“मी का म्हणून माफी मागायची? उभी हयात मी ज्योतिषशास्त्राचा अभ्यास करण्यात घालवली आहे. मला शिक्षा झाली तरी बेहत्तर पण मी माघार घेणार नाही “

“जशी आपली मर्जी”

या वेळेला माघार नाही, हा खटला लढवायचा आणि जिंकायचाच असा ठाम निर्धार बाईं नी केला आणि …

कोर्टात खटला उभा राहीला

पुढे चालू …

या लेखमालेतले पहीले भाग इथे पहा ..

Evangeline Smith Adams – 6

Evangeline Smith Adams – 5

Evangeline Smith Adams – 4

Evangeline Smith Adams – 3

Evangeline Smith Adams – 2

Evangeline Smith Adams – 1

 

बाईं  वर १८२४ च्या व्हॅग्रान्सी कायद्याच्या ‘फॉरच्युन टेलिंग प्रतिबंध’ कायदा  ( The anti-fortune-telling clause of the 1824 Vagrancy Act ) आणि न्युयॉर्क कोड ऑफ क्रिमीनल प्रोसीजर कोड च्या कलम ८८९ अंतर्गत खटला दाखल झाला होता.

“individuals who abandoned their wives or children and left them a burden on the public;
“persons pretending to tell fortunes, or where lost or stolen goods may be found;” keepers of
“bawdy houses;” those who had no visible profession but sustain themselves through gaming;
and “jugglers, common showmen, mountebanks, who exhibit or perform for profit puppet shows, wire or rope dancers, or other idle shows, acts or feats.”

या कायद्या अंतर्गत बाई  ‘फॉरच्युन टेलिंग’  हा व्यवसाय करत होत्या असा आरोप करण्यात आला होता.

न्युयॉर्क शहर पोलिसांच्या एका डिटेक्टीव्ह ज्याचे नाव अ‍ॅडॅली प्रेईस (Adele Preiss) कडे ह्या स्टींग ऑपरेशनची कामगीरी सोपवण्यात आली होती. अ‍ॅडॅलीने वेषांतर करुन ज्योतिष पाहण्याच्या बहाण्याने रितसर पैसे भरुन बाईंची अपॉईंट्मेंट घेतली , कार्नेजी हॉल सारख्या अतिप्रतिष्ठीत भागातल्या ऑफीस मध्ये अ‍ॅडली ने बाईंना भेटुन ज्योतिष विचारले. आवश्यक ते पुरावे गोळा केले.

बाईंनी , क्लार्क जॉर्डन (Clark L. Jordan) सारख्या बलाढ्य वकिला कडे केस सोपवली. जॉर्डन ने बाईं ना आरोप मान्य करा आणि सुटका करुन घ्या असा सल्ला दिला पण बाईंनी तो ऐकला नाही.

“ही केस लढवायचीच”

“पण मॅडम आपण जिंकण्याची शक्यता कमी आहे,  खटला उभा राहीला तर आपली नाहक बदनामी होईल आणि आपल्या व्यवसाया वर त्याचा मोठा प्रतिकूल परिणाम होईल. “

“चालेल पण आपण ही केस लढवायची आणि जिंकायची पण आहे, कोणत्यातरी जुनाट कायद्याचा आधार घेत ज्योतिषांवर आरोप होत आहेत , शिक्षा होत आहेत , हे कोठे तरी थांबले पाहीजे आणि ते मीच करु शकते . माझ्या कडे उत्तम बचाव आहे आणि अशी केस लढवायला लागणारा पैसा,  यां दोन्हींचा वापर करुन आपण ही केस अशा निर्विवाद पद्धतीने जिंकायची की पुढे जाऊन या खटल्याचा निकालाचा दाखला देत ज्योतिषांची या असल्या निर्बुद्ध आरोपांतून सुटका होऊ शकेल, ज्योतिषशास्त्रा साठी आपण हे करायचेच आहे”

बाईंनी आपल्या आत्मचरित्रात लिहले आहे:

“In those days “astrology had no legal standing in the great state of New York. It ranked with fortune telling, palm reading, and other much abused experiments with the occult; and its exponents were open to arrest and prosecution.”

