जज आता काय बोलणार याकडे सगळ्यांनी कान टवकारले.

जज नी टेबलाच्या ड्रॉवर मधुन एक लहानशी डायरी काढली , डायरीतली काही पाने उलटून ते एकाएकी थांबले .

चष्मा नाका वर घेऊन त्यांनी बाईं कडे रोखुन बघितले  …

जज काय बोलणार या बद्दलची उत्सुकता आता शिगेस पोहोचली होती..

 

पुढे चालू…

“मिस अ‍ॅडम्स, ठीक आहे, तुमचा मुद्दा पुराव्या निशी सिद्ध करायला एक संधी देतो”

“मी तयार आहे मिलॉर्ड”

 

“मिस अ‍ॅडम्स आपण म्हणालात की जगातल्या कोणाही व्यक्ती बद्दल तुम्ही अंदाज देऊ शकता, तुम्हाला अशाच एका  व्यक्ती बद्दल काय सांगता येते हे मला बघायचे आहे, भविष्यातले अंदाज नकोत कारण ते खरे ठरणार का खोटे हे कळायला बराच काळ थांबावे लागेल इतका वेळ आपल्यापाशी नाही,  तेव्हा तुम्ही किमान त्या व्यक्तीचे वर्णन , ठळक वैशिष्ट्ये , त्याच्या आयुष्यात घडलेल्या महत्त्वाच्या घटना सांगू शकाल?

“मी प्रयत्न करेन”

“त्या साठी आपल्याला काय लागेल , पैसा सोडून “

“मला जास्त माहिती लागत नाही, जन्मदिनांक, जन्मवेळ आणि जन्मठिकाण’

“इतकेच?”

“हो, इतकीच माहीती मला पुरेशी आहे”

“ठीक आहे, जन्मदिनांक, जन्मवेळ आणि जन्मठिकाण असा तपशील देतो, जो माझ्या माहीती प्रमाणे अचूक आहे”

जज नी एका कागदा वर जन्मदिनांक, जन्मवेळ आणि जन्मठिकाण’ लिहून बाईं कडे सोपवला.

“मिस अ‍ॅडॅम्स, तुम्हाला काय वाटते , या कामाला आपल्याला किती वेळ लागेल”

“तास – दीड तास”

“ठीक आहे तुम्हाला तुमची गणितें किंवा जे काही करायचे आहे त्या साठी वेळ मिळावा म्हणून मी कोर्टाचे कामकाज दोन तासां साठी स्थगित करत आहे,  कोर्ट बरोबर दोन तासांनी आपली कारवाई पुन्हा चालू करेल. “

“धन्यवाद मिलॉर्ड, मी काम सुरु करते”

“पण या दोन तासांत तुम्हाला कोणाही व्यक्तीशी बोलता येणार नाही अथवा इतर कोणत्याही मार्गाने संपर्क करता येणार नाही, कोर्टाचे मार्शल्स आपल्यावर लक्ष ठेवतील “

“हो मिलॉर्ड ,  मी आपल्या आज्ञेचे पालन करेन”

ठीक दोन तासांनी कोर्टाचे कामकाज पुन्हा सुरु झाले.

“मिस अ‍ॅडम्स , मला वाटते आपण आपले काम पुर्ण केले असावे”

“मिलॉर्ड, माझे अ‍ॅनालायसिस आणि निष्कर्ष तयार आहेत”

“मी ज्या व्यक्तीचे जन्म तपशील दिले आहेत त्याबद्दल तुमची काय अनुमाने आहेत ती आता वाचून दाखवा”

“येस मिलॉर्ड”

बाईंनी डोळ्यावर वाचायचा चष्मा लावून समोरचा कागद वाचायला सुरवात केली ..

“मी फॉरचुन टेलींग करत नाही त्यामुळे मी फक्त अंदाज देते, बरोबर का चूक हे त्या व्यक्तीनेच ठरवायचे, मी अचूकतेचा दावा करत नाही. मी जे सांगते ते त्या व्यक्तिच्या जन्मपत्रिकेचा सांगोपांग अभ्यास करुन इतकीच खात्री मी देते, अभ्यास न करताच मी काही सांगणार नाही”

“ठीक आहे , वाचन सुरु करा”

बाई वाचत होत्या , जज ऐकत होते आणि कोर्टात पिन ड्रॉप सायलेन्स होता.

वाचता वाचता बाई अचानक थांबल्या आणि म्हणाल्या …

“मिलॉर्ड , मी जे लिहून ठेवले ते जसेच्या तसे आपल्याला वाचून दाखवले आहे, पण या पुढचा भाग वाचायचे धाडस माझ्या कडून होईल असे वाटत नाही”

“का?”

