माझ्या आगामी पुस्तका बद्दल वाचकांचे मत काय आहे हे जाणुन घेण्यासाठी आपल्या या ब्लॉग वर एक जनमत चाचणी कौल ठेवला होता , वाचकांनी त्याला भरभरुन प्रतिसाद दिला त्याबद्दल मी सर्व वाचकांचा अत्यंत आभारी आहे, जनमताचा कौल असा आहे:

पुस्तकाची भाषा कोणती असावी ?


पुस्तकाची किंमत काय असावी?


पुस्तकाचा विषय कोणता असावा?

 

 

ज्यांनी आवर्जुन आपले मत नोंदवण्याचे कष्ट घेतले त्यांचे मन:पूर्वक आभार !

मराठीतून पुस्तक लिहा असे मत बहुमत दिसते , त्याचा मी जरुर विचार करेन पण  पुस्तकाचा खप होणे हा मुद्दा अत्यंत महत्वाचा असतो ,  ‘ब्रेक ईव्हन ‘    होण्यासाठी  जी काही ठरावीक विक्री एका विषीष्ठ काळात  व्हावी लागते ती इंग्रजीतल्या पुस्तका मुळेच होऊ  शकेल , कारण  इंग्रजीचा वाचक वर्ग  मराठीच्या तुलनेत दहा पट तरी मोठा आहेच.  त्यामुळे माझे पहिले पुस्तक अर्थातच ‘इंग्रजी’ तून असेल. पण मराठीचा आग्रह धरणार्‍यांनी  नाराज होण्याचे काही एक कारण नाही कारण मी अत्यंत सोपे – सुटसुटीत इंग्रजी लिहण्याचा प्रयत्न करेन. आणि ज्योतिषातले वरचे बहुतांश नविन लेखन   इंग्रजीतच उपलब्ध आहे / होत राहणार अशा परिस्थितीत आज ना उद्या प्रत्येकाला ‘इंग्रजी’ तले ग्रंथ वाचायचा सराव करुन घ्यायलाच हवा , नव्हे ती काळाची  गरज  आहे असे म्हणता येईल.

पुस्तकाची किंमत रु. ३०० ते  रु ४०० च्या आसपास असल्यास बहुतांश वाचकांच्या आवाक्यात राहील असा कल दिसतो आहे.  साधारण याच किंमतीत पुस्तक देण्याचा माझा प्रयत्न राहील. वेळ पडल्यास मी माझी ‘रॉयल्टी’ काहीशी  कमी घेईन पण पुस्तकाची किंमत याच टप्प्यात राहील असे बघेन, पण २५०  पृष्ठांचे  पुस्तक  कागद, छ्पाई, बांधणी यांचा खर्च तसेच विक्रेत्यांचे  कमीशन पाहता रु ३०० आत  देणे परवडणारे नाही.

पुस्तकाच्या विषयाबदल मात्र वाचकांचा कौल बुचकळ्यात टाकणारा मिळाला आहे. ग्रहगोचरी ( ट्रान्सीट्स) ला अत्यल्प मागणी पाहून मला आश्चर्य वाटले, कारण भारतातले ७०% च्या आसपासचे भविष्य कथन  फक्त आणि फक्त ग्रहगोचरी ( ट्रान्सीट्स) वरुन केले जाते , पाश्चात्यांच्यात सुद्धा ग्रहगोचरी ( ट्रान्सीट्स) वरच जोर असतो. मराठीत या विषयावर जवळ जवळ काहीच लिहले गेलेले नाही अशी स्थिती असताना कोणालाच या विषयाचा अभ्यास  करावासा वाटू नये याचे वैषम्य वाटले असो. पण माझे दुसरे पुस्तक केवळ याच विषयावर असेल पण मराठी वाचक कमी उत्सुक असल्याने ते इंग्रजीतून लिहणे भाग आहे.

