हॉटेल विन्सर  बेचिराख झाले खरे पण त्या राखेतुनच अमेरिकन ज्योतिष जगतात पुढे तब्बल ३० वर्षे तळपणारा तारा उदयास आला ………….. ‘इव्हांजेलीन अ‍ॅडॅमस!

पुढे चालुु  ….

या लेखमालेतले पहीले भाग इथे पहा ..

Evangeline Smith Adams – 5

Evangeline Smith Adams – 4

Evangeline Smith Adams – 3

Evangeline Smith Adams – 2

Evangeline Smith Adams – 1


वि
न्सर हॉटेलच्या आगीने बाईंना रातोरात देशभर न  भूतों न भविष्यती अशी प्रसिद्धी मिळाली आणि बाईंचे दुकान जोरात सुरु झाले. मी दुकान हा शब्द वापरला म्हणुन दचकू नका , खरोखरीच बाईंनी दुकानच खोलले होते आणि पुढे जाऊन त्याचा चक्क कारखाना झाला !

हे काय आणि कसे या बद्दल आपण नंतरच्या काही भागांतून विस्ताराने बोलूच पण त्या आधी आपण या १८९९ च्या विन्सर हॉटेल च्या आगीतुन  बाहेर पडून चक्क १५ वर्षे पुढे जाऊ ,  म्हणजे वर्ष १९१४ मध्ये !

हे वर्ष बाईंच्या आयुष्यातच नव्हे तर उभ्या अमेरिकेच्या ज्योतिष विश्वा साठी अत्यंत महत्वपूर्ण ठरले, मैलाचा दगड ठरले , क्रांतीकारी ठरले , विस्मयकारी ठरले, पथदर्शी ठरले, वादळी ठरले , अभूतपूर्व ठरले, खळबळजनक ठरले आणि काय काय ठरले कोणास ठाऊक !

वर्ष १९१४ मध्ये बाई ना अटक झाली !

१९१४ साला उजाडे पर्यंत बाई इतक्या प्रसिद्ध / सेलेब्रटी झाल्या होत्या की बाईंना हात लावायच्या आधी अमेरिकन ‘आबांच्या’ पोलीसांना दहा वेळा विचार करावा लागला असता , पण एके दिवशी मात्र असा विचार झाला आणि बाई एके दिवशी गजा आड झाल्या !

आता बाईंना अटक करायला कारण काय ? ना बाईंचे कोणाशी भांडण , ना बाईंनी कोणाला फसवले ना कोणता घोट्टाळा! बाईंचे दुकान न्युयॉर्क शहराचे सर्व कायदे कानू पाळून चालू होते , बाईंच्या नोकरांना रोजच्या रोज पगार दिला जात होता, बाई आपल्या आर्थिक उत्पन्नांवर कर भरत होत्या. सगळे काही सुरळीत होते  मग त्या ‘आत’ का गेल्या!

हितशत्रुंच्या कारवाया दुसरे काय?

बाईंचे हे नेत्रदिपक यश न बघवणारे असतील ना कोणी तरी न्युयॉर्क शहरात , झाले इकडून तिकडुन दबाव आणून , मंत्रालयातल्या ओळखीचा वापर करुन , तिथल्या गृहखात्याच्या ‘आबां’ ना  (किंवा नानांना असेल !) भरीस घालून बाईं  ना खडी फोडायला पाठवायचा कट शिजला. बाईं कडून हप्ता भेटत नाही  म्हणून न्युयॉर्क चे पोलिस ही डूक धरुन होतेच. मौका भी था और दस्तुर भी !

बाई तशा चलाख , कायद्याच्या कोणत्याही प्रकारे भंग होऊ नये याची त्या पुरेपुर दक्षता घेतच होत्या. तज्ञ वकिलांचा फौजफाटा त्यांच्या दिमतीस होता , बाईं ना तशी कोणती भिती नव्हतीच , ‘आपण बरे आपले ज्योतिष बरे’ (‘आपण बरे आपली क्वार्टर बरी ‘ ची आठवण येते ना ?)  असे सारे सुखाने चालू होते . पण पडायचा तो मीठाचा खडा पडलाच !

