प्रख्यात अमेरिकन ज्योतिर्विदा सौ सिल्वीया डीलाँग यांनी सोडवलेली एक होरारी केस.

प्रश्न:

सौ स्मिथ यांचा अमेरिकन आर्मी मध्ये असलेला मुलगा , व्हिएटनाम मध्ये लढत होता , बर्‍याच वर्षांनी सुट्टी घेऊन घरी येणार होता , पण व्हिएटनाम वॉर , केव्हा ही काहीही होऊ शकते, आई ( सौ स्मिथ) मुलाला भेटायला आतुर होती,  ठरल्या प्रमाणे हा पोरगा येतो की नाही अशी उगाचच शंकेची पाल मनात चुकचुकायला लागली म्हणुन त्यांनी (सौ स्मिथ)  विचारले:

“ माझा बाळ ठरल्या प्रमाणे सुट्टी घेऊन घरी येईल ना ?”

काय उत्तर द्याल या माऊलीला ?

 

प्रश्नाचा तपशील:

दिनांक: 17 डिसेंबर 1970
वेळ: 15:27:23 EST

स्थळ: Cassadaga , Florida, US 81W14’10 28N57’58

या पद्धतीच्या अ‍ॅनॅलायसीस मध्ये काही प्रारंभिक तपास करावा लागतो त्यात जन्मलग्न बिंदू कोठे आहे, चंद्र किती अंशावर आहे , कसा आहे, शनी कोठे आहे इ. बाबी येतात. त्यानंतर प्रश्ना संदर्भात महत्त्वाचे भाव, प्रश्नाशी निगडित असलेल्या व्यक्तीचे आणि विषयाचे (वस्तूचे) प्रतिनिधी ठरवावे लागतात.

चला तर मग, आपल्या प्रोटोकॉल प्रमाणे एक एक फॅक्टर तपासायला सुरवात करू या.

जन्मलग्न:

जन्मलग्न २५ वृषभ ०० असे आहे त्यामुळे ‘अर्ली असेंडंट ‘ किंवा ‘लेट असेंडंट ‘ हे दोन्ही फॅक्टर्स निकालात निघाले.

(ज्यांना या ‘अर्ली असेंडंट ‘ किंवा ‘लेट असेंडंट ‘ बद्दल माहीती नाही त्यांनी कृपया या ब्लॉग वरची ‘ज्युवेल थीफ’ ही लेखमाला जरूर वाचावी ज्युवेल थीफ ! (भाग – २) )

चंद्र व्हॉईड ऑफ कोर्स:

चंद्र  सिंहेत २२:४५ अंशावर आहे,  सिंहेत असे पर्यंत हा चंद्र  गुरु  आणि रवी शी योग करणार असल्याने चंद्र ‘व्हाईड ऑफ कोर्स’ नाही, काळजी नको!

(ज्यांना चंद्र ‘व्हॉईड ऑफ कोर्स’ बद्दल माहीती नाही त्यांनी कृपया या ब्लॉग वरची ‘ज्युवेल थीफ’ ही लेखमाला जरूर वाचावी ज्युवेल थीफ ! (भाग – २) )

शनी:

शनी व्ययात आहे, म्हणजे तो लग्नात नाही, सप्तमात नाही त्यामुळे ही पण काळजी मिटली.

(ज्यांना सप्तमातल्या शनी बद्दल माहीती नाही त्यांनी कृपया या ब्लॉग वरची ‘ज्युवेल थीफ’ ही लेखमाला जरूर वाचावी ज्युवेल थीफ ! (भाग – २) )

सर्व प्रथम या केस मध्ये सक्रिय असलेल्या / असू शकणार्‍या सर्व पात्रांची – अ‍ॅक्टर्स ची एक यादी बनवूया.

अशी कोण कोण पात्रें  – अ‍ॅक्टर्स आहेत?

  1. सौ स्मिथ –  माऊली (प्रश्नकर्ती )
  2. मुलगा

चला आता ही पात्रें आणि त्यांचे प्रतिनिधित्व करणारे ग्रह कोण आहेत ते तपासूया.

