मी माझ्या या आधीच्या एका केस स्ट्डी मध्ये ‘ विधिलिखीत’ या गोष्टीबाबत काही ओझरता उल्लेख केला होता. त्यावर काही वाचकांनी जादा माहीती द्या अशी विचारणा केली आहे. मी या विषयावर एक विस्तृत लेखमाला लिहायचा विचार करत आहे . माझ्या कडे या बाबतीत बरीच माहीती आहे,  या माहितीचे संकलन करुन लेखमाला लिहायला वेळ लागेल म्हणून तत्पूर्वी चटकन काही चार ओळी लिहाव्यात म्हणुन आजची ही पोष्ट.

मी मागच्या एका केस स्ट्डी मध्ये लिहले आहे ,  ‘विधिलिखीत अटळ असते ते चुकत नाही’  हे वाक्य अर्धसत्य आहे त्या विषयी आणखी काही विचार.

विधिलिखिता द्वारे आपल्याला एक हद्द (कुंपण) घालून दिलेली आहे ! सहसा व्यक्तीला हे आखून दिलेले कुंपण ओलांडता येत नाही. जसे बिल्डर कडून ताब्यात मिळालेल्या अपार्ट्मेंट्चा कार्पेट एरिया आपण बदलू शकत नाही , दक्षिणे असलेला दरवाजा उत्तरेला करु शकत नाही किंवा तत्सम मोठे स्ट्र्क्चरल बदल करु शकत नाही. ( कारण असे बदल करावयाचे असल्यास इमारतीच्या कॉलम्सची तोड्फोड करावी लागते आणि तशी ती केल्यास संपुर्ण इमारत जमीनदोस्त होऊ शकते ! )  पण या आखून दिलेल्या मर्यादेत राहुनही आपल्याला काही बदल नक्कीच करता येतात. अपार्ट्मेंट चे इंटीरियर डेकोरेशन , फॉल्स सिलिंग, बाल्कनी क्लोजींग, फ्लोरिंग टाइल्स बदलणे, किचन ओट्याची दिशा  / लांबी रुंदी बद्लणे,  भारतीय पद्धतीच्या शौचकूपाचे कमोड पद्धतीत रुपांतर करणे, पार्टिशन घालणे इ.

आपल्या आयुष्यात ही असेच असू शकते. काही मर्यादा आहेतच , त्या बदलता येणार नाहीत हे नक्की पण त्या मर्यांदेत राहूनही अनेक गोष्टीं आपल्याला निवडी साठी साठी उपलब्ध असतात याची बर्‍याच जणांना कल्पना नसते. उपलब्ध पर्यायांतून कोणता निवडायचा (आणि केव्हा!) याचे निर्णय स्वातंत्र्य (free Will) प्रत्येकाला जन्मजातच मिळालेले असते, पण प्रत्यक्षात होते असे की असे पर्याय असतात व आपल्याला निवड स्वातंत्र्य आहे हेच मूळात माहीती नसल्याने आपण त्याचा वापर करु शकत नाही.

ज्योतिषशास्त्र नेमके ईथेच आपल्या उपयोगी पडते. या शास्त्राचा वापर करुन आपण आपली हद्द काय हे जाणून घेऊ शकतो, आणि त्यात आपल्याला कोण कोणते पर्याय उपलब्ध आहेत हेही जाणुन घेऊ शकतो.

व्यवहारातले उदाहरण द्यायचे झाले तर असे पहा: आपण जर एखाद्या शुद्ध शाकाहारी हॉटेलात गेलात तर तिथे ‘मुर्ग मसाला , झिंगा फ्राय ‘ असल्या डिशेस मिळणार नाहीत पण तिथे उपलब्ध असलेल्या अनेक  शाकाहारी पदार्थांतून आपण आपल्याला जे आवडेल, रुचेल व परवडेल ते पदार्थ तर आपण नक्कीच निवडू शकतो ना?

 

या शास्त्राच्या मदतीने आपल्याला:

 • आपण व्हेज हॉटेलात आहोत की नॉन-व्हेज ते कळू शकते
 • आपल्याला कोणत्या डिशेस उपलब्ध आहेत हेही कळू शकते
 • आपल्याला किती बजेट मिळाले आहे हेही कळू शकते

 

त्यामुळेच एकदा का आपण मांसाहारी हॉटेलात नसून एका शुद्ध शाकाहारी हॉटेलात आहोत हे लक्षात आल्यावर चिकन , मटनाची अपेक्षा  धरणे बरोबर ठरणार नाही ! आणि बजेट आधीच माहीती असल्याने ‘पनीर मनपसंद’ मागवायचे का  बजेट मध्ये बसणारी  ‘दाल फ्राय’ हे नक्की ठरवता येते, खिशाला परवडू शकेल अशी  साधी ‘रोटी’  मागवायची का होऊ दे खर्च म्हणत  ‘मखमल नान (बटर मारके) ‘  मागवायचा  हे पण  ठरवता येते!

