श्वेतमुर्ती नी आरोपीच्या खांद्यावर हलकासा पण आश्वासक हात ठेवत विचारले..

“तू त्या माणसाला चाकूचे वार करुन ठार मारलेस हे असे का केलेस?”

या लेखमालेतले पहीले तीन भाग इथे वाचा:

लाय डिटेक्टरचा किस्सा  – १

लाय डिटेक्टरचा किस्सा  – २

लाय डिटेक्टरचा किस्सा  – ३

दरबारात अगदि टाचणी पडली तरी ऐकायला येईल अशी शांतता पसरली होती, प्रजाजन, दरबारी ईतकेच काय खुद्द रमण महाराज देखील कानात प्राण आणून आरोपी आता काय सांगतोय हे ऐकायला उत्सुक झाले होते.

“महाराज, पाच वर्षे झाली असतील त्याला, अजूनही तो दिवस मला काल घडल्या सारखा आठवतोय. ह्या माणसाने, ज्याचा मी खून केला आहे असे आपण सर्व जण मानता आहात, त्या, हो त्याच माणसाने , अगदी किरकोळ कारणांवरुन झालेल्या वादावादीतून माझ्या वडिलांचा खून केला होता, तेव्हाच्या उडालेल्या रक्ताच्या चिळकांड्या आणि माझ्या वयोवृद्ध वडिलांनी अतिव वेदनांच्या पोटी केलेला आकांत आजही माझ्या डोळ्यासमोरुन जाता जात नाही.”

“मी न्याय मागीतला होता महाराज, न्याय, अगदी धाय मोकलून रडत भेकत न्याय मागीतला होता हो,  वाटले होते मला न्याय नक्की मिळेल, त्या नराधमाला चांगली शिक्षा होईल. पण तसे व्हायचे नव्हते , खर्‍याचे खोटे आणि खोट्याचे खरे करण्यात निष्णात असलेल्या वकिलांची फौज उभी करुन, ती व्यक्ती त्या खटल्यातून निर्दोष सुटली होती, तेव्हा हे सत्यशोधक यंत्र नव्हते!

“हा माझ्यावर , माझ्या वडिलांवर झालेला सरासर अन्याय होता, मी त्यावेळी माझे म्हणणे मांडण्याचा, दाद मागण्याचा आटोकाट प्रयत्न केला अगदी साक्षात आपल्या समोर , महाराज अगदी आपल्या समोरही न्यायासाठी हात पसरले, पण नाही, आपल्या या न्याय प्रकियेत माझ्या सारख्या सामान्यांचा निभाव लागला नाही. माझी बाजू सत्याची असूनही मला न्याय मिळाला नाही.”

“मात्र त्याचवेळी मी ठरवले, आयुष्यात साधी मुंगी सुद्धा न मारलेल्या , सशासारखे काळिज असलेल्या , निष्पाप कोकरा सारख्या , सात्विक, पापभिरु अशा माझ्या वडिलांना या न्याय यंत्रणे द्वारा जरी न्याय मिळाला नसला तरी, न्याय मिळवण्याचे ईतरही काही मार्ग आहेत. मी मनाशी पक्के ठरवले, काहीही करावे लागले तरी बेहेत्तर, मी माझ्या वडिलांना न्याय मिळवून देणारच, आणि तसा तो मिळवून देणे हेच माझ्या आयुष्याचे एकमेव आणि अंतिम ध्येय असेल. वडिलांना न्याय हा एकच ध्यास, त्यासाठी मी संधीची वाट पहात होतो, गेली पाच वर्षे मी या माणसाच्या मागावर होतो, हा माणुस मला सतत गुंगारा देत आला, शेवटी मी त्याला गाठलेच. त्याला ठार मारुन मी माझा वडिलांना न्याय मिळवून दिला आहे. ‘न्याय’ ! जो मिळण्यासाठी माझा वडिलांचा आत्मा गेली पाच वर्षे तळमळत होता, ‘न्याय’ जो तुमची न्याय संस्था देऊ शकली नव्हती, तोच न्याय , आज मी माझ्या वडिलांना मिळवून दिलाय. आता तुम्ही कितिही ‘खून खून ‘ असे ओरडून म्हणालात तरी मी खून केलेला नाही, मी माझ्या वडिलांना न्याय मिळवून देऊन त्यांच्या तळमळणार्‍या आत्म्याला मुक्ती दिली आहे. समाजाच्या दृष्टिने हा खून असेलही, मी नाकारत नाही, खून करणे तुमच्या कायद्याच्या व्याख्येत मोठा गंभीर गुन्हा असेलही , मी नाकारत नाही, या अशा गुन्ह्याला तुमच्या कायद्यात फाशीची शिक्षाही असेल, मला त्याची पर्वा नाही, पित्याच्या चितेला अग्नी देताना पुत्राचे एक कर्तव्य मी पार पाडले होतेच, आज मी माझे राहीलेले दुसरे परम कर्तव्य पार पाडले आहे, माझ्या जीवनाचे ध्येय मी पूर्ण केले आहे, आज मी कृतार्थ आहे.. आता माझे काहीही होवो”

