19 डिसेंबर 2013 ची प्रसन्न सकाळ, दिवसातल्या सर्व अपॉईंटमेंटसचा आढावा घेत होतो. सकाळची आठची पहीलीच  अपॉंटमेंट  सौरभची होती. आता हा बाबा वेळेवर येणार का असा विचार मनात येतो न येतो तोच सौरभ  दारात हजर !

सौरभचा प्रश्न होता “नोकरी कधी मिळणार ?”

के. पी. होरारी ने उत्तर दिले.. अचूक – ठाम आणि परखड!

“सौरभ, मिळेल रे नोकरी, नको एव्हढे टेंशन घेऊ, सकाळी सकाळी आला आहेस , मस्त चहा घे , रिलॅक्स हो जरा मग पाहू या तुझ्या नोकरीचे कसे काय जमते ते ”

सौरभ ने त्याची एक संगणकीकृत जन्मपत्रिका आणली होती, नुसती जन्मपत्रिका नव्हती तर चक्क 120 पानाचे पुस्तकच होते ते , काय नव्हते त्यात, पन्नासपेक्षा जास्त कुंडल्या, सुमारे आठ वेगवेगळ्या दशा पद्धतीचे तक्ते, अनेक चक्रे , अष्ट्कवर्ग आणी चक्क पुढच्या 100 वर्षाचे महिनावार भविष्य “आप दिलके साफ है , …किसिको सहायता करना आपकी मजबूरी रहेगी .. कोई करीबी रिश्तेदार आपकी सहायता करनेका बहाना बनाके आपको फसायेगा…” या पद्धतीचे.

जन्मकुंडली अत्यंत महत्वाची  ती जातकाच्या 70-80 वर्षाच्या जीवनाबद्दल भाष्य  करते पण ‘लग्न कधी ठरेल’, ‘नोकरी कधी लागेल’, ‘बदली कधी होईल’,’हरवलेली वस्तू सापडेल का’ यासारखे तत्कालीन प्रश्न सोडवायला प्रश्न कुंडलीच जास्त उपयोगी पडते असा माझा अनुभव आहे.

जन्मपत्रिके बाबत एक मोठी समस्या असते ती म्हणजे अचूक जन्मवेळेची! ‘के.पी.’ ही ‘सब लॉर्ड थिअरी ‘ आहे , भविष्यकथनाचा सर्व डोलारा ह्या सब लॉर्डवर अवलंबून आहे, त्यामुळे ‘सब लॉर्ड्स’ अत्यंत अचूक असावे लागतात म्हणजेच जन्मवेळ ही तितकीच अचूक असायला हवी, पण होते काय आपल्यापैकी बर्‍याच जणांच्या जन्मवेळा अचूक नसतात, बहुतेक जन्मवेळां 11:15, 12:30, 3:45 अशा ज्याला ‘रांऊंडेड’ फिगर म्हणतात तशा नोंदवलेल्या असतात. कोणी तुम्हाला  अगदी यावेळेला विचारले की ‘काय टाईम झाला”‘ तर तुम्ही ‘4 वाजून 12 मीनिटें 27 सेकंद’ असे सांगाल का ‘सव्वा चार (4.15)’ ? त्यामुळे जन्मवेळेत ही अवघी २-४ मिनिटांची चूक वरकरणी क्षुल्लक वाटली तरी ‘के.पी.’ मध्ये ती फार महागात पडते. ह्या किरकोळ चुकीने सब लॉर्डस बदलतात व नरेंद्र मोदींचा अरविंद केजरीवाल होऊ शकतो. बहुतांश लोकांच्या जन्मवेळां +/- 5 मिनीटेच नव्हे तर चक्क +/- 30 मिनिटां पर्यंत मागेपुढे असु शकतात. यावर उपाय म्हणजे जन्मवेळेचे शुद्धीकरण. यासाठी मी जातकाच्या आयुष्यात घडलेल्या घटनांचे विश्लेषण ‘सोलर आर्क, टर्शरी प्रोग्रेशन्स, युरेनियन प्लॅनेटरी पिक्चर्स’ असे अनेक मार्ग वापरुन करुन जन्मवेळ नेमकी कोणती असू शकेल याचा अंदाज घेतो. पण ही एक बरीच वेळ घेणारी प्रक्रिया आहे, फार मोठी मेहेनत आहे. आजकाल जातकांना झटपट भविष्य हवे असते, तेही 100% अचूक , आणि वर हे सर्व फुकटात मिळावे ही माफक (?) अपेक्षाही असते !

