सग्ळी मंडली जमलीत ! वा वा … आता येव्हढा मोठा ऑडीयंन्स जमला आहे तर जरा स्वत:ची टिमकी वाजवून घेतो…
‘वेळणेश्वर’ च्या गोखले घराण्यात जन्म झाला याचा मला प्रचंड अभिमान! माझे स्वत:चे कर्तृत्व शून्य असले तरी काही आनुवंशीक देणग्या मला केवळ या ‘गोखल्यांच्या’ घरात जन्म घेतल्या मुळे वारसा हक्काने मिळाल्यात , जसे जरा बर्या पैकी म्हणता येईल, शाळा – कॉलेजातल्या परीक्षेच्या च्या रिझल्टची कधी काळजी वाटू नये अशी बुद्धिमत्ता जोडीला उत्तम गणित आणि तर्कशास्त्र, कामाचा झपाटा, निर्भिडता – स्पष्टवक्ते पणा, सचोटी, उच्च दर्जाची नीतीमूल्ये आणि दीर्घायुष्य.
आनुवंशीकतेचा वारसा जसा वडिलांच्या बाजूने येतो तसा आई कडच्या बाजूनेही येतो. माझी आई आपटे घराण्यातली, तर आई ची आई (आजी) भातखंडे घराण्यातली, आपटे – भातखंडे घराण्यातूनही मला उत्तम आनुवंशीक वारसा मिळाला आहे, उत्तम वकृत्व, बहुश्रुतता, लेखन कला, शिक्षकी पेशा आणि संगीताची उपजतच जाण! (आणि थोडेसे लाजून !) पिंगट डोळे आणि गुलाबी गोरा रंग पण मिळालाय !
पण….पण … गुलाबाच्या फुला बरोबर त्याचे काटे पण स्वीकारावे लागतात ना !
भातखंडे घराण्याकडून मला अजून एक जबरदस्त वारसा मिळाला आणि तो म्हणजे मधुमेह ! माझी आजी , आजीची सर्व भावंडे, माझी आई, मावश्या आणि मामा सगळे एकजात मधुमेही , पक्के मधुमेही, कट्टर मधुमेही , पोहोचलेले मधुमेही , निर्ढावलेले मधुमेही , अट्टल मधुमेही … तुम्ही काय म्हणाल ते ! मला दोन मोठ्या बहिणीं त्यातल्या सगळ्यात मोठ्या बहिणीला आणि मला मधुमेहाने पकडले , दुसरी बहिण मात्र दैवकृपेने या त्रासातून वाचली, आम्हा तिघा भावंडात ती नेहमीच नशीबवान ठरत आली आहे.
Genetics Play a Role in Type 2 Diabetes
मधुमेह आनुवंशीक असू शकतो पण याचा अर्थ असा नाही की तुमच्या आई- वडिलां पैकी कोणाला मधुमेह असला तर तुम्हाला तो 100% होणार. पण घरात आई वडिल , आई वडिलांचे अगदी जवळचे नातेवाईक – भाऊ बहिण इ. यांना मधुमेह असेल तर तुम्हाला मधुमेह होण्याची शक्यता अनेक पटीने वाढलेली असते !
आई कडूनच्या नात्यातल्या या सगळ्या मधुमेह्यांना या मधुमेहाने अकाली गिळले ! अनेक वर्षे मधुमेह अंगात वागवून शेवटी सगळे एक जात हृदयविकाराला बळी पडले. मला यात ही एक सुसूत्रता दिसते , बघा ना , या सगळ्यांचा मधुमेह कमालीचा दुर्लक्षीत होता , ना कसले पथ्य ना नियमीत औषधे ना इतर कोणती काळजी, असे अनेक वर्षे चालले होते तरीही यातल्या कोणालाही मधुमेहाचे इतर ‘खास’ आजार जसे न्युरोपथी, किडनी , रेटीनोपथी , अॅम्प्युटेशन असे काही झाले नाही, फक्त हृदयविकार झाला!