केस स्ट्डीज ला सुद्धा जास्त पसंती नाही  हे अजबच म्हणायचे!!  माझ्या मते,   एक व्यवस्थित , खुलासेवार केस स्ट्डी  चार पुस्तके वाचल्याचे पुण्य पदरात टाकते!  थिअरी हा भाग सर्वच पुस्तकांतून वाचवायास मिळेल , शुष्क पोपटपंची करायला काय जाते? पण हे ज्ञान प्रत्यक्षात वापरायचे कसे हे ‘केस स्ट्डी ‘ शिकवते , तो भाग फार कमी पुस्तकांतून वाचावयास मिळेल. माझ्या ब्लॉग वर आहेत तशा केसस्ट्डीज तुम्हाला मराठीच काय इंग्रजी ब्लॉग्ज वर सुद्धा सापडणार नाहीत एव्हढेच नव्हे तर माझ्या तोडीच्या केस स्ट्डीज कोणत्या ग्रंथात सुद्धा सापडणार नाहीत , अगदी  सी. आर. भट्ट, हसबे, शहासनें पासून ते साक्षात कृष्ण्मुर्ती पर्यंतच्या लेखकांच्या पुस्तकांत सुद्धा नाहीत अशा केस स्ट्डीज !  काहीजणांना कदाचित असे वाटले असेल की ब्लॉग वर प्रसिद्ध झालेल्याच केसस्ट्डीज पुस्तक रुपाने प्रसिद्ध होतील पण तसे नाही  ,माझी ‘थंडा प्रतिसाद’  ही पोष्ट वाचा, त्यात काही केस स्ट्डीज ची नुसती नावे दिली आहेत त्या ब्लॉग वर आलेल्या नाहीत (आणि येणार ही नाहीत !) त्या आणि अशा अनेक केसस्ट्डीज माझ्या फाईल्स मध्ये आहेत , पुस्तकातल्या केस स्ट्डीज पूर्ण नव्या अप्रकाशित असतील.

होरारी  (प्रश्नशास्त्र) आणि कृष्णमुर्ती पद्धती ओळख या विषयांना माफक प्रतिसाद आहे , हे स्वाभाविक आहे .

माझ्या प्रकाशकांचा आग्रह आणि माझाही स्वत:चा विचार लक्षात घेता माझे पहिले पुस्तक ‘Case Studies in KP Astrology’  इंग्रजीतून प्रसिद्ध होईल , किंमत रु ३५०  च्या आसपास असेल. पुस्तक माझ्या कडून डायरेक्ट विकत घेता येईल किंवा अ‍ॅमेझॉन इंडीया , फ्लिपकार्ट,  बुक अड्डा,  स्नॅपडील, पेटीएम , क्रॉसवर्ड अशा अनेक ऑन लाइन विक्रेत्यांकडून घेता येईल.

सध्या तरी काही तांत्रिक अ‍डचणीं मुळे  ‘इबुक’ किंवा ‘किंडल बुक ‘ माध्यमातून हे पुस्तक देता येणार नाही  आहेत.  जर त्या अ‍डचणिं दूर झाल्यातर या दोन्ही माध्यमातून ही पुस्तक प्रकाशीत  होईल पण किंमतीत फारसा फरक असणार नाही.

पुस्तक कसे असेल याची थोडीफार कल्पना येण्यासाठी.

माझ्या मुलाने (चि. यज्ञेश) या पुस्तकाचे एक कव्हर डिझाईन पण करुन टाकले आहे , त्याचा हा नमुना:

मी स्वत: या पुस्तकाच्या ‘प्रोजेक्ट’ साठी ‘मोटिव्हेशन आयकॉन’  तयार केला आहे  तो असा:

आणि हा ‘प्रोजेक्ट किक ऑफ ‘  स्प्लॅश !

 

असो ,  पण वाचकांच्या इच्छेला  मान देऊन ‘ग्रहयोगां’ वर खास मराठीतुन पुस्तक लिहीत आहे, काळजी  नको.

