पुस्तक लिहायचे ठरवले आणि  काही अ‍डचणी  लगेचच डोळ्यासमोर आल्या. सगळ्यात पहील्यांदा लक्षात आले ते म्हणजे पुस्तकाच्या लिखाणाचा आवाका फारच मोठा असतो !  २५० पृष्ठांचे पुस्तक लिहायचे म्हणजे किमान ५०० पाने लिहायला लागणार म्हणजे काटछाट करुन शेवटी ते २५० पानां पर्यंत येईल.

मी ब्लॉग वर लिहतो ते तीन-चार पानांचे पण आता ५०० पाने लिहायची म्हणजे जरा जास्त सिस्टीमेटीक  लिहायला हवे , त्यातही सलग एका पाठोपाठ असे चॅप्टर्स  लिहणेही शक्य नसते ,  जसे सुचेल तसे लिहायचे आणि नंतर हे सगळे तुकडे जोडून गोधडी पूर्ण करायची असे काहीसे करावे लागणार आहे.

पूर्वीचे लेखक पेन – पेन्सील ने वहीत लिहायचे , पुढे टाइपरायटर चा वापर सुरु झाला. अलिकडच्या काळात संगणकावर लेखन होते व त्यासाठी एखादा वर्ड प्रोसेसर वापरला जातो.

आपल्या पैकी बहुतेकांना मायक्रोसॉफ्ट चा ‘वर्ड’ हा वर्डप्रोसेसर माहीती असेलच , एखादा एका पृष्ठात बसेल असा मजकूर , रेझ्युमे, रिपोर्ट असे काही लिहायला बर्‍याच जणांनी ‘वर्ड’ वापरला असेल. ही कामे करायला सध्यातरी वर्ड इतके चांगले सॉफ्ट्वेअर दुसरे कोणते नाही हे पण मान्यच करायला हवे.

पण पुस्तकाचे लिखाण करायला मायक्रोसॉफ्ट वर्ड अगदीच कुचकामी . याचे मुख्य कारण म्हणजे ‘वर्ड’ हा मुख्यत: ऑफिसच्या कामाला जास्त उपयोगी आहे, जिथे मजकूर काय लिहायचे हे नक्की असते , अगदी पहील्या ओळीपासून ते शेवट पर्यंत सलग लिहायचे असते. किंबहुना लिहण्यापेक्षा फॉरमॅटींग मध्येच जास्त वेळ जातो असा अनुभव आहे ! त्यातही लिखाणात चित्रे (ग्राफिक्स) असतील तर ‘वर्ड’ हमखास घोळ घालतो. जसे जसे  लिखाणाचा आकार मोठा होत जातो ( १००  पानें) तसे तसे ‘वर्ड’ नवे नवे प्रश्न निर्माण करतो आणि लिखाणाचा मौल्यवान वेळ हा त्या ‘वर्ड’ चे नखरे आणि तंत्रे सांभाळण्यात जातो . हा अनुभव फक्ता ‘वर्ड’ च्या बाबतीत नाही तर मायक्रोसॉफ्ट च्या बहुतेक सर्वच प्रॉडक्ट्स बाबतीत येतो. आपल्यालाही असे अनुभव बरेच वेळा आले असतील.

थोडक्यात मायक्रोसॉफ्ट वर्ड हा सगळे लिखाण हे नेहमीच सलग (linear) असते अशी शक्यता विचारत घेऊन तयार केला आहे , पण पुस्तके , कांदबरी या सारखे लेखन प्रकार असे सलग कधीच लिहले जात नाहीत.

काही वेळा एकदम शेवट लिहला जातो मग अनुक्रमणिका, मग अधला मधला एखादा चॅप्टर , काही वेळा नुसत्या कल्पना , प्रसंग, उदाहरणें नोंद केल्या जातात , नंतर त्यांचा जसा लागेल तसा वापर केला जातो.  एखादा ग्रंथ लिहायचा म्हणजे बरीच तयारी करावी लागते , बरीच माहीती गोळा करावी लागते ,  केव्हाही , काहीही सुचु शकते. लिहलेले , सुचलेले सगळेच वापरले जात नाही, बरीच मोडतोड , फिरवाफिरवी करावी लागते .

दुर्दैवाने मायक्रोसॉफ्ट वर्ड ही असले काही हाताळू शकत नाही  (यात त्याचा काही दोष नाही, तो ह्या अशा कामासाठी तयारच केलेलाच नाही!) . मग असा कोणता वर्ड प्रोसेसर आहे जो ह्या गरजां पूर्ण करु शकेल आणी लिहुन पूर्ण झाल्यावर त्याचे प्रिंटिंग साठीचे प्रोसेसिंग ही काही प्रमाणात करु शकेल. मग शोध सुरु झाला अशा एखाद्या वर्ड प्रोसेसर चा जो खास ग्रंथ लेखनासाठीच तयार केला आहे, थोडा शोध घेतल्यावर , असा एक वर्ड प्रोसेसर सापडला !

