बर्‍याच दिवसां नंतर एक केस स्ट्डी सादर करतोय…

७ जून , संध्याकाळ चे सात वाजत आले होते, त्या दिवसातल्या माझ्या सगळ्या अ‍ॅपॉईंटमेंट्स संपल्या होत्या, गल्ल्यात जमा झालेल्या गांधीबाबातल्या दोन हिसकावून घेऊन आमची राबडी देवी शॉपिंगला कधी पळाली  ते कळलेच नाही ! (काही बोलायची सोय नाही !) , मी, बिचारा, उरलेल्या गांधीबाबांचा हिशेब लावत होतो तेव्हढ्यात फोन वाजला , स्क्रिन वर नाव आले ‘संजु बाबा’ !

“बोल रे सायबां”

“अंकल, फ्रि आहात का?”

“ते तुझे काय काम आहे ह्यावर ठरणार बघ !”…हा माझा खवचट पणा!

“अंकल प्लीज!”

“तर,  तु असा उगाच सहज म्हणून फोन करणार्‍यातला नाही,  काहीतरी भानगड असणारच,  अरे किती वेळा ‘ह्या मुलीशी माझा विवाह होणार का?” असले प्रश्न विचारतोस रे?  किती पोरी फिरवून झाल्या रे आत्ता पर्यंत ? ऐक माझे , कोणीतरी बर्‍या घरातली मुलगी बघ आणि हो मोकळा !”

“अंकल, या वेळेला तसले काही नाही”

“अगा गा गा.. आता काय?”

“ते समक्षच सांगतो ना,  आत्ता आहे का मोकळा वेळ?”

“वेळ नाही म्हणायची काही सोय ठेवतोस का कधी ? त्यात तुझा बापूस माझा गाववाला पडला ना , मग तुला नाही कसे म्हणणार … लगेच येणार आहेस का ? नाही, मागच्या वेळे सारखे रात्री ११ वाजता आलेले चालणार नाही”

“नाय, अगदी लग्गेच येतो,  हे काय अशोक स्तंभालाच तर आहे,  मारलीच गाडीला किक.”

“ये मग ,  आता काय , आलिया भोगासी..”

“अंकल…”

अक्षरश: १५ मिनिटात, काड काड , कर्कश्य आवाज करणारी बुलेट दारासमोर थांबली..

संजु बाबा आला!

“वाईल्ड बोअर सायलेंसर बशीवलास का काय?”

“येस, कसे काय आहे फायरिंग”

“कानठळ्या बसतात”

“तेच तर पायजेल ना?”

“तु सुधारणार नाहीस!”

“अंकल..”

“ते सोड ,  तुझे काय काम आहे ते सांग पटकन, मी बिजी हाय मला जास्त टायम नाय!”

“सांगतो ना अंकल! जास्त टायम नाय घेणार.. गेल्या वर्षी माझे जपान चे  कराटे ट्रेनिंग हुकले ..”

“तर, तेव्हा मीच तर सांगीतले होते ना की मर्दा या टायमाला नाय चानस ..”

“तसेच झाले ना राव! पण आता पुन्हा तसा चानस आला आहे”

“आले लक्षात ,  या वेळेला जरा भक्कम स्पॉन्सरर मिळालेला दिसतोय!”

“येस, मुंबईची ती  xxxxxx स्पॉन्सर करतेय मला”

“पण स्पॉन्सरशीपचे  नक्की आहे का?”

“हां”

“असे आहे तर मला प्रश्न का विचारतोस रे, सगळे फिक्स आहे ना, मग जाशील ना जपानला त्यात काय अडचण आहे आता?”

“ते खरे आहे , पण पुन्हा मागच्या वेळे सारखे लास्ट मिनिटाला फिसकटेल का अशी थोडी काळजी वाटते”

“म्हणजे  थोडक्यात कराटे ट्रेनिंग साठी जपानला जाण्याचा योग आहे का असा प्रश्न आहे”

“सहीं ..”

“गांधी बाबा आणलेस ना? “

“हे काय विचारणे झाले का?”

“तसे नाही रे , मी जरा गंमत केली”

“हा, बघा जरा यंदा तरी चानस मिळेल का?”

“तुला काय वाटते?”

“यंदा चानस भेटायलाच पाहीजे ”

“ठीक आहे, बघुया काय होते ते”

संजुबाबाचे प्रश्न मी प्रश्न कुंडलीच्या माध्यमातूनच सोडवतो कारण त्याच्या जन्मवेळेचा घोळ आहे आणि तसेही ‘परदेश गमन कधी?” सारखे तात्कालीन प्रश्न तपासायला जन्मकुंडली पेक्षा प्रश्नकुंडलीच जास्त योग्य.

