कॉम्प्युटर म्हणले आपल्या डोळ्यासमोर एक ठरावीक चित्र येते, मॉनीटर (स्क्रीन) , कॉम्प्युटर चा डब्बा,  को-बोर्ड आणि अर्थातच माऊस.

ण जेव्हा कॉम्प्युटर ‘होम कॉम्प्युटर / पर्सनल कॉम्प्युटर’ या अवतारात प्रथम ऑफिसेस मधून आणि नंतर घराघरात पोहोचला तेव्हा वर लिहलेल्या पैकी  मॉनीटर , डब्बा , कि-बोर्ड या तीन गोष्टी अर्थातच होत्या पण हा बेटा ‘माऊस’ मात्र तेव्हा आस्तित्वातच नव्हता. मी कॉम्प्युटर शिकलो (१९७८) तेव्हा त्याला माऊसची सुविधाच नव्हती, तर दुसर्‍या मोठ्या कॉम्प्युटर ला माऊस तर सोडाच साधा कि-बोर्ड सुद्धा नव्हता , मॉनीटर (स्क्रीन) पण नव्ह्ता ! पंच् कार्ड आणि प्रिंटर च्या माध्यमातून कॉम्प्युटर वापरणारा आणि कॉम्प्युटर यांच्यात संभाषण व्हायचे. नंतरही काही वर्षे म्हणजे कॉम्प्युटर वर ‘डॉस’ ही ऑपरेटींग़ सिस्टीम होती तो पर्यंत माऊस नव्हतेच ,  अ‍ॅपल चा पहीला म्यॅक माऊस सहीत आला , पाठोपाठ माऊस वापर शक्य असलेली विंडोज ची पहीली आवृत्ती बाजारात आली.  पुढे पुढे ‘माऊस’ ही इतकी अत्यावश्यक गरज झाली इतकी की आज माऊस शिवाय कॉम्प्युटर ही कल्पनाच आपण सहन करु शकणार नाही.

असे जरी असले तरी माऊस या उपकरणाकडे कोणीच फारसे गांभिर्याने पाहात नाही , त्याची रचना, आकार, डीपीआय , ट्रॅकिंग,  या बाबी आपण विचारात न घेता फक्त किंमत हाच घटक  बघितला जातो. बर्‍याच वेळा आपण घेतलेल्या कॉम्प्युटर बरोबर एक माऊस फुकट (असे आपल्याला वाटते !) मिळत असल्याने आपली काहीच तक्रार नसते. ‘चालतयं की’  असे म्हणत पदरात पडला तो माऊस वापरला जातो.

सामान्यत: बाजारात मिळणारा (कॉम्प्युटर बरोबर फुकट मिळणारा) माऊस त्याचे विहीत काम चोख बजावतो यात शंका नसली तर त्याचे सदोष डिझाईन्स आपल्याला बरीच हानी पोहचवते हे आपल्या लक्षात येत नाही कारण  बर्‍याच जणांचा कॉम्प्युटर चा वापर तसा मर्यादीत असतो किंवा तुकड्या तुकड्यात विखुरला गेलेला असतो, पाच – सहा तास किंवा त्याहुनही जास्त काळ सलग कॉम्प्युटर वापरणार्‍यांना मात्र या माउस च्या सदोष डिझाईन ने उत्पन्न झालेला त्रास आज ना उद्या जाणवायला लागतो. त्यातही जे ग्राफीक्स सॉफ्टवेअर जसे फोटो शॉप, कोरेल ड्रॉ , अ‍ॅडोबी प्रीमियर, इनडिझाईन, इल्युस्ट्रेटर किंवा इतर अनेक अ‍ॅनिमेशन सॉफ्टवेअर्स वापरतात त्यांच्या बाबतीत हा त्रास लौकरच सुरु होतो कारण अशा कामात कि-बोर्ड पेक्षा माऊसच जास्त वापरला जातो / वापरावा लागतो. अशी कामे करताना उजवा हात कायमचा माऊस वर ठेवलेला असतो असे म्हणले तर फारसे वावगे ठरणार नाही.

माऊस च्या या अतिवापराने नेमक्या कोणत्या प्रकाराच्या समस्या निर्माण होतात? याचे उत्तर आपल्या हाताच्या पंजाची रचना , त्याची निसर्गाला अभिप्रेत असलेली हालचाल आणि सध्याचे माउस चे डिझाईन यात दडलेले आहे.

आपल्या कदाचित लक्षात येणार नाही पण जरा उभे राहून हात सैल सोडल्यास आपला पंजा कशा अवस्थेत असतो ते पाहा, हाताचा पंजा आपल्या मांडीला समांतर आहे असे दिसेल, म्हणजे पंजाची आतली बाजू (हस्तरेषा असलेली) आपल्या मांडीला चिकटलेली दिसेल.