सौ स्मिथ –  माऊली:

प्रश्नकर्ता लग्न भावा (१) वरून बघतात, या चार्ट मध्ये वृषभ लग्न आहे म्हणजे वृषभेचा स्वामी ‘शुक्र’  प्रश्नकर्तीचे  म्हणजेच ‘माऊली’ चे प्रतिनिधित्व करणार, लग्नस्थानात कोणताही ग्रह नाही. ‘चंद्र’ हा नेहमीच प्रश्नकर्त्याचा नैसर्गिक प्रतिनिधी असतो.

शुक्र आणि चंद्र हे सर्व जातकाचे (सौ स्मिथ –  माऊली) चे प्रतिनिधित्व करतील. शुक्रा सारखा स्त्री ग्रह प्रश्नकर्तीचा प्रतिनिधी असणे हे हा चार्ट रॅडीकल असल्याची एक खूण.

मुलगा:

संतती नेहमीच पंचम (५) स्थानावरुन पाहतात. पंचमेश आणि पंचमातले ग्रह एकत्रित रित्या संततीचे प्रतिनिधित्व करतील.

पंचम स्थानाची सुरवात ८ कन्या २८ वर आहे , म्हणजे बुध हा ं पंचमेश म्हणून संततीचे प्रतिनिधित्व करणार. युरेनस आणि प्लुटो देखील पंचमात आहेत पण ह्या ग्रहांचा प्रतिनिधी म्हणून वापर केला जात नसल्याने आपण यांचा विचार करायला नको.

बुध एकटा संततीचे प्रतिनिधित्व करेल.

प्रमुख पात्रे आणि त्यांच्या भूमिका करणारे अभिनेते निश्चित झाले!

आता मुलाची आणि त्याच्या आईची भेट होणार असेल तर मुलाचा  प्रतिनिधी (बुध) आणि जातकाचे प्रतिनिधी (चंद्र , शुक्र) ) यांच्यात कोणता तरी योग व्हायला हवा.

प्रथम आपण जातकाचा प्रतिनिधी चंद्र आणि मुलाचा प्रतिनिधी बुध यांच्यात काही योग होतात का ते पाहू.

चंद्र २२ सिहेंवर आहे, बुध १३ मकरेत असल्याने त्यांच्यात योग होत नाही

आता आपण जातकाचा दुसरा प्रतिनिधी शुक्र आणि मुलाचा प्रतिनिधी बुध यांच्यात काही योग होतात का ते पाहू.

शुक्र १४ वृश्चिके वर आणि बुध १३ मकरेत आहे , या दोघांत लाभ योग होणार आहे आणि हे अंतर अवघे १ अंशाचे आहे, बुध हा शुक्रा पेक्षा किंचितसा जलद असल्याने तो हे अंतर भरून काढून शुक्राशी लाभ योग करू शकेल. .

माऊलीची आणि मुलाची भेट होणार या बद्दल आपल्या एक टेस्टीमोनी मिळाली. म्हणजे भेट होणार का?

उत्तर कितीही होकारार्थी वाटते तरी एफेमेरीज पाहील्या खेरीज उत्तर द्यायचे नाही. मी या काळातल्या (१७ डिसेंबर १९७० ) एफेमेरीज तपासल्या.

 

सोबत दिलेले फिरंगी पंचांग बघितले तर असे दिसते की , हा बुध जो प्रश्न विचारते वेळी मार्गी होता तो प्रश्न विचारल्याच्या तिसर्‍या दिवशीच २० डिसेंबर १९७० ला १४ मकरे वर असताना वक्री होणार आहे ! वक्री अवस्थेत तो मकरेतून धनू राशीत येईल मग पुन्हा मार्गी होईल पण हे सगळे होई तो पर्यंत शुक्र जो सध्या शुक्र १४ वृश्चिके वर आहे तो वृश्चिक रास ओलांडून धनू राशीत जाईल म्हणजे होणार असे वाटत असलेला बुध – शुक्र लाभ योग होणार नाही !

होरारीत  याला 

Refranation. 
Two planets are applying toward an aspect, but before the aspect perfects, one of the planet turns retrograde, and as a result the aspect cannot become exact.