के. पी. जन्मपत्रिके पेक्षा प्रश्न कुंडली साठी जास्त उपयुक्त आहे असे माझे मत बनले आहे. अनेक जुन्या जाणकार ‘के. पी.’ अभ्यासकांनी सुद्धा प्रत्यक्ष/ अप्रत्यक्ष रित्या याचाच पुरस्कार केला आहे.

प्रश्नकुंडलीची वेळ आपण स्वत: ठरवु शकतो त्यामुळे जन्मवेळेची अचूकता हा प्रश्न राहात नाही. मी बरेचसे प्रश्न प्रश्नकुंडलीच्या आधारानेच सोडवतो. एव्हढेच नव्हे तर जन्मकुंडली वापरताना देखील त्यावेळची एक होरारी कुंडली तयार करतो या अशा विविक्षित वेळेच्या होरारी चार्टला ’कन्सलटेशन चार्ट ‘ म्हणतात. याचा भविष्यकथनात फार उत्तम उपयोग करुन घेता येतो. किंबहुना तसा तो करुन घ्यावा असे माझे आग्रहाचे प्रतिपादन आहे. त्याबद्दल लौकरच एक स्वतंत्र लेख लिहायचा विचार आहे.

सौरभला अगदी थोडक्यात प्रश्न कुंडली म्हणजे काय ते सांगून त्याला मनात घोळणार्‍या प्रश्नावर लक्ष केंद्रित करून, एक नंबर जो, 1 ते 249 मध्ये असेल असा द्यायला सांगितला.
सौरभ ने थोडवेळ डोळे मिटून तो ज्या एका मुंबईच्या एका ‘बापूं’ ना फार मानतो, त्यांच्या नावाचा जप केला आणि “40” हा नंबर दिला.

प्रश्नकुंडली साठी असल्या काही धार्मिक कर्मकांडाची अजिबात आवश्यकता नाही किंवा तुमचा देवा वर विश्वास असलाच पाहिजे असेही नाही. मग काय हवे? ‘दाढ दुखी’ सारखा अगदि ठणकणारा प्रश्न, प्रश्नाचे उत्तर जाणून घ्यायची कमालीची तळमळ आणि ज्योतिषशास्त्रावर विश्वास !

आता ते ‘40’ नंबर वरुन तयार केलेली प्रश्न कुंडली शेजारीच दिली आहे .

 

प्रश्न कुंडली चा डेटा:

होरारी नंबर: 40 (/249)
दिनांक: 19 डिसेंबर 2013
वेळ: 08:23:04
स्थळ: देवळाली कॅम्प (नाशिक)
अयनांश: कृष्णमूर्ती 23 :57:43
संगणक आज्ञावली : KPStar One

प्रश्न कुंडलीत सर्व प्रथम पाहायचे तो चंद्रमा, तो मनाचा कारक ग्रह मानला जात असल्याने प्रश्न विचारते वेळी जातकाच्या मनात काय काय विचार घोळत होते याचा दाखला हा चंद्र नेहमीच देत असतो आता हा चंद्रमा कोणत्या घरात आहे, कोणाच्या नक्षत्रात आहे ते बघायचे.