 

 

 

 

 

 

 

आपला आत पुढे केला तरीही आपला पंजा जमीनीला लंबरुपात असतो. हीच आपल्या पंजाची नैसर्गिक स्थिती आहे .

 

 

 

 

 

 

 

 

 

आता आपण माऊस वर हात कसा ठेवतो ते पहा , हात माउस वर असतो तेव्हा तो जमीनीला समांतर असतो म्हणजे माऊस वर हाताचा पंजा ठेवताना ति आपण ९० अंशात वळवून मग माऊस वर ठेवतो,  म्हणजे माऊस वापरताना आपला पंजा असा बळजबरी वळवाव लागतो.

(वरील फटू तला ‘पंजा’ माझा आहे, मजा म्हणजे ,  काही महीन्यां पूर्वी बोटात घट्ट रुतुन बसणारी अंगठी आता वजन कमी झाल्यामुळे गोल गोल फिरायला लागली आहे!)

 

 

आपल्या हाताच्या पंज्याची रचना , मनगटाचा भाग तसा लवचिक असल्याने आपण हे करु शकतो (किंवा काही काळ सहन करु शकतो असे म्हणावे लागेल) पण काहीही झाले तरी ही आपल्या पंजाची नैसर्गिक ठेवण नाही, माउस चा वापर मर्यादीत असेल तर आपले शरीर हा अत्याचार सहन करु शकेल , त्रास जाणवणार सुद्धा नाही पण मी आधी लिहले आहे तसा जर  माऊस चा वापर होणार असेल तर आपले शरीर (इथे आपल्या उजव्या हाताचा पंजा ) नक्कीच कुरकुर करायला लागते. ‘बर्दाशी की भी एक हद्द होती है ‘ , ती ओलांडली की मग ही कुरकुर उग्र रुप धारण करायला सुरवात होते.  हा त्रास अनेक मार्गाने होतो. वैद्यक शास्त्रात याला विविध नावे व लक्षणे दिली आहेत त्याचा इथे उहापोह करणे शक्य नसले तरी काही परिचयाची नावे सांगतो, ती म्हणजे ‘कारपेल टनेल सिंड्रोम CTS’ आणि ‘रिपीटेटीव्ह स्ट्रेस इंजुरी RSI’.

 

Carpal Tunnel Syndrome is essentially a chronic impingement of the median nerve, which runs through your forearm to your palm.

There are a few ways to cause Carpal Tunnel, but the most common is that near-constant pressure on the underside of the wrist combines with a reduced range of motion to just sort of stick everything together inside there.

When you use a standard computer mouse, chances are good that you rest the underside of your wrist on your desk just about all the time. That is a recipe for wrist pain, fatigue, and carpal tunnel.

The most common injury that can result from a lack of proper mouse usage is wrist tendinitis.  In particular, tendinitis of the flexor carpi ulnaris, a tendon located on the anterior of the forearm.

Tendonitis of the flexor carpi ulnaris tends to occur when the wrist is repetitively put into a position of extreme ulnar deviation.  That is, the wrist is moved repetitively in the horizontal plane to its extremes.  As one study found, typical average ulnar deviation during non-mouse usage is in the range of 2 degrees.  However, when working at a computer, that number can go as high as 30 degrees.  In other words, when you mouse exclusively from the wrist, you are putting your wrist in an unnaturally extreme position.  When you do it excessively, it tends to result in tendinitis.

 

सामान्यत: मनगटात असह्य वेदना, जळजळ किंवा हालचाली करण्यात मर्यादा पडणे असे या विकाराचे स्वरुप असते. आता यावर औषध उपचार  तसेच फिजिओ थेरपी उपलब्ध असली तरी त्यांचा वापर ‘वेदनांना काही काळ आराम देणे’ इतकाच असतो. ज्या कारणां मुळे हा त्रास सुरु झाला ती कारणे थांबवणे हाच एक प्रभावी उपचार मानला जातो. आता इथे ‘अन्यायी वापर थांबवा’ म्हणजे माऊस चा वापर बंद करा असाच घ्यावा लागेल!

 

 

अर्थात हे शक्य होईलच असे नाही. काही जण मौज म्हणून किंवा वेबसर्फिंग म्हणून कॉम्प्युटर वापरता दिसत असले तरी काहीजणांचे (माझ्या सारख्या) पोट या कॉम्प्युटर वरच्या कामावर (म्हणजेच माऊस च्या वापरावर!) अवलंबून असते , आता माउस चा वापर थांबवा म्हणजे चक्क काम थांबवा असाच अर्थ आणि असे हे रोजीरोटीचे साधन अचानक बंद कसे काय करता येईल?