आता हा निव्वळ योगायोग म्हणायचा का आनुवंशीकता मला सांगता येणार नाही, पण हे आनुवंशीक असले तर फार चांगले ! माझ्या मधुमेहा बरोबरच्या या प्रवासात आशेचा हा छोटासा कवडसा म्हणायचा ! का म्हणाल तर , पाय कापून घेणे, आंधळे होणे , डायलेसिस वर राहणे या पेक्षा हृदयविकाराचा तीव्र झटका बरा, दगडा पेक्षा वीट मऊ असे म्हणता ना तस्से.
असे म्हणतात की मधुमेह्याला या हृदयविकाराचा फारसा त्रास जाणवत नाही आणि शेवटचा तो ‘नेणारा’ झटका येतो तेव्हा तर म्हणे मधुमेहींना त्याच्या वेदना अजिबात जाणवतच नाही, खरे खोटे कोण जाणे, पण खरेच असे होत असेल तर चांगलेय की , म्हणजे बघा काय होतेय काय नाही ते कळायच्या आतच ‘फुक्क !’ अगदी ‘वेदना रहित’ मुलायमशिंगी फुक्क !
आणि महाराजा , तो झटका येतो तो पण अगदी क्लासीक टायमाला म्हणजे झोपेत , पहाटे पहाटे ! साला अश्शी डेथ पायजे नै का ? रात्री माणूस टीव्ही शिरेल पाहून (आणि कायमचूर्ण घेऊन !) झोपतो काय आणि सकाळ झाली तरी अजून कसा उठला नाही म्हणून घरचे लोक्स बघायला जातात तर ‘ढ्यॅण ‘! गडी झोपेतच गारद ! अॅटॅक आला कधी , ‘जय म्हाराष्ट्र ‘ केला कधी , या कानाचा त्या कानाला पत्ता लागत नाही!
“मल्मली तारुण्य माझे तु पहाटे पांघरावे मोकळ्या केसात माझ्या तु जीवाला गुंतवावे ‘
किंवा
“पहाटे पहाटे मला जाग यावी तुझी रेशमाची मिठी सैल व्हावी’
असे दिवस आमचे ग्येल्ये हो , पण निदान ..
“पहाटे पहाटे माझे फुक्क व्हावे..”
अशी रम्य पहाट लाभावी अशी स्वल्पशी विच्छा का धरु नै म्हणतो मी ?
विनोदाचा भाग बाजूला ठेवला तरी आपले ही असेच काहीतरी व्हावे असे मला मनापासून वाटते खरे आणि माझ्या पत्रिकेतल्या अष्टम स्थानातल्या गुरु च्या कृपेने तसे होईल देखील पण शेवटी देवाच्या मनात जे असेल तेच घडणार नै का ?
Type 2 Diabetes and Silent Heart Attacks
You probably don’t think of a heart attack as the kind of thing that could happen without you even knowing it. But it can, and it’s more common than you might think.
It’s called a silent heart attack. It can happen to anyone, but diabetes makes you more likely to have one. You might not feel anything at all. Or it could feel mild, like heartburn or the odd ache or pain. It might seem so minor that you just shrug it off and think it’s just part of getting older.
In case of diabetics, heart attack can occur in 40 out of 100 patients and without any obvious symptoms like chest pain or angina. Moreover, the attack
will be so massive that you will get no time to manage it as 80% of deaths in diabetics are due to heart diseases.
Cardiovascular diseases (heart attack and stroke) occur 10-15 years earlier in diabetics as compared to a similar risk factored patient. Painless heart attack can occur in 40% of diabetics (so no angina or chest pain).”
Though no reason has been ascertained for pain-free heart attack, the absence of this obvious symptom makes the heart disease more severe. “The patient is unable to report on time”
How Could It Be Silent?
One of the common effects of diabetes is a type of nerve damage called neuropathy. Usually it causes problems like numbness, tingling, or weakness in your hands and feet. But it doesn’t always stop there.
You can also have damage in nerves that lead to your heart, bladder, and blood vessels. When that happens, you might not get important warning signs like pain or discomfort.
So during a heart attack that might normally cause big-time pain in your chest, arm, or jaw, you might not notice a thing. It’s like someone presses a big mute button on what you’re able to feel. But the damage does happen, and the dangerous consequences of a silent heart attack are real.
