हा गेल्या आठवड्यात काहाडलेला फटू, वजन चक्क दोन किलोंने कमी झाल्याचा आनंद व्यक्त करताना !
क्यॅमेरा Nikon D5200 , लेंस 50 mm , F1.8 prime, ISO 200, f2.8 , एक साधा यल्लो एल ई डी लॅम्प लाईट सोर्स म्हणून वापरला , दुपारची वेळ असल्याने खिडकीतून येणार्या अॅम्बीयंट लाईट चा वापर केला आहे , (पडदा वापरुन जरा डिफ्युज केला) , पांढर्या छत्रीवरुन रिप्लेक्शन घेतले. कॅमेरा ट्रायपॉड वर, रिमोट शटर रिलिज.
क्रोमा की वापरली आहे बाकी शक्य असूनही इतर कोणतेही फोटॉशॉप टच अप केले नाही.
वजन कमी झाल्यामुळे अनावश्यक ‘चरबी’ कमी झाली त्यामुळे जरासा लुकडा दिसत आहे. , वजन कमी करन्यासाठी जे काही केले त्याचा आणखी एक चांगला परिणाम म्हणजे केस काळे झाले आणि चमकदार झाले !
हे तसे अनपेक्षीत होते.
वजन कमी करण्यासाठी व्यायाम (जलद चालणे , काही कॉर्डिओ व्हॅस्कुलर प्रकाराचे सर्किट ट्रेनिंग), जेवण कमी केले, अॅपल सायडर व्हिनेगर , ग्रीन टी , दालचिनी पावडर आणि मध – कोमट पाण्याचा वापर यांचा कमालीचा फायदा झाला जोडीला रामदेवबाबाचे आलोम विलोम , कपालाभाती इ.
रामदेव बाबाचा मध अजिब्बात घेऊ नका, नुस्ता गुळाचा पाक आहे , फशीवतोय तो सगळ्यांना , मला बेंगलोर चा एक मधवाला सापडला आहे तो मध सर्वोत्तम !
हनी अॅन्ड स्पाईस – बेंगलोर चा मधवाला
मध अस्सल आहे म्हणून किंमत जरा जास्त आहे २९५ ला पाव किलो ! रामदेव बाबाच्या चौपट किंमत आहे !
महाग जरुर पण चांगला आहे , तेव्हा हाच घ्या , थोडा कमी खा ..
“जब मेहेंगी हुई बहुत शराब तो थोडी थोडी पिया करो ।’
यांच्या कडून ऑन लाईन पेमेंट करुन मागवता येतो, हे लोक अॅमेझॉन वर पण हाच मध (त्याच किंमतीत) विकतात..
हे आपले अॅमेझॉण वाले , यांचा कडे हाच मध त्याच किंमतीत भेटतो
ही मधाची बाटली …
असो, ह्याच फोटो शुट मधला आणखी एक फटू…जरा शिरेस मूड मध्ये…
शुभं भवतु
- ऑन लाईन (लाईव्ह स्ट्रीमिंग) ज्योतिष क्लास - March 24, 2020
- पुण्यात क्लास सुरु ! - February 29, 2020
- Lost & Found ! - February 26, 2020
- बासरीवाला ! - February 6, 2020
- निशाणी बदला… भाग्य बदला – ३ - February 6, 2020
- निशाणी बदला… भाग्य बदला – २ - February 5, 2020
- ‘निशाणी बदला… भाग्य बदला’ - February 5, 2020
- विठ्ठला कोणता झेंडा घेऊ हाती – भाग २ - January 23, 2020
- विठ्ठला कोणता झेंडा घेऊ हाती – भाग १ - January 22, 2020
- प्रश्नकुंडलीची वेळ - January 21, 2020
👍
श्री. संतोषजी,
अभिप्रया बद्दल धन्यवाद.
सुहास गोखले
Suhasji,
Tumcha ya purvi asalela cream colour chya shirt madhala blog varcha photo phar chan hota. To website var ghetlela chan disel.
Namaskar,
Sudhanva
श्री. सुधन्वाजी,
सारखा एकच एक फटू बघूण मलान कंटाळा आला म्हणून जरा नविन काही. आत्ताचा गुलाबी – जांभळुआ ब्यॅक ग्राऊंड वरचा फटू चांगला आहे,
सुहास गोखले
श्री. सुहासजी,
वजन कमी करून बऱ्याच जणांना स्फुर्ती व योग्य मार्गदर्शन केल्याबद्दल धन्यवाद.
चांगला मध कसा ओळखावा याबद्दल काही माहिती असल्यास आम्हाला इकडे तसे शोधात येईल.
फोटो छान आले आहेत.
धन्यवाद,
अनंत
श्री. अनंतजी,
अभिप्रया बद्दल धन्यवाद.
खरेतर चांगला मध ओळखायला लॅब टेस्ट करावी लागते पण साधारण चव घेऊन अंदाज येऊ शकतो. सध्या बाजारात मिळणारे बहुतांश मध हे काही प्रमाणात भेसळीचेच आहेत.
मी सध्या बेंगलोर च्या हनी अॅन्ड स्पाईस चा मध वापरत आहे तो बरा आहे .
सुहास गोखले