नमस्कार, माझ्या या नव्या कोर्‍या वेब साईट वर आपले स्वागत आहे!

 

गेली तीन वर्षे ब्लॉग च्या माध्यमातून मी लिहीत आलो आहे, वाचकांनाही ते आवडले असावे, कारण ब्लॉग ची वाचन संख्या १,२५,००० च्या घरात पोहोचली आहे.

दरम्यान च्या काळात मी ‘ऑन लाईन ज्योतिष क्लासेस’ , ‘ऑन लाईन ट्रेडींग़’ अशा इतर अनेक क्षेत्रात प्रवेश केला . तेव्हा या सगळ्यां साठी  एकच एक असे संपर्क माध्यम (प्लॅटफॉर्म) म्हणजेच  स्वत:ची हक्काची एक जागा ,  एक वेब साईट असावी असे प्रकर्षाने जाणवू लागले.

मात्र ही वेब साईट प्रत्यक्षात उतरवताना बराच वेळ मोडला, अनेक तथाकथित वेब साईट डिझाइनर्सचा वाईट अनुभव घेतल्यानंतर शेवटी मीच हे शिवधनुष्य उचलायचे  ठरवले. मी सॉफ्टवेअर अभियंता असलो तरी ‘वेब -साईट’ चे सॉफ़्टवेअर लिहणे हा काही माझा प्रांत नाही. मग काय ‘संन्याशाच्या लग्नाला शेंडी पासुन सुरवात ‘ म्हणतात ना,  त्या पद्धतीने पुस्तकें वाचून एक एक  प्रयोग करत  बरेच अडखळत , धडपडत मी ही ‘वेब-साईट’ उभी केली. वेबसाईट तयार करायची तर ती सर्वोत्कृष्टच असा चंग बांधूनच काम केले.  आज ती सारी मेहेनत फलद्रुप झाली आहे ,  माझी वेब साईट तय्यार आहे अगदी मला जशी हवी होती तश्शी!

वेब साईट इतकी चांगली झाली आहे की  ती बघता क्षणीच ‘आम्हाला पण अशीच वेबसाईट बनवून द्या’ अशा विचारणां होऊ लागल्या आहेत,  ‘वेबसाईट आणि (अ‍ॅन्ड्रॉईड – आय ओएस) अ‍ॅप्स डेव्हलपमेंट’, हा एक नवा व्यवसाय सुरु करतो आहे!

या कामात मला माझा मुलगा चि. यशची मोठी मदत झाली आहे किंबहुना त्याच्या मदती शिवाय ही साईट तयारच होऊ शकली नसती!

माझी वेबसाईट मराठी भाषेतली सगळ्यात आकर्षक , देखणी आणि नेत्रसुखद वेबसाईट ठरेल असा माझा सार्थ विश्वास आहे , मी असंख्य मराठी वेबसाईटस ना भेट दिली आहे , माझ्या वेबसाईट इतकी  सुंदर वेबसाईट अभावानेच सापडेल,
कोणाला  माझ्या साईट पेक्षा आकर्षक, नेत्रसुखद  मराठी वेबसाईट माहीती असल्यास मला जरुर कळवावे !

 

ही वेबसाईट तीन ट्प्प्यात पूर्ण होणार आहे ,

पहीला टप्पा माझ्या ब्लॉग लेखनाचा , मी गेल्या तीन वर्षात लिहलेले सुमारे २७० लेख आता माझ्या वेबसाईट वर उपलब्ध करुन दिले आहेत.

दुसर्‍या टप्प्यात माझ्या सर्व सर्व्हिसेस ‘ज्योतिष क्लासेस , वेबसाईट आणि (अ‍ॅन्ड्रॉईड – आय ओएस) अ‍ॅप्स डेव्हलपमेंट, ऑन लाईन ट्रेडींग़ इ. ‘ याबद्दल ची पृष्ठे असतील. तसेच या साईट साठी खास तयार केलेले चटपटीत (फटाकडे !) अ‍ॅप!

तिसर्‍या टप्पा खास माझ्या ‘ऑन लाईन ज्योतिष क्लास’ च्या विद्यार्थ्यां साठी असेल , त्यात कोर्स चे व्हीडीओ बघणे , स्पेशल बेव कास्ट पाहणे, होमवर्क, क्विझ , शंका समाधान, ट्युटोरियल्स, चर्चा ग्रुप (कट्टा) ई,

ह्या बेवसाईट ची ठळक वैषिष्ट्ये म्हणजे:

१> अत्यंत मनोवेधक मांडणी.
२> मनोहर चित्रे.
३> सुबक , वळणदार फॉन्ट्स , कदाचित इतके सुबक फॉन्ट वापरणारी ही पहीलीच मराठी वेब साईट असेल !
४> स्लायडर्स चे विविध प्रकार , फुल हाईट स्लायडर्स मराठीत प्रथमच !!
५> प्रत्येक पान वेगळे, त्याची रचना वेगळी, मांडणी वेगळी.
६> मोबाईल, टॅबलेट, लॅपटॉप, डेस्कटॉप सर्व माध्यमातुन साईट उत्तम दिसते.
७> गतीमानता ! भरपुर हाय रेझोल्युशन इमेज वापरल्या असतानाही साईट काही सेकंदात आपल्या समोर सादर होते.
८> लेखांचे तारखे नुसार आणि विषयानुसार चे वर्गीकरण , अनुक्रमणीका.
९> सहज सोपा संपर्क.
१०>फेसबुक स्टाइल लाईक / डिसलाइक सुविधा उपलब्ध आता कोणत्याही पोष्टला / पृष्ठाला लाइक / डिसलाईक देणे सहज शक्य.
११>आवडलेला लेख , फेसबुक / ट्वीटर / गुगल प्लस / ईमेल द्वारा इतरांशी शेअर करण्याची सुविधा.
१२> आणि हे सगळे संपूर्ण माय मराठीत ! १००% मराठीत!

 

ही वेबसाईट मोबाईल फोन वर चांगली दिसत असली तरी ही साईट पिसी (लॅपटॉप / डेस्कटॉप) च्या मोठ्या स्क्रिन पाहणे हा एक नयनरम्य सोहळा ठरेल. साईटची मांडणी, विविध प्रकाराचे स्लायडर्स इ सर्व मोठ्या स्क्रीन वरच चांगले दिसतील.

आमच्या परीने ही वेबसाईट जास्तीत जास्त आकर्षक , जलद आणि निर्दोष करायचा प्रयत्न केला आहे, तरीही काही त्रुटी राहुन गेल्या असण्याची शक्यता आहे. आपल्याला अशा काही त्रुटीं आढळल्यास त्या नि:संकोचपणे कळवा. साईट अधिक चांगली होण्यासाठी काही सुचना असतील तर त्याही कळवा.

पुन्हा एकदा आपले या वेबसाईट वर मनापासुन स्वागत करतो आणि आपल्या सुचना/ अभिप्रायांची प्रतिक्षा करतो.

कळावे,

आपला


About सुहास गोखले

मी सुहास गोखले या वेब-साईटचा निर्माता. आपल्याला ज्योतिष विषयक मार्गदर्शन हवे असल्यास किंवा आपली एखादी सुचना / तक्रार असेल तर खाली दिलेल्या 'संपर्क फॉर्म' मध्ये माहीती भरुन पाठवल्यास मी ताबडतोब आपल्याशी संपर्क साधेन.
+5

सुहास गोखले administrator

मी सुहास गोखले या वेब-साईटचा निर्माता. आपल्याला ज्योतिष विषयक मार्गदर्शन हवे असल्यास किंवा आपली एखादी सुचना / तक्रार असेल तर खाली दिलेल्या 'संपर्क फॉर्म' मध्ये माहीती भरुन पाठवल्यास मी ताबडतोब आपल्याशी संपर्क साधेन.

31 प्रतिक्रिया

///////////////
  1. सुहास गोखले

   श्री. रामकृष्णजी ,

   धन्यवाद.

   आपण या नव्या कोर्‍या वेब साईट वर कॉमेंट करणारे पहीले मानकरी ठरलात ! अभिनंदन!!

   आपला

   सुहास गोखले

   +1
 1. दीपक पाटील

  नवीन वर्षाच्या नव्या दिवशी आनंदाची बातमी.
  आपले लेख वाचायला खुप आवडतात.
  नवीन वेब साइट साठी खुप खुप शुभेच्छा !!

  +1
 2. Prashant Deshpande

  गुढीपाडवा व नवीन वर्षांच्या
  हार्दिक शुभेच्छा,,,,,
  वेबसाईट सुरेखच झाली आहे , आपणास व चि.यश यांस अनेक शुभेच्छा ,
  आपल्या प्रगतीची गुढी अशीच दिवसेदिवस उंच होत राहो ही ईश्वर चरणी प्रार्थना व सदिच्छा
  प्रशांत देशपांडे , ठाणे

  +2
 3. mandar joshi

  sushas kaka sarv pratham padwa chya hardik shubecha , atishay surekh ahe website mana pasun awdli, itke diwas blog war aple lekh miss karat hoto khup jasta, ata niyamit lekh ithe yetil hich apeksha , krupaya aple apurna rahilele lekh purna kara ani aple jyotish classs lawkr suru kara , apnas uttrotar yash milo hich prarthana

  +1
  1. सुहास गोखले

   धन्यवाद श्री. मंदारजी.