त्या काळातले न्युयॉर्क शहरातले  कायदे कानू जरा वेगळे होते (अमेरिकेत हे असले प्रकार फार ) त्यातला एक कायदा फॉरच्युन टेलींग’ बद्दल होता. आता हे ‘फॉरच्युन टेलींग’ म्हणजे काय तर  ‘भविष्य सांगणे !”

न्युयॉर्क शहरात ‘भविष्य सांगणे’ या प्रकाराला बंदी होती, भविष्य सांगणे मग ते कोणत्याही प्रकाराने का असेना न्युयॉर्क शहरात  तो कायद्यानुसार गुन्हा मानला जात होता.

या बाबतीत ‘न्युयॉर्क शहराचा कायदा काय म्हणत होता ?

“For a fee or compensation which s/he directly or indirectly solicits or receives, s/he claims or pretends to tell fortunes, or holds himself/herself out as being able, by claimed or pretended use of occult powers, to answer questions or give advice on personal matters or to exorcise, influence or affect evil spirits or curses. ”

पेनुनसाल्विया राज्याचा कायदा याहुन ही अधिक स्पष्ट होता / आहे :

A person is guilty of a misdemeanor of the third degree if he pretends for gain or lucre, to tell fortunes or predict future events, by cards, tokens, the inspection of the head or hands of any person, or by the age of anyone, or by consulting the movements of the heavenly bodies, or in any other manner, or for gain or lucre, pretends to effect any purpose by spells, charms, necromancy, or incantation, or advises the taking or administering of what are commonly called love powders or potions, or prepares the same to be taken or administered, or publishes by card, circular, sign, newspaper or other means that he can predict future events, or for gain or lucre, pretends to enable anyone to get or to recover stolen property, or to tell where lost property is, or to stop bad luck, or to give good luck, or to put bad luck on a person or animal, or to stop or injure the business or health of a person or shorten his life, or to give success in business, enterprise, speculation, and games of chance, or to win the affection of a person, or to make one person marry another, or to induce a person to make or alter a will, or to tell where money or other property is hidden, or to tell where to dig for treasure, or to make a person to dispose of property in favor of another.

अमेरिकेत आणि युरोप मध्ये असे कायदे प्रचलित आहेत. या कायद्या नुसार शिक्षा पण झाल्या आहेत ,

किती मार्गांनी ‘फॉरच्युन टेलींग’ करता येते ?

ही एक यादी नमुन्यां दाखल !