माझे  आगामी पुस्तक अत्यंत देखणे असेल याची पहिल्या पासुन काळजी घेण्यात येत आहे. लिखाण दर्जेदार असेल यात काही शंकाच नाही पण पुस्तकाचे कव्हर, कागद, छ्पाई, बांधणी हा भाग पण उत्तम असेल. पुस्तकाची मांडणी मनोवेधक असेल , त्यासाठी सध्या मी ‘टायपोग्राफी’  या विषयाचा खास अभ्यास करत आहे,  इतर ग्राफिक्स मी स्वत: खास  लक्ष देऊन तयार करत आहे. ‘स्क्रिवेनर’  (Scrivener)  हा खास ग्रंथ लेखनासाठी तयार केलेला वर्ड प्रोसेसर  वापरत  आहे, (मायक्रोसॉफ्ट वर्ड .? ह्यॅ ह्यॅ ह्यॅ  कै च्या कै  राव !) पुस्तकाचा ले -आऊट , डिझाइन अ‍ॅडोबी ‘इन डिझाईन’  (Adobe InDesign) वापरुन केले जाईल.  तेव्हा जे मिळेल ते उत्तम दर्जाचेच असेल , खात्री बाळगा!

इंग्रजी पुस्तक (केस स्ट्डीज ) साधारण मार्च (गुढीपाडवा)  मध्ये प्रकाशीत करण्याच्या दृष्टीने प्रयत्न चालू आहेत.  मी आपल्याला वेळोवेळी याचे अपडेट्स देत राहीन (तेव्हढीच पुस्तकाची जैरात पण होऊन जैल ना!)

शेवटी  पुन्हा एकदा सर्व वाचकांचे व त्यातही ज्यांनी ह्या ‘पोल’ मध्ये आपले मत नोंदवले त्या सर्वांचे मन:पूर्वक आभार. ज्यांना काही कारणांमुळे ‘पोल’ मध्ये मत नोंदवता आले नाही त्यांनी अजुनही आपले मत  ‘संपर्क फॉर्म’ अथवा कॉमेंट्स मार्फत माझ्याकडे पोहोचवावे, आपल्या मताचा निश्चीत विचार होईल.

कळावे.

शुभं भवतु


About सुहास गोखले

मी सुहास गोखले या वेब-साईटचा निर्माता. आपल्याला ज्योतिष विषयक मार्गदर्शन हवे असल्यास किंवा आपली एखादी सुचना / तक्रार असेल तर खाली दिलेल्या 'संपर्क फॉर्म' मध्ये माहीती भरुन पाठवल्यास मी ताबडतोब आपल्याशी संपर्क साधेन.
0

सुहास गोखले administrator

मी सुहास गोखले या वेब-साईटचा निर्माता. आपल्याला ज्योतिष विषयक मार्गदर्शन हवे असल्यास किंवा आपली एखादी सुचना / तक्रार असेल तर खाली दिलेल्या 'संपर्क फॉर्म' मध्ये माहीती भरुन पाठवल्यास मी ताबडतोब आपल्याशी संपर्क साधेन.

13 प्रतिक्रिया

///////////////
 1. Himanshu

  Good to see the results! One business idea. I’ve seen one astrologer doing this. If you have a e-copy then you can lump that into your consultation charge and give the client a copy of the book. For example, if you charge 500 for something then charge 900 and advertise that my consultation includes a free copy of my book.

  0
  1. सुहास गोखले

   श्री. हिमांशुजी ,

   धन्यवाद.

   आपली कल्पना नक्कीच विचार करण्यासारखी आहे. आगामी काळात मी ज्योतिष वर्ग घेणार आहे त्यावेळी माझीच पुस्तके टेक्स्ट बुक म्हणून देणार आहे त्यामुळे सर्वच पुस्तकांची मांडणी टेक्स्ट बुक पद्धतीने करत आहे.

   आपला

   सुहास गोखले

   0
    1. सुहास गोखले

     श्री. हिमांशुजी ,

     धन्यवाद.

     ज्योतिष वर्ग घेणार ऑनलाईन असतील (मराठी का इंग्रजी हा गोंधळ इथेही आहेच !)

     आपला

     सुहास गोखले

     0
 2. viraj thale

  मी हे पुस्तक घेणार.पण मुळात ग्रहगोचरी म्हणजे काय हे सामान्य वाचकांना समजलेले दिदिसत नाही असे वाटते.

  0
  1. सुहास गोखले

   श्री. विराजजी ,
   धन्यवाद.

   आपण म्हणताय तसे खरेच बर्‍याच वाचकांना ‘ग्रहगोचरी’ म्हणजेच ट्रांन्सिट्स हे लक्षात आले नसेल बहुदा.

