नमस्कार ,

अनेक दिवसां पासुन प्रलंबित असलेले आमच्या वेबसाईटच्या मुखपृष्ठाचे  चे काम पूर्ण झाले असून आज गुढी पाडव्याच्या शुभ दिवशी आमच्या वेबसाईटच्या मुखपृष्ठाचे अनावरण होत आहे!

इतके दिवस आपण आमच्या www.suhasjyotish.com  हा वेबसाईट अ‍ॅड्रेस वापरला तरी आम्ही आपल्याला सक्तीने आमच्या मराठी ब्लॉग वर म्हणजे आमच्या वेबसाईट्च्या एका उप-पृष्ठावर blog.suhasjyotish.com वर नेत होतो. पण आता आमच्या वेबसाईट चे मुखपृष्ठ तयार झाले असल्याने आपण वेबसाईट चे मुख्य पान पाहू शकाल.

आपला मराठी ब्लॉग वाचण्यासाठी आपल्याला प्रथम या वेब साईट च्या मुखपृष्ठावर यावे लागेल आणि मग तेथुन ‘मेन्यु’ मधून निवड करुन मराठी किंवा इंग्रजी ब्लॉग वर येता येईल.

आमच्या वेबसाइट्ची सगळी नसली तरी काही महत्वाची आणि निवडक फिचर्स / सेवा सुविधा चालू करण्यात आल्या आहेत, यात:

 • मुखपृष्ठ
 • मराठी ब्लॉग
 • इंग्रजी ब्लॉग
 • ऑन लाइन अभ्यासवर्गाची माहीती देणारे पृष्ठ

अर्थात अजून बरेच काम बाकी आहे !

आज पासुन माझा वर्डप्रेस मार्फत दाखवला जाणारा इंग्रजी भाषेतला ब्लॉग पण आता माझ्या स्वत:च्या वेबसाईट वर स्थलांतरीत करण्यात आला आहे. माझे भविष्यातले लेख हे मराठी आणि इंग्रजी भाषेत होणार असल्याने हा बदल आपल्याला निश्चितच स्वागतार्ह्य वाटेल.

आमच्या ‘ऑन लाइन अभ्यासवर्गाची माहीती देणारे पृष्ठाला’ भेट देऊन या अभ्यासक्रमाची सर्व माहीती जाणून घ्या. यात:

 • अभ्यासवर्गाचे नियम व अटीं ( मराठी अनुवाद) )
 • Course Terms & Conditions (अधिकृत मसुदा, सर्व कायदेशीर वा अन्य बाबतीत)
 • वारंवार विचारले जाणारे प्रश्न
 • अभ्यासक्रमाचा पाठ्यक्रम
 • अभ्यासवर्गाचे शुल्क (फी)
 • परतावा (रिफंड) योजना
 • सुहास गोखले कोण आहेत ?

ही माहीती असलेली पीडीएफ डॉक्युमेंट्स आहेत. आपण ती तिथेच वाचू शकता अथवा डाऊनलोड करुन घेऊ शकता.

 

माझ्या या ऑनलाईन कोर्स ची  थोडक्यात माहीती:

 ज्योतिषशास्त्र – प्राथमिक स्तर

ज्या व्यक्तीला ज्योतिषशास्त्राची काहीही माहीती नाही अशी व्यक्ती डोळ्या समोर ठेऊन हा अभ्यासक्रम तयार करण्यात आला आहे. या अभ्यासवर्गाला वयाची, शिक्षणाची, जाती-धर्माची अट नाही, ज्योतिषशास्त्रा बद्दल काही माहीती असणे आवश्यक नाही. अभ्यासक्रम पूर्णत: मराठी भाषेत शिकवला जाणार असल्याने इंग्रजी भाषेची कोणतीही अडचण येणार नाही.  गणिताचा भाग केवळ  बेरीज- वजाबाकी-गुणाकार – भागाकार इतकाच मर्यादीत ठेवलेला असल्याने गणीताचा बाऊ करण्याचीआवश्यकता नाही.  आपली शिकण्याची तळमळ आणि मेहनत करण्याची तयारी इतकेच काय ते अपेक्षित आहे.

धार्मिकता , श्रद्धा आणि आध्यात्म या पासुन संपूर्णपणे अलिप्त असलेला हा अभ्यासक्रम अगदी कट्टर नास्तिक व्यक्तीला किंवा मुस्लीम /ख्रिश्चन अशा इतर धर्माच्या विद्यार्थ्याला देखील त्याच्या  धर्माची / श्रद्धेची कोणतीही आडकाठी न येता सहज पूर्ण करता येईल.

