आपल्या आयुष्यात अनेक घटना घडत असतात पण काही वेळा असे लक्षात येते की काही घटना एकमेकीला बांधलेल्या असतात , एक प्रकाराची साख़ळी असते. तिसरी घटना घडावी म्हणून दुसरी घटना आधीच घडलेली असते आणि ही दुसरी घटना घडण्याची तयारी त्याच्या आधीच घडलेल्या पहील्या घटनेत झालेली असते. पहीली घटना घडली नसती तर दुसरी घडली नसती आणि दुसरी घटना घडली नाही म्हणून तिसरी घटनाही घडली नसती असे काहीतरी विलक्षण नाते या घटनांत असते. यालाच आपण ‘योगायोग’ म्हणतो का?
जरा आठवून पाहा , आपण एखाद्या काळजीत असताना एक जुनी ओळखीची व्यक्ती अचानक तुम्हाला भेटते आणि त्या व्यक्तीच्या साह्याने तुम्हाला सतावत असलेली समस्या क्षणार्धात दूर होते. इथे आश्चर्य हे की ती व्यक्ती मुळात तुमची समस्या सोडवायला म्हणून आलेलीच नसते , ती कदाचीत तुमच्या कडून वाचायला नेलेले तुमचेच एक पुस्तक परत करायला आलेली असते. पण त्या व्यक्तीने तुमच्या कडे पुस्तक मागणे – तुम्ही ते देणे ही एक घटना आणि तुम्ही काळजीत असतानाच नेमके त्याच वेळी त्या व्यक्तीला तुमचे पुस्तक परत करण्याच्या हेतुने का होईना तुम्हाला भेटायची ईच्छा होणे , आणि नेमकी हीच व्यक्ती तुमची समस्या सोडवण्यासाठी सक्षम असणे … हा सारा विलक्षण योगायोगच नाही का? हा ‘योगायोग’ म्हणायचा का नियतीने आपल्या साठी केलेली योजना ?
आजच्या व्हिडीओत मी माझ्या आयुष्यात घडलेला असाच एक विलक्षण योगायोग सांगत आहे….
हा व्हिडीओ आवर्जुन पाहा, आपल्यालाही असेच काही विलक्षण , अतर्क्य अनुभव आले असतील तर जरुर कळवा ..
शुभं भवतु
- ऑन लाईन (लाईव्ह स्ट्रीमिंग) ज्योतिष क्लास - March 24, 2020
- पुण्यात क्लास सुरु ! - February 29, 2020
- Lost & Found ! - February 26, 2020
- बासरीवाला ! - February 6, 2020
- निशाणी बदला… भाग्य बदला – ३ - February 6, 2020
- निशाणी बदला… भाग्य बदला – २ - February 5, 2020
- ‘निशाणी बदला… भाग्य बदला’ - February 5, 2020
- विठ्ठला कोणता झेंडा घेऊ हाती – भाग २ - January 23, 2020
- विठ्ठला कोणता झेंडा घेऊ हाती – भाग १ - January 22, 2020
- प्रश्नकुंडलीची वेळ - January 21, 2020
सुहासजी आपले आतापय॔ंतचे सगळे लेख आवडीने वाचले
हा लेख दॣक्श्राव्य आहे.मला ऐकू येत नसल्यामुळे पंचाईत झाली.
असो! लेख छानच असणार.आपल्याला पुढील लेखनासाठी शुभेच्छा
श्री अविनाशजी,
अभिप्राया बद्दल धन्यवाद.
