प्रत्येक राशीच्या लोकांचा एक स्वभाव असतो, वागायची एक पध्दत असते, आता हेच बघा ना , एका इंटरव्हू साठी बरेच जण आलेत, त्यात सर्व राशींचे लोक असणारच पण ओळखता येतेय कोण कोणत्या राशीचा ते?

मेष: “साला काय घोळ घालताय, फटाफटा इंटरव्हू घेऊन मोकळे कराना एकदा”

वृषभ: “लागू दे पाहिजे तेवढा वेळ, पण ती चिकणी रिसेप्शनिष्ट आमच्या समोर राहिल असे बघा..”

मिथुन: “कॅन्टीन चा चहा बेक्कार पण त्या कॅंटीन वाल्या मामाची काय फिरकी घेतली म्हणुन सांगु”

कर्क: “ अरेरे, काय ही गर्दी, काय ही बेकारी, माझ्या पेक्षा त्या कोपर्‍यातल्या मुलाला मिळायला हवी ही नोकरी, बिच्चारा किती गरजु वाटतो”

सिंह: “खरे तर मी आलेलो असताना आणखी कोणाचा इंटरव्हू घ्यायची गरजच नाही ”

कन्या: “तिसर्‍यांदा तपासले, सगळी सर्टीफिकेटस् आणलीतना, माझा अर्ज नककी वाचला असेल ना त्यांनी?”

तुळ: “येईल, येईल योग्य वेळ येताच सगळे काही होईल, अहो मिस रिसेप्शनिष्ट, जरा ते मॅगेझिन देता का”

वृश्चिक: “साला सगळी वशिलेबाजी असणार, हंटर ने फोडुन काढले पाहिजे एकेकाला”

धनु:  “युसलेस फेलोज, फार वेळ लावतात बुवा, आमच्या वेळेची काही किंमत, जाऊ दे ती ही माणसेच ना शेवटी”

मकर: “मी विमा पॉलीसीची ब्रोशर्स आणि फॉर्मस् आणायला पाहिजे होते, एक दोन मासे नक्की गळाला लागले असते”

कुंभ: “सार्क ने जे काही सांगीतले ते मंडुकोपनिषदात हजारो वर्षांपासुन आहे, पण त्याही पेक्षा चार्वाकाने तित्तरिय उपनिषदाच्या सातव्या खंडातल्या पाचव्या ऋचे वर जे भाष्य केले आहे ना…”

मीन:  “माझे नशिबच फुटकं, इथे ही तेच होणार, सकाळी अंघोळीच्या वेळी नळाचे पाणी गेले तेव्हाच मला वाटले होते … ”

शुभं भवतु


About सुहास गोखले

मी सुहास गोखले या वेब-साईटचा निर्माता. आपल्याला ज्योतिष विषयक मार्गदर्शन हवे असल्यास किंवा आपली एखादी सुचना / तक्रार असेल तर खाली दिलेल्या 'संपर्क फॉर्म' मध्ये माहीती भरुन पाठवल्यास मी ताबडतोब आपल्याशी संपर्क साधेन.

सुहास गोखले administrator

मी सुहास गोखले या वेब-साईटचा निर्माता. आपल्याला ज्योतिष विषयक मार्गदर्शन हवे असल्यास किंवा आपली एखादी सुचना / तक्रार असेल तर खाली दिलेल्या 'संपर्क फॉर्म' मध्ये माहीती भरुन पाठवल्यास मी ताबडतोब आपल्याशी संपर्क साधेन.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.