ईश्वराची कृपा आणि गुरुजनांचा आशीर्वाद यांच्या बळावर माझे संगीत विषयक जिवन अत्यंत समृद्ध झाले आहे.

मीअनेक प्रकाराचे संगीत ऐकतो, जाणतो. हिंदी – मराठी सिनेमातल्या गाण्यांच्या परिघ तर मी केव्हाच ओलांडला होता.. त्या टीचभर  विश्वाच्या कैक पटीने मोठे विस्तारलेले संगीताचे क्षेत्र मला कायमच खुणावत आले आहे. मी माझ्या या संगीत क्षेत्रातल्या मुशाफिरी बद्दल एक छोटासा लेख पूर्वी लिहला आहे ( मनाला भावते ते संगीत!   ) .

पाश्चात्य संगीत म्हणजे नुसता धांगडधिंगा , केकाटणे असा जो बर्‍याच जणांचा गैर समज झालेला असतो (किंवा तसा तो करुन दिला गेलेला असतो म्हणा) तसा माझा कधीच झाला नाही कारण  या क्षेत्रातले जे ‘वाटाडे’ मला भेटले ते सगळेच संगीतातले दर्दी असल्याने ‘काय ऐकायचे , कसे ऐकायचे , का ऐकायचे , केव्हा ऐकायचे’ याचा गुरु मंत्र नेहमीच मिळत गेला आणि माझे संगीताचे क्षेत्र सतत विस्तारत राहीले. संगीताची व्याख्या किंवा मापदंड , फक्त एक-दोन गायकांच्या, मुठभर संगीतकारांच्या प्रतीभे पुरता मर्यादीत ठेवण्याचा कोते पणा भारतात मोठ्या प्रमाणात होत गेला आणि परिणामत: लता मंगेशकर हा एकच एक आवाज ४०-५० वर्षे  अव्याहत आपल्या माथ्यावर बळजबरीने मारण्यात आला. असेल लतादीदींचा आवाज दैवी पण

 

प्रत्येक गाणे ‘लता’ नेच गायले पाहीजे ह्या अतिरेकी अट्टाहासापायीं अनेक उमद्या ,प्रतिभावंत कलाकारांचा गळा घोटण्यात आला हे विदारक सत्य नाकारता येत नाही.

 

अशी अनेक गाणी आहेत जी ‘लता’ पेक्षा  दुसर्‍या कोणा गायीकेने गायली असती तर त्या गाण्याला जास्त चांगला न्याय मिळाला असता, पण तसे व्हायचे नव्हते ना!

या एकाच गायकाच्या / गायिकेच्या अतिरेकी उदोदो मधून मी फार लौकर बाहेर पडलो हे मी माझे भाग्य समजतो.

असो…

भारतीय शास्त्रीय संगीत आणि पाश्चात्य अभिजात शास्त्रीय संगीताचा माझ्या वर कमालीचा पगडा असला तरी मला मनापासुन आवडते ते जॅझ आणि ब्लूज ह्या प्रकारातले संगीत.  या क्षेत्रातला एक दिग्गज कलाकार म्हणजे लुईस आर्मस्ट्रॉंग. हा माणुस म्हणजे अमेरिकन संगीताचा ‘भिष्म पितामह ‘ मानला जातो , खर्‍या अर्थाने तो अमेरिकन संगीताचा ‘बाप’ होता!  एक चालता बोलता इतिहास होता. अलौकिक  प्रतिभा लाभलेल्या या  गायक / वादकाने आख्या अमेरिकेवर वर्षानुवर्षे अधिराज्य गाजवले. अमेरिकेतल्या न्यु ऑरलिन्स विमानतळाला  मोठ्या  गौरवाने याचे नाव दिले गेले आहे (Louis Armstrong New Orleans International Airport ) यातच त्याचे कर्तृत्व अधोरेखीत होते.

या थोर कलाकारा बदल  जितके बोलावे , लिहावे तितके कमीच आहे. मला ही लिहायची अतोनात ईच्छा आहे पण नंतर कधीतरी, वेळ मिळेल तेव्हा . पण आज वानगी दाखल म्हणून मी या कलाकाराच्या अत्यंत गाजलेल्या एका कलाकृतीचा व्हीडीओ आपल्या समोर सादर करत आहे.