न्युयॉर्क च्या सिटी कोर्टात न्यायमुर्ती  जॉन फ्रेस्की ( John Freschi ) यांच्या पुढ्यात ह्या खटल्याचे कामकाज सुरु झाले,

खटल्याचा सुरवात “a prophecy of future events involving a negative or affirmative deception by a person professing to tell fortunes constitutes a violation of Section 889 Code of Criminal Procedure,” या मुद्द्यावरुन सुरु झाली.

बाईं नी वकिल जॉर्डन शी चर्चा करुन आपले बचावाचे मुद्दे तयार केले होते.

पहीला मुद्दा होता:

“If someone “prepares a astrological horoscope of one applying therefor and gives the relative position of planets at the time of his/her birth basing the horoscope on the well-known and fixed science of astronomy it is not a violation of law.”

आणि दुसरा मुद्दा होता

त्या काळातले ‘फॉरचुन टेलर्स’ हे स्वत:कडे काही दैवी शक्ती आहे असे दावा करायचे , त्यांचे कपडे , वागणे , बोलणे , त्यांची काम करण्याची जागा या सार्‍यांत एक प्रकारचे गुढतेचे वलय असायचे , अंधार, चित्रविचित्र आकृत्या, उग्र सुगंध (धुप ?)  , पायघोळ झगे (कफनी ?) , माळा ( रुद्राक्ष ?) , क्रिस्टल बॉल, काळे मांजर , कवट्या – हाडे , वनस्पती, चित्रविचित्र आवाज, किंचाळणे, लांब केस / दाढी , विचित्र हातवारे, आकाशातल्या देवांना केलेली आवाहने , अंमली पदार्थांचा मुक्त वापर ( सतत गांजाची चिलिम ओढणारे महाराज  ?) असे बरेच काही ह्या ‘फॉरचुन टेलर्स’  कडे बघायला मिळत असे , बरेच ‘फॉरचुन टेलर्स’  हे जुनाट , अंधार्‍या जागेत , बोळकंडीत, तळघरात किंवा एखाद्या निर्जन भागात , उंच टेकडीवर , मठ  / आश्रम ( श्री क्षेत्र ?) सदृश्य जागेत आपला व्यवसाय करत असत.

(पहा , आपल्याकडचे मृत  / जिवंत  बुवा-बापू-अण्णा- स्वामी – महाराज – ताई – माई – अक्का – देवी- अनंत कोटी ब्रम्हांड नायक , यांच्यात आणि ह्या ‘फॉरचुन टेलर्स’ मध्ये कमालीचे साम्य आहे कि नाही ?)

बाई असले काहीही  करत नव्हत्या , आपल्या क्लायंटस ना जे काही सांगत असत ते कोणत्या अनामिक शक्तींच्या आधारे नाही तर खगोल शास्त्रा सारख्या सर्व मान्य आणि प्रस्थापित शास्त्रा वर आधारीत होते ( “well known and fixed science of  astronomy” ).

हे दोन मुद्देच बाईं ना ‘फॉरच्युन टेलर्स’ पासुन वेगळ्या ठरवणार होते.

या खटल्यातला एकमेव साक्षीदार होता डिटेक्टीव्ह अ‍ॅडॅली प्रेईस, ही साक्ष अत्यंत महत्वाची होती.

अ‍ॅडलीने साक्ष देताना सरतपासणीत तो  बाईंना कसा भेटला , बाईंना काय विचारले . बाईंनी काय उत्तर दिले आदी सारा तपशील व्यवस्थित कोणताही गोंधळ किंवा विसंगती न  होऊ होता सादर केला.

जॉर्डन ने उलट उलटतपासणी सुरु केली…

“आरोपी अ‍ॅडॅम्स ना आपण ओळखता का?”

“हो”

“कसे“

“मी त्यांना भविष्य विचारायला गेलो होतो”

“तुम्ही त्यांना त्यापूर्वी ओळखत होता?”

“नाही, त्यापुर्वी मी फक्त त्यांचे नाव ऐकून होतो इतकेच”

“काय ऐकून होतात ?”

“हेच की त्या ‘फॉरचुन टेलर’ आहेत आणि ‘फॉरचुन” सांगतात”

“नक्की ?”

