मित्र हो, सर्वप्रथम आपणां सर्वांना नविन वर्षाच्या अनेक शुभकामना! हे नूतन वर्ष आपल्याला व आपल्या कुटुंबियांना सुख शांतीचे व भरभराटीचे जावो. सध्या सार्या विश्वात घोंगावणारे ‘करोना व्हायरस’ चे जागतीक अरिष्ट दूर व्हावे आणि सकल मनुष्य जमातीची या अजगरी विळख्यातून सुखरूप मुक्तता व्हावी अशी प्रार्थना करतो. आपल्या शुभेच्छा देतानाच, आजच्या या शुभ मुहुर्तावर माझ्या ‘ऑन लाईन (लाईव्ह स्ट्रीमिंग)’ पद्धतीच्या ज्योतिष अभ्यासक्रमाची घोषणा करताना मला कमालीचा आनंद होत आहे. आज पासून या ‘ऑन लाईन (लाईव्ह स्ट्रीमिंग)’ ची नाव नोंदणी चालू करत आहे. आत्ता कोणतेही पैसे भरण्याची आवश्यकता नाही, या अभ्यासवर्गाची पहीली दोन लेक्चर्स पूर्णत: मोफत आहेत, ही दोन्ही लेक्चर्स पहा, ‘ऑन लाईन…