जसा काळ बदलतो तसे आपल्यालाही बदलावे लागते ब्लॉग वरचे गद्य लेख आता लोकांना वाचायचा कंटाळा येतो. (व्हॉट्सॅप वरचे छोटेसे चटपटीत मेसेज मात्र आवडीने वाचले जातात !) , तुलनेत व्हिडीओच्या माध्यमातुन पोहोचवलेले साहीत्य / विचार जास्त प्रभावी ठरत आहेत. स्पर्धात्मक वातावरणामुळे इंटरनेट सेवा मुबलक आणि स्वस्त झाल्या मुळे व्हिडीओ बघणे सुकर झाले आहे . तेव्हा मी ही कात टाकली आहे, आता पुढ्चे सर्व लेखन अशा व्हिडीओच्या माध्यमातुन करावे लागणार आहे , ही काळाची गरज आहे. आत्ताच जर हे केले नाही तर पुन्हा कधीच नाही अशी परिस्थिती आहे.
मात्र काही लेख मी लिखीत स्वरुपात सादर करण्याचा प्रयत्न करेन.
सुहास गोखले
सुहासजी,आपणास” रु-ब-रु ” पाहिले, ऐकले. धन्य वाटले.
नव्या वाटे कडे वळता आहात(द्रुकश्वाव्य),चांगलेच आहे. पण अनेक लेख अपुर्ण सोडले आहेत त्यांच काय? ऊदाः नवाब आँफ×××.
असो, तुमच्या हरयेक लिखाणाची वाट पाहणार!
धन्यवाद श्री अण्णासाहेब ,
माझ्या लक्षात आहे, जसा वेळ मिळेल तसे सर्व अपूर्ण लेख पूर्ण करत आहे.
सुहास गोखले
Dear SuhasJi,
Heard your yogayog of 6020. Very much interesting. It’s apparent that it was a turning point in your life. Yes it is true that such yogayogs do operate in our life.
Eager to hear your other yogayogs !!!
Your attempt of using Video clip as a medium is very good. Keep it up.
With warm regards,
Sudhanva Gharpure
धन्यवाद श्री सुधन्वाजी,
सुहास गोखले
I have not got the success in everything in my life, so pls.tell me a proper information in life.
श्री उमेशजी,
सर्वप्रथम आपण माझ्या ज्योतिष विषयक मार्गदर्शन सेवेत जी उत्सुकता दाखवली त्याबद्दल मी आपले आभार मानतो.
आपली समस्या पुरेसी स्पष्ट नाही , कोणत्याच बाबतीत यश मिळाले नाही म्हणजे नेमके काय ते स्पष्ट केले तर त्या अंगाने काही विचार करता येईल.
सुहास गोखले
lai mhanje lai bhari vatala tumcha video. tumcha aawaj aikla bhari vatla. asech kisse sangat ja.
Thanks a lot sir
धन्यवाद श्री गोरक्षनाथजी
सुहास गोखले
Suhasji,
Tumcha 6020 ha video bhaghitla. yogauog he nehemich achanak dhyanimani nastana ghadatat aani aaushyala kalatani detat. Me Civil Engineer aahe. me engineering che shikshan ghetana mala electrical engg chi line havi hoti. me 2nd year paryant electrical engg sathi try kela pan upyog kahi zala nahi. mag aahe tyat samadhan manun me civil engg che shikshan complete kele. Tya nantar gulf madhye nokari karata hi khup prayatna kele agdi visa stamping nantar sudha me jawu shaklo nahi. aata jenvha KP jyotishya shiktana maze guru D. G. Sawant yanchya shi ya vishayvar charcha keli tenvha tyani tynachya anubhawa varun ase sangitale ki 99% jyanchi lagna ras dwiswabhi aste te jatak nokri nimittane pardeshi jau shakat nahi adchani yetatach. Je Jivanat ghadanar aahe te ghadtech.
After watching your video I think I should share my personal experience with you.
Regards,
Kiran Joshi
धन्यवाद श्री किरणजी
सुहास गोखले
सर एखादा केपी ज्योतिष वरचा लेख द्या ना
श्री दर्शनजी,
एक केपी वर आधारीत केस स्ट्डी व्हिडिओ च्या माध्यामातून तयार केली आहे या आठवड्या अख्रे प्रकाशीत करेन.
सुहास गोखले