सौरभ ‘नोकरी कधी मिळेल? म्हणून एव्हढसे तोंड करुन आलेला असल्याने, तोच विचार प्रामुख्याने त्याच्या मनात असायला पाहीजे , नव्हे तसा तो नसल्यास प्रश्न विचारण्याची वेळ चुकली अथवा सौरभ नोकरीसाठी फारसा गंभिर नाही असा त्याचा अर्थ निघेल.
के. पी. मध्ये नोकरीसाठी तीन महत्त्वाची स्थाने आहेत:

2: आर्थिक उत्पन (बॅंक बॅलन्स)
6: व्यवसाय / नोकरीच्या जागी नियमित उपस्थिती
10: नोकरी /व्यवसाय / करियर
11: जातकाची इच्छापूर्ती
यापैकी दशम स्थान (10) हे प्रमुख घर (प्रिंसीपल हाऊस) म्हणून विचारात घ्यायचे.

चला आता आपण सौरभच्या प्रश्न कुंडलीत ‘चंद्र’ काय प्रकाश पाड्तोय ते पाहू.
(इथुन पुढे ग्रहाचे अथवा भावाचे कार्येशत्व लिहताना ते :
A grade / B grade / C grade / D grade अशा पद्धतीने लिहीले आहे, त्यामुळे कार्येश ग्रह कोणते ते तर कळतेच पण त्यातले प्रथम दर्जाचे कोण हे पण लगेच लक्षात येते‌.)

हा चंद्र धनात (2), त्रितीयेश (3), गुरुच्या नक्षत्रात, गुरु धनातच (2), अष्टमेश (8) व लाभेश (11) म्हणजे चंद्र: 2 / 2 / 8, 11 / 3 या भावांचा म्हणजे नोकरी साठीच्या महत्त्वाच्या धन (2) व लाभ (11) या दोन्ही भावांचा कार्येश आहे. प्रश्नाचा रोख बरोबर आहे हे चंद्राच्या कार्येशत्वाने जणू सिद्धच केले आहे. चंद्र स्पष्टपणे सांगतोय की सौरभचा प्रश्न प्रामाणिक आहे, मनापासून, कळकळीने विचारला आहे. ही कुंडली आपल्याला सौरभला नोकरी मिळेल का हे तर सांगेलच आणि जर नोकरी मिळणार असेल तर ती केव्हा हे पण सांगेल.

जर चंद्र भलतीच कोणती स्थाने दाखवत असेल तर? असे होते काही वेळा, जातकाच्या मनात वेगळेच काही तरी घोळत असते, प्रश्न दुसराच कोणता तरी विचारलेला असतो, चंद्र हा गोंधळ दाखवतोच. अशा वेळी प्रश्नाचे उत्तर देऊ नये, जातकाला काही वेळा नंतर, मनातले इतर विचार बाजूला करून, फक्त समोरच्या पश्नावरच मन केंद्रित करायला सांगून त्याच्या कडून दुसरा नंबर घ्यावा.

आता पुढचा टप्पा, नोकरी मिळण्याचा योग आहे का ? याचे उत्तर दशमाचा (10) सब लॉर्ड देणार कारण नोकरी/व्यवसाय विषयक प्रश्नांना दशम स्थान (10) हे प्रमुख ( प्रिन्सिपल हाउस ) भाव आहे.
या टप्प्यावर आपल्याला दोन गोष्टीं तपासायच्या असतात:

 1. सर्वप्रथम बघायचे ते हे की हा सब लॉर्ड वक्री ग्रहाच्या नक्षत्रात नसावा.तो स्वत: वक्री असला तरी चालेल. जर हा सब लॉर्ड वक्री ग्रहाच्या नक्षत्रात असेल तर प्रश्नात अपेक्षित असलेली घटना घडणार नाही. नोकरीचा प्रश्न असेल तर ‘नोकरीचा योग नाही’. पण याचा अर्थ जातक आयुष्यभर नोकरी विना बेकार राहणार, त्याला नोकरी कधीच मिळणार नाही असा नाही, प्रश्नकुंडली साधारणपणे सहा महिन्यांच्या कालावधीसाठी (काही अपवादत्मक स्थितीत ही कालमर्यादा दिड वर्षा पर्यंत घेता येते‌‌ ) उपयुक्त असल्याने याचा अर्थ असा घ्यायचा की नजिकच्या काळात ‘नोकरीचा योग ‘नाही, पण त्या पुढच्या काळात तो योग असेलही. उत्तर जर याच टप्प्यावर नकारार्थी आले तर मग केस ईथेच बंद करावी, पुढचे विश्लेषण करत बसण्याची आवश्यकता नाही.
 2. दुसरा तपासणीचा मुद्दा, हा सब प्रश्ना सदर्भातल्या भाव समुहातल्या एका तरी भावाचा कार्येश असायलाच हवा. या केस मध्ये प्रश्न नोकरी संदर्भात असल्याने, दशमाचा सब नोकरी साठीच्या भावसमुहातल्या 2, 6, 10, 11 यापैकी एका तरी भावाचा कार्येश असायलाच पाहीजे. त्यातही प्राधान्याने 10 किंवा 6 व्या स्थानाचा. हा सब जर 2, 6, 10, 11 यापैकी एकाही भावाचा कार्येश नसेल तर प्रश्नाचे उत्तर नकारार्थी आहे असे समजावे, म्हणजेच नजिकच्या काळात तरी प्रश्नात अपेक्षित असलेली घटना घडणार नाही (पुढे कदाचित घडूही शकेल). असे झाल्यास केस ईथेच बंद करावी, पुढचे विश्लेषण करत बसण्याची आवश्यकता नाही.

सौरभच्या प्रश्नकुंडलीतला दशमाचा (10) सब केतू असून तो स्वत:च्या नक्षत्रात आहे, केतू हा छाया ग्रह सदैव वक्रीच असल्याने त्याला कायमच मार्गी मानला जातो. आता हया केतूचे कार्येशत्व बघुया.
केतू लाभात (11) आहे. केतूवर शनीची दृष्टी आहे (हा दृष्टी योग भावचलितात न पाहता क्षेत्र कुंडली प्रमाणे म्हणजेच अंशात्मक न पाहता राशीगत पाहावा) , शनी षष्ठात(6) असून नवमेश (9) व दशमेश (10) आहे, शनी गुरुच्या नक्षत्रात, गुरु धनस्थानी (2), अष्टमेश (8) व लाभेश (11). केतू मेषेत आहे, मेषेचा स्वामी मंगळ चतुर्थात(4) व्ययेश (12) व सप्तमेश (7) , मंगळ चंद्राच्या नक्षत्रात असून चंद्र धनात (2) व त्रितीयेश (3)

एकंदर पाहता केतू 6,10, 2,11 या स्थानंचा कार्येश होत असल्याने दशमाच्या सब चा होकार आहे असे समजायला काहीच हरकत नाही.

इथे आपला पहिला टप्पा पार पडला पण दशमाच्या सब चा होकार म्हणजे नोकरी नक्की असे काही नाही, त्यासाठी पुढे येणार्या् दशा, अंतर्दशा, विदशा या अनुकूल असायला हव्यात , वयाच्या 60 व्या वर्षी नोकरी योग्य दशा येणार असेल तर त्याचा काय उपयोग!

प्रश्नाच्या वेळी कुंडलीत गुरु महादशा चालू होती ती 14 एप्रिल 2027 पर्यंत आहे. आता गुरु महाराज सौरभला नोकरी देतात का ते पाहू.

गुरु चे कार्येशत्व आपण पाहिलेच आहे ते असे: 2/8,11.
म्हणजे गुरु महाराज प्रसन्न आहेत, पैसा देणार म्हणजेच नोकरी देणार. (पैसा कोणत्याही मार्गाने मिळेल पण इथे नोकरीतूनच पैसा दिसतोय कारण व्यवसायाचे सप्तम (7) स्थान व गुंतवणूक, जुगार , शेअर इ साठीचे पंचम (5) स्थान नाही ) . पण गुरुचा सब लॉर्ड काय म्हणतोय ते पण बघितले पाहिजे, ते भाया पन खुस पायजेना नायतर ते गुरु नोकरी देयाचे बोलनार अने हे बाबा देयाची नाय म्हंते असा लफडा होयेचा का नाय ‍! तवा दोनीबी नोकरीसाठी तैयार असा मांडवली झाला पायजे नी !.