“मला तसा संशय होता”

“असा संशय कसा निर्माण झाला”

“त्यांची पॅम्फ्लेटस वाचून”

“पण त्यांच्या पॅम्फ्लेटस मध्ये फॉरच्युन टेलिंग’ असा कोणता उल्लेख आहे?”

“मला सांगता येणार नाही”

“तरीही आपल्याला शंका आली”

“शक करना मेरा पेशा है “

इथे जॉर्डन ने बाईंची पॅम्फ्लेटस पुरावे म्हणून कोर्टात सादर केले.

“जजसाहेब , माझ्या अशिलांनी प्रसिद्ध केलेली पॅम्प्लेट्स आपल्या समोर सादर केली आहेत , त्यात कोठेही फॉरच्युन टेलींग असा प्रत्यक्ष  अप्रत्यक्ष उल्लेख नाही किंबहुना तसा कोणाचा समज हवा असा कोणताही मजकूर / वाक्यरचना त्यात नाही , तरीही फक्त संशयाच्या आधारावर माझ्या अशिलाला या खटल्यात गोवण्यात आले आहे. माझ्या अशिलाला नाहक बदनाम करण्याची एक साजीस रचण्यात आली आहे त्याचा हा एक भाग आहे”

जजसाहेबांनी त्या पॅम्प्लेट्स कडे ओझरती नजर टाकून , खटलाचे कामकाज पुढे चालू ठेवण्याचा इशारा केला.

“ठीक आहे, मि अ‍ॅडली, आता पुढे काय झाले ते सांगू शकाल”

“ते सर्व मी सरतपासणीत आधीच सांगीतले आहे”

“शक्य आहे पण पुन्हा एकदा ते कोर्टा समोर सांगायला काय हरकत आहे”

“मी आरोपीला फोन करुन त्यांची अपॉईंटमेंट घेतली”

“पुढे ?”

“ठरलेल्या दिवशी मी आरोपीची त्यांच्या ऑफीसात भेट घेतली”

“हे ऑफिस कोठे आहे किंवा तुम्ही आरोपीला भेटलात ती जागा कोठे होती ?”

“कार्नेजी हॉल”

“बापरे , कार्नेजी हॉल म्हणजे न्युयॉर्क मधली एक अति प्रतिष्ठीत जागा !”

“असे म्हणता येईल”

“सामान्यत: फॉरच्युन टेलिंग करणार्‍या व्यक्ती अशा पॉश आणि  महागड्या जागेत अ‍ॅफिस थाटून असतात?”

“मला सांगता येणार नाही“

“मि. अ‍ॅडॅली , पोलिस मुख्यालया तुन मिळालेल्या रेकॉर्ड नुसार तुम्ही गेल्या दोन वर्षात एकंदर १८ फॉरच्युन टेलिंग करणार्‍या व्यक्तींं चा तपास केला आहे, खरे ना?”

“हो”

“मग त्या सर्व १८ फॉरच्युन टेलर्स ची ऑफिसेस अशाच पॉश एरियात होती ?”

“नाही”

“मग कोठे होती”

“बहुतांश लोक न्युयॉर्कच्या अंधार्‍या गल्ली बोळात, तळघरात किंवा एखाद्या निर्जन भागात आपला व्यवसाय करत असताना सापडले”

“म्हणजे आरोपी ह्या  एकमेव अशा की ज्यांचे  ऑफिस न्युयॉर्क च्या अत्यंत पॉश मानल्या जाणार्‍या आणि महागड्या जागेत होते”

“आरोपी चे ऑफीस एका पॉश आणि महागड्या जागेत होते इतकेच म्हणता येईल.”

