बघता बघता ब्लॉग ला चार वर्षे पूर्ण झाली ! या चार वर्षात दोन लाख पेज व्हूज (जुना वर्ड प्रेस ब्लॉग + वेबसाईट वर स्थलांतरीत केलेला ब्लॉग) मिळाले. ३५० पोष्टस हातून लिहल्या गेल्या. पण सुरवातीचा उत्साह आता राहीला नाही हे मात्र खरे आणि याला कारण म्हणजे कामाचा वाढता व्याप आणि एकंदरच वाचकांचा थंडा प्रतिसाद!! ‘वाचकांचा इतका थंडा प्रतिसाद ‘ का? यावर पूर्वी मी फार विचार करत असे , कधी कधी मनाला लावून पण घेतले पण नंतर लक्षात आले की आपण चुकीच्या अपेक्षा धरतोय! मी ब्लॉग लिहायला सुरवात केली तीच मुळी फार उशीरा, त्यावेळे पर्यंत बहुतांश वाचक वर्ग फेसबुक, व्टीटर , व्हॉट्स…