सभासद नोंदणी अभियान!

हायला, काय भारी अस्सल सर्कारी शब्द प्रयोग केलाय नै !!

 

 

आपल्या वेबसाईट वर सभासद नोंदणी चालू आहे.

या कामी मला मेलचिंप या सेवादात्या कडून मोलाची मदत होत आहे. ‘मेल चिंप’ ही एक मोठ्या प्रमाणात अ‍ॅटॉमेटीक ईमेल पाठवणारी यंत्रणा आहे जी सध्या आपल्या वेबसाईट वर कार्यरत आहे.

 

 

 

आपल्या बेवसाईट वरच्या प्रत्येक पानाच्या तळाशी एक ‘सभासद नोंदणी’ फॉर्म आहे, हा फॉर्म भरुन पाठवल्यास आपल्यास या वेबसाईटचे सभासदत्व मिळेल. हे सभासदत्व पूर्णत: मोफत आहे शिवाय आपल्याला जेव्हा पाहीजे तेव्हा विनासायास हे सभासदत्व रद्द करता येते.

वेबसाईट्च्या सभासदांना:

१> वेबसाईट वर प्रसिद्ध होणार्‍या नव्या लेखां बद्दल माहीती.
२> वेबसाईट चे न्युज लेटर.
३> वेळोवेळी केली जाणारी निवेदनें.
४> आगामी काळात अनेक नव्या नव्या योजना चालवल्या जातील त्याची माहीती प्राधान्याने.
५> आमच्या आगामी ज्योतिष अभ्यासवर्गाच्या शुल्कात थोडी सवलत.

असे अनेक लाभ आम्ही देणार आहोत.

सभासदांची नोंदणी करणे , सभासदांच्या याद्या बनवणे आणि त्या अद्ययावत ठेवणे, सभासद्त्व रद्द करा अशी विनंती आल्यास तीचा सन्मान करणे, सभासदांना वेळोवेळी पाठवल्या जाणार्‍या  ईमेल्स ची रचना करणे , इमेल्स पाठवणे,  पाठवलेल्या ईमेल्स चे पुढे काय झाले याचा विदा गोळा करणे अशी बरीच कामे मी पूर्वी स्वत: हाताने करत होतो ती आता या ‘मेल चिंप‘ द्वारा बिनबोभाट होणार आहेत.

शेजारच्या चित्रात सभासद नोंदणी करण्याची पद्धत दाखवली आहे.

 

आपण सभासद नोंदणी केल्यानंतर केवळ काही मिनिटांत आमच्याकडून आपल्याला एक ईमेल पाठवली जाईल. ही ईमेल आपण स्वत:च ‘सभासद नोंदणी केली आहे का” याची खातरजमा करण्यासाठी असते. तसेच आपला ईमेल पत्ता बरोबर आहे का याचीही चाचणी यात होते.

त्या ईमेल मध्ये सांगीतल्या प्रमाणे आपण आपले सभासद्त्व निश्चित करावयाचे आहे. हे पूर्ण होताच आपल्या विनंतीचा सन्मान केला जाऊन आपल्याला एक ‘वेल कम ‘ ईमेल पाठ्वली जाईल.

हा टप्पा पार पडल्या नंतरच आपण या वेबसाईट्चे सन्माननिय सभासद  व्हाल आणि वर लिहलेले सर्व लाभ आपल्याला प्राप्त होतील.

आपली माहीती व ईमेल पत्ता दुसर्‍या कोणाला दिला / विकला जाणार नाही किंवा त्याचा कोणताही दुरुपयोग होणार नाही याची मी स्वत: व्यक्तिश: हमी देतो.

आपल्याला हे सभासदत्व रद्द करावयाचे असल्यास आमच्या कडून येणार्‍या प्रत्येल ईमेल च्या तळाशी ‘सभासद रद्द करा- Unsubscibe’ ही लिंक असेल , त्यावर क्लीक केल्यास आपले सभासदत्व रद्द होईल, त्यावेळी आम्ही आपल्याला ‘सभासदत्व का रद्द करता?’ याबद्दल विचारु देखिल, आपण कारण सांगीतल्यास ही सेवा अधिक चांगली होण्यास मदत होईल.

या सुविधेचा सगळ्यांनी लाभ घ्यावा ही नम्र विनंती.

याबाबतीत आपल्या काही सुचना / अपेक्षा असल्यास नि:संकोच पणे कळवाव्यात आम्ही त्यांचे स्वागत करु.

कळावे,

आपला लोभ आहेच तो वृद्धींगत व्हावा ही विनंती

आपला


About सुहास गोखले

मी सुहास गोखले या वेब-साईटचा निर्माता. आपल्याला ज्योतिष विषयक मार्गदर्शन हवे असल्यास किंवा आपली एखादी सुचना / तक्रार असेल तर खाली दिलेल्या 'संपर्क फॉर्म' मध्ये माहीती भरुन पाठवल्यास मी ताबडतोब आपल्याशी संपर्क साधेन.
0

सुहास गोखले administrator

मी सुहास गोखले या वेब-साईटचा निर्माता. आपल्याला ज्योतिष विषयक मार्गदर्शन हवे असल्यास किंवा आपली एखादी सुचना / तक्रार असेल तर खाली दिलेल्या 'संपर्क फॉर्म' मध्ये माहीती भरुन पाठवल्यास मी ताबडतोब आपल्याशी संपर्क साधेन.

4 प्रतिक्रिया

///////////////
 1. Vanmala r dongre

  Navin post chhan ahet pan adhiche barech lekh ardhvat sodlele ahet te krupaya purna karavet hi vinanati

  +1
  1. सुहास गोखले

   वनमालाजी ,

   अभिप्राया बद्दल धन्यवाद.

   मला कल्पना आहे , काही लेख अपूर्ण आहेत , मला जसा वेळ मिळेल तसे हे सर्व अपूर्ण लेख पूर्ण करायचा प्रयत्न करेन.

   सुहास गोखले

   0
 2. माधुरी लेले

  अर्धवट लेखांची कारणे आपण सांगितलीत… मान्य.. पण हे बर्याच लेखांबाबत घडल्यामुळे पुढील लेख वाचाच कशाला ..अर्धवटच रहाणार असतील तर..असं वाटुन वाचले गेले नाहीत अनेक लेख.. आता वाचेन नियमीत.. शभेच्छा!

  0
  1. सुहास गोखले

   धन्यवाद सौ. माधुरीताई,

   येत्या महीना दोन महीन्यात मागे अर्धवट राकीलेले सर्वच लेख पूर्ण करत आहे..

   सुहास गोखले

   0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.