 1. Alectromancy: by observation of a rooster pecking at grain
 2. Astrology: by the movements of celestial bodies.
 3. Astromancy: by the stars.
 4. Augury: by the flight of birds.
 5. Bazi or four pillars: by hour, day, month, and year of birth.
 6. Bibliomancy: by books; frequently, but not always, religious texts.
 7. Cartomancy: by playing cards, tarot cards, or oracle cards.
 8. Ceromancy: by patterns in melting or dripping wax.
 9. Chiromancy: by the shape of the hands and lines in the palms.
 10. Chronomancy: by determination of lucky and unlucky days.
 11. Clairvoyance: by spiritual vision or inner sight.
 12. Cleromancy: by casting of lots, or casting bones or stones.
 13. Cold reading: by using visual and aural clues.
 14. Crystallomancy: by crystal ball also called scrying.
 15. Extispicy: by the entrails of animals.
 16. Face reading: by means of variations in face and head shape.
 17. Feng shui: by earthen harmony.
 18. Gastromancy: by stomach-based ventriloquism (historically).
 19. Geomancy: by markings in the ground, sand, earth, or soil.
 20. Haruspicy: by the livers of sacrificed animals.
 21. Horary astrology: the astrology of the time the question was asked.
 22. Hydromancy: by water.
 23. I Ching divination: by yarrow stalks or coins and the I Ching.
 24. Kau cim by means of numbered bamboo sticks shaken from a tube.
 25. Lithomancy: by stones or gems.
 26. Necromancy: by the dead, or by spirits or souls of the dead.
 27. Nephelomancy: by shapes of clouds.
 28. Numerology: by numbers.
 29. Oneiromancy: by dreams.
 30. Onomancy: by names.
 31. Palmistry: by lines and mounds on the hand.
 32. Parrot astrology: by parakeets picking up fortune cards
 33. Paper fortune teller: origami used in fortune-telling games
 34. Pendulum reading: by the movements of a suspended object.
 35. Pyromancy: by gazing into fire.
 36. Rhabdomancy: divination by rods.
 37. Runecasting or Runic divination: by runes.
 38. Scrying: by looking at or into reflective objects.
 39. Spirit board: by planchette or talking board.
 40. Taromancy: by a form of cartomancy using tarot cards.
 41. Tasseography or tasseomancy: by tea leaves or coffee grounds.
 42. Ureamancy: by gazing upon the foamy froth of urine created within water.

आहे ना कमाल ! 

आजच्या तारखेला देखील न्युयॉर्क राज्यात ‘फॉरच्युन टेलिंग’ हा गुन्हा (a class B misdemeanor) मानला जातो आणि त्याला ’ ९० दिवसांचा तुरुंगवास किंवा $५०० दंड  किंवा दोन्हीही’ अशी शिक्षा आहे.

आजचा न्युयॉर्क स्टेट लॉ म्हणतो:


“The law prohibits anyone from claiming to the ability to tell fortunes, exorcise curses, or manipulate occult powers except “as part of a show or exhibition solely for the purpose of entertainment or amusement.”

अर्थात हा कायदा तसा कागदावरच आहे , प्रत्यक्षात या कायद्याचा वापर फार कमी वेळा झालेला आढळतो . काही मोठ्ठा फ्रॉड झाला असेल तरच ! या संदर्भातली एक केस मी एका वेगळ्या लेखात आपल्या समोर सादर करेन!!

न्युयॉर्क स्टेट लॉ मधील वाक्य रचना पाहील्यावर लक्षात येईल की यातला ‘entertainment or amusement’ हा उल्लेख एक मस्त पळवाट आहे, entertainment or amusement नावाखाली काही सांगीतले तर ते ‘फॉरच्युन टेलिंग’ मध्ये मोडत नाही !

मी माझ्या सर्व क्लायंट्स ना माझे डिस्क्लेमर (Disclaimer) पाठवत असतो ते वाचून , समजाऊन घेऊन मगच त्यांनी माझी सेवा विकत / फुकट घ्यावयाची असते त्या माझ्या डिस्क्लेमर मध्ये माझी वाक्यरचना अशीच आहे:

“Birth Charts,  Astrological  Reports, Astrological Remedies and any Advice / Recommendations henceforth collectively called as  ‘Service’ , offered by Suhas Gokhale is for Entertainment purposes only and should be taken strictly as guidelines.”


असो,  बरेच विषयांतर झाले …

कायद्याने बंदी घालून ‘गुटखा’ संपला का?  डान्स बार बंद झाले का? आणि त्या ५०० मिटर बंदीचे (बरोबर ओळखलेत तुम्ही राव !) काय झाले ? अगदी तसेच या फॉरच्युन टेलींग’ बंदीचे पण झाले. मग ‘हप्ता’ मिळाला नाही डान्सबार वर (किंवा ‘त्या’ लॉज वर !) धाड पडते तसे न्युयॉर्क मधल्या ज्योतिषांवर पोलिस धाडी घालायचे तसेच  हप्त्या उकळण्यासाठी  नवी नवी गिर्‍हाईके मिळवण्यासाठी पोलिसांनी खबरें पण पेरलेले असायचे ,  हे खबरे स्टींग ऑपरेशन करायचे (म्हणजे बघा हे स्टींग ऑपरेशन हा प्रकार किती जुना आहे ते !) , कितीही काळजी घेतली तरी एका अशाच स्टींग ऑपरेशन मध्ये बाई सापडल्या! पोलिसांना पुरावा मिळाला ! ‘बाईंना’ आत टाकले!

