आपल्या भविष्यात काय दडले आहे याची उत्सुकता सगळ्यांनाच असते, पण हे जाणुन घेताना बर्‍याच वेळा ज्योतिषाकडून जातकाच्या काही अवाजवी अपेक्षा  असतात, तसेच ज्योतिष शास्त्रा बद्दल बरेचसे गैरसमजही असतात!

उदा:

  • चांगले , अनुकूल असेच भविष्य कानावर पडावे.
  • आपल्याला ज्या घटना घडाव्यात असे वाटते त्याच घटना घडतील असे ज्योतिषाने सांगावे.
  • मनात आधीच ठरवून ठेवलेल्या निर्णयाला ज्योतिषाने होकार भरावा
  • आडवळणाने वा महत्त्वाची माहिती लपवून ठेऊन विचारलेल्या प्रश्नांना ज्योतिषाने मात्र खुलासेवार उत्तरे द्यावीत.
  • आपल्या पुढच्या समस्या ज्योतिषी सोडवू शकतो.
  • भविष्यकथन अगदी अचूक १०० % बरोबर यायला हवे.
  • वर्तवलेले भविष्य बरोबर आले नाही तर पैसे परत मिळावेत.

 

जातकाच्या जन्मपत्रिकेचा अभ्यास करून ज्योतिषी जातकाच्या आयुष्यातल्या भविष्यकालीन घटना बद्दल भाष्य करत असतो, आपल्या व्यवसायाशी प्रामाणिक असलेला ज्योतिषी ‘जे आहे तेच’ सांगत असतो, केवळ जातकाला बरे वाटावे म्हणून हेतुत: खोटे, रंगवलेले, साखर पेरलेले भविष्य सांगणे म्हणजे व्यवसायाशी प्रतारणा ठरेल.

भविष्य हे नेहमीच शुभ व अशुभ घटनांचे एक  मिश्रण असते, चांगल्या बरोबर वाईट हा जो काही नियतीचा संकेत असतो तो जसाच्या तसा स्वीकारावा लागतो.

अचूक जन्मवेळेची पत्रिका हा भविष्यकथनाचा पाया आहे, बहुतांश वेळा जन्मवेळ अंदाजपंचे असते, एकाच मातापित्याच्या पोटी केवळ एक, दोन मिनिटांच्या फरकाने जन्माला आलेल्या जुळ्या बालकांच्या आयुष्यातल्या घटना किती भिन्न असतात हे तर आपण नित्य पाहतोच, मग जेव्हा जातकाने दिलेली जन्म वेळ १० -१५ मिनिटं (काही वेळा या पेक्षा जास्त फरकाने) मागे पुढे असू शकते  तेव्हा भविष्यकथनाच्या अचूकतेला आपोआपच मर्यादा पडतात .

ज्योतिषशास्त्र हे फक्त गणित व खगोलशात्राचा पसारा नाही तर  काही दैवी भाग (अध्यात्म) , अंत:स्फूर्ती (इंट्युईशन) यांचाही त्यात मोठा वाटा असतो,  प्रश्नकर्त्याची भविष्य जाणून घ्यायची खरी , आत्यंतिक तळमळ ,  अभ्यासू , निष्णात व  शुद्ध आचरण  असलेला ज्योतिषी उपलब्ध होणे आणि प्रश्न ज्या वेळी विचारला पाहिजे तीच वेळ साधणे असे सगळेच योग जुळून यावयास लागतात.

ज्योतिषी तुमचे भविष्य जाणू शकतो पण ते बदलण्याची ताकद वा जादू कोणत्याही ज्योतिषा कडे नसते.

शुभं भवतु

 


About सुहास गोखले

मी सुहास गोखले या वेब-साईटचा निर्माता. आपल्याला ज्योतिष विषयक मार्गदर्शन हवे असल्यास किंवा आपली एखादी सुचना / तक्रार असेल तर खाली दिलेल्या 'संपर्क फॉर्म' मध्ये माहीती भरुन पाठवल्यास मी ताबडतोब आपल्याशी संपर्क साधेन.
+3

सुहास गोखले administrator

मी सुहास गोखले या वेब-साईटचा निर्माता. आपल्याला ज्योतिष विषयक मार्गदर्शन हवे असल्यास किंवा आपली एखादी सुचना / तक्रार असेल तर खाली दिलेल्या 'संपर्क फॉर्म' मध्ये माहीती भरुन पाठवल्यास मी ताबडतोब आपल्याशी संपर्क साधेन.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.