लुईस हा तसा ट्रंपेट वाजवणारा कलाकार. पण ट्रंपेट च्या जोडीला तो गायचा देखिल . त्याचा जाडाभरडा, खरखरीत आवाज काही जणांना आवडणार नाही पण त्याच्या गाण्यात कमालीची सहजता आहे, अस्सल काळ्या मातीचा गंध असलेल्या आवाजात लुईस गायचा  ते अगदी मनापासुन , भावनांनी ओथंबलेले शब्द , सुराच्या साध्या सोप्या प्रवाही महिरपीतून  मांडत , मानवी भावभावनांचे  एक एक कंगोरे  तो किती सहजपणे दाखवतो हे पाहण्या / ऐकण्या सारखेच आहे. या व्हीडिओ मध्ये ही तसा अनुभव आपल्याला येईल. त्याचे ते प्रसन्न , निर्व्याज , निरागस हास्य , ती सहजता आणि या सगळ्या मागे आधारवडा सारखी असलेली त्याची कमालीची तळमळ , बघता क्षणी ,  ऐकता क्षणी हृदयाला जाऊन भिडते ..हे खरे संगीत !

या व्हीडीओ मधले गाणे आहे ‘व्हॉट अ वंडरफुल वर्ल्ड’ एक साधे सरळ सोपे , तरल , हॅपी गो लकी गाणे , कमालीचे आशावादी !

हे जग किती सुंदर आहे याची साक्ष द्यायला आग्र्याचा ताजमहाल नको की वनश्री ने नटलेले एखादे हिलस्टेशन , आपल्या आसपास , अवती भोवती, असणार्‍या  अनेक साध्या साध्या गोष्टींत ही किति सौदर्य लपले आहे , किती आनंद भरलेला आहे हे या गाण्यातून अगदी सहजपणे सादर केले आहे. ‘आनंद’ ही मनाची एक भावना असते, आनंद मानण्यावर असतो, हे गाणे नेमके तेच तर सांगत आहे.

आज आपल्याला बाहेर दिसते काय ? अन्याय, अत्याचार , भ्रष्टाचार , अतिरेकी हल्ले, आभाळाला भेदून  पलीकडे गेलेली महागाई, भ्रष्ट राजकारण्यांचे घोटाळे , भूक आणि गरिबी… यादी मोठी आहे! पण आपण जगत असतो .. एक आशा ठेवून कधीतरी हे सुधारेल .. ही आशाचा आपल्याला पुढे जगण्याची उमेद देत राहते… परिस्थितिशी दोन हात करताना थकलेल्या , रांजलेल्या , पिचलेल्या मनावर कोठे तरी वार्‍याची हलकीशी झुळूक यावी तसे हे गाणे आपल्या कानाशी एक हळूवार गाज घालते ..

इतके हताश व्हायची गरज नाही, अजुनही आशा आहे , सारे काही संपले नाही … हे जग सुंदर आहे,   ते आपले आहे,  आपलेच राहणार आहे , सुंदरच राहणार आहे!

 

… आशावाद ! खरा की खोटा कोण जाणे ! पण हे गाणे ऐकताना क्षण दोन क्षण सगळ्याचा विसर पडायला होते , मनाला एक उभारी येते, एक नवी उमेद मिळते . .. आता याहुन अधिक काय हवे?

हे गाणे बॉब थिले आणि जॉर्ज विस या दोघांनी मिळून लिहले आहे , स्वर आणि संगीत अर्थातच लुईस आर्मस्ट्राँग चे . हे  गाणे (व्हीडीओ नाही)  १९६७ साली ‘सिगल्स रेकॉर्ड’ च्या स्वरुपात प्रकाशीत झाले. १९८८ मध्ये याची रिमास्टर केलेली आवृत्ती प्रकाशीत झाली. या गाण्याचे काही व्हीडीओज उपलब्ध आहेत ते सर्व लुईस च्या स्टेज शोज मधले आहेत.

हे गाणे इतके लोकप्रिय झाले , गाजले की याची सन्माननिय नोंद ‘ग्रॅमी हॉल ऑफ फेम’ मध्ये करण्यात आली आहे (हा बहुमान फार थोड्या कलाकृतींना मिळाला आहे हे लक्षात घ्या)

 

व्हीडीओ पाहण्यापुर्वी त्यातल्या गाण्याचे शब्द:

 

Louis Armstrong – What a wonderful world ( 1967 )

प्रत्यक्ष गाण्या पुर्वीचे लुईस चे भाष्य …

Some of you young folks been saying to me …..

“Hey Pops, what you mean ‘What a wonderful world’?

How about all them wars all over the place?
You call them wonderful?

And how about hunger and pollution?
That ain’t so wonderful either.”

