“मॅडम, माफ करा पण तुम्ही आमचा वेळ बरबाद करत आहात, आम्ही आपल्याला रुम देऊ शकत नाही. सॉरी”
हताश मनाने बाई हॉटेलच्या बाहेर आल्या.
नकार मिळालेले हे कितवे हॉटेल असावे हे आता मोजायच्या पलीकडे होते..
पुढे चालू …
या लेखमालेतले पहीला भाग इथे पहा ..
या ज्योतिषी बाई होत्या आपल्या लेखाची नायिका इव्हांजेलीन अॅडॅमस!
बाई असतील बोस्टन परगण्यातल्या एका बड्या उमराव घराण्यातल्या पण न्युयॉर्क शहराला त्याचे काय? असे शेकड्यांनी उमराव केव्हाच पचवून बसलेले ते अक्राळ विक्राळ शहर अशा रोज येणार्या – जाणार्या किती उमरावांची गिनती करणार? तेव्हढा वेळ तरी होता का कोणाला?
“बोस्टनात काय बिझनेस रायला नाय “ असे म्हणत (‘नाशकात’ काय बिझनेस रायला नाय असे मी पण म्हणत असतो म्हणा ! ) या बाई न्युयॉर्कला धडकल्या पण न्युयॉर्क मध्ये आपले असे स्वागत होईल याची बाईंना सुतराम कल्पना नव्हती.
सुरवातीला न्युयॉर्कच्या बिझनेस डिस्ट्रीक्ट मधील एखाद्या हॉटेलात वास्तव्य करुन तिथूनच व्यवसाय सुरु करु आणि मग जातकांची गर्दी (!) वाढली की स्वत:चे स्वतंत्र जागेत ऑफिस थाटू असा विचार करत न्युयॉर्क मध्ये पाय ठेवलेल्या बाईंना व्यवसाय करायला तर सोडाच पण आपले थकले भागले अंग टेकायला एखादा बेड मिळणे दुरापास्त झाले होते.
हॉटेल रुम साठी अशी पायपीट करत असताना त्यांना एक बर्या पैकी हॉटेल दिसले — विन्सर होटेल (Windsor Hotel). अवघे सातच मजले असलेले हे हॉटेल इतर हॉटेल्स च्या तुलनेत लहानच म्हणायचे ! पण देखणी इमारत , दिमाखदार एन्ट्रन्स , प्रशस्त मनोवेधक लॉबी, दारावरचा हसतमुख दरवान पाहताच बाई सुखावल्या , बाईंना एकदम हायसे वाटले , त्या मनात म्हणाल्या ‘चांगले हॉटेल दिसतेय, इथे माझी सोय झाली तर कित्ती बरे होईल”
The Windsor Hotel was located at 575 Fifth Avenue (at the corner of East 47th Street) in Manhattan , New York. The seven-story hotel opened in 1873, at a time when hotel residency was becoming popular with the wealthy, and was advertised as “the most comfortable and homelike hotel in New York.”
“मी ज्योतिषी आहे तोच माझा व्यवसाय आहे” असे सांगताच एकाही नावाजलेल्या हॉटेल ने बाईंना दोन मिनिटें सुद्धा लॉबीत उभे राहू दिले नव्हते, बाई उमराव घराण्यातल्या होत्या म्हणून बरे नाहीतर चक्क धक्के मारुन हाकलूनच द्यायचे !
पण या विन्सर हॉटेलच्या प्रशस्त लॉबीत शिरता क्षणीच का कोणास ठाऊक ‘इथे आपल्याला नक्की थारा मिळेल’ असा बाईंना विश्वास वाटू लागला.
बाईंनी आपल्या आत्मचरित्रात लिहून ठेवले आहे:
“By the time I reached the Windsor Hotel , in that day the New York home of many visiting notables, my feelings had calmed… I entered respectfully the portals of the great building which was destined to bring me sudden fame…”
बाई इंटीईश्युन ची दैवी देणगी लाभलेल्या ज्योतिषी होत्या , हॉटेल च्या लॉबी मध्ये शिरताच हे जे त्यांच्या मनात आले तो एक दैवी संकेत होता असेच म्हणावे लागेल !
आणि तो खरा ही ठरला ! इतीहास त्याला साक्ष आहे !!
रिसेप्शन ला असणारा मॅनेजर समोर उभ्या असलेल्या बाई एक ज्योतिषी आहे हे कळताच कपाळावर आठ्या घालून …..नहीं ……… म्हणणारच होता पण इतका वेळ हा संवाद ऐकणारा हॉटेलचा मालक वॉरेन लेलँड ( जो योगायोगानेच नेमका त्या वेळी रिसेप्शन कौटर च्या आसपास होता ) धावतच कौटर जवळ आला.
“मॅडम , मी ऐकले की आपण ज्योतिषी आहात?”
“हो मी ज्योतिषी आहे , एनी प्रॉब्लेम ?”
“प्रॉब्लेम? अजिबात नाही, आपले स्वागत आहे , मी वॉरेन लेलँड या हॉटेलचा मालक”
“मि वॉरेन लेलँड आपण स्वत:? आणि हे आपले हॉटेल आहे ? मला कल्पना नव्हती”
“हो, आपल्याला माझ्या बद्दल माहीती आहे?”
“हो तर, आपल्याला कोण जाणत नाही शिवाय आमच्या बोस्टन ला आपले ‘पॅलेस हॉटेल’ आहे ना?’