 


https://www.literatureandlatte.com/scrivener.php

 

‘स्क्रिवेनर’  (Scrivener)  हा खास ग्रंथ लेखनासाठी तयार केलेला वर्ड प्रोसेसर आहे.  सध्या मी याची  ३० दिवसाची ‘ट्रायल व्हर्शन ‘ वापरत आहे ,  अगदी मला जसा हवा होता तस्सा हा वर्ड प्रोसेसर आहे,   याचे लायसेंस तसे खूपच स्वस्त आहे (डॉलर ४० फक्त!) मी अगदी लौकरच , म्हणजे ट्रायल संपयाच्या आतच लायसन्स विकत घेत आहे !

आपल्याला कल्पना येण्यासाठी इंटरनेट वरुन उचललले काही स्किनशॉट्स.

मुळात हा मॅक साठी तयार केलेला असल्याने युजर इंटरफेस अगदी खास मॅक फ्यॅमीलीतला आहे.

Scrivener

At a Glance

Organizational and word processing software for fiction and screenplays
Uses the full power of the Mac OS X system to dynamically manage your writing project
Puts all your research and information in one place for easy access while you write

Scrivener is a word processor and project management tool created specifically for writers of long texts such as novels and research papers. It won’t try to tell you how to write – it just makes all the tools you have scattered around your desk available in one application.

Scrivener provides access to the full power of the OS X text system: add tables, bullet points and images and format your text however you want. Define ranges of text as footnotes and they become footnotes when you export or print. And because the way you view your text onscreen may not always be how you want to see it in print, Scrivener makes it easy to format the printed or exported text completely differently from what is onscreen – leaving you free to focus on the actual writing.

Research
No more switching between multiple applications to refer to your files. Keep all of your research – image files, PDF documents, movies, sound files and web pages – right inside Scrivener. And unlike in other programs that only let you see one document in a window at a time, Scrivener lets you view a research document in one pane and compose your text in another right alongside it.

Corkboard
The corkboard is one of the writer’s most familiar tools. In Scrivener, every document is attached to a virtual index card onto which you can jot a synopsis. Use the corkboard to shuffle these index cards around – which is instantly reflected in the structure of your draft.

Outline
The outline feature is another way of viewing the synopses and meta-data of the documents in your project. Restructure your work easily; get an overview of the project so far and what still needs to be done; check how many scenes have a certain character as the point-of-view character; read and edit an overview of a scene, a chapter or of the whole draft.

Draft the Next Blockbuster
While Scrivener is not a replacement for dedicated screenplay software, its familiar scriptwriting features make the basics of formatting a script easy. So you can draft your script inside Scrivener using Scrivener’s unique research and structuring tools, and then export it to a dedicated scriptwriting program. And because you can mix up script formatting with normal text, it makes it easier than ever to write treatments.

Smile – You Have Snapshots Never be afraid to make mistakes. Scrivener’s “snapshot” feature makes it easy to return to an earlier version of your text. Before starting a major edit on a document, just take a snapshot, which stores the old version safely away. You can then call up old snapshots for reference, or restore an older version of the text if you decide you prefer it to the most recent revision.

Full Screen – Evolved
Sometimes you want to blank out the rest of the world while you write – or at least the rest of the screen. Scrivener boasts the most advanced full screen editing mode out there. Fade the background in and out, choose the width of the “paper” and get writing. Prefer an old-school green-text-on-black look? No problem. Flexible preferences mean you can set up the full screen mode however you want. Change documents, refer to your notes, apply keywords – or just write – in one of the most beautiful distraction-free modes available.

Compile for Export or Print
Finished your masterpiece? Now it’s time to get it out there by compiling your draft into a single document: print a novel using standard manuscript formatting; export to Microsoft Word; save as HTML; export as plain text and import a screenplay into Final Draft. Whatever your requirements, Scrivener’s export feature is powerful enough that you need do little formatting until you come to export and publish. And for those who want to typeset their own work, Scrivener even supports the MultiMarkdown markup language, which gives those who have more exacting requirements all the power of exporting to LaTeX and XHTML.

Particularly suited to writers who don’t always think in a linear fashion, Scrivener is a revolutionary program that will help you manage and complete your next creative project.

 

मायकोसॉफ्ट वर्ड हे  असले काही सहजपणे आणि ते सुद्धा सिस्टीम क्रॅश न होता करु शकेल का ? मला तरी  याबद्दल मला मोठ्या शंका आहे. तेव्हा सध्यातरी तरी  ‘स्क्रिवेनर’   झिंदाबाद!
पुढे मागे सविस्तर ‘अणूभव’ लिहेन !

शुभं भवतु


About सुहास गोखले

मी सुहास गोखले या वेब-साईटचा निर्माता. आपल्याला ज्योतिष विषयक मार्गदर्शन हवे असल्यास किंवा आपली एखादी सुचना / तक्रार असेल तर खाली दिलेल्या 'संपर्क फॉर्म' मध्ये माहीती भरुन पाठवल्यास मी ताबडतोब आपल्याशी संपर्क साधेन.
0

सुहास गोखले administrator

मी सुहास गोखले या वेब-साईटचा निर्माता. आपल्याला ज्योतिष विषयक मार्गदर्शन हवे असल्यास किंवा आपली एखादी सुचना / तक्रार असेल तर खाली दिलेल्या 'संपर्क फॉर्म' मध्ये माहीती भरुन पाठवल्यास मी ताबडतोब आपल्याशी संपर्क साधेन.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.