श्वेतमुर्ती रमण महाराजांना म्हणाले:

“महाराज, आपल्या दृष्टिने आरोपीने  खून केलेला असला तरी त्याच्या दृष्टीने त्याने कोणावर हल्ला केलेला नाही, त्याच्या दृष्टिने हा खून नाही. त्याच्या साठी तो एक न्यायनिवाडा होता. आपण खून नाही तर एका प्रकारे न्याय केला आहे असे त्याच्या मनात पक्के आहे, ही मनोधारणा ईतकी पक्की आहे की “मी खून केलेला नाही” हे त्याच्या दृष्टीने निखळ सत्यच आहे आणि म्हणूनच यंत्राने तो खरे बोलत असल्याचा दाखला दिला”

“म्हणजे एकादी घटना फक्त बाह्य लक्षणे किंवा साक्षी पुराव्यातून सहज दिसणारा कार्यकारण भाव यांना सुसंगत असेलच असे नाही, जेव्हा आपण त्या घटने मागचा ‘मनोव्यापार’ पण लक्षात घेऊ तेव्हाच त्या घटनेचा खरा मतीतार्थ लक्षात येईल”

“दोन घटना पहा, दोन्ही घटना अगदी एक सारख्या आहेत, एक व्यक्ती बंदूक उचलते , धाड धाड गोळ्या घालते आणि समोरच्या माणसाला गोळ्या घालून ठार मारते- घटना अगदी तंतोतंत एक सारख्या, पण एका घटनेल्या व्यक्तीला ‘शौर्य पदक’ मिळते तर दुसर्‍या व्यक्तीला फासावर लटकवले जाते! का? कारण पहिली व्यक्ती आपल्या देशाचा बहादुर सैनिक होता व त्याने मारलेली व्यक्ती ही आपल्या देशावर आक्रमण करणारा शत्रु होती, दुसर्‍या घटनेतली व्यक्ती अतिरेकी होती आणि मृत झालेली व्यक्ती आपल्या देशाची एक निरपराध नागरीक होती. वर वर पाहता दोनही घटना एकसारख्या मग त्या दोघांनाही एक सारखी फळे मिळायला हवी होती, पण दोघांनाही अलग अलग फळे मिळाली याचे कारण त्या घटने मागची पार्श्वभूमी , बंदूक दोघांच्याही हातात होती पण ती त्यांनी कशी वापरली त्यावर त्या व्यक्तीला मिळणारे फळ (शौर्य पदक / फाशी) अवलंबून होते.”

“बर्‍याच वेळा आपण घटनेचा ताळमेळ घालताना फार वरवर विचार करतो, सब घोडे बारा टक्के या न्यायाने सरधोपट विचार करतो, पण त्या घटने मागचे मानसशास्त्र समजावून घेत नाही. एकच घटना वेगवेगळ्या व्यक्तींना वेगवेगळी वाटू शकते , त्यांच्या प्रतिक्रियाही मग त्यांच्या त्यांच्या समजूती प्रमाणे किंबहुना त्या त्या व्यक्तीच्या ‘मानसशास्त्रीय जडणघडणीं’ वर जास्त अवलंबून असू शकतात, हे आपण बर्‍याच वेळा लक्षातच घेत नाही. वर वर साधारण दिसणार्‍या घटनां मागेही व्यक्ती –स्थल-काल-परिस्थिती सापेक्षता असते / दिसते ती मानवी मती गुंग होऊन जाईल ईतक्या विविध प्रकारची असू शकते. तीं एका साच्यात बसवता येणार नाही, सगळ्यांसाठी एकच एक मानक फुटपट्टी असू शकत नाही, बनू शकत नाही. या गोष्टी गणिताच्या सुत्रात बसवणे मानवी आकलन शक्तीच्या आवाक्या बाहेरची बाब आहे”