मागच्या वेळेचे अनुभव लक्षात घेता मी संजुबाबाला होरारी नंबर विचारण्याच्या भानगडीत पडलो नाही. संजुबाबाने प्रश्न विचारला आणि मला तो प्रश्न पुर्ण समजला, ती वेळ धरुन मी एक तात्कालीन कुंडली (टाईम चार्ट) बनवली , ती वापरुनच प्रश्न तपासायचे ठरवले.

 

 कुंडलीचा (टाईम चार्ट)  तपशील:

दिनांक: ०७ जुन २०१६ , मंगळवार
वेळ: १९:४२:३८
स्थळ: गंगापुर रोड , नाशिक
अयनांश: न्यू के.पी. २३:५९:४७

प्रश्न आहे : संजुबाबाला कराटे ट्रेनिंग साठी जपानला (परदेश) जाण्याचा योग आहे का नाही, असल्यास केव्हा ?

परदेश गमनासाठी प्रश्नकुंडलीतली खालील स्थाने महत्वाची असतात:

३: घरापासुन, कुटुंबियां पासुन दूर
९: लांबचा प्रवास
१२: अनोळखी प्रदेश
(कधी कधी सप्तम (७) स्थान ही सक्रिय असते)

११: ईच्छा पूर्ती

संजुबाबा कराटे ट्रेनिंग ला परदेशी जाणार असल्याने
४: शिक्षण

यात व्यय स्थान  (१२) हे  मुख्य (Principle) मानले जाते.

समय कुंडली आहे आणि जातक समोरच बसला आहे, प्रश्न विचारता क्षणाची कुंडली मांडली आहे , तेव्हा हा चंद्र काय म्हणतो ते प्रथम पाहूयात.

जर प्रश्न खर्‍या तळमळीने विचारला असेल तर बहुतांश केसेस मध्ये चंद्र जातकाच्या मनातला प्रश्न दाखवतो , म्हणजे चंद्राचे कार्येशत्व हे जातकाच्या प्रश्नाशी निगडीत असते. चंद्र प्रश्ना संबधीतल्या मुख्य किंवा पुरक भावांचा कार्येश असतो. जर चंद्र अशा पद्धतीने कार्येश होत नसेल तर तिन शक्यता असतात.

जातकाने खर्‍या तळमळीने प्रश्न विचारलेला नाही.
जातकाच्या मनात काहीतरी वेगळेच आहे.
ही वेळ जातकाच्या प्रश्नाला उत्तर मिळण्यासाठी अनुकूल नाही.

जातकाची तळमळ नसेल तर अशा प्रश्नाचे उत्तर देत बसू नये, गोड बोलून जातकाची बोळवण करावी.

चंद्राच्या कार्येशत्वा वरुन प्रश्न विचारते वेळी जातकाच्या मनात काय घोळते आहे याचा अंदाज येतो, जर चंद्राचे कार्येशत्व आणि जातकाचा प्रश्न यात काहीच ताळमेळ बसत नसेल तर आणि जातकाचा एकंदर अविर्भाव प्रामाणीक , तळमळीचा वाटला तर त्याला त्याचे मन त्याच्या प्रश्नावर एकाग्र करायाला सांगून पुन्हा एकदा नवा होरारी क्रमांक मागून घ्यावा. हा ही प्रयत्न फसला तर अशा प्रश्नाचे उत्तर देत बसू नये, जातकाला पुन्हा केव्हातरी प्रश्न विचारण्यास सांगावे.

तळमळीने प्रश्न विचारणे आणि समोर चांगला ज्योतिषी असणे हे जरी अत्यावश्यक असले तरी काही वेळा नियतीचीच ईच्छा नसते की जातकाला त्याच्या प्रश्नाचे उत्तर मिळावे. त्यामुळे असेल कदाचित पण काही वेळा चंद्र प्रश्नाचा रोख दाखवू शकत नाही.

असे जेव्हा होते त्यावेळी त्या प्रश्न / समय कुंडलीतही काही योग असतातच, जे ही बाब अधोरेखीत करतात (ते कोणते योग या बद्द्ल नंतर कधी तरी).

इथे एक बाब लक्षात घेतली पाहीजे आणि ती म्हणजे चंद्राची ही अशी साक्ष काढायची असेल तर प्रश्न विचारता क्षणीच कुंडली मांडली गेली असली पाहीजे. जर प्रश्न विचारण्याची वेळ  आणि प्रत्यक्षात कुंडलीची वेळ यात अंतर असेल (तासाभरा पेक्षा जास्त) तर मात्र ही चंद्राची साक्ष घेण्यात काही अर्थ नाही.

