कोणत्याही व्हिडीओ ची चार प्रमुख तांत्रिक अंगे असतात :
- A : ऑडीओ : ध्वनी
- V : व्हिडीओ : प्रकाश चित्रण
- L : लाईटींग़ : प्रकाश योजना
- E : एडीटींग़ : संपादन
एखादा चांगला व्हिडीओ निर्माण करायचा तर या चारही आघाड्या सांभाळाव्या लागतात. यातली एक जरी बाजू कमकुवत राहीली तरी सगळ्या मेहेनतीवर पाणी फिरते!
मी नुकतेच माझ्या व्हीडीओ चॅनेल साठी ‘सॅमसन’ चा ‘सी ओ टू‘ हा सुपर कॉर्डीऑईड कन्डेन्सर मायक्रोफोन घेतला , या मायक्रोफोन मुळे आवाज अधिक सुस्पष्ट आणि नैसर्गिक असा ध्वनिमुद्रित होईल आणि त्यामुळे व्हिडीओ चा दर्जा उंचावेल अशी आशा आहे.
अर्थात हा मायक्रोफोन एक्क्सेलार पद्धतीचा असल्याने संगणकाला जोडण्यासाठी एक खास ‘ऑडीओ इंटरफेस’ यंत्रणा (बेरिंजर यु एम २) पण विकत घ्यावी लागली शिवाय या मायक्रोफोन ‘ओव्हर हेड’ पद्धतीने वापरणार असल्याने , मायक्रोफोन माऊंट करायला खास ‘मायक्रोफोन स्टॅन्ड ‘ घ्यावा लागला तसेच व्हायब्रेशन्स रोखण्या साठी ‘शॉक माऊंट’ आणि ‘प-फ-भ-‘ चे उच्चार चांगले येण्यासाठी एक ‘पॉप फिल्टर’ ! अ..ब ब… बघा एक साधा मायक्रोफोन काय घेतला पण त्या साठी हा इतका सारा फौजफाटा जमवावा लागला! मारुतीच्या शेपटी सारखी या अॅटॅचमेंट्ची यादी वाढतच आहे !
…………………. पण चांगले काही तरी करायची जिद्द आहे ना ! मग हौ दे खर्च !!
असो, या ‘सॅमसन सी ओ टू’ मायक्रोफोन च्या अनबॉक्सिंग चा एक लहानसा व्हीडीओ माझ्या ‘यु ट्युब’ चॅनेल वर प्रकाशीत केला आहे , आपण तो पाहावा आणि आपला आपला अभिप्राय नोंदवावा अशी नम्र विनंती.
शुभं भवतु
- ऑन लाईन (लाईव्ह स्ट्रीमिंग) ज्योतिष क्लास - March 24, 2020
- पुण्यात क्लास सुरु ! - February 29, 2020
- Lost & Found ! - February 26, 2020
- बासरीवाला ! - February 6, 2020
- निशाणी बदला… भाग्य बदला – ३ - February 6, 2020
- निशाणी बदला… भाग्य बदला – २ - February 5, 2020
- ‘निशाणी बदला… भाग्य बदला’ - February 5, 2020
- विठ्ठला कोणता झेंडा घेऊ हाती – भाग २ - January 23, 2020
- विठ्ठला कोणता झेंडा घेऊ हाती – भाग १ - January 22, 2020
- प्रश्नकुंडलीची वेळ - January 21, 2020
Vdoबघितला,छान. नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करण्याचा तुमचा अट्टाहास मनाला सुखावतो. शुभेच्छा.
धन्यवाद श्री अण्णासाहेब
सुहास गोखले
The product seems to be of very good quality. But would it be possible to synchronise audio and video simultaneously with this product?
धन्यवाद श्री प्राणेशजी
मुळात व्हिडिओ कॅमेरा पिक्चर + आवाज असे दोन्ही रेकॉर्ड करतो पण कॅमेर्याने रेकॉर्ड केलेल्या ऑडीओ रेकॉर्डींग चा दर्जा अगदी सुमार असतो म्हणून हा एक्सटर्नल मायक्रोफोन आवाज स्वतंत्र रित्या रेकॉर्ड करण्यासाठी वापरायचा. नंतर योग्य त्या व्हिडीओ एडिटर मध्ये कॅमेर्याचे फूटेज आणि मायक्रोफोन ने रेकॉर्ड केलेला ऑडीओ ट्रॅक घ्यायचा त्याच वेळी व्हिडीओ कॅमेर्याने रेकॉर्ड केलेला ऑडीओ ट्रॅक पण लोड करायचा . हा कॅमेर्याचा ऑडीओ ट्रॅक एक संदर्भ – रेफरन्स म्हणून वापरायचा असतो. वेगवेगळी ऑडिओ – व्हिडीओ तंत्रे वापरुन व्हिडीओ फूटेज आणि मायक्रोफोन ट्रॅक सिंक करायचा. कोणतेही चांगले व्हिडीओ एडीटींग़ सॉफ्टवेअर ही ‘सिकिंग’ ची सुविधा देतेच पण फक्त या ‘सिकिंग’ च्या कामासाठी तयार केलेली खास सॉफ्टवेअर्स पण आहेत. एकदा हे सिकिंंग झाले की कॅमेर्याचा सुमार दर्जाचा ऑडीओ ट्रॅक आता गरज नसल्याने कट / डीलीट करायचा अशी प्रक्रिया आहे . सिकिंग चे काम सोपे होण्यासाठी, शुटींग सुरु केल्या केल्या एक जोरदार क्लॅप साऊंड मुद्दाम म्हणून द्यायचा (याला सिनेमा जगात क्लॅप म्हणतात) , क्लॅप चा हा खास आवाज ऑडीओ – व्हिडीओ सिंक करण्यात महत्वाची भूमिका बजावतो. हा क्लॅप नसेल तरी सुद्धा सिकिंग करता येते पण त्याला वेळ जास्त लागतो.