“आपल्याला भेटून आनंद झाला, आपण काही काळजी करु नका , आपल्याला हवी तशी रुम देतो. “
“खूप खूप आभारी आहे मी आपली , इतकी हॉटेल्स हिंडले पण मी ज्योतिषी आहे हे कळताच मला नकार मिळत होता”
“या बिझनेस डिस्ट्रीक्ट मधले कोणतेच हॉटेल ‘ज्योतिषा’ ला रूम देणार नाही , फक्त माझे हॉटेल त्याला अपवाद कारण मला स्वत:ला ज्योतिषात खूप रुची आहे , म्हणूनच मी तुम्हाला रुम देत आहे.”
“धन्यवाद”
“पण माझी एक रिक्वेस्ट आहे”
“काय?”
“माझे भविष्य सांगायचे”
“इतकेच ना? सांगेन की”
“आमची पाचव्या मजल्यावरची रुम आपल्याला देऊ शकेन मॅडम, खोली जरा लहान वाटेल आपल्याला पण खिडक्यांतून न्युयॉर्क चा बेस्ट व्हू मिळेल आपल्याला , भरपूर मोकळी हवा आणि सुर्य प्रकाश, आणि वरच्या मजल्यावर असल्याने कसलीच वर्दळ नाही, एकदम शांत , आपल्याला निवांतपणे राहता येईल”
“पाचवा मजला ? मला नक्को”
बाई असे का म्हणाल्या असतील ? बाईंनी पाचव्या मजल्यावरची रुम नाकारणे हा पण एक दैवी संकेत म्हणायचा !
…इतीहास त्याला साक्ष आहे !!
“मॅडम, ही पाचव्या मजल्यावरची रुमच घ्या, मी खात्री देतो, आपल्याला कोणताही त्रास होणार नाही, मोठे मोठे सेलेब्रीटी लोक राहून गेलेत त्या रुम मध्ये, शिवाय आपल्याला त्या रूम साठी चांगले ऑफ सिझन डिस्काउंट पण मिळेल”
“पण मला नक्को, दुसरी कोणती रुम नाही का आपल्या कडे?”
“मॅडम, आमच्या कडची बेस्ट रुम ऑफर केली आहे पण आपल्याला ती नकोच असेल तर मी आपल्याला आमची पहील्या मजल्या वरची रुम देऊ शकेन पण त्यात काही अडचणी आहेत..”
“त्या काय ? ”
“रुमचा रेट जरा जास्त आहे, १२ डॉलर प्रती दिवस”
“महाग वाटते”
“हो पण रुम एकदम प्रशस्त आहे , उत्तम आरामदायी फर्निचर आहे, कार्पेटस अगदी नवीन आहेत, म्हणून जरा महाग आहे”
“ती दुसरी अडचण काय म्हणालात”
“रुम पहील्या मजल्यावर असल्याने गेस्ट्स ची आणि आमचे ऑफिस पण ह्याच मजल्यावर असल्याने स्टाफ ची पण सतत वर्दळ चालू राहणार, लोकांचे पावलांचे आवाज, मोठ्या आवाजातले बोलणे , रुम सर्विस साठी सतत ठणाणणार्या बेल्स , रस्त्यावरच्या ट्रॅफीक चा गोंगाट आपल्याला खूप त्रासदायक वाटेल”
“असू दे , मला चालेल ही रुम , पण मी महीनाभर राहायचे म्हणतेय त्याला आपली काही हरकत नाही ना?”
“बिलकुल नाही मॅडम, आपल्याला चालत असेल तर आम्ही आनंदाने ती पहील्या मजल्या वरची रुम आपल्याला देतो”
बाईंनी आपल्या या पहिल्या मजल्यावरच्या रुम मध्ये चेक ईन केले तेव्हा रात्रीचे साधारण आठ वाजले होते , वार होता गुरुवार आणि तारीख होती १६ मार्च १८८९.
बाई रुम मध्ये जरा स्थिरावत आहेत तोच रुम च्या दरवाज्यावर टकटक झाले ..
“येस, कम ईन”
दारात हॉटेलचा मालक ‘वॉरेन लेलँड’ उभा होता…
पुढे काय झाले ?
पुढच्या भागात वाचा……
(सोबतचा फटू हा त्याच ‘विन्सर हॉटेलचा आहे अंदाजे १८९५ साली घेतलेला )
क्रमश:
शुभं भवतु
- ऑन लाईन (लाईव्ह स्ट्रीमिंग) ज्योतिष क्लास - March 24, 2020
- पुण्यात क्लास सुरु ! - February 29, 2020
- Lost & Found ! - February 26, 2020
- बासरीवाला ! - February 6, 2020
- निशाणी बदला… भाग्य बदला – ३ - February 6, 2020
- निशाणी बदला… भाग्य बदला – २ - February 5, 2020
- ‘निशाणी बदला… भाग्य बदला’ - February 5, 2020
- विठ्ठला कोणता झेंडा घेऊ हाती – भाग २ - January 23, 2020
- विठ्ठला कोणता झेंडा घेऊ हाती – भाग १ - January 22, 2020
- प्रश्नकुंडलीची वेळ - January 21, 2020
interesting
धन्यवाद श्री कौशल जी
सुहास गोखले
1 no baraka !!!!!
धन्यवाद श्री गोरक्षनाथजी
सुहास गोखले