नमस्कार,

माझ्या ज्योतिष विषयक सल्ला सेवेत आपले स्वागत आहे.

मी एक व्यावसायीक ज्योतिष सल्लागार आहे आणि अर्थातच मी मोफत भविष्य सांगत नाही. माझी सेवा सशुल्क आहे. तरी पण आपल्या सर्वांचा लोभ लक्षात घेता, अत्यंत वाजवी शुल्का मध्ये भविष्य विषयक सेवा पुरवत आहे, त्याचा लाभ घ्यावा.

मी इमेल, फोन वा प्रत्यक्ष भेट अशा मार्गंनी सेवा पुरवतो. मात्र प्रत्यक्ष भेटीला वेळेची ‘एक तास’ ही मर्यादा असते, आपण दिलेल्या सेवा शुल्काच्या प्रमाणातच वेळ उपलब्ध करून दिला जातो.

मी माझी सेवा दोन टप्प्यात पुरवतो, पहिल्या टप्प्यात आपला प्रश्न समजावून घेणे व तदनुषंगीक प्राथमिक माहीती मिळवणे एव्हढाच भाग असतो. त्यानंतर आपल्या पत्रिकेचा सखोल अभ्यास करून आपल्याशी दुसर्‍यांदा संपर्क साधला जातो त्यावेळी आपल्याला आपल्या प्रश्नां संदर्भातले माझे उत्तर व मार्गदर्शन दिले जाते.

मी माझे सेवाशुल्क १००% आगावू घेतो , काही अप्रिय अनुभव आल्याने उधारी व हप्ते नाईलाजाने बंद करावे लागले आहे. सेवाशुल्क आपंण रोखीने, चेक / डिमांड ड्राफ्ट, बँक ट्रान्सफर, मनी आर्डर अशा अनेक मार्गांनी भरू शकता. मिळालेल्या रकमेची रितसर पावती दिली जाते.

माझे सेवाशुल्क आपल्या प्रश्नाच्या स्वरुपावर अवलंबुन असल्याने आपला प्रश्न काय आहे ते कळल्या खेरिज माझे सेवाशुल्क किती ते सांगता येणार नाही.

माझ्या सेवे अंतर्गत मी फक्त भविष्यकालिन घटनांचा अंदाज देत असतो परंतु अशा घटना घडतीलच असा कोणताही दावा किंवा ठाम विधाने मी करत नाही. मी केलेले अंदाज काही वेळा चुकीचे ठरु शकतात याची मी आपल्याला स्पष्ट कल्पना देतो. याच कारणांसाठी मी  केलेले भविष्यकालिन घटनांचे अंदाज चुकले या कारणास्तव आपण भरलेले सेवाशुल्क परत मिळणार नाही. तसेच मी  केलेले भविष्यकालिन घटनांचे अंदाज वा तदनुषंगीक माहीतीचा कोणत्याही प्रकारने वापर करणे/ न करणे सर्वस्वी आपल्याच हातात असल्याने त्याच्या परीणामांची कोणतीही जबाबदारी मला घेता येणार नाही वा कोणत्याही कारणास्तव ,कोणत्याही प्रकाराची नुकसान भरपाई देणे मला शक्य होणार नाही.

या संदर्भात माझा अधिकृत ‘डिसक्लेमर फॉर्म’ जो आपण माझी सेवा घेण्या पूर्वी वाचणे आणि मान्य करणे आवश्यक आहे याची कृपया नोंद घ्यावी.

मी अत्यंत प्रामाणिक पणे  आणि  उच्च दर्जाची व्यावसायिक नीतीमूल्ये पाळून व्यवसाय करतो, या संदर्भातली ‘माझी व्यावसायीक नीतीमुल्यें’‘ ही पोष्ट एकदा नजरे खालुन घालावी ही विनंती.

या पानाच्या तळाशी असलेल्या संपर्क फार्म भरल्यास, मला आपल्याशी संपर्क साधता येईल.

धन्यवाद

शुभं भवतु


About सुहास गोखले

मी सुहास गोखले या वेब-साईटचा निर्माता. आपल्याला ज्योतिष विषयक मार्गदर्शन हवे असल्यास किंवा आपली एखादी सुचना / तक्रार असेल तर खाली दिलेल्या 'संपर्क फॉर्म' मध्ये माहीती भरुन पाठवल्यास मी ताबडतोब आपल्याशी संपर्क साधेन.
+1

सुहास गोखले administrator

मी सुहास गोखले या वेब-साईटचा निर्माता. आपल्याला ज्योतिष विषयक मार्गदर्शन हवे असल्यास किंवा आपली एखादी सुचना / तक्रार असेल तर खाली दिलेल्या 'संपर्क फॉर्म' मध्ये माहीती भरुन पाठवल्यास मी ताबडतोब आपल्याशी संपर्क साधेन.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.