आमच्या (वेळणेश्वरवाल्या!) गोखल्यांच्यातले सर्व पुरुष (आणि गोखल्यांच्या बहुतेक सर्व मुली) दीर्घायुषी , सगळे एकजात ७५ पार करून स्वत:ला आणि घरच्यांनाही कंटाळा येई तोपर्यंत बॅटींग करुन , ‘वृद्धापकाळाने निधन पावले’ असे खरोखरीच म्हणता यावे अशा थाटात गेले आहेत. नाही म्हणायला सगळ्यांना शेवटी एकजात विस्मरणाचा आजार झाला होता ही एक नोंद घेण्याची बाब. त्यामुळे झाले काय , कॉलेजात शिकत असताना ‘आपण ७५ वर्षे जगणार इतकेच नव्हे तर अगदी सहस्त्रचंद्र दर्शन करुन मगच सगळ्यांना ‘जय महाराष्ट्र ‘ करणार ‘ याची मला खात्रीच होती (आता नै , मी माझे गटूळं केव्हाचे बांधून ठेवलयं !) . म्हणूनच असेल कदाचित वयाच्या पन्नाशी पर्यंत मर मर काम करायचे, बक्कळ पैका गाठीला बांधायचा आणि नंतरची २५-३० वर्षे ‘आपल्याला जसे हवे तसे , आवडेल तसे, मुक्त , मस्तीत जगायचे ‘ असे बरेच मनातले मांडे खाल्ले सुद्धा होते, हो, उगाच खोटे कशाला बोला !
पण हे मनातले मांडे मनातच राहणार असे काही घडले !
त्याचे झाले असे , सगळे सुरळीतपणे चालू असताना २००८ साली मी नोकरी बदलली, या नव्या नोकरीच्या निमित्ताने मला संपूर्ण शरीराची आरोग्य तपासणी करून घ्यावी लागली आणि तिथेच ‘घात झाला’ !
“गोखले तुम्हाला डायबेटिस झाला असण्याची शक्यता आहे”
“क्काय?”
“डायबेटीस – टाईप – २ डायबेटीस मेलिटस म्हणजेच T2DM आजार झाला असण्याची शक्यता आहे”
“डायबेटीस! इतक्या लौकर ? म्हणजे अजून तसे माझे वय झालेले नाही“
“गोखले, डायबेटीस फक्त उतार वयातल्या लोकांनाच होतो असे आता राहिलेले नाही, वयाच्या पंचविशीतच डायबेटीस ची लागण होते आजकाल!”
बाकी हे डॉक्टर कधीकाळी सरकारी दवाखान्याशी म्हणजेच महाराष्ट्र शासन आरोग्य सेवेशी संबधित असावेत , त्या शिवाय ‘लागण’ हा खास सर्कारी शब्द प्रयोग कशाला करतील? ‘लागण’! कैच्या कै शब्द आहे की नै ! आणि याच्या जोडीला तो डेंजर शब्द (भुईमुगावर झालेला किडी चा) ‘प्रादुर्भाव’ , ही आपली शासकीय मराठी !!!
डॉक्टरांच्या तोंडून ‘लागण’ हा शब्द ऐकताच मला त्याही स्थितीत ‘फिस्सकन’ हसायला आले!
“पण गोखले, अजून आपण पक्के निदान केलेले नाही , आपण आणखी काही टेस्ट्स करू , मी लिहून देतो त्या सर्व टेस्ट लौकरात लौकर करून घेऊन मला पुढच्या आठवड्यात भेटा, त्यानंतर ठरवू”
जेव्हा सर्व टेस्ट चे रिपोर्ट आले ते पाहून डॉक्टरांनी सांगितले:
‘गोखले, रिपोर्टस फारसे उत्साहवर्धक नाहीत, तुम्हाला डायबेटीस T2DM आहे आणि इतकेच नव्हे तर तुम्ही ‘पक्के मधुमेह रुग्ण आहात”
“म्हणजे ?”