सुहास गोखले
Suhasji,
Namaskar,
Mi tumche blog nehemi vachato. Samja Jatkala ekhadya gruha chya Mahadashet – consider ‘A’ gruha, Antardashet ‘B’ gruha, aani Vidashet ‘C’gruha astana kahi mahatwachya ghatana ghadalya astil, pudhil kahi varshani jar tech grahua pan vegveglya dashet yet astil tar tashyach ghatananchi parat ghadu shaktat ka? mi KP jyotishya padhati shikat aahe.
Mala basic western astrology baddal mahiti kuthe/ books kuthe milu shaktil?
Reg,
Kiran Joshi
श्री किरणजी,
अभिप्राया बद्दल धन्यवाद.
आपण म्हणता तसे ‘अ’ ग्रहाची दशा , ‘ब’ ग्रहाची अंतर्दशा आणि ‘क’ ग्रहाची विदशा असताना ज्या तर्हेचे रिझल्ट मिळाले त्याच धर्तीचे रिझल्ट्स ‘ब’ ग्रहाची दशा , ‘अ’ ग्रहाची अंतर्दशा आणि ‘क’ ग्रहाची विदशा असे कॉम्बीनेशन असताना मिळू शकतात . कारण अ, ब , क ग्रहांचे रोल्स (दशास्वामी , अंतर्दशा स्वामी, विदशा स्वामी असे ) बदलले तरी त्यांचे कार्येशत्व तेच राहणार आहे. पण इथे एक बाब लक्षात घेतली पाहीजे की एखादा ग्रह जेव्हा महादशा स्वामी म्हणून असताना जितकी दणकेबाज फळें देईल तितकी दणकेबाज फळें तोच ग्रह अंतर्दशा / विदशा स्वामी असताना देणार नाही. एक लक्षात घ्या , आपल्या आयुष्यात घडणार्या मोठ्या घटनां ज्या उभ्या आयुष्यात एकदा / दोनदाच घडत असतात त्यावर महादशा स्वामीचा अंमल असतो तर नेहमी घडणार्या घटनांवर अंतर्दशा / विदशा स्वामी च्या अखत्यारीत येतात, ही दोन्ही तारतम्यें लक्षात घेऊन फलादेश करता येतो.
आपण पाश्चात्य ज्योतिष शास्त्रा बद्दल विचारले आहे, पण मुळात अयनांश हा भाग सोडला तर आपली आणि त्यांची पद्धती एकच आहे. प्रथम भाव, मिथुन राशी , गुरु बद्दल आपण जे समजतो अगदी तसेच पाश्चात्य ज्योतिषशास्त्रात समजले जाते, आपला मंगळ आणि त्यांचा मंगळ यात फरक नाही. पाश्चात्य ज्योतिषशास्त्रात ग्रहयोगांवर जास्त जोर दिला जातो तसेच कालनिर्णया साठी वेगवेगळ्या प्रकाराची डायरेक्शन्स , प्रोग्रेशन्स वापरली जातात , ट्रांसीट्चा अत्यंत प्रभावी वापर केला जातो.
या विषयावर अनेक पुस्तके आहेत , एक सुरवात म्हणून आपण अॅलन ओके चे पुस्तक Alan Oken’s Complete Astrology: The Classic Guide to Modern Astrology जरुर वाचावे .
आणखी वाचावयाचे असेल तर:
Predictive Astrology: The Eagle and the Lark Paperback – December 1, 1998
by Bernadette Brady
How to Read Your Astrological Chart: Aspects of the Cosmic Puzzle Kindle Edition
by Donna Cunningham (Author)
Stephen Arroyo’s Chart Interpretation Handbook: Guidelines for Understanding the Essentials of the Birth Chart Kindle Edition
by Stephen Arroyo (Author), Jerilynn Marshall (Editor)
सुहास गोखले