   आपला

   सुहास गोखले

   0
 3. Gaurav Borade

  अरे व्वा … सर्वप्रथम आपले मनापासून अभिनंदन आणि शुभेच्छा …!
  आपल्या ब्लोग प्रमाणेच आपले पुस्तक सुद्धा आकर्षक असेल याची खात्री आहे..
  तसे आपण दिलेले सगळेच पर्याय चांगले होते.. आपण या सर्वांवर कमीत कमी एक पुस्तक लिहवे हि एक नम्र विनंती.. 🙂
  बाकी पुन्हा एकदा आपल्या पहिल्या पुस्तकासाठी शुभेच्छा …! ( advance booking च्या तारखेची वाट बघतोय… 😉 )

  0
  1. सुहास गोखले

   श्री. गौरवजी ,

   धन्यवाद.

   आहे किमान चार पुस्तकांचा प्लॅन आहे , केस स्टडीज वरचे पुस्तक पहिले कारण त्याचे स्र्व मटेरियल माझ्याकडे तयार आहे , फक्त इंग्रजीत भाषांतर करायचे काम बाकी आहे . बाकीच्या पुस्तकांवर बरेच काम करावे लागेल.

   आपला

   सुहास गोखले

   0
 4. madhukar santukrao diwanji

  guruji namskar,
  pustak tadakheband khapnar (bhavishya ha maza vishay nahi) .
  subhecha.
  putakache advance booking suru kele tar chan hoil.
  madhukar diwanji

  0
  1. सुहास गोखले

   श्री. मधुकरजी,

   धन्यवाद.

   आपल्या कामाचे लक्षात आहे , ज्रा जास्तच रेंगाळले आहे हे मान्य , आपण या एक – दोन दिवसांत फोन वर बोलून चर्चा करु,

   आपला
   सुहास गोखले

   0
 5. swapnil

  सुहास जी केस स्टडी फार महत्वाच्या आहेत असे मला पण वाटते .कारण यातून प्रक्टीकॅल knownledge मिळते जे पुस्तक पेक्षा खूप महत्वाचे व निर्णायक ठरते .मला कृष्णमुर्ती पद्धतीतले काहीच माहित नव्हते पण केस स्टडी वाचून खूप माहिती मिळाली . आता मला के पी सोपी वाटते . याचे सगळे श्रेय केस स्टडी लाच

  0
  1. सुहास गोखले

   श्री. स्वप्नीलजी,

   अभिप्राया बद्दल धन्यवाद. पुस्तकातले नियम एका परीने बरोबरच असतात पण त्याच्या व्यक्ती, स्थळ, काल , परिस्थिती सापेक्षा अर्थ कसा लावायचा हे केस स्ट्डीज मधूनच शिकायला मिळते. ‘खिशात सापडलेल्या रेल्वेच्या एका तिकीटा वरुन खून उघडकिस आणल्याचे’ एक उदाहरण नुकतेच टि.व्ही. वर पाहीले. एखादी कुंडली सोडवताना असेच शेरलॉक होम्स सारखे काहीतरी अतर्क्य करावे लागते, काही वेळा नियम जसे आहेत तसे लागू पडत नाहीत, त्यावेळी त्यातले बारकावे समजाऊन घेऊन काम केले तरच कोडे सुटणे शक्य असते , केसस्ट्डीज च्या माध्यामातून हे सांगणे / समजवूण घेणे जास्त सोपे जाते. माझ्या ब्लॉग्स वर अशा अनेक ट्विस्ट वाल्या केस स्ट्डीज आहेत त्या वाचल्या तर के.पी. समजणे अवघडा नाही. शुभेच्छा!

   सुहास गोखले

   0
 6. Atul Barve

  Sir,

  After reading the above Wachakancha Kaul , I remembered the Va Pu Kale`s Kathakathan story — Statistics Marathe .

  It`s Ok.

  Hereby I request you to publish your case studies by Paramparik Jyotish Padhaati and Grahayog ( very easy to understand ). And not by KP method ( Quite difficult to understand ).

  It is my kind request. Please do not take it personally.

  Thank You !

  0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.