   आपल्याला माझी वेबसाईट आवडली हे वाचून खूप समाधान वाटले, इतके दिवस जी मेहेनत घेतली त्याचे सार्थक झाले.

   हो, लौकरच मी नवीन लेख प्रकाशीत करणार आहे तसेच काही अपूर्ण असलेल्या लेखमाला ही क्रमाक्रमाने प्रकाशीत होतील.

   कळावे,

   आपला

   सुहास गोखले

   +1
 4. Santosh

  सुहासजी,

  नवीन वेबसाईट फार छान आहे.
  पुन्हा एकदा अभिनंदन आणि चि. यशचे देखील अभिनंदन.

  आता तुमच्या लेखमालेच्या प्रतीक्षेत ☺

  संतोष सुसवीरकर

  +2
  1. सुहास गोखले

   धन्यवाद श्री. संतोषजी.

   आपल्याला माझी वेबसाईट आवडली हे वाचून खूप समाधान वाटले, इतके दिवस जी मेहेनत घेतली त्याचे सार्थक झाले.

   हो, लौकरच मी नवीन लेख प्रकाशीत करणार आहे तसेच काही अपूर्ण असलेल्या लेखमाला ही क्रमाक्रमाने प्रकाशीत होतील.

   कळावे,

   आपला

   सुहास गोखले

   0
 5. Anand Kodgire

  Aaplya navin upkram baddal shubhechcha
  Website baddal Abhinandan
  We look forward to all your future writings.
  Also eager to know on classes

  So once again congratulations sir

  +1
  1. सुहास गोखले

   धन्यवाद श्री. आनंदजी,

   आपल्याला माझी वेबसाईट आवडली हे वाचून खूप समाधान वाटले, इतके दिवस जी मेहेनत घेतली त्याचे सार्थक झाले.

   हो, लौकरच मी नवीन लेख प्रकाशीत करणार आहे तसेच काही अपूर्ण असलेल्या लेखमाला ही क्रमाक्रमाने प्रकाशीत होतील.

   कळावे,

   आपला

   सुहास गोखले

   0
 6. Himanshu

  Happy New Year and hearty congratulations. This website is superb. Although I’m looking at it through my phone, it still looks great. Since I’m working on web applications at work myself, I can imagine how much hard work you two must have done. Hats off and best wishes!

  +1
  1. सुहास गोखले

   धन्यवाद श्री. हिमांशुजी

   आपण आवर्जुन वेळात वेळ काढून अभिप्राय दिला या बद्दल आभार.

   वेबसाईट तयार करायची असे मनात आले , नाशिक, पुणे , मुंबई येथील काही ‘वेब-साईट’ डिझाईनर्स शी आम्ही संपर्क साधला पण काही उत्साहवर्धक प्रतिसाद मिळाला नाही. इकडे काम नाही , बिझनेस नाही म्हणून गळा काढायचा आणि दुसरी कडे दारात आलेल्या कस्टमर च्या फोन कॉल्स ना साधे उत्तर सुद्धा द्यायचे नाही , असा काहीसा विचित्र अनुभव येत राहीला. ज्यांनी प्रतिसाद दिला त्यांनी काहीच्या काही कोटेशन्स दिली , अगदी तोंडाला येईल त्या रकमा सांगीतल्या शेवटी ह्या सगळ्याला कंटाळून आम्ही स्वत:च वेबसाईट डिझाईन करायचे ठरवले.. मी तब्बल ३० वर्षे सॉफ़्टवेअर क्षेत्रात घालवली असली तरी माझे कार्यक्षेत्र अगदी वेगळे होते , वेब डिझाईन चा काहीच अनुभव नव्हता पण पुस्तके वाचून प्रयोग करत शेवटी ही साईट आम्ही स्वत:च बनवली, जमते सगळे , हे काही रॉकेट सायन्स तर नक्कीच नाही.

   असो, आपल्याला जेव्हा सवड मिळेल तेव्हा ही वेबसाईट मोठ्या स्किन वर पाहा, कारण त्या आकारातच या साईट चे सगळे सौदर्य कळून येईल. सेलफोन वर काय मज्जा नाय .

   आपल्या सुचना आणि अभिप्रायांचे स्वागत आहे. सध्या आम्ही साईट लोड टायमिंग वर झगडत आहोत, आपल्या कडे ही साईट किती वेळात लोड होते ते कळवल्यास बरे होईल. आपण स्वत: ह्याच क्षेत्रात काम करत असल्याने साईट लोडींग स्पीड वाढवण्या बाबत काही सुचना / अनुभव कळवल्यास मोलाची मदत ठरेल.