“म्हणजे ही मधुमेहाची सुरवात नाही तर मधुमेह तुमच्या शरीरात स्थिरावला आहे , बळावला आहे , चक्क फुल ग्रोन , डेव्हलप्ड असा आजार बनला आहे “
म्हणजे याचा अर्थ मधुमेह आहे असे आज म्हणजे २००८ साली लक्षात आले असले तरी त्याआधी काही वर्षे दबक्या पावलाने त्याचा माझ्या अंगात प्रवेश करता झाला असावा आणि मला कोणताही सुगावा लागला नाही, खरे तर आनुवंशीकतेने मधुमेहाची इतकी मोठी परंपरा मला लाभलेली असताना मी वेळीच काळजी घ्यायला पाहिजे होती, नियमित चाचण्या – तपासण्या करून घ्यायला हव्या होत्या.. हाच तो गाफीलपणा , आता तो चांगलाच नडला म्हणायचा !
आपल्या आई वडिलांना अथवा भावंडांना अथवा आपल्या काका, मामा, आत्या, मावशी , आजी , आजोबा या पैकी कोणाला मधुमेह असेल तर सावध व्हा, गाफील राहू नका, नियमित तपासण्या करून घ्या, मधुमेह हा आता फक्त श्रीमंतांना / सुखवस्तु लोकांनाच होतो किंवा उतार वयात केव्हातरी होतो असे अजिबात राहिले नाही. वयाच्या पंचविशीतच मधुमेहाने गाठल्यांची संख्या कमालीच्या वेगाने वाढत आहे तेव्हा आनुवंशीकता असेल अथवा नसेल, तपासणी करून घ्या. या तपासण्या फार महाग नाहीत . आपले वय , वजन, लाईफ स्टाईल आणि आनुवंशीकता यांचा विचार करून साधारण सहा महिन्यातून एकदा तरी अशी तपासणी घेणे आपल्याला लाभदायक ठरेल.
“अस्से होय , म्हणजे आता मी अधिकृत मधुमेही म्हणवून घ्यायला मोकळा’
आता ‘फिसक्कन‘ हसायची पाळी डॉक्टरांची !…
“गोखले , तुमचे कौतुक करावेसे वाटते, ही बातमी इतक्या सहजतेने स्वीकारली ! नाहीतर आपल्याला डायबेटीस झाला आहे असे ऐकताच ढसढसा रडणारे , डोके आपटून घेणारे, हातापायाला कापरे भरून खुर्चीतच कोसळणारे अनेक पेशंट मी नित्यनेमाने पहात असतो, तुम्ही एकदम वेगळे वाटलात “
माझ्या आईला झालेला मधुमेह , तिला झालेला त्रास हे मी फार जवळून पाहिले होते . मधुमेह मला नवीन नव्हता.
‘त्रिशूल’ नामक हिंदी सिनेमात अमिताभ बच्चन च्या तोंडी एक डायलॉग आहे:
“जिसने पच्चीस बरस अपनी माँ को रोज थोडा थोडा मरते देखा है उसे मौत से क्या डर रहेगा…”
डॉक्टरांनी मला मेट्फॉर्मिन वर ठेवले आणि गोड खाऊ नका, व्यायाम करा, नियमित चाचण्या करा असा नेहमीचा घिसापीटा सल्ला दिला, आज दहा वर्षां नंतरही नव्या मधुमेही रुग्णाला डॉक्टर हाच सल्ला देतात, हेच उपचार सुचवतात , अगदी इमाने इतबारे, त्यात फारसा बदल झालेला दिसत नाही . इकडे मधुमेहावर किती नवीन संशोधन झाले आहे, किती नवीन माहिती उपलब्ध झाली आहे त्याची दखल सुद्धा घेतली जात नाही.
मधुमेह बरा होत नाही उलट तर तो दिवसेंदिवस बळावत जाणारा आयुष्याला पुरून उरणारा घातक असा आजार आहे हेच रुग्णाच्या मनावर सातत्याने बिंबवले जाते.
केवळ माझाच नाही तर बहुतेका मधुमेही लोक्स चा अनुभव असा आहे की मधुमेहावरचा उपचार म्हणजे फक्त रक्त शर्करा चाचणी अहवाल बघायचा आणि औषधाचे डोस वाढवत राहायचे (औषधाचे हे डोस असे वाढतच जातात ते कमी कधीच होत नाहीत !).
इथे मला डॉक्टरांवर टिका करायची नाही मी फक्त मला आलेले अनुभव सांगत आहे.