“ठिक आहे, आता मला सांगा, आरोपीच्या ऑफिसात काय पाहीले”

“काय पाहणार , एका बिझनेस आस्थापने सारखे ऑफिस होते ते , बाहेर रिसेप्शन , ग्राहकांना बसायला जागा, पुस्तकांनी भरलेली कपाटें , तीन – चार टायपिस्ट आणि आतल्या एका केबीन मध्ये आरोपीची बसण्याची जागा “

“वा, अगदी हुबेहुब वर्णन केलेत आपण , तसुभरही चुक नाही”

“मी पोलिस डिटेक्टीव्ह आहे”

“अच्छा जसे शक करना आपका पेशा है तसे निरिक्षण करना भी आपका पेशा है “

“तसे समजा हवे तर”

“थोडक्यात आरोपीचे ऑफीस हे एखाद्या बिझनेस सारखे होते”

“हो”

“म्हणजे असेही म्हणता येईल की आरोपीचे ऑफीस एखाद्या फॉरच्युन टेलर च्या कामाच्या जागे प्रमाणे नव्हते “

“मला असे ठोस अनुमान काढता येणार नाही”

इथे जॉर्डन ने बाईं च्या ऑफीसची  काही प्रकाशचित्रे पुरावे म्हणून कोर्टात सादर केली .

“ठीक आहे , मघाशी तुम्ही म्हणालात की आरोपी साठी स्वतंत्र केबीन होती?”

“हो”

“तिथे काय पाहिले”

“ऑफीस टेबल, बसायला खुर्च्या, पुस्तकें आणि फाईल्स नी भरलेले रॅक्स “

“बस इतकेच”

“हो”

“बघा आठवून नीट”

“मी सांगीतले तितकेच त्या केबीन मध्ये होते”

“म्हणजे मुद्दाम केलेला अंधार, छता पासुन जमीनी पर्यंत टांगलेले पडदे, चित्र विचित्र आकृत्या चितारलेल्या भिंती, मुखवटे, लोलक, कवटी, हाडे, क्रिस्ट्ल बोल, मॅजीक वँड असे काहीही नाही “

“नाही तसे काहीही नव्हते, साधी एखाद्या ऑफीस केबीन सारखी केबीन“

“अगदी एखादेे काळे मांजर सुद्धा नाही ?”

“मी पाहिले नाही ”


“मिलॉर्ड  कृपया हा मुद्दा नोंद करुन घ्यावा” जॉर्डन ने जज्ज ना सांगीतले..

……….

………

 

क्रमश:

 

शुभं भवतु


About सुहास गोखले

मी सुहास गोखले या वेब-साईटचा निर्माता. आपल्याला ज्योतिष विषयक मार्गदर्शन हवे असल्यास किंवा आपली एखादी सुचना / तक्रार असेल तर खाली दिलेल्या 'संपर्क फॉर्म' मध्ये माहीती भरुन पाठवल्यास मी ताबडतोब आपल्याशी संपर्क साधेन.
+3

सुहास गोखले administrator

मी सुहास गोखले या वेब-साईटचा निर्माता. आपल्याला ज्योतिष विषयक मार्गदर्शन हवे असल्यास किंवा आपली एखादी सुचना / तक्रार असेल तर खाली दिलेल्या 'संपर्क फॉर्म' मध्ये माहीती भरुन पाठवल्यास मी ताबडतोब आपल्याशी संपर्क साधेन.

4 प्रतिक्रिया

///////////////
 1. koushal

  Are you referring to Swami Samarth in your post above at the place where you have written… (अनंत कोटी ब्रम्हांड नायक )?

  0
  1. सुहास गोखले

   श्री कौशलजी,

   ‘अनंत कोटी ब्रम्हांड नायक’ आचार्य प्र के अत्रे यांच्या गाजलेल्या ‘तो मी नव्हेच’ या नाटकातुन उचलले आहे , त्या नाटकातला लखोबा / दिवाकर दातार अशी विविध रुओपे घेऊन बायकांची फसवनून करणारे पात्र एक म्हाराज बनुन पण फसतव्ततअसते त्याला लोक हे असले काही अनंत कोटी ब्रम्हांड नायक म्हणत असतात.

   यात कोणाच्या श्रद्धा स्थानांना धक्क लावयचा हेतु नव्हता

   बाकी आपला समाज या खर्‍या / खोट्या बुवा. बापू, स्वामी , महाराह, राणा यांच्या जोखडातून जितक्या लौकर बाहेर पडेल तितके चांगले असे माझे मत आहे

   सुहास गोखले

   0
   1. koushal

    Yes, i have seen that drama… its quite close to reality. There are lot of people who claim to be someone or something with extra power… How people trust and blindly follow them is beyond my comprehension

    0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.