चला तर मग, पाहुया या संजुबाबा चा चंद्र काय म्हणतो आहे ते !

चंद्र: सप्तमात (७), चंद्राची कर्क राशी अष्टम स्थानी (८), चंद्र गुरुच्या नक्षत्रात, गुरु नवमात   (९), गुरु लग्नेश (१) आणि चतुर्थेश (4) , म्हणजे चंद्राचे एकंदर कार्येशत्व असे असेल .

चंद्र:  ९ / ७  / १, ४ / ८

चंद्र परदेशगमना संदर्भातल्या नवम स्थानाचा (९) स्थानाचा प्रथम दर्जाचा कार्येश आहे, तसेच तो परदेशगमना संदर्भातल्या पुरक अशा सप्तम स्थानाचा (७) ही कार्येश आहे, संजुबाबाला ट्रेनिंग साठी परदेशी जायचे आहे आणि चंद्र चतुर्थाचा (४) कार्येश आहे. म्हणजे समय कुंडली जातकाच्या प्रश्नाचा रोख अगदी बरोबर दाखवत आहे.  प्रश्न तळमळीने विचारला आहे,  प्रश्न विचारायची वेळ ही बरोबर निवडली गेली आहे, ही कुंडली आपल्याला संजुबाबाच्या प्रश्नाचे उत्तर शोधण्यास निश्चित मदत करु शकेल.

आता, संजुबाबा परदेशी जाणार का नाही हे आपल्याला व्यय स्थानाचा (१२‌) सब सांगणार आहे.

त्याचा विचार आपण पुढच्या भागात करु…

क्रमश:

शुभं भवतु


About सुहास गोखले

मी सुहास गोखले या वेब-साईटचा निर्माता. आपल्याला ज्योतिष विषयक मार्गदर्शन हवे असल्यास किंवा आपली एखादी सुचना / तक्रार असेल तर खाली दिलेल्या 'संपर्क फॉर्म' मध्ये माहीती भरुन पाठवल्यास मी ताबडतोब आपल्याशी संपर्क साधेन.
0

सुहास गोखले administrator

मी सुहास गोखले या वेब-साईटचा निर्माता. आपल्याला ज्योतिष विषयक मार्गदर्शन हवे असल्यास किंवा आपली एखादी सुचना / तक्रार असेल तर खाली दिलेल्या 'संपर्क फॉर्म' मध्ये माहीती भरुन पाठवल्यास मी ताबडतोब आपल्याशी संपर्क साधेन.

6 प्रतिक्रिया

///////////////
 1. Santosh

  सुहासजी,

  तुम्ही प्रश्नकुंडली वेस्टर्न पद्धतीने पहायची कि केपी ने हे कस ठरवता ?
  त्याचे काही ठोकताळे आहेत का ?

  संतोष सुसवीरकर

  0
  1. सुहास गोखले

   श्री. संतोषजी,

   अभिप्राया बद्दल धन्यवाद.

   मी दोन्ही चार्ट्स (वेस्टर्न आणि के.पी.) तयार करतो आणि दोन्हीही वापरतो! कारण मी केवळ एकाच (के.पी., पारंपरीक इ.) अवलंबून राहात नाही. के.पी. कालनिर्णया साठी जास्त उपयुक्त आहे, पण घटनेचे स्वरुप, घटना घडण्या च्या आधी व नंतर च्या धडमोडी, मानसशास्त्रीय अंग इ अनेक बाबतीत पाश्चात्य पद्धती जास्त माहीती देतात, पारंपरीक पद्धतीं कार्मिक , दैवी बाजू व इतर बारीक सारीक पण मह्तवाचा तपशील फार चांगल्या रितीने देतात.

   आता या अशा अनेक पद्धतीचा एकत्रित अभ्यास करुन उत्तर देणे योग्य असले तरी त्यात फार वेळ जातो . म्हणून मग प्रश्नाचे स्वरुप, समोर बसलेल्या जातकाची मानसिकता , प्रसंगाचे गांभिर्य बघून किती खोलात जायचे हे ठरवायचे , त्यातही काळ, काम, वेग आणि मिळणारे मानधन पण विचारात घ्यावे लागते (व्यवहार आहे हा !) , ३००-४०० रुपयां साठी पूर्ण दिवस (गेलाबाजार अर्धा दिवस तरी ) घालवणे व्यावसायीक ज्योतिषाला परवडणारे नसते . (ज्यांचा हा फावल्या वेळेचा उद्योग / छंद आहे त्याना एकवेळ असा वेळ खर्च करणे परवडेल)

   मी सुरवात वेस्टर्न होरारी चार्ट वरुन करतो, मग के.पी. होरारी आणि अगदी आवश्यक भासल्यास पारंपरीक पद्धतीने विचार करतो.