आता ह्या गुरुचा सब आहे शनी . शनी चे कार्येशत्व आपण पाहिलेच आहे ते असे: 2/ 6/ 8,11 / 9,10 म्हणजेच गुरुच्या सब ची पण तक्रार नाही. गुरु महाराज सौरभला नोकरी देऊन सोडणार असे दिसते !

पण गुरु महादशा तर 14 एप्रिल 2027 पर्यंत चालणार आहे , आपल्याला तर महिना, आणि शक्य झाला तर दिवस ठरवायचाय, म्हणजे, अंतर्दशा,विदशा, सूक्ष्म दशा बघणे ओघाने आलेच.

गुरुच्या महादशेत सध्या शनीची अंतर्दशा चालू आहे ती 13 डिसेंबर 2015 पर्यंत, शनी स्वत:च्या माध्यमातून 6,10 चा कार्येश आहे आणि नक्षत्रस्वामी गुरुच्या माध्यमातून 2, 11 कार्येश होत असल्याने , शनीच्या अंतर्दशेचा आपण सर्वप्रथम विचार करु. शनी चा सब बुध आहे , बुध सप्तमात (7) , धनेश(2) व पंचमेश (5), बुध स्वत:च्याच नक्षत्रात आहे.

बुध जरी पंचम (5) या नोकरीच्या विरोधी भावाचा कार्येश होत असला तरी धनेश (2) असल्याने पूर्णपणे विरोधी नक्कीच नाही,तेव्हा शनी अंतर्दशा अनुकूल ठरेल असा कयास करुन आपण शनीच्या अंतर्दशेतल्या विदशा काय आहेत ते पाहूया.

1. बुध: 6 मार्च 2014 पर्यंत.
2. केतू: 29 एप्रिल 2014 पर्यंत.
3. शुक्र: 30 सप्टेंबर 2014 पर्यंत.
4. रवी: 15 नोव्हेंबर 2014 पर्यंत.
5. चंद्र: 31 जानेवारी 2015 पर्यंत.
6. मंगळ: 26 मार्च 2015 पर्यंत.
7. राहू: 12 ऑगष्ट 2015 पर्यंत.
8. गुरु: 13 डिसेंबर 2015 पर्यंत.

प्रश्नकुंडलीचा आवाका सहा महिने ते एक वर्ष एव्हढाच असतो , त्याहूनी जास्त कालावधीसाठी प्रश्नकुंडलीचा वापर टाळावा. त्यातही हा नोकरीचा प्रश्न असल्याने सहा महिन्यांचाच कालावधी तपासणे ईष्ट. त्यामुळेच मी बुध, केतू, शुक्र याच अंतर्दशांचा विचार करायचा आणि पुढील विदशांचा विचार अगदि शेवटचा उपाय म्हणून करायचा असे ठरवले.

पहिली बुधाची विदशा . बुधाचे कार्येशत्व 7,2,5 काही बळकट नाही, त्यामुळे बुधाची विदशा सोडायचे ठरवले.

पुढची विदशा केतू ची. केतू चे कार्येशत्व आपण आधीच पाहीले आहे , नोकरी साठी लागणार्याय 2,10,11 या स्थानाचा केतू कार्येश तर आहेच शिवाय तो मुलाखत/करार मदार या साठी लागणार्या त्रितीय (3) या स्थानाचाही कार्येश होतो आहे. केतू चा सब शनी आहे, तो नोकरीसाठी अनुकूल आहेच.

पुढची विदशा येते शुक्राची. शुक्र अष्ट्मात (8), लग्नेश (1) व षष्ठेश(6), शुक्र रवी च्या नक्षत्रात , रवी सप्तमात (7) व पंचमेश(5) , म्हणजे शुक्र काही फारसा अनुकूल नाही.