या अभ्यासक्रमात ज्योतिषशास्त्राची ओळख करुन दिली जाईल, ज्योतिषशास्त्र नेमके आहे तरी काय, त्याच्या मर्यादा काय हे समजाऊन सांगीतले जाईल, या शास्त्राचा नेमका आणि खरा उपयोग काय आहे आणि तो कसा करुन घ्यायचा या बद्दल सविस्तर मार्गदर्शन केले जाईल. ज्योतिषशास्त्राच्या सर्व मुलभुत संकल्पना, ज्योतिषाशास्त्राचे सर्व मुख्य आधारस्तंभ ,महत्वाचे नियम- आडाखे सखोल पणे शिकवले जातील तसेच अचूक भविष्यकथनासाठी प्रसिद्ध असलेली ‘कृष्णमुर्ती पद्धती’ पण विस्ताराने शिकवली जाईल. ज्योतिषशास्त्र आणि मानसशास्त्र,जातक कसे हाताळावे, व्यावसायीक शिस्त कशी जोपासायची,अभ्यास कसा वाढवायचा , व्यासंग कसा करायचा या बद्दल अत्यंत बहुमोल माहीती या अभ्यासक्रमात सांगीतली जाईल.   

अनावश्यक फाफटपसारा , गणिताचे अवडंबर , भाकड नियमांच्या भूलभुलैयाला काट मारुन, शास्त्रीय दृष्टीकोन ठेवून , निखळ गणित, शुद्ध तर्कशास्त्र आणि केवळ काळाच्या कसोटीवर टिकलेल्या / सिद्ध झालेल्याच नियम आणि संकल्पनांवर आधारीत असा हा अभ्यासवर्ग आपला ज्योतिषशास्त्रातला पाया भक्कम करुन देऊन आपल्यात एक आत्मविश्वास निर्माण करेल.

 

वेबसाईट्च्या मुखपृष्ठावर तळाला मी या अभ्यासवर्गात कसे शिकवेन याची एक झलक दाखवणारा एक १५ मिनिटांचा व्हीडीओ पण उपलब्ध करुन दिला आहे.

(हाच व्हिडीओ आपण या अभ्यासवर्गाला प्रवेश घेतल्या नंतरही पाहणार आहात!)

 

आमचा ऑनलाईन पद्धतीचा ‘ज्योतिषशास्त्र – प्राथमिक स्तर’  हा अभ्यासवर्ग अगदी लौकरच सुरु होत आहे,

त्या बद्दलची अधिकृत उद्घोषणा आम्ही लौकरच करत आहोत तसेच त्याबद्दल आपल्याला व्यक्तीश: कळवत पण आहोत,

बस्स.. जरा थोडीशीच आणखी प्रतिक्षा!

 

आमच्या या नव्या रुपातल्या वेबसाईट ला भेट देऊन आपला मौल्यवान अभिप्राय द्यावा ही विनंती. आपल्या सुचनांचे मनापासुन स्वागत केल जाईल.

ही वेबसाईट डिझाईन करताना मला माझ्या मुलाने चि. यश ने अफाट मेहेनत घेतली आहे, त्याचे स्वत:चे शिक्षण व इतर अनेक उद्योग सांभाळत त्याने हे काम वेळेत पूर्ण केले या बद्दल त्याचे मन:पूर्वक आभार!

 

शुभं भवतु

 

 

 

 


About सुहास गोखले

मी सुहास गोखले या वेब-साईटचा निर्माता. आपल्याला ज्योतिष विषयक मार्गदर्शन हवे असल्यास किंवा आपली एखादी सुचना / तक्रार असेल तर खाली दिलेल्या 'संपर्क फॉर्म' मध्ये माहीती भरुन पाठवल्यास मी ताबडतोब आपल्याशी संपर्क साधेन.
0

सुहास गोखले administrator

मी सुहास गोखले या वेब-साईटचा निर्माता. आपल्याला ज्योतिष विषयक मार्गदर्शन हवे असल्यास किंवा आपली एखादी सुचना / तक्रार असेल तर खाली दिलेल्या 'संपर्क फॉर्म' मध्ये माहीती भरुन पाठवल्यास मी ताबडतोब आपल्याशी संपर्क साधेन.

2 प्रतिक्रिया

///////////////
 1. गौरव

  हार्दिक अभिनंदन सर …! गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा…! आणि ज्योतिष क्लास साठी पण खूप खूप शुभेच्छा …!

  0
  1. सुहास गोखले

   धन्यवाद श्री गौरवजी,

   आपल्यालाही नविन वर्षाच्या अनेक अनेक ह्रार्दीक शुभेच्छा .

   वेबसाईट च्या नव्या रंग रुपा बद्दल काही सुचना असतील तर अवश्य कळवा.

   सुहास गोखले

   0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.