Well how about listening to old Pops for a minute.
Seems to me, it aint the world that’s so bad
but what we’re doin’ to it.

And all I’m saying is see what a wonderful world
It would be if only we’d give it a chance.
Love baby, love. That’s the secret, yeah.
If lots more of us loved each other
we’d solve lots more problems.
And then this world would be gasser.

That’s wha’ ol’ Pops keeps saying.”

प्रत्यक्ष गाणे

What A Wonderful World”

I see trees of green,
red roses too.
I see them bloom,
for me and you.
And I think to myself,
what a wonderful world.

I see skies of blue,
And clouds of white.
The bright blessed day,
The dark sacred night.
And I think to myself,
What a wonderful world.

The colors of the rainbow,
So pretty in the sky.
Are also on the faces,
Of people going by,
I see friends shaking hands.
Saying, “How do you do?”
They’re really saying,
“I love you”.

I hear babies cry,
I watch them grow,
They’ll learn much more,
Than I’ll ever know.
And I think to myself,
What a wonderful world.

Yes, I think to myself,
What a wonderful world.

Oh yeah.

पहा … विडीओज.

आपल्या साठी या व्हीडीओच्या दोन आवृत्ती देत आहे , पहीला व्हीडिओ तसा अलिकडच्या काळातला, लुईसच्या चेहेर्‍यावरचे कमालीचे आशावादी आणि कृतार्थ भाव मनाला  मोहवून टाकतात..

दुसरा व्हीडीओ खास आहे , चित्रपट ‘गुड मार्निंग व्हिएतनाम’ !   व्हिएतनाम युद्धातल्या अमेरिकेन सैन्याच्या हालचाली , व्हिएतनामी जनता आणि अमेरिकन सैन्यातील काहीशा नाजुक ,हळूवार संबंधाची काही क्लिपिंगज यांचे बेमालूम मिश्रण असे हेरेकॉर्डींग आहे. या व्हीडीओत  दिसणारा  (शेवट्च्या फ्रेम मध्ये स्पष्ट)  कलाकार आहे रॉबिन विल्यम ,(Robin Williams,) युद्धाची लादलेली अपरिहार्यता, मृत्यूचे घोंगावणारे वादळ या सार्‍या अक्राळ-विक्राळ वास्तवाच्या पार्श्वभुमी वर  देखील माणुसकीचे , सदहृदयतेचे , मैत्रीचे , विश्वासाचे हळूवार कोंब  कसे फुटू शकतात ? लुईस चे आश्वासक शब्द  साथीला असताना काहीच अशक्य नाही!

आणि याच गाण्याच्या आणखी एक नितांत सुंदर रमणीय व्हिडीओ … ह्या छोट्या चिमुरड्यांनी दिल खुष केला !

Okaïdi and Playing for Change are teaming up to unite and help children around the world trough music.

Wherever you come from, whatever political, economic, spiritual or ideological beliefs you might have, music has the power to break down barriers and unite us all.

Strongly convinced of this, the Playing For Change movement was set up to inspire, connect, and bring peace to the world through music. The movement funds projects such as building schools or running music education programmes around the world.

Okaïdi and Playing for Change share the same values of commitment, being open to others and fraternity. So it was only natural that they should team up to bring children together using an optimistic, universal song known by all generations.

The song was rearranged and performed by 3 children’s choirs from 3 different cultures and continents (North America, Africa and Europe) who were accompanied by the Playing for Change musicians.

 

शुभं भवतु


About सुहास गोखले

मी सुहास गोखले या वेब-साईटचा निर्माता. आपल्याला ज्योतिष विषयक मार्गदर्शन हवे असल्यास किंवा आपली एखादी सुचना / तक्रार असेल तर खाली दिलेल्या 'संपर्क फॉर्म' मध्ये माहीती भरुन पाठवल्यास मी ताबडतोब आपल्याशी संपर्क साधेन.
+2

सुहास गोखले administrator

मी सुहास गोखले या वेब-साईटचा निर्माता. आपल्याला ज्योतिष विषयक मार्गदर्शन हवे असल्यास किंवा आपली एखादी सुचना / तक्रार असेल तर खाली दिलेल्या 'संपर्क फॉर्म' मध्ये माहीती भरुन पाठवल्यास मी ताबडतोब आपल्याशी संपर्क साधेन.

4 प्रतिक्रिया

///////////////
  1. Anant

    Simply beautiful !
    Thank you for making our life enriched with these beautiful articles and videos !!!

    0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.