१९८५ – आफ्रिकेतल्या भीषण दुष्काळा वर मात करण्याचा हेतुने अनेक मार्गांनी   , अनेक पातळ्यां वर सर्वकष प्रयत्न केले गेले. (अजूनही चालू आहेत) . अमेरिकेतल्या बड्या दिग्गज गायक – वादक कलाकारांनाही वाटले सामाजीक बांधीलकी म्हणून आपणही काही केले पाहीजेत. कलेच्या क्षेत्रातले अत्युच्च पातळी वरचे हे कलाकार मुळात एकत्र येणे अनेक कारणां मुळे अवघड होते , पण ते शक्य झाले , ते सगळे  एकत्र आले आणि घडला तो ईतिहास !

आता हे कलाकार एकत्र येऊन करणार काय ? त्यांचे सगळ्यांचे बलस्थान म्हणजे ‘कला’ ! या कलेच्या मध्यमातून त्यांनी एक मोठा निधी जमवायचे ठरवले. गावोगावी जाऊन गाण्याचे कार्यक्रम करणे हा पर्याय अर्थातच सगळ्यांच्या मनात आला पण हे जमणे जवळ जवळ अशक्य होते, दोन – चार कलाकार  एकत्रीत असे शोज होऊ शकले असते नाही असे नाही, पण एक नाही दोन नाही , ४०-४५ कलाकारांना एकत्र आणणे अशक्यप्राय होते. प्रत्येकजण स्वत:चे स्टेज शोज, रेकॉर्डिंग यात कमालीचा व्यग्र , त्यात अमेरिके सारख्या अवाढव्य देशात दूर दूर अंतरावर असलेल्या या कलाकारांना दौर्‍यासाठी एकत्र आणणे कितीही मनात असले तरी शक्य होणार नव्हतेच.

मग बर्‍याच विचाराअंती या सगळ्या कलाकारांनी एक ‘गाणे’ रेकॉर्ड करायचे ठरवले त्या गाण्याच्या रेकॉर्डच्या  (हो, रेकॉर्डच कारण १९८५ मध्ये सी.डी. / डी.व्ही.डी. नव्हत्या!) विक्रीतुन उपलब्ध होणारा निधी या ‘आफ्रिका बचाव ‘ ला देणे!

या कलाकारांनी मग ‘ग्रुप युएसए ‘ नामक ग्रुप स्थापन केला आणि काम सुरु केले.  प्रख्यात (आता याच्या पुढे उल्लेख केलेले सर्वच कलावंत प्रख्यातच आहेत ! त्यामुळे पुन्हा पुन्हा ‘प्रख्यात’ असे लिहीत नाही !) गायक मायकेल जॅक्सन ने मोठा पुढाकार घेतला. मला माहीती आहे ‘मायकेल’ चे नाव घेतले की भारतात नाके मुरडली जातात , अत्यंत हीन पातळीवरच्या कॉमेंट्स केल्या जातात, पण कोणी काहीही म्हणो, मायकेल जॅक्सन एक महान कलाकार होता , इतकेच सांगतो (आणि जास्त वाद-विवाद करत बसत नाही!)

मुळात सुरवात झाली हॅरी बेलफॉन्टे आणि केन क्रागेन पासुन , त्यांनी कल्पना अनेक प्रथितयश कलाकारांसमोर मांडायला सुरवात केली, सगळ्यांनी अतिशय उत्साहवर्धक प्रतिसाद दिले. शेवटी क्वींसी जोंस आणि मायकेल जॅक्सन या जोडगोळी वर सगळी जबाबदारी टाकण्यात आली. त्यांनी ही हे एक पवित्र काम समजून समरसुन काम सुरु केले.

क्वींसी जोंस आणि मायकेल या दोघांनी  या गाण्याची रुपरेखा ठरवली. आपापले अत्यंत व्यस्त दिनक्रम बाजूला ठेऊन स्टीव्ही वंडर आणि रे चार्लस पण सामील झाले. टीना टर्नर, डायना रॉस, हॅरी बेलफॉन्टे , लिओनेल रिची, सिंडी लॉपर, पॉल सिमॉन, केनी रॉजर्स, जेम्स इंग्राम, बिली जोएल, डायनो वॉरविक, विलि नेल्सन, ब्रुस स्प्रिंग्स्टीन, केनी लॉगींस, रे चार्लस, हुई लेविस, किम क्रेन्स, बॉब ड्यालन, डायरेल हॉल, स्टॉव्ह पेरी  .. भली मोठी यादी आहे ही. आपल्या कडे लता, आशा,  किशोर, रफी , मुकेश , तलत यांना जे स्थान आहे तसेच ह्या मंडळींना तिकडे आहे ! त्यातला बॉब ड्यालन तर चक्क ‘२०१६ सालचा नोबेल पारितोषीक’ विजेता आहे!

गाण्याचे शब्द मायकेल जॅक्सन आणि लिओनेल रिची ने मिळून लिहले आहे.  संगीत संयोजन मिचेल ओमार्ट्न ने केली आहे. क्वींसी जोंस प्रकल्प निर्माता होता.

जानेवारी १९८५ मध्ये रेकॉर्ड झालेल्या या सिंगल रेकॉर्ड च्या  (सिंगल रेकॉर्ड म्हणजे फक्त एकच गाणे असलेली रेकॉर्ड) पहील्याच  फेरीत ३० लाख प्रती विकल्या गेल्या आणि ५५ लाख डॉलर्स जमले! (१९८५ चे ५५ लाख , आजचे १७५ लाख !)