मांसाहारी हॉटेल का शाकाहारी हॉटेल ‘ आणि खिशात पैसे किती हे तुमचे विधिलिखित पण कोणती डिश घ्यायची हे तुमचे निर्णय (निवड) स्वातंत्र्य! पण काही वेळा हे विधीलिखीत इतके टोकाला जाऊन लिहलेले असते की खिशात भरपूर पैसे आहेत, समोर आपल्याला हवे तसे उत्तम हॉटेल आहे आहे पण नेमका उशीर झाल्यामुळे हॉटेल चे किचन बंद झालेले असल्या मुळे भरपेट जेवण मिळण्या ऐवजी तेलकट मेदूवडा खाऊन बाहेर पडावे लागते, हा भाग वेगळा!

‘लग्न कधी होईल ? नोकरी कधी लागेल ? असे कालनिर्णय करणे हा ज्योतिषशास्त्राचा मुळ उद्देश्य नाहीच . ज्योतिषशास्त्र आपल्या साठी एक प्लॅनिंग टूल आहे त्याचा वापर करुन आपल्याला आपले तर जीवन आहे त्यात सुखी समाधानी करता येईल

कारण या शास्त्राद्वारे आपल्याला:

 1. आपली कुवत
 2. आपली बलस्थाने
 3. आपल्या कमकुवत बाजू
 4. आपल्या समोर असलेल्या संधी आणि आव्हाने
 5. अनुकूल काळ, कठीण काळ

या सार्‍यांचा अंदाज आधीच आल्याने आपल्याला आपल्या प्रयत्नांना योग्य दिशा देता येते, वेळ, पैसा, साधनसामुग्री यांचा अपव्यय टाळून , त्यांचा सुयोग्य वापर करुन यश मिळवता येते.

घोंगावत येणारे वादळ आपण थांबवू शकत नाही पण योग्य ती दक्षता घेऊन मनुष्य व वित्त हानी नक्कीच टाळता येते, अपयशाची तीव्रता कमी करता येते, कमीत कमी नुकसान होईल अशा उपाय योजना करता येतात.

शिवाय आपली हद्द / कुवत काय आहे / किती आहे याचा ही अंदाज आल्याने चुकीच्या अपेक्षा  आणि चुकीच्या जागीच्या / अवाजवी अपेक्षा ठेवल्या जाणार नाहीत व त्यामुळे वारंवार होणारे अपेक्षाभंग टाळून मन: शांती ही मिळवता येईल!

या लेखा चा दुसरा भाग लौकरच म्हणजे दोन-चार दिवसात प्रकाशीत करत आहे तेव्हा तो वाचण्या साठी या ब्लॉग ला पुन्हा भेट द्यायला विसरु नका!

शुभं भवतु


About सुहास गोखले

मी सुहास गोखले या वेब-साईटचा निर्माता. आपल्याला ज्योतिष विषयक मार्गदर्शन हवे असल्यास किंवा आपली एखादी सुचना / तक्रार असेल तर खाली दिलेल्या 'संपर्क फॉर्म' मध्ये माहीती भरुन पाठवल्यास मी ताबडतोब आपल्याशी संपर्क साधेन.
+1

सुहास गोखले administrator

मी सुहास गोखले या वेब-साईटचा निर्माता. आपल्याला ज्योतिष विषयक मार्गदर्शन हवे असल्यास किंवा आपली एखादी सुचना / तक्रार असेल तर खाली दिलेल्या 'संपर्क फॉर्म' मध्ये माहीती भरुन पाठवल्यास मी ताबडतोब आपल्याशी संपर्क साधेन.

0 प्रतिक्रिया

///////////////
 1. प्रशांत देशपांडे

  छानच , सुटसुटीत शब्द आणि भाषा , आमचे कडून हार्दिक अभिनंदन आणि शुभेच्छा

  0
  1. सुहास गोखले

   श्री. प्रशांतजी,
   अभिप्रया बद्दल धन्यवाद . तशी या विषयाची व्याप्ती फारच मोठी आणि संकल्पना बरीच क्लिष्ट आहे . यातल्या बर्‍याच अनुभुती पाचव्या मिती (व्हायबेशंस चे एक डेरिव्हेटीव्ह ) मधल्या आहेत . (आपल्याला लांबी, रंदी. खोली आणि वेळ या चारच मितीं माहीती आहेत , पण त्या पलीकडे ५ वी , ६ वी आणि ७ वी मिती पण आस्तित्वात आहेत पण आपल्या विज्ञानाला याचा आतापता लागायचा आहे , अजून एखाद दोन आईनस्टाईन जन्माला यायचे आहेत . मी जरा जास्तच सोपे करुन लिहलेय.

   सुहास गोखले

   0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.