आज काही कामा साठी जुना अर्काईव्ह उघडायला लागला , आणि अचानक मी केलेली ही कविता सापडली, आधी मी असले काही लिहलेय याच्यावर माझाच विश्वास बसला नाही. पण नंतर आठवले, 2007 -2008 चा तो काळ असावा बहुदा, मी त्यावेळी नविनच सुरु झालेल्या ‘मिसळपाव’ ह्या मराठी संकेतस्थळाचा सभासद होतो (आता नाही !) , तेव्हा ही कविता तिथे डकवली होती. तशा मी एक दोन कथा (‘संधी’ व ‘शेळीचा धिंगाणा’ भाग -1) , दुसर्या एका मराठी संकेतस्थळावर : ‘मनोगत’ वर ही प्रसिद्ध केल्या होत्या. ‘कागदी वाघ’ ही आय. डी. घेऊन! मनोगत वर माझ्या ब्लॉगवरचेच काही निवडक लेख नुकतेच प्रकाशीत केले आहेत, ‘मिसळपाव’ वर मात्र त्यानंतर कधीच फिरकलो नाही (आणि फिरकणार ही नाही !) .
ते असो , तेव्हा मी ‘मिसळपाव’ वर लिहलेली ही कविता आपल्या समोर सादर करत आहे.
कवितेचा विषय ‘दारु’ असला तरी आमी त्यातले नै बर्का , उगाच कोणाचा गैरसमज होईल म्हणून हा खुलासा आधीच करुन ठेवतो.
तो अर्ज है…
ही धार पहिलटकरीण , नाकास दर्प ओला
काल ठेविला तो ‘ओपनर ‘ कुठे रे गेला
गलासात आज माझ्या ओतु नकोस सोडा
चखण्यात मात्र घाला कांदा अजुन थोडा
अंड्यास कोंबडीच्या सोली हलकेच आता
फर्साण ,शेवगाठी अन बोंबिल भेळ भत्ता
सलाम आन्टीला तो, जल्लाद फार्म्युल्याला
घोट एकुलाच जिर्ता , आत्मा फरार जाला
नवटाक शेरभराची शीडात भरेल वारा
मी डोलतो असा हा, पाहीजे कुणां किनारा
(आपल्याला बी जमतयां की )
- ऑन लाईन (लाईव्ह स्ट्रीमिंग) ज्योतिष क्लास - March 24, 2020
- पुण्यात क्लास सुरु ! - February 29, 2020
- Lost & Found ! - February 26, 2020
- बासरीवाला ! - February 6, 2020
- निशाणी बदला… भाग्य बदला – ३ - February 6, 2020
- निशाणी बदला… भाग्य बदला – २ - February 5, 2020
- ‘निशाणी बदला… भाग्य बदला’ - February 5, 2020
- विठ्ठला कोणता झेंडा घेऊ हाती – भाग २ - January 23, 2020
- विठ्ठला कोणता झेंडा घेऊ हाती – भाग १ - January 22, 2020
- प्रश्नकुंडलीची वेळ - January 21, 2020