“पुढचा भाग मी वाचू शकेन असे मला वाटत नाही याचे कारण म्हणजे या भागात मी जे लिहले आहे ते माझ्या अ‍ॅनालायसिस चा भाग म्हणूनच आहे पण असा भाग मी कोणत्याही परिस्थितीत माझ्या क्लायंट ला सांगत नाही. पण आत्ताची केस वेगळी आहे, मी मेहेरबान कोर्टात ज्योतिषशास्त्राच्या सिद्धतेसाठी उभी आहे त्यामुळे हा भाग वाचायला मला परवानगी द्या”

“जे काही लिहले आहे ते वाचा, थांबू नका”

“ही पत्रिका ज्या व्यक्तीची आहे ती या वेळे पर्यत हयात असेल का नाही याची मला शंका आहे, ह्या व्यक्तीला पाण्या पासुन कमालीची भय आहे, माझी गणिते मला सांगत आहेत की या व्यक्तीचे पाण्यात बुडून निधन झाले असावे किंवा जर ही व्यक्ती या वेळे पर्यंत हयात असेल तर अगदी नजीकच्या काळात म्हणजे येत्या तीन महीन्यांत  या व्यक्तीला पाण्या पासुन धोका संभवतो तेव्हा या व्यक्तीने आवश्यक ती काळजी घ्यावी असे मी सुचवते”

कोर्टात एक जबरदस्त सन्नाटा पसरला, सगळे एकजात सुन्न झाले , एका महिलेच्या तोंडातून अस्फुट किंकाळी बाहेर पडली. प्रत्येकाच्या मनात विचार आला…

बाईंनी चक्क मृत्यु चे भाकित केले? आता बाई किमान पाच वर्षे तरी खडी फोडायला जाणार!

हातातल कागद खाली ठेवून, बाईंनी वाचायचा चष्मा डोळ्या वरुन दूर केला , कमरेत वाकून  जज ना अभिवादन करत बाई म्हणाल्या..

“मिलॉर्ड, मी माझ्या अभ्यासाच्या आधारवर , आत्ता पर्यंत मिळवलेल्या अनुभवातुन आणि अवगत केलेल्या कौशल्यांच्या जोरावर माझी अनुमाने आपल्या समोर मांडली आहेत”

जज नी काही क्षण रोहुन बाईं कडे पाहीले,

“मिस अ‍ॅडम्स, मी खुले पणाने मान्य करतो की तुम्ही जी अनुमाने काढली आहेत ती १००% बरोबर आहेत.  मी अगदी खात्री ने सांगतो कारण ज्या व्यक्ती चे हे जन्म तपशील आहेत ती व्यक्ती माझा मुलगा आहे. आणि…”

इतके बोलुन जज थांबले , डोळ्यांच्या कोपर्‍यात दाटलेले अश्रु हातरुमालाने पुसत ते काही क्षण थबकले ..

“आणि माझा हा मुलगा सहा महिन्यां पुर्वी पोहायला गेला असतान बुडून मृत्यु पावला आहे”

सारे कोर्ट हतबुद्ध झाले !

“मिस अ‍ॅडम्स , मी तुमचे अभिनंदन करतो, माझा माझ्या डोळ्यावर आणि कानांवर विश्वास बसत नाही की केवळ जन्मदिनांक, जन्मवेळ आणि जन्मस्थळ इतक्या तुटपुंज्या माहिती वर आपण इतके अचूक अंदाज करु शकता हे सारे थक्क करणारे आहे”

“धन्यवाद मिलॉर्ड ”

आपल्या वीस पानी निवाड्यात जज जॉन फ्रेस्की John Freschi म्हणतात..

“You’ve proved the very scientific nature of your practice and further in establishing in public that you’ve the ‘competence’ to make judgments about the future trends and thus about how individuals and society should adjust to the probable.”

“… You’ve successful in proving that living is a science in control of the human being instead of blind luck of which he is frequently victim.”

“You’ve established that you study positions of the planets and read their individuations without any assurance by the defendant that such reading was a prognostication of future events.”

“… the influences of heavenly bodies possibly give inherited tendencies and natural proclivities to human beings, knowledge of which could let them better pursue their “enlightened self-interest.”
[proclivity : A tendency to choose or do something regularly; an inclination or predisposition towards a particular thing.]