केतूचीच विदशा योग्य आहे. म्हणजे गुरु महादशा-शनी अंतर्दशा- केतू विदशेत सौरभला नोकरी मिळण्याची शक्यता आहे आणि हा कालावधी येतो 6 मार्च 2014 ते 29 एप्रिल 2014.

आता दशा अंतर्दशा विदशा यांनी जरी हा कालावधी सांगीतला असला तरी गोचर भ्रमणाची अनुकूलताही हवीच हवी अन्यथा सारी मेहेनत वाया गेली,म्हणून मी या टप्प्यावर गोचर भ्रमण बघितले. अपेक्षित घटना तीन चार महिन्यात घडणार असल्याने रवी चे भ्रमण तपासायचे.

आपली अपेक्षित साखळी गुरु – शनी -केतु अशी आहे, रवी दरवर्षी 15 मार्च ला मीनेत म्हणजे गुरु च्या राशीत प्रवेश करतो. मीनेत शनीचे नक्षत्र आहे , त्यामुळे साखळी जुळते. रवी 18 मार्च ला शनीच्या नक्षत्रात दाखल होईल व 30 मार्च पर्यंत तो शनीच्या नक्षत्रात राहील.

म्हणजे आपला अपेक्षित कालावधी 18 मार्च ते 30 मार्च असा असेल.
सौरभला दिलासा देण्यासाठी हा कालावधी सांगणे पुरेसा असला तरी एव्हढा मोठा कालावधी सांगणे के.पी. च्या परंपरेला साजेसे नाही, आणखीही सुक्ष्म कालावधी सांगता आला पाहिजे.

18 मार्च ते 30 मार्च या कालावधीतल्या सुक्ष्मदशा अशा आहेत:
1. रवी 20 मार्च पर्यंत
2. चंद्र 25 मार्च पर्यंत
3. मंगळ 28 मार्च पर्यंत
4. राहू 5 एप्रिल पर्यंत

महादशा स्वामी , अंतर्दशा स्वामी व विदशा स्वामी यांनी नोकरी साठीची सर्वच 2,6,10,11 स्थाने दिली आहेत, आता आपल्याला मुलाखतीतले यश व नोकरीचा करार(नेमणूक पत्र) यासाठी त्रितीय (3) स्थान हवे, तसे विदशा स्वामी केतू ने तेही दिलेले असले तरी ते काहीसे क्षीण स्वरुपाचे आहे , म्हणून सुक्ष्मदशा निवडताना त्रितीय (3) स्थानाच्या प्रथम दर्जाच्या ग्रहाची सुक्ष्मदशा निवडणे भाग आहे.
चंद्र व मंगळ हे असे दोनच ग्रह आहेत जे हा निकष पूर्ण करतात.
चंद्र 2,8,11,3 ही स्थाने देतो तर मंगळ 2,4,3,7,12 ही स्थाने देतो.चंद्र शनी या नोकरी साठीच्या अत्यंत बळकट ग्रहाच्या सब मध्ये आहे तर मंगळ स्वत:च्याच सब मध्ये आहे. तौलनिक दृष्ट्या चंद्र जास्त अनुकूल वाटतो.

म्हणजे चंद्राच्या सुक्ष्मदशेत 20 मार्च 2014 ते 25 मार्च 2014 या कालावधीत सौरभला नोकरी मिळणार. त्यातही 22 मार्च ला रवी गुरु च्या राशीत , शनीच्या नक्षत्रात, केतूच्या सब मध्ये व चंद्राच्या सब सब मध्ये असेल.

“सौरभ, काळजीचे कारण नाही, 20 मार्च 2014 ते 30 मार्च 2014 या कालावधीत तुला नोकरी मिळणार”

मना वरचे दडपण एकदम कमी झाल्याने सौरभ चा चेहेरा एकदम खुलला.
“काका तुमच्या भविष्यावर माझा पूर्ण विश्वास आहे, तुम्ही म्हणताय म्हणजे नोकरी लागल्यातच जमा… “

“सौरभ माझी बरीच भाकितें चुकलीही आहेत बरे का त्यामुळे अशी गॅरंटी मी तरी देणार नाही, तरी पण मी सांगीतलेल्या कालावधीत ग्रहमान अनुकूल आहे, जोरदार प्रयत्न केलेस तर यश तुझेच आहे, मी केवळ निमीत्त मात्र..”