सगळे ‘टॉप’ चे कलाकार आणि कमालीची रुची दाखवून , तळमळीने , मेहेनतीने निर्माण केलेल्या या कलाकृतीने बक्षिसे मिळवली नसतील तरच नवल !  ग्रॅमी अ‍ॅवार्ड तर मिळालेच,  पण प्रतिष्ठेचे मानले जाणारे ‘अमेरिकन म्युझीक अ‍ॅवॉर्ड’, ‘पिपल्स चॉईस अ‍ॅवार्ड’ पण मिळाले.

या गाण्याबद्दल बरेच काही लिहता येईल, अनेक कथा – दंतकथा आहेत , पण ते नंतर कधी तरी….

मी दाखवत असलेला व्हीडीओ हा हे गाणे रेकॉर्ड होत असताना घेण्यात आला आहे , अनेक फ्रेम्स मध्ये व्हीडिओ ग्राफर दिसतो. मुळ गाणे ऑडीओ स्वरुपात सिंगल रेकॉर्ड च्या माध्यमातुन सादर केले गेले , व्हीडीओ नंतर काही  वर्षांनी.

व्हीडीओ पाहा :

गाण्याचे शब्द आणि ते गाणारे कलाकार :

 

Lionel Richie 
There comes a time when we heed a certain call

Lionel richie & Stevie Wonder 
When the world must come together as one

Stevie Wonder 
There are people dying

Paul Simon 
And its time to lend a hand to life

Paul Simon & Kenny Rogers 
The greatest gift of all

Kenny Rogers 
We cant go on pretending day by day

James Ingram 
That someone, somewhere will soon make a change

Tina Turner 
We are all part of gods great big family

Billy Joel 
And the truth, you know, love is all we need

Chorus: 
Michael Jackson 
We are the world, we are the children
We are the ones who make a brighter day
So lets start giving

Diana Ross 
Theres a choice were making
Were saving our own lives

Michael & Diana Ross
Its true well make a better day
Just you and me

Dionne Warwick 
Send them your heart
So theyll know that someone cares

Dionne Warwick & Willie Nelson 
And their lives will be stronger and free

Willie Nelson 
As God has shown us by turning stones to bread

Al Jarreau 
So we all must lend a helping hand

Chorus: 
Bruce Springsteen 
We are the world, we are the children

Kenny Loggins 
We are the ones who make a brighter day
So lets start giving

Steve Perry 
Theres a choice were making
Were saving our own lives

Daryl Hall 
Its true well make a better day
Just you and me

Michael Jackson 
When youre down and out, there seems no hope at all

Huey Lewis 
But if you just believe theres no way we can fall

CindyLauper 
Well, well, well, well let us realize that a change can only come

Kim Carnes 
When we stand together as one

Chorus: 
We are the world, we are the children
We are the ones who make a brighter day
So lets start giving

Theres a choice were making
Were saving our own lives
Its true well make a better day
Just you and me

We are the world, we are the children
We are the ones who make a brighter day
So lets start giving

Bob Dylan 
Theres a choice were making
Were saving our own lives
Its true well make a better day
Just you and me

Chorus 
We are the world, we are the children
We are the ones who make a brighter day
So lets start giving

Theres a choice were making
Were saving our own lives

Bob Dylan 
Its true well make a better day
Just you and me

Ray Charles 
Alright let me hear ya

Chorus 
We are the world, we are the children
We are the ones who make a brighter day
So lets start giving

Ray Charles 
Theres a choice were making
Were saving our own lives
Its true well make a brighter day
Just you and me

Stevie Wonder / Bruce Springsteen 
We are the world, we are the children
We are the ones who make a brighter day
So lets start giving

Stevie Wonder 
Theres a choice were making
Were saving our own lives
Its true well make a better day
Just you and me

Stevie Wonder / Bruce Springsteen 
We are the world, we are the children
We are the ones who make a brighter day
So lets start giving

Bruce Springsteen 
Theres a choice were making
Were saving our own lives
Its true well make a better day
Just you and me

Chorus 
We are the world, we are the children
We are the ones who make a brighter day
So lets start giving

Theres a choice were making
Were saving our own lives
Its true well make a better day
Just you and me

James Ingram 
We are the world, we are the children
We are the ones who make a brighter day
So lets start giving

Ray Charles 
Theres a choice were making
Were saving our own lives
Its true well make a better day
Just you and me

 

 


About सुहास गोखले

मी सुहास गोखले या वेब-साईटचा निर्माता. आपल्याला ज्योतिष विषयक मार्गदर्शन हवे असल्यास किंवा आपली एखादी सुचना / तक्रार असेल तर खाली दिलेल्या 'संपर्क फॉर्म' मध्ये माहीती भरुन पाठवल्यास मी ताबडतोब आपल्याशी संपर्क साधेन.
+1

सुहास गोखले administrator

मी सुहास गोखले या वेब-साईटचा निर्माता. आपल्याला ज्योतिष विषयक मार्गदर्शन हवे असल्यास किंवा आपली एखादी सुचना / तक्रार असेल तर खाली दिलेल्या 'संपर्क फॉर्म' मध्ये माहीती भरुन पाठवल्यास मी ताबडतोब आपल्याशी संपर्क साधेन.

2 प्रतिक्रिया

///////////////

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.