“आपल्या दृष्टीने आनंदाची असणारी गोष्ट एखाद्याला अतीव दु:खाची वाटू शकते, एखाद्याच्या दृष्टीने असलेली लाखमोलाची वस्तु आपल्यासाठी कचरा असू शकते. म्हणूनच महत्व प्रसंगांना , घटनांना नाही, तर त्यात गुंतलेल्या व्यक्तिंना किंबहुना त्या व्यक्तींच्या मानसशास्त्रिय बैठकीला द्यायला हवे”

“माझे यंत्र हे मेंदूत होणारे रासायनिक बदल अगदी अचूकपणे टिपू शकते व अशा बदलांच्या आधारावर काही आडाखे वापरुन निर्णय घेत असते बर्‍याच वेळा हे आडाखे बरोबर ही ठरतात , त्याचा अनुभव आपण सर्वांनी घेतलाही आहे, पण मुळात या गृहीतकात एक महत्वाचा दुवा जोडायचाच राहून गेला आहे , तो म्हणजे मानसशास्त्र ! “

“माझे सत्यशोधक यंत्र अपयशी ठरेले ते ह्याच बाबतीत. मी घटने मागची मानसशास्त्रीय बैठक विचारातच घेतली नव्हती. मनोव्यापाराचा हा कप्पा ढुंडाळायचाच राहीला. सगळेच काही 2+2 = 4 असे नसते. ह्या सगळ्या गृहीतकांना छेद देऊन जाणारे ही काही असू शकते याचा मी विचारच केला नव्हता”

“माझा ज्योतिषाशाचा थोडाफार अभ्यास आहे म्हणून सांगतो, एखादा ग्रह विषीष्ट स्थानात, विषीष्ट योगात, विषीष्ट राशीत असताना काही ठरावीक प्रकारची फळे देतो असे बोलले जाते , मानले जाते, हे झाले पुस्तकी ज्ञान. पण पत्रिकेत  एकसारखी ग्रह स्थिती असलेल्या सगळ्यांनाच एकाच प्रकारची फळे मिळत नाहीत असाच अनुभव सगळ्यात जास्त येतो ह्याचे कारण ‘व्यक्ती –स्थल-काल-परिस्थिती ‘ सापेक्षता आणि त्याहुनही महत्वाचे त्या व्यक्तीचा मनोव्यापार, किंबहुना हा मनोव्यापारच कोणती फळे , कोणत्या प्रकारे मिळणार आणि ती व्यक्ती त्याचा वापर कसा करुन घेणार हे ठरवते, हा मनोव्यापार जो व्यक्ती गणीक बदलत असतो , तो पुस्तकात शब्द बद्ध ही करता येणार नाही, तो समजाऊनच घेतला पाहीजे आणि तसा तो समजत नाही किंवा समजावून घ्यायचा प्रयत्नही केला जात नाही तो पर्यंत हे ज्योतीषाचे आडाखे चुकतच राहणार , अगदी माझ्या या यंत्रा सारखे!”

क्षणभर थांबून , मग हात जोडुण , श्वेतमुर्ती म्हणाले:

“माझी चूक झाली महाराज, मीच आता एक गुन्हेगार म्हणून आपल्याला शरण येत आहे , आपल्याला जी योग्य वाटेल ती शिक्षा मला द्या , मी ती भोगायला तयार आहे”.

… आता त्या आरोपीचे पुढे काय झाले कोणास ठाऊक , आपली गोष्ट तसे म्हणले तर ईथेच संपते.. मग ह्याचा जोतिषाशी काय संबंध आहे ? काय संबंध?

अहो ही एकच गोष्ट ज्योतिषशास्त्राच्या अनेक अंगांना स्पर्श करुन जाते, नाही समजले ?