22 मार्चला संध्याकाळी सौरभचा फोन आला,

“ काका, अगदि तुम्ही सांगीतल्या प्रमाणेच झाले, आज सकाळी ,माझा फायनल ईंटरव्हू झाला, जागीच नोकरीची ऑफर मिळाली.. आता मीच काय ते ठरवायचे आहे, मला निर्णय कळवण्यासाठी आठ दिवसांची मुदत दिली आहे..”
“मग काय ठरवलेस?”

“ठरवायचे काय त्यात , मी ही ऑफर स्विकारतोय..”

सौरभ नोकरीच्या ठीकाणी नक्की केव्हा जॉईन झाला ते सांगता येईल ? एक क्लू देतो, सौरभ नाशिकचा, नोकरी बेंगलोर येथे होती.

 

शुभं भवतु


About सुहास गोखले

मी सुहास गोखले या वेब-साईटचा निर्माता. आपल्याला ज्योतिष विषयक मार्गदर्शन हवे असल्यास किंवा आपली एखादी सुचना / तक्रार असेल तर खाली दिलेल्या 'संपर्क फॉर्म' मध्ये माहीती भरुन पाठवल्यास मी ताबडतोब आपल्याशी संपर्क साधेन.
0

सुहास गोखले administrator

मी सुहास गोखले या वेब-साईटचा निर्माता. आपल्याला ज्योतिष विषयक मार्गदर्शन हवे असल्यास किंवा आपली एखादी सुचना / तक्रार असेल तर खाली दिलेल्या 'संपर्क फॉर्म' मध्ये माहीती भरुन पाठवल्यास मी ताबडतोब आपल्याशी संपर्क साधेन.

5 प्रतिक्रिया

///////////////
 1. Shardul

  Great analysis & i realy like your step by step approach .
  Learning a lot from you sir !
  I have a query regarding this , i have seen many Kundalis running dasha of 5,1, 9 and still doing good in job . Also , these Kundalis are not having Dashas of 6 & 10 for long time still their jobs are in-tact . Just to clarify these are Dashas from Janma Kundali and using KP Ayanansh & techniques . Can you please let me know your opinion on it .

  0
  1. सुहास गोखले

   Hi,

   Thanks for the feedback and some good words. I appreciate your keen observations. But there is lot more in Astrology than these Dasha could indicate. Dashas are sort of Symbolic progressions and mainly used for timing events but for that natal promise has to be there. Planetary configuration in the birth chart is what is being promised, Dasha can’t over turn natal promise neither can deliver something of its own.

   Hope this helps

   God bless you

   Suhas
   .

   0
   1. Shardul

    Thanks a lot for your enlightning reply , it should take away my confusion . I have been perplexed by this question for some time now.
    I also agree with you that KP gives most accurate results for prasnha kundali than Janma Kundali . Can you write something about something on this topic objectively analysing both traditional technique & KP . This should help people who started with one method and are now also studying another . Thanks in advance !
    .

    0
 2. सुहास गोखले

  Thanks Shardul, Although I use KP in my practice, it is juts one of the tools I use. I am not not blinded by KP or for that matter any such technique. But sure , even today I start with Vedic chart to quickly access the overall picture (sort of a bird’s eye view),then based on initial observations I choose an appropriate method to further analyze the chart. It is just like a car mechanic would do , first decide which screw to fix and then use appropriate screw driver!

  As far writing article on the topic, I do have some text ready with me but not sure whether I should post it on the blog or convert it into a ebook or use that as course ware for my forthcoming web based Astrology classes.

  Well, just wait and watch. Keep visiting, I appreciate your comments, for such comments keep me going.

  God bless you.

  SUhas

  0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.