डायबेटीस वाल्यांचा साधारण प्रवास असा होताना दिसतो:
टप्पा १: अय्या गडे इश्श गडें
रोग निदान , पथ्य आणि व्यायाम
पण हा हनीमून फार काळ टिकत नाही ! बहुतेक नये नये मधुमेहाचे रोगी अवघ्या काही महिन्यांतच दुसर्या टप्प्यावर येतात ( अहो , ते रोगी म्हणू नक्का हो, एकदम डाऊन मार्केट वाटते , ते ‘रुग्ण’ पण म्हणू नक्का, फार सर्कारी वाटते .. त्या पेक्षा पेशंट म्हणा , त्यातल्या त्यात जरा बरे .. अप मार्केट … रोगी म्हणा की रुग्ण म्हणा की पेशंट सगळे सारखेच की , पण साला इथेही उतरंडी रचल्या गेल्या आहेत राव!)
दुसरा टप्पा खरे तर लांबवता येतो. खरेच ? आम्हाला ‘ पाळणा लांबवणे’ च काय ते ऐकून माहिती, लिहून घ्या —पाळणा लांबवणे.. आणखी एक सर्कारी शब्द प्रयोग …
आज मी नक्की म्हणू शकतो की दुसरा टप्पा लांबवता तर येतोच पण ठरवले तर आयुष्यात हा दुसरा टप्पा कधी येणार पण नाही असे ही बघता येते.
पण बहुतांश मधुमेही इथे अपयशी ठरतात आणि मग..
टप्पा २: अब आया उँट पहाड के निचे …
तोंडी घ्यायचे औषध (बहुतेक वेळा मेटफॉर्मिन)
कोणी गोविंद घ्या कोणी गोपाळ घ्या या चाली वर कोणी सात-आठ महिन्यात तर कोणी वर्ष – दोन वर्षात या दुसर्या टप्प्यावर येतात, नाईलाज असतो म्हणा ना!
मेटफॉर्मिन सुरु होते , यात काही वंगाळ नै पण तुमच्या मेटफॉर्मिन चा आजूबाजूच्या लोक्स ना त्रास होतो त्याचे काय ? मेटफॉर्मिन ला विनोदाने ‘ मेट फार्टिंग ‘ म्हणतात ते उगाच का?
माझा स्वत:चा अनुभव आहेच आता या ताईंचा अनुभव पाहा किती बोलका (?) आहे ..
Meformin – farts smell like rotten eggs
Taking the regular met. and was doing well, but after three months I have to admit that the gastric issue is starting to be a problem. Maybe related – maybe not? I haven’t had a solid BM in a few weeks and have several BM’s daily – loose and my farts smell like rotten eggs. Needless to say I have been backsliding on my diet and drinking a few beers in the southern summer heat. Does the XR help with these problems? And has anyone else had the stinky fart issue. I can’t seem to tolerate my own farts anymore – help!?!
जाऊ दे मंडली , मेटफॉर्मिन तसे गुणाचे बाळ आहे , सच्ची ! उगीच त्या सोन्याला बदनाम करतात लोक्स (कोठे फेडाल ही पापं)
टप्पा ३: साथी डोस बढाना
तोंडी घ्यायच्या औषधाची मात्रा वाढवली जाते , दिवसातून दोन वेळा
चला पुढे …इथे कोणी तुम्हाला थांबू देत नाही.
आता इथून पुढचा प्रवास काहीसा झपाट्याने होतो असा अनुभव आहे.
टप्पा ४: खा , गण्या किती खाशील ते !
आणखी नविन औषधे !
आता तोंडी घ्यायच्या पहील्या औषधाची जास्तीतजास्त शक्य आहे तेव्हढी मात्रा रुग्ण घेत असतोच पण त्याने त्याच्या मधुमेहावर ठीम्म परीणाम होत नसतो , मधुमेह टस नै की मस नै (हे ‘टस की मस’ म्हणजे नक्की काय असते हो ? ). मग या औषधाच्या जोडीला इतर दोन तीन प्रकारातली औषधे येतात.
टप्पा ५: “क्या बच्चे की जान लोगे क्या”
इथे बच्चा म्हणजे आपला बिच्चारा मधुमेही नै कैै, तर ‘तोंडी घ्यायची औषधे” !
