‘विल्स’ ही ‘विल्स’ होती ! बाकीच्यात काय दम नव्हता , हिरवी पट्टी मिरवणारी ‘कूल’ शिगरेट खरोखरच ‘कुल’ होती नाय असे नाय, एकदम बिनवासाची ! अशीच बिनवासाची दारू तैयार झाली तर काय बहार येईल नै , कित्ती जणांची सोय होईल ! बाकी लोक्स ह्या असल्या ‘कूल’, ‘कॅप्स्टन’, ‘पनामा’. ‘ब्रिस्टॉल’ शिगरेटीं का ओढायचे कळत नाही, कोणी कितिही , काहीही म्हणले तरी ‘विल्स’ ची नजाकत कश्या कश्यात नै. या ‘विल्स’ च्या अनेक ‘हळूवार’ आठवणी आहेत. नोकरी करायला लागल्यावर खिशात चार पैसे खुळखुळायला लागले आणि मग ‘स्टेट एक्स्प्रेस’, ‘डनहील’ वगैरे सुरु झाले ( स्टंडर्ड वाढले ना !) , पुढे आम्रविकेत आल्यावर ‘कॅमल ‘(असली!), ‘मार्लब्रो’…