   थोडक्यात कोणती एक पद्धती चांगली नाही, प्रसंगा नुसार काय हत्यार वापरायचे ते ठरवायचे , हे अनुभवातून आपोआपच कळते.

   सुहास गोखले

   0
 2. Santosh

  सुहासजी,

  माझं वेस्टर्न कुंडलीच ज्ञान कमी आहे पण आपण सायन पद्धतीने कुंडली बनवता का?

  कि वेस्टर्न कुंडली फक्त सायन पद्धतीने बनवता येते ?

  संतोष सुसवीरकर

  0
  1. सुहास गोखले

   श्री. संतोषजी,

   वेस्टर्न पद्धतीत ००:००:०० अयनांश वापरतात त्यालाच सायन म्हणतात, आपल्या कडल्या पारंपरीक आणी के.पी. मध्ये अयनांशाचा विचार होतो , वेगवेगळे अयनांश प्रचलित आहेत, साधारण सध्याचे अयनांश २४:००:०० असे आहेत. अयनांश चा फरक सोडला तर वेस्टर्न आणी के.पी. कुंडली मध्ये काहीही फरक नसतो.
   कोणत्याही ज्योतिष सॉफ्टवेअर मधय सायन कुंदली बनू शकते , सेटींग़्ज मध्य अयनांश ० म्हणजेच टॉपीकल झोडीअ‍ॅक ‌सेट केले की झाले.
   बाकी वेस्टर्न आणि पारंपतीक मध्य फार मोठे फरक नाहीत (अयनांश हाच तो मोठा फरक !) , वेस्टर्न वाले भावचलित कुंडलीच जास्त वापरतात व प्लॅसीडस हाऊस सिस्तीम जास्त फेमस आहे , के.पी. मध्ये पण प्लॅसीडस हाऊस सिस्टीमची भावचलीत कुंडली वापरतात.
   पारंपरीक मध्ये भावचलीत फार कमी वापरतात त्याच्या ऐवजी ‘होल साईन हाऊस ‘ म्हणजेच क्षेत्र कुंडली वापरली जाते.

   वेस्टर्न मध्ये दशा पद्धती नाही त्या ऐवजी ते लोक सोलर / ल्युनार रिटर्न, प्रोग्रेशंस , डायरेक्शंस वापरतत. ग्रहयोग आणि ट्रांसिट जास्त कसोशीने बघतात,

   बाकी आपले शुक्र , मंगळ, बुध आणि त्यांचे यात कोणताही फरक नाही. आपल्या कडे दुसर्‍या भावा वरुन जे पाहीले जाते तेच ते लोक पाहतात.

   मोठा फरक एक आहे ते म्हणजे ज्योतिषा कडे बघण्याच्या … आपल्या कडे इव्हेंट प्रेडीक्शन ला (अतिरेकी) महत्व दिले जाते , वेस्टर्न मध्य सायकॉलाऑजी , इन्म्पॅक्ट , चॅलेंजेस, ऑपोएर्च्युनिटीज, थ्रेट्स, स्ट्रेंग्थ , विकनेस अशा अंगाने विचार होतो (तो बरोबर ही आहे !)

   सुहास गोखले

   0
 3. Santosh

  पण एक नक्की तुमच्या वेस्टर्न कुंडली केस स्टडी मुळे माझं इंटरेस्ट वाढायला लागला आहे.

  केपी कुंडली व्हील चार्ट सारखी काढता येते का? असेल तर कोणत्या software मध्ये ?

  संतोष सुसवीरकर

  0
  1. सुहास गोखले

   श्री. संतोषजी,

   पारंपरीक साठी जी सॉफ्ट्वेअर्स आहेत तॉ वेस्ट्र्न पद्धतीची म्हणजे सायन कुंडली बनवू शकतत. पण गोल आकारातली कुंडली मिळत नाही. त्यासाठी आअपल्याला वेस्ट्र्न अ‍ॅस्टोलॉजी ची ऑफ्टवेअर्स जसे सोलर फायर, जानुस, केपलर इ. वापरावी लागतील

   के.पी> कूंडली गोल आकारात करण्यासाठी पण आपल्याला वर लिहलेली केपलर, सोलर फायर , जानुस इ. सॉफ्टवेअर्स लागतील .

   ऑन लाईन मध्ये सगळ्यात बेस्ट म्हणजे http://www.astro.com >

   सुहास गोखले

   0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.