एव्हाना रुग्णाचा डायबेटीस आता या तोंडी घ्यायच्या औषधांच्या कुवती बाहेरचा झालेला असतो. तोंडी घ्यायच्या औषधां बरोबर आता इन्शुलिन चे इंजेक्शन जरुरीचे ठरते . आता डॉक्टर रुग्णाच्या हातात सिरींज आणि निडल ठेवतात (हॅ हॅ हॅ ! )
टप्पा ६: कदम कदम बढाये जा !
इन्शुलिन ची मात्रा वाढवली जाते , दिवसातून प्रत्येक खाण्याच्या वेळी, वेगवेगळ्या प्रकारांची इन्शुलिन स्वतंत्रपणे , मिक्स करून घेणे जरुरीचे ठरते. फास्ट अॅक्टींग , दीर्घकाळ परिणाम करणारे , साधे , दुधाळ , ह्युमन , अमुक नी तमुक , यंव आणि त्यंव ! नशिब या इन्शुलिन मध्ये ‘शेजवान’,’तडका’ , ‘मुंबई मीठा’, ‘जैन’, ‘कोल्हापुरी’ , अमूल बटर’, ‘पेशावरी ठुमका’ ,’मांचुरियन’ असले काही प्रकार नाहीत! सच्ची , मी एकदा माझ्या डॉक्टरांना इन्शुलिन उपासाला चालते का? असा प्रश्न विचारुन (डॉक्टरांना) भोवळ आणली होती !
टप्पा ७: ऐसी लागी लगन !
एव्हाना मधुमेहाने शरीर पूर्ण पोखरून टाकलेले असते , वरून सग्ळे शाबूत आत सगळा भुग्गा ! गुंतागुंत वाढते , रेटीनोपथी, न्युरोपथी , हृदयविकार , किडनी विकार जे म्हणाल ते , या सार्यांची लक्षणे ठळकपणे दिसायला लागतात , काही निष्काळजी रुग्ण्यांच्या बाबतीत तर डोळे जाणे, पाय कापावा लागणे असले घातक परिणाम ही होतात.
टप्पा ८: अगा वैकुंंठीच्या राजा !
इथे काय होते ते आता सांगायला पाहिजे का?
असो…
वर्ष २००८ मध्ये माझा मधुमेही म्हणून प्रवास चालू झाला …, दहा वर्षे झाली त्याला … २०१९ सुरू झाले , आज मी आपल्या जागी घट्ट आहे ( ते टस नै का मस नै असे म्हणतात ना तस्सा) आणि डायबेटिस म्हाराज पण ! ते कसले खट, ते अजूनही माझ्या बोकांडी बसलेले आहेतच, वेताळ पंचविशीतल्या राजा विक्रमा सारखा हा मधुमेह मी खांद्यावर घेऊन चालतोच आहे..चालतोच आहे ,
“तो आला , त्याने पाहिले आणि त्याने जिंकले’
असे म्हणतात ना तसेच या मधुमेहाच्या बाबतीत..
“तो आला , त्याने पोखरले आणि त्याने नेले’
असे म्हणावे लागते.
या पेक्षा माझ्या बाबतीत वेगळे काय घडणार असा विचार करुन करून मी थकलो आणि शेवटी हा विचारच करायचे सोडून दिले म्हणाना का.
आपण घरात मांजर पाळतो ना तसा मी या मधुमेहाला गेले दहा वर्षे पाळला आहे !
या लेखमालेतला पुढचा भाग इथे वाचा: साखरेचे खाणार त्याला भाग – २
क्रमश:
- ऑन लाईन (लाईव्ह स्ट्रीमिंग) ज्योतिष क्लास - March 24, 2020
- पुण्यात क्लास सुरु ! - February 29, 2020
- Lost & Found ! - February 26, 2020
- बासरीवाला ! - February 6, 2020
- निशाणी बदला… भाग्य बदला – ३ - February 6, 2020
- निशाणी बदला… भाग्य बदला – २ - February 5, 2020
- ‘निशाणी बदला… भाग्य बदला’ - February 5, 2020
- विठ्ठला कोणता झेंडा घेऊ हाती – भाग २ - January 23, 2020
- विठ्ठला कोणता झेंडा घेऊ हाती – भाग १ - January 22, 2020
- प्रश्नकुंडलीची वेळ - January 21, 2020
आजकाल बदलत्या जीवनशैलीमुळे मधुमेहाचे प्रमाण खूप वाढले आहे. आपण मधुमेहावर विजय मिळवाल अशी खात्री आम्हाला आहेच.लेख नेहमीप्रमाणेच अप्रतिम.