   कळावे,

   आपला

   सुहास गोखले

   0
 7. Sudhanva Gharpure

  Dear Suhas,

  Website is heavily loaded with quality information. No dought. Following are some tips for further betterment for the website visitors who don’t know you, want to have advise and have searched the website from a word ” jyotish ” .

  Front page advertisement of classes can be shifted on right side into a small rectangle. It gives a feeling that the persons in the add are yourself and your wife !!!

  Rest of full page should give brief info about jyotish as a subject, your background and services offered. This is to get followed by slider.

  Info about development of Jyotish as a science in India and in other countries, initial developments, books written in Sanskrit by various authors and current position can be a given and ” History & Developments”.

  Various developed methods to predict the future can be added in brief in ” Futurism in brief “.

  Positive aspects and limitations of this science i.e. predicting future from study of Kundali.

  Way forward in future can be put in brief.

  All this will give full info in brief to a person who don’t know you personally.

  Warm regards,

  Sudhanva

  +1
  1. सुहास गोखले

   धन्यवाद श्री. सुधन्वाजी,

   आपण वेळात वेळ काढून माझ्या वेब -साईट ला भेट देऊन आपल्या मौलिक सुचना माझ्या पर्यंत पोहोचवल्यात त्याबद्दल मी आपला अत्यंत आभारी आहे.

   आपल्या सुचना अत्यंत समर्पक आणि विचार प्रवर्तक आहेत, अशा सुचना माझ्या साठी अत्यंत महत्वाच्या असतात आणि त्यावर प्राधान्याने विचार केला जात आहे. लौकरच आपण दिलेल्या सुचनांचा परिणाम वेब-साईट वर पाहवयास मिळेल. बाकी बाबतीत आपण आज संध्याकाळी सविस्तर बोललो आहोतच.

   आपल्या सारख्या वाचकांच्या जोरावर तर हे लेखन चालू ठेवले आहे, आपला पाठिंबा असाच लाभत रहावा ही ईच्छा .

   कळावे ,

   आपला

   सुहास गोखले

   +1
 8. Sudhanva Gharpure

  What I mean is, from the footprint, people should understand that this belongs to a roaring Lion in this subject !!!

  Regards,

  Sudhanva

  +1
 9. शाम कृष्णराव जोशी

  उत्तम अप्रतिम नविन वर्षात छान उपक्रम आवडले

  +1
 10. Prashant

  Dear Suhasji,
  Saprem Namaskar,
  Happy Gudhi Padwa to you and your family. Also Hearty Congratulations for the new website. Hope many users visit your site and enlighten themselves with the knowledge shared on Astrology. Your son Yash has done a great job putting it all together hats off to him!

  Kalave lobh kayam rahava,
  Aapla,
  Prashant

  +1
  1. सुहास गोखले

   श्री. प्रशांतजी,

   अभिप्राया बद्दल धन्यवाद आणि आपल्याला आणि आपल्या कुटूंबियांना नविन वर्षाच्या अनेक शुभेच्छा

   आपला

   सुहास गोखले

   0
 11. Narendra Jangle

  Dear Suhas Sir
  Very nice site !!!
  It is really a pleasant experience while opening the site !!!
  Congratulation to you !!
  Wishing you all the success for you !

  +1
  1. सुहास गोखले

   श्री. नरेंद्रजी.

   वेब साईट ला भेट देऊन आवर्जुन अभिप्राय दिल्याबद्दल धन्यवाद.

   आपला

   सुहास गोखले

   0
 12. Anant

  श्री. सुहासजी,

  नवीन वेबसाइट बद्दल तुमचे व चि. यश चे अभिनंदन. काही दिवस कामात व्यग्र असल्याने अभिप्राय देण्यास विलंब झाला.
  वेबसाइट चे नवीन रूप फारच छान आहे. तुमची चिकटी व सर्वोत्तम देण्याचा आग्रह ही स्वतः design करून सिद्ध केली. आम्हां वाचकांना या मुळे वाचनास अजून आनंद मिळेल यात काही शंकाच नाही.
  आता सगळे लेख वाचुन काढतो. दोन महिन्याचा बॅकलॉग राहिला आहे.
  पुढील लेखनास शुभेच्छा !

  धन्यवाद.
  अनंत

  0
  1. सुहास गोखले

   श्री. अनंतजी,

   अभिप्रया बद्दल धन्यवाद.
   आपल्या सारखे काही वाचक अजुनही वेळात वेळ काढून या वेबसाईट ला भेट देतात आणि आवर्जुन प्रतिक्रिया देतात म्हणुनच काहीतरी नविन लिहायची प्रेरणा मिळत राहाते.

   सुहास गोखले

   0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.