चिंता नको , एकेक पदर उलगडून दाखवतो मग आपल्या लक्षात येईल, भविष्य सांगताना किती अंगाने, खोलात जाऊन विचार करावा लागतो ते.

पण त्याआधी ती सबलॉर्ड्स , रुलिंग प्लॅनेट्स आणि कार्येशाची झापडं कोण दूर करणार ?

शुभं भवतु

( बेन्यांनो,  लई रंगात यून ऐकतासा नव्हे का, आता वाईच दम खावूया, मगाधरनं निस्ती बडबाड बडबाड चाल्लिये , लै भूका लागल्यात,  ये त्या अन्न्याला सांग,  एक फर्मास मिसळ बनीव, कांदा येकदम बारीक काटायचा हा, त्ये गेल्या टायमाला दिल्ता तस्ला नको, आणि पाव पन जरा बगूनशान द्येयाचे रे XXXX  XXXX,   मागल्या टायमाल कस्ले शिळे , वातड पाव दिलातास रे XXXX, , आमच्या टामी कुत्र्याने बी त्वांड लावले नाय.

आता बगुया ह्यो अन्न्या मिसळ पाठीवनार कदी आमी खानार कदी त्ये. पन पावनं येक इचारु का ,  काय वो,  त्यो मोदी म्हंनत व्हता की अच्चे  दिन येनार येनार , मंग, तुमच्या कडे आलं का त्ये अच्चे  दिन?  आमच्या कडे नाय बा, काय सुदीक पत्या नाय , कवा येणार कोन जाने, हे असेच अन्न्याच्या मिसळी वानी, यील तवा खरं म्हनायचं झालं !

त्ये जौदे  पावनं , जरा ती गाय छाप ची पुडी सर्किवा हिकडे, त्येवढाच आपला टाईमपास हो.. )


About सुहास गोखले

मी सुहास गोखले या वेब-साईटचा निर्माता. आपल्याला ज्योतिष विषयक मार्गदर्शन हवे असल्यास किंवा आपली एखादी सुचना / तक्रार असेल तर खाली दिलेल्या 'संपर्क फॉर्म' मध्ये माहीती भरुन पाठवल्यास मी ताबडतोब आपल्याशी संपर्क साधेन.
0

सुहास गोखले administrator

मी सुहास गोखले या वेब-साईटचा निर्माता. आपल्याला ज्योतिष विषयक मार्गदर्शन हवे असल्यास किंवा आपली एखादी सुचना / तक्रार असेल तर खाली दिलेल्या 'संपर्क फॉर्म' मध्ये माहीती भरुन पाठवल्यास मी ताबडतोब आपल्याशी संपर्क साधेन.

4 प्रतिक्रिया

///////////////
 1. गामा पैलवान

  नमस्कार सुहास गोखले! या प्रसंगी आरोपीने आपणहून हल्ला केलेला नसावा बहुतेक. त्याच्यावर झालेला हल्ला परतवलेला दिसतोय. या झटापटीत हल्लेखोराचा चाकू आरोपीच्या हातात पडल्याने हल्लेखोर बळी पडलाय वाटतं.
  आपला नम्र,
  -गामा पैलवान

  0
  1. सुहास गोखले

   धन्यवाद , गामा पैलवान जी,

   आपण ब्लॉग वाचता आहात आणि वेळात वेळ काढून अभिप्राय देत आहात हे पाहून अत्यंत समाधान वाटले. आपल्या सारख्या अभ्यासु, बहुश्रुत , चौकस आणि समतोल विचाराच्या व्यक्ती कडून आलेला अभिप्राय मला लाखमोलाचा वाटतो.

   नक्की काय झाले असावे याचे उत्तर आपल्याला भाग -3 मध्ये मिळेलच , भाग 4 मध्ये ह्या सगळ्यांचा ज्योतिषाशई काय आणि कसा संबंध येते ते बैजवार सांगणार आहे (कदाचित भाग – 5) पण लिहावा लागेल असे दिसत आहे.

   शुभेच्छा !

   सुहास

   0
 2. Gorakshnath Kale

  aapan sangitlayapramane manovyapar khup mahatwcha aahe mhanunach jagat changle aani vvait aahe, jyachi uttare parmeshwarashivay konich deu shakat nahi

  0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.