डिट्टो. . सेम 2 शेम
धन्यवाद श्री तेजराजजी
हम है राही डायबेटीस के हमसे कुछ न बोलिये
जो भी प्यार से मिला, हम उसी के हो लिये –
सुहास गोखले
छान सूरवात..पुढील भागाची वाट पाहतोय.
धन्यवाद श्री दीपकजी
सुहास गोखले
सुहासजी
नमस्कार, धन्यवाद.
आता मालिका संपल्यावरच प्रतिसाद.
धन्यवाद श्री संदीपजी
जशी आपली मर्जी !
सुहास गोखले
Gr8 one.
धन्यवाद श्री तुषारजी
सुहास गोखले
मधुमेहावर इतका निखळ विनोदी लेख प्रथमच वाचला.
अप्रतिम लेख !
धन्यवाद श्री नरेंद्रजी
सुहास गोखले
सुहासजी मधुमेही रुग्णाची व्यथा उत्तमपणे अधोरेखीत केली आहे.मला शाळेतील एक धड्यातील वाक्य आठवले : great is the greed of sweets and also its sufferings.लेख अप्रतिम पण असा
रोग कोणाला होऊ नये.
धन्यवाद श्री श्रीकांतजी ,
सुहास गोखले
माझ्या मोठ्या भावाला डायबेटीस आहे दहा वर्षे झाली डोळ्यावर गेला.दृष्टी वर मर्यादा वाचणे टी वी बंद.आता दिनानाथमधे १५ दिवस किडनी इन्फेक्शन ,किडनी स्टोनसाठी ऍडमिट करावे लागले.नियमित औषधे ,चालणे सर्व पथ्य पाळतो.पण कोकण टुर केली ४ दिवसाची निमित्त झाले.आता डीसचार्ज मिळाला .पण मनात भिती वाढली.पेनशनर दवाखान्याच्या बिलामुळे टेन्शन.दिड लाख खर्च .त्यामुळे आजारी पडणे सुध्दा गुन्हा आहे.खुपच अवघड आहे आता मेडीक्लेमसुध्दा ६७ वयात कोण देणार ? पोटाला रोज जेवणापुर्वी इन्सुलेशनच इंजक्शन घ्यावच लागत. आई(९२) व वडील (८०) व आज्जी (९०) असे जगले कोणाला डायबेटीस नाही. तुमचा लेख वाचुन असे वाटते आपल्यालाही काळजी घ्यावी लागेल.
श्री श्रीकांतजी
आपल्या वडील बंधुं बद्दल वाचून अतिशय वाईट वाटले , इतका वेळ मधुमेह शरीरात राहीला की असले काहीतरी होण्याची शक्यता असतेच.
आपण ही काळजी घ्यावी असे सुचवतो. आपल्याला मधुमेह आहे की नाही याची तपासणी अगदी कमी खर्चात आपल्या घरा शेजारच्या कोणत्याही पॅथॉलॉजी लॅब मध्ये सहज होते ती करून घ्या आणि निर्धास्त व्हा आणि अशी चाचणी वर्षातूनएकदा तरी करून घेणे आवश्यक आहे. बाकी वाजन जास्त असल्यास कमी करणे, जीवन शैलीत थोडे बदल करणे , व्यायाम , ध्यानधारणा हे पण केले पाहीजे.
शुभेच्छा
सुहास गोखले
आपल्या अनमोल खजिन्याच्या प्रतिक्षेत !!!
धन्यवाद श्री मोहनजी
सुहास गोखले
आगाऊ वेगळा पण न भिवविणारे निरूपण! वाट बघतोय पुढील लेखाची!
धन्यवाद श्री दीपकजी
सुहास गोखले