( या फटू चा आणि लेखाचा काहीही संबंध नाही ,  फटू  आवडला म्हणूण डकवला आहे. फटू इंटरनेट वरुन उचलला आहे हे वेगळे सांगायला नको !)

नुकतेच एका जातकाने विचारलेल्या काही शंकांना उत्तर दिले , तेव्हा लक्षात आले की अरे हा तर एक स्वतंत्र लेख होऊ शकतो.  तेव्हा त्या जातकाला दिलेल्या उत्तरातच थोडी भर घालून लेख तयार केला आहे.

ज्योतिष शास्त्र फक्त शक्याशक्यता (प्रोबॅबीलिटीज) सांगू शकते ,  हे काहीसे ठोकताळ्याचे शास्त्र आहे , हे ठोकताळे  शेकडो वर्षाच्या अनुभवातून निर्माण झालेले आहेत  , हे ठोकताळे असल्याने  ते गणीताच्या फॉर्म्युल्या सारखे  दरवेळी  अचूक, हमखास , उत्तर  देऊ शकणार नाहीत. 

काही जणांचा गैरसमज असा असतो की  ज्योतिषी सांगणे म्हणजे एखाद्याच्या  आयुष्याची डीव्हीडी फास्ट फॉरवर्ड करुन पाहून सांगणे पण ते शक्य नाही .

मी ज्या तारखां आपल्याला सांगीतल्या आहेत त्या घटना घडण्यासाठी अनुकूल अशा ग्रहमानाच्या आहेत  याचा अर्थ इतकाच घ्यायचा की या तारखांच्या आसपास प्रयत्न केले तर यश मिळण्याची शक्यता जास्त आहे , याचा अर्थ असा नाही की  (त्या तारखा वगळून) इतर  वेळी घटना घडणार नाही.  असे म्हणता येईल की इतर वेळेस प्रयत्न केले तरीही यश मिळू शकेल नाही असे नाही, पण प्रयत्न जास्त करावे लागतील. प्रयत्न दोन्ही वेळेला लागणारच पण ग्रह अनुकूल असतील तर कमी श्रमात यश पदरात पडेल.

सकाळी १०-११ (किंवा संध्याकाळी ५-६ ) वाजता पीक ऑफिस अवर्स मध्ये रस्त्यावर गाडी चालवणे आणि  पहाटे ५ (किंवा रात्री ११ ) वाजता त्याच रस्त्यावर गाडी चालवणे यात जो फरक आहे तोच इथे असेल. दोन्ही वेळा मुक्कामाचे ठिकाण गाठले जाईल पण एक प्रवास जलद आणि सुखदायक असेल तर दुसरा त्रासाचा, वेळ आणि इंधन जास्त लागणारा असेल.

तेव्हा काही कालावधी अनुकूल आहे म्हणजे इतर वेळी प्रयत्नच करायचे नाही असा अर्थ घेऊ नका ,  आपले प्रयत्न चालूच ठेवा.

नोकरी  – व्यवसाया बाबतीत आपण फारच सुक्ष्म (आणि अचूक !) उत्तराची अपेक्षा धरता आहात. ज्योतिषशास्त्र हे अनेक अंगाने मर्यादीत आहे , ज्या क्लारिटीची आपण अपेक्षा करत आहात ती देणे हे या शास्त्राच्या कुवतीच्या बाहेर आहे. उद्योग – व्यवसायाची हजारों क्षेत्रे आहेत त्यात पुन्हा हजारोंनी स्पेशलायाझेशन्स आहेत , यांची लक्षावधी परम्युटेशन – कॉम्बीनेशन्स होतात पण ज्योतिषशास्त्रा कडे अवघे ९ ग्रह व्हेरीएबल्स म्हणून आहेत तेव्हा त्यांच्यात अशी किती कॉम्बीनेशन्स होतील ? केवळ ९ ग्रहांच्या माध्यमातून लाखों मधले एखादे नेमके क्षेत्र अचूक पणे सांगणे या शास्त्राला कदापीही शक्य होणार नाही,  हे शास्त्र वापरुन आऊट लाईन स्वरुपाचे काही सांगता येते आणि हीच या शास्त्राची मर्यादा आहे. काही ज्योतिषी ग्राहकाला खूष करण्यासाठी  काहीही वाट्टेल ते सांगत असतात पण ते शास्त्राशी प्रामाणीक राहुन सांगीतलेले नसते.

ज्योतिष शास्त्र फक्त शक्याशक्यता (प्रोबॅबीलिटीज) सांगू शकते म्हणजेच तुमच्या समोर कोणते ऑपशन्स आहेत ते सांगता येते पण त्या पैकी नेमका कोणता प्रत्यक्षात घडेल हे या शास्त्राला सांगता येत नाही कारण त्यात ‘व्यक्ती / स्थळ / काळ / परिस्थिती सापेक्षता’ हा महत्वाचा घटक असतो आणि त्याचा अंदाज पत्रिके वरुन घेता येत नाही.