मग यावर उपाय म्हणजे म्हणजे:

 1. ‘माऊस’ ला पर्याय हुडकणे
 2. माउस हाताळण्याची चुकीची पद्धत बदलणे.

‘माऊस’ ला पर्याय म्हणता येतील अशी काही उपकरणें आपल्याला उपलब्ध आहेत , माऊस सारखेच काम करणारे पण मनगटावर ताण न पडणारे ग्राफिक्स पेन , ग्राफिक्स टॅबलेट / पॅड असे पर्याय उपलब्ध आहेत, हे पर्याय मनगटांना होणार त्रास मोठ्या प्रमाणात कमी तर करतातच शिवाय ह्या उपकरणांचे रेझॉल्युशन जास्त असल्याने , एकदम फाईन मुव्हमेंटस करता आल्याने माउस पेक्षा जास्त चांगले काम होते , म्हणूनच बहुतांश ग्राफिक्स डिझाईनर माऊस ऐवजी अशी ग्राफिक्स पॅड वापरतात. अर्थात हा एक चांगला पर्याय असला तरी महागडा आहे, अशा ग्राफिक्स पॅड / टॅबलेट ची किंमत काही हजारात असू शकते (कमीत कमी ₹ ५०००!) शिवाय ग्राफिक्स स्टायलस, बॅटरीज असा पुन्हा पुन्हा करावा लागणारा खर्च आहेच.

 

माउस हाताळण्याची चुकीची पद्धत बदलणे म्हणजेच सध्याच्या माउस च्या डिझाईन मध्ये आवश्यक ते बदल करणे. असा बदल करताना आपल्या हाताच्या पंजाची जी नैसर्गिक रचना आहे त्याचा अभ्यास करुन माऊसच असा बनवायचा की माऊस वापरताना हाताचा पंजा जमीनीला समांतर न राहता तो नैसर्गिक अवस्थेत म्हणजे जमीनीला लंब अवस्थेत राहील.

आधीच्या चित्रात नेहमीच्या माउस वर असलेला पंजा जमीनीला समांतर (पॅरालल) आहे , म्हणजेच आपल्याला हाताचा पंजा अनैसर्गिक रित्या ९० अंशात वळवून मगच तो माऊस वर ठेवावा लागतो. यामुळे कळत नकळत आपण आपल्या मनगटावर ताण देत असतो.

शेजारच्या चित्रात एक वेगळ्याच प्रकाराचा माऊस दाखवला आहे तो निट पाहा , इथे हाताचा पंजा कसा आहे ते पाहा,  माऊसच्या या सुधारित डिझाईन मध्ये आपला पंजा त्याच्या नैसर्गिक अवस्थेत म्हणजेच जमिनीला लंब (परपेंडीक्युलर) राहातो, जबरदस्ती ९० अंशात वळवावा लागत नाही, पंजा नैसर्गिक अवस्थेत राहील्यामुळे त्यामुळे पंजावर ताण पडत नाही. या अशा डिझाईनला ‘व्हर्टीकल माऊस’ म्हणतात.

तसे पाहीले तर माउस कसा पकडला जातो एव्हढा फरक सोडला तर बाकी साधारण माउस आणि हा माऊस यात कार्यक्षमतेच्या दृष्टीने काहीच फरक नाही, पण हा  माऊस सामान्य माऊस च्या तुलनेत चार-पाच पट महाग असतो. साधा वायर वाला माऊस आपल्याला ₹ ३०० च्या आसपास तर वायरलेस माऊस साधारण ₹ ६०० च्या घरात असतो, स्वस्तात स्वस्त व्हर्टीकल माऊस ₹ १००० ला मिळतो तर काही व्हर्टीकल माऊस च्या किंमती  ₹ १०,००० च्या घरात आहेत!

आता या व्हर्टीकल माउस ने ‘कारपेल टनेल सिंड्रोम CTS’ आणि ‘रिपीटेटीव्ह स्ट्रेस इंजुरी RSI’  या समस्या सुटतील का असा प्रश्न विचारला जाईल, याचे उत्तर असे की समस्या पूर्णपणे दूर होणार नाही पण मोठ्या प्रमाणात कमी होईल. ‘व्हर्टीकल माऊस’ आणला तरी अतिवापराने वर दिलेली दुखणे काही प्रमाणात होणारच!  हे ‘माऊस वापरावा लागतो असा व्यवसाय केल्याची किंमत’  किंवा ‘occupational hazard ‘ मानायचे.