(आणि मजा म्हणजे ज्या डितेक्टीव्ह ने स्टींग ऑपरेशन केले होते त्याला त्यावेळी बाईंने जे भविष्य सांगीतले होते ते नंतर बरोबर पण आले होते !)

बाईंना अटक व्हायची ही पहीली घटना नव्हती , या आधी त्यांना दोन वेळा अटक झाली होती, एका केस मध्ये फारसा दम नसल्यामुळे बाई सहीसलामत सुटल्या होत्या तर दुसर्‍या केस मध्ये बाईंनी मांडवली केली.

या वेळेला मात्र बाई चांगल्याच कचाट्यात सपडल्या होत्या.

बाईंचे वकील म्हणाले…

“सगळे तुमच्या विरुद्ध आहे, कशाला वाद वाढवत बसता, सरळ माफीनामा लिहून द्या, दंड केला आहे तो भरा आणि व्हा मोकळे “

“पण का?”

“केस जिंकायची १% सुद्धा संधी नाही “

बाईंनी वकिलांचे म्हणणे धुडकाऊन लावले.

“मी का म्हणून माफी मागायची? उभी हयात मी ज्योतिषशास्त्राचा अभ्यास करण्यात घालवली आहे. मला शिक्षा झाली तरी बेहत्तर पण मी माघार घेणार नाही “

“जशी आपली मर्जी”

या वेळेला माघार नाही, हा खटला लढवायचा आणि जिंकायचाच असा ठाम निर्धार बाईं नी केला आणि …

कोर्टात खटला उभा राहीला

क्रमश:

शुभं भवतु


About सुहास गोखले

मी सुहास गोखले या वेब-साईटचा निर्माता. आपल्याला ज्योतिष विषयक मार्गदर्शन हवे असल्यास किंवा आपली एखादी सुचना / तक्रार असेल तर खाली दिलेल्या 'संपर्क फॉर्म' मध्ये माहीती भरुन पाठवल्यास मी ताबडतोब आपल्याशी संपर्क साधेन.
+3

सुहास गोखले administrator

मी सुहास गोखले या वेब-साईटचा निर्माता. आपल्याला ज्योतिष विषयक मार्गदर्शन हवे असल्यास किंवा आपली एखादी सुचना / तक्रार असेल तर खाली दिलेल्या 'संपर्क फॉर्म' मध्ये माहीती भरुन पाठवल्यास मी ताबडतोब आपल्याशी संपर्क साधेन.

6 प्रतिक्रिया

///////////////
 1. Avinash

  जोतिष सांगणे हा गुन्हा आहे याचीच खरेतर कल्पना नसते आणि एखादा गुन्हा आहे म्हणजे पलवाटा नक्कीच असणार interesting !

  0
  1. सुहास गोखले

   धन्यवाद श्री अविनाशजी

   जोतिष सांगणे हा गुन्हा ठरवला गेला त्यामागे बरिच कारणें आहेत ! त्याबद्दल मी एक लेख नक्कीच लिहेन

   सुहास गोखले

   0
 2. Gorakshnath Kale

  sir jyotish shastrala evadha juna itihaas aahe mag ase ka? tyala shastra mhanun ka manyata nahi?

  0
  1. सुहास गोखले

   श्री गोरक्षनाथ जी.
   हा एक फार मोठा विषय आहे मी याबाबत माझ्या ब्लॉग वर लिहले आहे.

   सुहास गोखले

   0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.