विचार केला”

“किती वेळ”

“माझ्या अंदाजा प्रमाणे दहा एक मिनिटें”

“आणि मग काय झाले”

“आरोपीने माझ्या प्रश्नाचे उत्तर दिले”

“काय उत्तर होते ते?”

“इथुन पुढे वर्षभर आर्थिक अडचणीं आहे तशाच राहतील किंबहुना त्यात थोडीशी वाढच होईल मात्र वर्षा नंतर आर्थिक बाबतीत सुधारणा व्हायला सुरवात होऊन सुमारे दोन वर्षां नंतर आर्थिक स्थितीत चांगला मोठा बदल झालेला दिसेल”

“आरोपींने आणखी काही सांगीतले ?”

“नाही”

“बस इतकेच”

“हो इतकेच , मिटींग संपली’

“हो”

“त्यानंतर तुमचे आणि आरोपीचे कोणतेही बोलणे झाले नाही”

“नाही, मी आरोपीला एक शिष्टाचार म्हणून अभिवादन केले आणि निघून गेलो”

“आरोपी ने तुम्हाला जे सांगीतले त्याला तुम्ही फॉरचुन टेलींग म्हणता?”

“फॉरचुन टेलींग  किंवा अन्य कोणता आरोप फ्रेम करणे माझे काम नाही ते न्युयॉर्क पोलिस डिपार्टमेंट चे काम असते”

“मग आपले काम काय होते?”

“मी पोलीस डिटेक्टीव्ह आहे, तपास करणे हे माझे काम असते, आरोपी फॉरच्युन टेलींग करतात असा संशय होता त्याची शहानिशा करुन रिपोर्ट द्यायचा “

“ते तुम्ही ठीक पद्धतीने केले आहेत असे दिसते”

“तो माझ्या कर्तव्याचा भाग होता”

“धन्यवाद मि अ‍ॅडली , आपली उलटतपासणी संपली आपण जाऊ शकता “

“धन्यवाद”

अ‍ॅडली च्या साक्षीने दोन मुद्दे भक्कम पणे समोर आले होते ते म्हणजे

“बाईंचे ऑफीसची जागा, ऑफीस, काम करायची पद्धत, बाईंचा पेहराव, वागणे सर्व काही एखाद्या बिझनेस वुमन सारखे होते, कोणत्याही प्रकारे ते ‘फ़ोरच्युन टेलर्स’ सारखे नव्हते”

आणि

“बाई नी केलेले मार्गदर्शन हे जातकच्या पत्रिकेचा अभ्यास करुन केले होते. हे देखील त्या काळातल्या फ़ोरच्युन टेलर्स’ च्या कार्यपद्ध्तीच्या अगदी टोकाचे विरुद्ध होते”

बाईंनी ही केस मुद्दाम लढवायची ठरवली होती त्याचा पहीला टप्पा यशस्वी पणे पार पडला होता.

बाईंनी आपल्या आत्मचरित्रात नोंदवले आहे:

“I ordered him (Clark L. Jordan – Defense attorney) not to get the case thrown out, but to have it tried thoroughly, so that a decision affirming her practice could be entered into case law. “

पण दुसरा टप्पा मात्र खुपच अवघड होता या टप्प्या बद्दल बाईंनी आपल्या आत्मचरित्रात नोंदवले आहे:

“The scientific status of my astrology was central to my arguments, and to the judge’s
deciding that it was not fortune telling”

बाईंच्या वकिलाने म्हणजे जॉर्डन ने नोंदवले आहे:

“I decided to argue that Adams did not pretend to or claim actually to reveal particular
future events. All that occurred was an attempt on Adams’s part to explain the positions of the planets and read their individuations without any assurance by the defendant that such reading was a prognostication of future events.”

त्याने पुढे असेही लिहून ठेवले आहे:

“To substantiate our argument, we attempted to articulate the scientific status of the practice by highlighting its repeatability, verifiability, its community of scholars, its causal model, and other norms that they thought made Adams a competent analyst of present conditions to guide future action. “

बाईंची  व्युह रचना अशी होती : बाई जे सांगतात ते ज्योतिषशास्त्रीय अंदाज असतात , हे ज्योतिषशास्त्र हे एक शास्त्र आहे आणि ते आधीच सुस्थापीत झालेल्या आणि सर्वमान्य असलेल्या  गणित, तर्कशास्त्र आणि खगोलशास्त्र यांच्या पायावर भक्कम पणे उभे आहे.  ग्रहगोलांच्या हालचालींचा विश्वासार्ह तपशील, हजारों वर्षाची परंपरा, आणि अनेक नामवंतानी ह्या क्षेत्रात केलेले संशोधन ही या ज्योतिषशास्त्राची बैठक आहे. या मुद्द्यांच्या आधारावर ‘ज्योतिषशास्त्र हे एक प्रस्थापीत शास्त्र असून ते ‘फॉरच्युन टेलिंग’ या गटात मोडत नाही.

बाईंनी आणि जॉर्डन ने जंगी तयारी केली.

पार बॅबिलोनियन काला पासुन आजच्या काळा पर्यंतक्जे अक्षरश: शेकडो संदर्भ ग्रंथ त्यांनी कोर्टात हजर केले.

बाई आपल्या आत्मचरित्रात लिहतात:

“I had gone into that court room with a pile of reference books that reached nearly to the ceiling and a mass of evidence that reached as far back as the Babylonian seers”

दुसरा दिवस उजाडला.

अ‍ॅडलीची साक्ष संपल्याने आता  सरकारी वकिलांनी बाईंना विटनेस बॉक्स मध्ये बोलावले.

सरकारी वकिलांच्या प्रश्नांची सरबत्ती सुरु झाली.

“मिस अ‍ॅडॅम्स, तुमच्या वर ‘तुम्ही फ़ॉरच्युन टेलींग करता’ हा आरोप आहे हे आपल्याला मान्य आहे ?”

“नाही”

क्रमश:

शुभं भवतु

 


About सुहास गोखले

मी सुहास गोखले या वेब-साईटचा निर्माता. आपल्याला ज्योतिष विषयक मार्गदर्शन हवे असल्यास किंवा आपली एखादी सुचना / तक्रार असेल तर खाली दिलेल्या 'संपर्क फॉर्म' मध्ये माहीती भरुन पाठवल्यास मी ताबडतोब आपल्याशी संपर्क साधेन.
+1

सुहास गोखले administrator

मी सुहास गोखले या वेब-साईटचा निर्माता. आपल्याला ज्योतिष विषयक मार्गदर्शन हवे असल्यास किंवा आपली एखादी सुचना / तक्रार असेल तर खाली दिलेल्या 'संपर्क फॉर्म' मध्ये माहीती भरुन पाठवल्यास मी ताबडतोब आपल्याशी संपर्क साधेन.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.