हरिसभाईला झाली सर्दी, बारीक ताप ही होता, सर्दीच आहे होईल बरी दोन चार दिवसात, म्हणून हरिसभाईने दुखणं अंगावरच काढले.
सर्दीने जेव्हा  उग्र रुप धारण केले तेव्हा कांताबेन (हरिसची बायडी ) म्हणाली :

‘ते डोक्टर कडे जाव ना काय तरी दवा पानी द्येयेल ना ते’ .

‘मला ते का समज्यते नाय का, पन काय हाय ते डोक्टर साला फोकट मंदी दवा देणार नाय, ते पैसा मागनार, हौन ज्याईल दो दिन मंदी बरा तेला काय करायचा दवा दारु , खालीपिली पैसा ज्याणार ना तेच्या पाकीट मंदी‘

आणखी दोन दिवस गेले आणि प्रकरण हरिसभाईच्या सहनशक्तीच्या बाहेर गेले. आता डॉक्टर गाठलाच पाहिजे हे हरिसभाईचा ध्येनामंदी आले पण ‘खालीपिली पैसा ज्याणार ना तेच्या पाकीट मंदी’ हे काही हरिसभाईच्या डोक्यातून जात नव्हते.

कांताबेन म्हणाली ‘ ते आपले कोलनीतला द्येसपांदे डाक्टर हाय ना, च्यांगला दवा देते, तेला विचारनी ‘

‘हा ते च्यांगला हाय पन ते साला पैसा देल्या बिगर तोंड नाय खोलनार ‘

मग हरिसभाईच्या सुपिक मेंदूतन मग एक शक्कल निघाली, त्याला माहीती होते की डॉ. देशपांडे रोज सकाळी कॉलनीतल्या बागेत मॉर्नींग वॉक ला जातात , तेव्हा त्यांना तिथेच गाठून गप्पा गोष्टी केल्याचे नाटक करुन सर्दीचे औषध विचारु घेऊ. हरिसभाईची ट्रिक यशस्वी झाली, हरिसभाईच्या मिठ्ठास बोलण्याच्या भरात येऊन डॉ. देशपांडेंनी औषध सांगून टाकले. एका दिवसात हरिसभाईला आराम पडला. फुकटात काम झाले म्हणून हरिसभाई खुस !

पण हा आनंद फार काळ टिकला नाही, कारण चारच दिवसानंतर हरिसभाईला पोष्टाने डॉ. देशपांडें कडून एक बील आले ‘ वैद्यकीय सल्ला रु 300/- ‘.

हरिसभाईला कळेना “हे साला मला 300 रुपेचा बील कसा काय आला ,मी ते डोक्टरचा दवाखाने मंदी कदी गेला बी नाय तरी साला बील कसा काय पाठवला? गलतीसे मिस्टीक झ्याला असनार ‘ असा समज करुन हरिसभाई ने त्याकडे दुर्लक्ष केले. आठ दिवसांनी डॉ. देशपांडें कडून एक माणूस हरिसभाई कडे आला व रु 300/- ची मागणी करु लागला.

‘अरे तसा काय नाय, माजा कायपन पैसा देयाचा बाकी नाय, काय तर च्युकी जाला आसल , मी द्येसपांदेशी बोलते समदा तु जाव ‘ असे सांगून हरिसभाईने त्या माणसाला कटवला. थोड्याश्या गुश्यातच हरिसभाई दुकानात पोचला. तिथे त्याचे मित्र अ‍ॅडव्होकेट बिपीन मेहता भेटले.

“हरिसभाय, आज जरा गुस्से मा’

‘ए बिपीनभाय, हे बघ ना साला, हे द्येसपांदे डोक्टर कसा पागल जैसा करते, साला तेच्या दवाखाने मंदी कदी गेला नाय, तेचा दवा पन नाय घेतला, तरी साला 300 रुपेचा बील कसा काय पाठवला, आज तेचा आदमीपन येऊन गेला पिसा मागायला’

मग हरिसभाईने बिपीनभाईला समदी इस्टोरी डीट्टेलमंदी सांगीतली. बिपीनभाई म्हणाला :

‘देख हरिसभाय, साला गल्ती तुजाच हाय, तू तेला गार्डन मंदी दवा विचारला नाय का, ते तेचा पैसा मागते बग ’

‘अरे पन तेच्या दवाखाने मंदी जाऊन विचारला तर पैसा देयेल नी पण मी साला तेला गार्डन मंदी दवा विचारला,आपला दोस्तीमंदी , तेचा काय पैसा पडते काय?’

