सिंग नई टोबू नम तर सिंगा ! সিং নেই তবু নাম তার সিংহ
हे काय आहे?
सध्या टी.व्ही. वर दाखवत असलेल्या ‘बोर्नव्हीटा’ च्या जाहीरातीत हे गाणं ब्यॅक ग्राऊंड ला वापरले आहे. आवाज ओळखीचा वाटत होता , अर्थातच किशोरदां सारखा , शब्द कळत नव्हते , अगदी पहील्यांदा ही ‘अॅड’ बघितली तेव्हा क्षणभर ही एखादी ‘स्पॅनिश’ किंवा ‘लॅटीन अमेरिकन’ ट्यून असावी असे वाटले पण लक्षपूर्वक ऐकल्यावतर त्यात भारतीय भाषेचा भास झाला . ही ट्यून काय आहे , कसली आहे याचा शोध सुरु झाला ..
प्रथम ही ‘अॅड’ च पहा ना…
https://www.youtube.com/watch?v=QEDRDrV55q8
बरेच दिवस सर्च केल्यानंतर ही ट्यून सापडली…
हो, माझ्या अंदाजा नुसार आपल्या किशोरदांनीच गायली आहे, गाणे बंगाली आहे !
पडद्यावर खुद्द किशोरदांनीच अभिनय केल्याने त्याची खुमास वाढली आहे, आणि किशोरदां जेव्हा असा अवखळ अभिनय करतात तेव्हा गाण्याचे शब्द बंगालीत असो वा कानडीत , आपल्याला गाणे बरोबर कळते , शब्दांची गरजच भासणार असा जिवंत अभिनय , बंद्या रुपया सारखा..
तर हे ते गाणे …
सिंग नई टोबू नम तर सिंगा ! সিং নেই তবু নাম তার সিংহ
https://www.youtube.com/watch?v=-jIWp0R5QhA
१९५८ चा बंगाली चित्रपट ‘लुकोचुरी লুকোচুরি ‘ मधले हे गाणे आहे, या चित्रपटात स्वत: किशोरकुमार यांच्या समवेत माला सिन्हा, अनिता गुहा, अनुप कुमार असे कलाकार आहेत, चित्रपटाचे संगीत हेमंतदां नी दिले आहे.
वाईट इतकेच वाटले की हेमंतदां नी हे गाणे १९२० ‘Oh by Jingo’ या प्रसिद्ध गाण्याची चक्क कॉपी करुन उचलले आहे ! नोट न नोट सेम टू सेम !
मूळ इंग्रजी वर्शंन्स इथे पहा..
https://www.youtube.com/watch?v=8bVpiCvpupM
https://www.youtube.com/watch?v=SAw7MA8sAIc
https://www.youtube.com/watch?v=1AQnyYCPCXE
In the land of San Domingo
Lived a girl called Oh By Jingo
(Ta da, ya da da da da da, um-pa, umpa um-pa um-pa)
From the fields and from the marshes
Came the young and oh by goshes
(Ta da, ya da da da da da, um-pa, umpa um-pa um-pa)
They all spoke with a different lingo
But they all loved Oh By Jingo
and every night, they sang in the pale moonlightOh by gee by gosh by gum by jove
Oh By Jingo won’t you hear our love
We will build for you a hut
You will be our favorite nut
We will have a lot of little Oh By Gollies
And we’ll put them in the follies
By Jingo said “By gosh by gee
By Jiminy, please don’t bother me”
So they all went away singing
Oh by gee by gosh by gum by jove By Jingo
By gee, you’re the only girl for me.
इंस्ट्रुमेंटल
हा तर निख्ख्ळ अप्रतिम टेक आहे ! बाकीच्या वर्शनस ऐकल्या नाहीत तरी ही ऐकाच !! सुरवातीचा ‘ब्रास’ चा सेक्शन अप्रतिमच ! ‘ब्रास’ काय असते त्याची पुसटशी का होईना झलक ऐकायला मिळाली मग बघा, वेड लागेल… मी आहे ना , उत्तमोत्तम ब्रास कोणाचे ऐकायचे ते सांगायला , १२०० सिडीज , ४०० एल.पी. रेकॉर्ड्स चा संग्रह उगाच नाही जपलाय !!
https://www.youtube.com/watch?v=t8FDgxmn3OU
शुभं भवतु
सुहास गोखले
- ऑन लाईन (लाईव्ह स्ट्रीमिंग) ज्योतिष क्लास - March 24, 2020
- पुण्यात क्लास सुरु ! - February 29, 2020
- Lost & Found ! - February 26, 2020
- बासरीवाला ! - February 6, 2020
- निशाणी बदला… भाग्य बदला – ३ - February 6, 2020
- निशाणी बदला… भाग्य बदला – २ - February 5, 2020
- ‘निशाणी बदला… भाग्य बदला’ - February 5, 2020
- विठ्ठला कोणता झेंडा घेऊ हाती – भाग २ - January 23, 2020
- विठ्ठला कोणता झेंडा घेऊ हाती – भाग १ - January 22, 2020
- प्रश्नकुंडलीची वेळ - January 21, 2020