व्हर्टीकल माऊस  महाग असले  तरी  हा खर्च एकदाच करावयाचा आहे, हाताच्या पंजाचे दुखणे मागे लागले की त्यावर होणार्‍या खर्चाचा तुलने ह्या  व्हर्टीकल माउस वर होणार एकवेळचा खर्च किरकोळ वाटेल !

माझ्या व्यवसायामुळे मला दिवसभर (बारा तासाच्या आसपास ) कॉम्प्युटर वर काम करावे लागते आणि माऊस चा वापर ही बराच असतो, मी मघाशी हाताच्या पंजाची जी दुखणी सांगीतली त्याची सुरवात दोन तीन वर्षां पूर्वीच झाली होती , सुरवातीला दुर्लक्ष केले , मग कोठे ‘मुव्ह’ लाव , गरम कपड्याने शेक असे उद्योग सुरु झाले,  पुढे पुढे दुखण्याने उग्र स्वरुप धारण करायला सुरवात केली ,  आता ‘व्होलिनी ‘ ची आख्खी ट्यूब फासून सुद्धा आराम वाटेनासा झाला. शेवटी डॉक्टरांना भेटावे लागले. डॉक्टरांचा सल्ला घेऊन , काही गोष्टी ताबडतोब बदलल्या / नव्या खरेदी केल्या, ज्यात:

 • सुयोग्य उंची असलेले टेबल
 • पाठीच्या कण्याला चांगला आधार देऊ शकत असलेली खुर्ची
 • उच्च दर्जाचा अ‍ॅन्टी ग्लेअर कोटींग असलेला कॉम्प्युटर मॉनीटर
 • मेकॅनिकल कि बोर्ड
 • व्हर्टिकल माऊस
 • उच्च दर्जाचे माऊस पॅड

या पैकी कि-बोर्ड वर मी लेख लिहला आहे, आता पुढच्या भागात मी घेतलेल्या ‘व्हर्टीकल माऊस ‘ बद्दल लिहतो.

क्रमश:

शुभं भवतु


About सुहास गोखले

मी सुहास गोखले या वेब-साईटचा निर्माता. आपल्याला ज्योतिष विषयक मार्गदर्शन हवे असल्यास किंवा आपली एखादी सुचना / तक्रार असेल तर खाली दिलेल्या 'संपर्क फॉर्म' मध्ये माहीती भरुन पाठवल्यास मी ताबडतोब आपल्याशी संपर्क साधेन.
+1

सुहास गोखले administrator

मी सुहास गोखले या वेब-साईटचा निर्माता. आपल्याला ज्योतिष विषयक मार्गदर्शन हवे असल्यास किंवा आपली एखादी सुचना / तक्रार असेल तर खाली दिलेल्या 'संपर्क फॉर्म' मध्ये माहीती भरुन पाठवल्यास मी ताबडतोब आपल्याशी संपर्क साधेन.

2 प्रतिक्रिया

///////////////
 1. संतोष

  सुहासजी,

  माउस दिसायला एकदम भारी आहे.
  बऱ्याचदा आपण काही गोष्टी एवढ्या डिटेल मध्ये नाही पाहत, तुमचं शास्त्रोक्त विवेचन फार छान आहे.

  संतोष सुसवीरकर

  +1
  1. सुहास गोखले

   श्री. संतोषजी ,

   अभिप्रया बद्दल आभार. मी या लेखात सांगीतलेल्या समस्या जास्त वेळ माऊस वापरणार्‍यांना थोड्या फार फरकाने होतातच, समस्या निर्माण झाली की मग महागडी औषशे / ट्रीटमेंट घ्यावी लागते एव्हढे करुनही झालेले नुकसान भरुन निघेलच असे नाही. त्यापेक्षा वेळीच सावध होऊन चांगल्या उपकरणां साठी थोडी गुंतवणूक केली तर या समस्या मुळातच निर्माण होणार नाहीत.

   प्रत्येक व्यवसायात अशा प्रकारची ऑक्युपेशनल हॅजार्ड्स असतात , त्रास असतातच . व्हेरीकोज व्हेन्स, स्पॉन्डीलायटीस, कॉन्स्टीपेशन, मायग्रेन , विविध प्रकाराच्या जॉईंट पेन्स यादी बरीच मोठी आहे.

   मोबाईल फोन च्या अतिवापराने अनेक प्रकारच्या शारीरीक आणि मानसीक व्याधी निर्माण होत आहेत , आत्ता आत्ताशा लोकांना त्याची जाणीव व्हायला सुरवात झाली आहे .

   माउस , कि-बोर्ड सारख्या उपकरणां बाबत आपण फारसे दक्ष असत नाही म्हणून मी माझ्या अनुभवा आधारीत काही लिहण्याचा प्रयत्न करतो आहे.

   सुहास गोखले

   0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.