व्यवहारातले उदाहरण द्यायचे तर समजा, दोन व्यक्तींनी एकाच वेळी , एकाच शोरुम मधून  एकाच कंपनीच्या , एकाच मॉडेलच्या  प्रत्येकी ८ लाख किंमतीच्या कार घेतल्या, या कारचे मॉडेल उत्तम रिसेल व्हॅल्यू  मिळवून  देणारे म्हणून प्रसिद्ध आहे. दोन वर्षाने  पाहीले असता एकाला रिसेल साठी ला ६ लाखाची ऑफर आहे तर दुसर्‍याला त्याच्या कार ला ३ लाख सुद्धा मिळणार नाहीत. कारण एकाची कार अजून नव्या सारखी असते तर दुसर्‍याच्या कारचा खटारा झालेला दिसतो……..या दोन कार मध्ये इतका मोठा फरक कसा पडला?  कार कशी वापरली त्यावरुन !

या कारच्या मॉडेल ला सामान्यत: उत्तम रिसेल व्हॅल्यू मिळेल हे भविष्य झाले (जे या मॉडेलच्या पूर्वी झालेल्या असंख्य  युज्ड कारच्या ट्रॅन्साक्शन्स च्या अनुभवातून बनलेले आहे )  पण शेवटी या कारच्या मॉडेलला चांगली रिसेल किंमत मिळेल ही शक्याशक्यता आहे प्रत्यक्षात मिळू शकणारी किंमत ही अनेक घटकांवर अवलंबून असते  उदा: 

 • कार कशी मेंटेन केली आहे? (रंग, पोचे, टायर , बॅटरी इ)  
 • कार ला अपघात झाला होता का?
 • कारचे मायलेज किती झाले आहे ?
 • कार एक हाती वापरली गेली आहे का? 
 • कार उघड्यावर पार्क केली जात होती का कव्हर्ड पार्किंग मध्ये?
 • कार समुद्र किनार्‍या वरच्या गावातली आहे का?  
 • कार चा मालक डॉक्टर / पारशी आहे का?
 • कार चा रंग कोणता आहे?

असे अनेक घटक असू शकतात त्यावर शेवटी रिसेल व्हॅल्यू अवलंबून असते.  अनेक  बाह्य घटकांचा तो एकत्रित परिणाम असतो.  

जेव्हा एखाद्या व्यक्ती च्या बाबतीतत एखादे भाकित केले जाते ते प्रत्यक्षात येणे अथवा न येणे या मागे त्या व्यक्तीने केलेले प्रयत्न, त्याने केलेली चांगली / वाईट कर्में, त्या व्यक्तीचे पूर्वसंचित असे अनेक घटक कारणीभूत असतात.

पत्रिकेवरुन घटनेची शक्याशक्यता सांगता येते पण बाकीच्या कारणीभूत घटकांचा अंदाज पत्रिकेवरुन घेता येत नाही.

नोकरी मिळण्यासाठीचा अनुकूल काळाचा अंदाज बांधता येईल पण त्या व्यक्तीने ‘नोकरी मिळणार आहे ‘ असे भविष्य सांगीतले आहे ना मग कशाला अर्ज करायचे , मुलाखतीं द्यायच्या अशी समजूत करुन काहीच प्रयत्न केले नाहीत तर अनूकूळ काळ येऊन जाईल पण कोणतेच प्रयत्न केले गेले नसल्याने नोकरी मिळणार नाही. लॉटरी लागण्यासाठी संधी मिळण्यासाठी आधी तिकिट तरी खरेदी करावे लागेल ना?

शक्याशक्यता सांगता येते हीच या शास्त्राची आणि पर्यायाने या शास्त्राद्वारे केलेल्या मार्गदर्शनाची मर्यादा आहे.

असो.

शुभं भवतु  


About सुहास गोखले

मी सुहास गोखले या वेब-साईटचा निर्माता. आपल्याला ज्योतिष विषयक मार्गदर्शन हवे असल्यास किंवा आपली एखादी सुचना / तक्रार असेल तर खाली दिलेल्या 'संपर्क फॉर्म' मध्ये माहीती भरुन पाठवल्यास मी ताबडतोब आपल्याशी संपर्क साधेन.
0

सुहास गोखले administrator

मी सुहास गोखले या वेब-साईटचा निर्माता. आपल्याला ज्योतिष विषयक मार्गदर्शन हवे असल्यास किंवा आपली एखादी सुचना / तक्रार असेल तर खाली दिलेल्या 'संपर्क फॉर्म' मध्ये माहीती भरुन पाठवल्यास मी ताबडतोब आपल्याशी संपर्क साधेन.

2 प्रतिक्रिया

///////////////
 1. anand kodgire

  Lekha aavadla
  Jyotish itke gahan aahe mhanun interest vaadhato.
  Tumchya kadun shikayala maja yeil.

  Khup divas ghetle lekh lihayala.

  Aamchi farmaish pan purn kara ki rao
  To babajicha anubhavacha pudhcha bhaag taka na aata
  Dhanyavaad

  0
  1. सुहास गोखले

   धन्यवाद श्री. आनंदजी,

   आता कामे बरीच आवाक्यात येत आहेत, वेळ भेटत आहे, काही नवीन लेख या महीन्यात (ऑक्टॉबर) प्रकाशीत करत आहे.

   सुहास गोखले

   0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.