“मिस अ‍ॅडम्स , तुम्ही जे सांगता त्याला तुम्ही अंदाज म्हणत असाल पण तो तुमचा विनय आहे (modesty) पण एके काळी ब्लॅक मॅजीकच्या विळख्यात सापडलेल्या, भोंदू च्या ताब्यात असलेल्या या विद्येला आपण ‘शास्त्रा’ चा  दर्जा मिळवून दिला आहे.”

“You’ve raised astrology to the dignity of an exact science —one of vibration, and claims
that all the planets represent different forces of the universe.,”

“ the ‘science’ of astrology seems to be the generalization of certain principles gathered from the concrete phenomena presented by the heavenly bodies and their application to mundane affairs. Those who work with it have a form of tables and a co-ordination of instances upon which they act and create their axioms, and one must be led to believe that there is considerable force in their arguments. In this, as in all new theories and discoveries, so in the field of endeavor and thought, there are to be found those who hesitate and doubt until a masterly has fixed it in the minds of the majority, as a science. Whether minds are prepossessed or limited, the sincerity of the defendant’s determination upon the opinion of her work from her own perceptions and a study of authorities cannot be questioned. She certainly does seem to have a thorough knowledge of the subject. And in this, she claims no faculty of foretelling by supernatural or magical means that which is future, or of discovering that which is hidden or obscure; but she does claim that nature is to be interpreted by the influences that surround it..”

 

जज पुढे म्हणतात …

आपण जे पुरावे दिले आहेत आणि मी घेतलेली चाचणी आपण यशस्वीपणे उत्तीर्ण झाला आहात…

त्या आधारावर मी आपल्याला आपल्या वर केलेल्या सर्व आरोपांतून मुक्त करत आहे. आपला हा व्यवसाय चालू ठेवायला मी काही अटींवर परवानगी देत आहे. फॉरच्युन टेलींग हा अजुनही कायद्याने गुन्हा आहे याची नोंद आपण आणि आपल्या सारख्या पद्धतीने व्यवसाय  करणार्‍या / करु पाहणार्‍या सर्व व्यक्तींनी घ्यावी असा निवाडा मी आज इथे माझ्या सही आणि शिक्क्याने देऊन कोर्टाचे कामकाज संपले असे घोषित करतो”

बाईंनी खटला असा निर्विवाद पद्धतीने जिंकला आणि एक नवा ईतीहास रचला गेला ..  बाई प्रसिद्धीच्या शिखरावर पोहोचल्या.

पण बाईंचा एक ज्योतिर्विदा म्हणुनचा उण्यापुर्‍या ४० वर्षाचा प्रवास असाच उत्कंठावर्धक आहे, त्या बद्दल पुढच्या काही भागात ..

क्रमश:

शुभं भवतु


About सुहास गोखले

मी सुहास गोखले या वेब-साईटचा निर्माता. आपल्याला ज्योतिष विषयक मार्गदर्शन हवे असल्यास किंवा आपली एखादी सुचना / तक्रार असेल तर खाली दिलेल्या 'संपर्क फॉर्म' मध्ये माहीती भरुन पाठवल्यास मी ताबडतोब आपल्याशी संपर्क साधेन.
+2

सुहास गोखले administrator

मी सुहास गोखले या वेब-साईटचा निर्माता. आपल्याला ज्योतिष विषयक मार्गदर्शन हवे असल्यास किंवा आपली एखादी सुचना / तक्रार असेल तर खाली दिलेल्या 'संपर्क फॉर्म' मध्ये माहीती भरुन पाठवल्यास मी ताबडतोब आपल्याशी संपर्क साधेन.

11 प्रतिक्रिया

///////////////
 1. विवेक वजुरकर

  आपला लेख वाचला, उत्कंठावरधक आहे. आवडला. मी माझी जन्म तारीख व वेळ पाठवत आहे कृपया कसे आहे माझ्या आयुष्यात ?

  0
  1. सुहास गोखले

   धन्यवाद श्री विवेकजी

   आपण माझ्या वेबसाईट / ब्लॉग वरच्या संपर्क फॉर्म मार्फत संपर्क करावा

   सुहास गोखले

   0
 2. Anand Kodgire

  excellent article. you have gift of story telling.
  I am awaiting to join your class to learn this science and get involved in analysis. Getting deep in analysis is also fun.
  Your articles are very informative and entertaining

  0
  1. सुहास गोखले

   धन्यवाद श्री आनंदजी

   ज्योतिष क्लास चै एक बॅच सध्या सुरु आहे पुढची बॅच सुरु होण्याच्या आधी मी स्वत: आपल्याला कळवेन.

   सुहास गोखले

   0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.