‘हरिसभाय , तेचा काय हाय , घर ,ओफिस , गार्डन कवा पन , कंदीपण, ते डाक्टर असते, तू बिमारीचा बात तेचा कडे केला अन तेने दवा सांगीतला , ते तेचा सलाह .तवा तु तेचा सलाह कदी घ्येतला, कुटे घ्येतला तेचा काय पण फरक नाय पड्ते , तुला तेचा  पिसा देयालाच पायजे , नाय दिला तर ते कोरट मंदी ज्यायल ’.

चरफडत का होईना हरिसभाय ने डॉ. देशपांडेंचे बील भरुन टाकले ‘साला दोस्तीमंदी काय विचारला ता तेचा पैसा मागते’.

चारच दिवसानंतर हरिसभाईला पोष्टाने अॅडव्होकेट बिपीन मेहता कडून एक बील आले ‘ कायदेविषयक सल्ला रु 1200/- ‘.

हरिसभाईला कळेना हे साला मला 1200 रुपेचा बील कसा काय आला ,मी ते बिपीनभायाचा ओफीस मंदी कदी गेला बी नाय,माजा कोरट चा काय लफडा बी नाय, तरी साला बील कसा काय?

असे हरिसभाई मला नेहमीच भेटत असतात, कधी ते मित्र बनून येतात, तर कधी शेजारी म्हणून , आणि नातेवाईक तर काय हक्काचेच !

हया हरिसभाईंच्या दृष्टीने ‘तेला काय टाईम लागते, साला पत्रिका घ्येयाची न सांगायचा फटफट’ असे जरी असले तरी मला असे कॅज्युअल राहता येणार नाही, कुंडली हातात घेतल्यावर शास्त्राशी प्रतारणा करता येणार नाही, व्यवस्थित अभ्यास हा करावाच लागतो, द्यायचा तो वेळ द्यायलाच लागतो, मेहनत ही करावी लागते आणि बर्‍याच जणांना कल्पना नसते पण या कामाला काही वेळा तीन – चार तास सुद्धा लागू शकतात.

ज्योतिष विषयक सल्ला /मार्गदर्शन देणे हा माझा व्यवसाय आहे, माझे ज्ञान ही माझी गुंतवणूक आहे व मी खर्च करत असलेला वेळ हा माझा कच्चामाल आहे , त्यामुळे ‘घोडा अगर घास से दोस्ती करेगा तो खायेगा क्या ? ‘

पण लक्षात कोण घेतो?

शुभं भवतु


About सुहास गोखले

मी सुहास गोखले या वेब-साईटचा निर्माता. आपल्याला ज्योतिष विषयक मार्गदर्शन हवे असल्यास किंवा आपली एखादी सुचना / तक्रार असेल तर खाली दिलेल्या 'संपर्क फॉर्म' मध्ये माहीती भरुन पाठवल्यास मी ताबडतोब आपल्याशी संपर्क साधेन.
+1

सुहास गोखले administrator

मी सुहास गोखले या वेब-साईटचा निर्माता. आपल्याला ज्योतिष विषयक मार्गदर्शन हवे असल्यास किंवा आपली एखादी सुचना / तक्रार असेल तर खाली दिलेल्या 'संपर्क फॉर्म' मध्ये माहीती भरुन पाठवल्यास मी ताबडतोब आपल्याशी संपर्क साधेन.

4 प्रतिक्रिया

///////////////
  1. अन्नासाहेब गलांडे

    सुहासजी।नमसकार
    सुरवात झाली,वाचतोय
    येऊ दया

    0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.