 
म्हणजे काय ? माऊलीच्या तिच्या मुलाशी भेट होणार नाही ? योग नाहीत म्हणजे घटना घडणार नाही , नाहीच होणार भेट , बर्‍याच वर्षा नंतर रजा घेऊन भेटायला येणार मुलगा येणार नाही , मुलाच्या भेटीची चातका सारखी वाट पाहणार्‍या या माऊलीला कसे सांगायचे ‘माऊली , आपला मुलगा काही ठरल्या वेळी आपल्याला भेटायला येणार नाही’

असे नकारार्थी उत्तर देण्यापुर्वी आणखी काही , बुडत्याला काडीचा आधार स्वरुप काही सापडते का याचा तपास करायचा माझ्या प्रघात आहे.

मुलाचा प्रतिनिधी म्हणून आपण फक्त बुधाचाच विचार केला. युरेनस आणि प्लुटो पंचमात असले तरी आपण वगळले होते , मग त्यांचा विचार करुन पाहीले तर ? कदाचित त्यांच्या रुपाने या माऊलीला तिचा मुलगा भेटतो का ते पाहायला काय हरकत आहे ?

म्हणजे माउलीचे प्रतिनिधी चंद्र आणि शुक्र आणि मुलाचे हे जादाचे प्रतिनिधी युरेनस आणि प्लुटो यांच्यात योग होतात का हे पाहणे आले.

चंद्र २२ सिहेंवर आहे, युरेनस १३ तूळेत असल्याने त्यांच्यात योग होत नाही
चंद्र २२ सिहेंवर आहे, प्लुटो २९ कन्येत असल्याने त्यांच्यात योग होत नाही

शुक्र १४ वृश्चिके वर आणि युरेनस १३ तूळेत असल्याने त्यांच्यात योग होत नाही
शुक्र १४ वृश्चिके वर आणि प्लुटो २९ कन्येत असल्याने त्यांच्यात लाभ योग होऊ शकतो पण हा योग होण्यापूर्वी शुक्र २४ वृश्चीकेवर असलेल्या गुरु शी युती करणार आहे हे पण लक्षात घेतले पाहीजे.

हा गुरु माउलीचा अष्टमेश आणि मुलाचा चतुर्थेश आहे म्हणजे माऊलीची आणि मुलाची भेट घडेल ही पण काही अडथळे येण्याची संभावना आहे.

एफेमेरीज तपासल्या तर असे दिसते की:

६ जानेवारी १९७० रोजी वृश्चीक रास ओलांडायच्या अगदी बेतात असताना शुक्र , कन्येतल्या एव्हाना वक्री अवस्थेत असलेल्या प्लुटो शी लाभ योग करणार आहे पण त्या आधी हा शुक्र, गुरु शी युती करणार आहे हे आपण नोंदवले होते त्याचे काय झाले ते पाहा. आपल्या लक्षात येईल की शुक्र – गुरु ० अंशातली परफेक्ट युती ही त्या अधी फक्त एक दिवस म्हणजेब ५ जानेवारी १९७० ला होणार आहे म्हणजे जवळजवळ एकाच वेळी शुक्र – गुरु आणि शुक्र – प्लुटो हे योग होणार आहे.

जातकाचा प्रतिनिधी शुक्र आणि मुलाचा प्रतिनिधी प्लुटो यांच्यात उशीराने का होईना योग होणार आहे असे दिसते म्हणजे आई – मुलाची भेट होणार.

मी सौ स्मिथ ना सांगीतले

“जरा गडबड आहे”

“म्हणजे तो येणार नाही ?”

“असे ही नाही, तो येणार पण ठरलेल्या दिवशी नाही, जरा उशीराने आपली भेट होणार , ग्रहयोगच सांगताहेत ना”

“उशीर होणार इतकेच ना? मग काही हरकत नाही, त्याचे हे नेहमीचेच आहे , एका फौजीची आई आहे मी , हे असे मागे-पुढे होणे काही नवीन नाही मला”

“हो ना , या आर्मी वाल्यांचे असेच असते”

“बाकी धन्यवाद , मला मोठी काळजी लागून राहीली होती ”

“आपले स्वागत आहे”


सौ स्मिथ निघून गेल्या आणि मी इतका वेळ आणलेले सारे उसने अवसान गळून पडले , पाण्याचा आख्ख्या ग्लास रिता केला , डोके दाबून काही क्षण बसून काढले , त्या माऊलीच्या गळ्यात पडून ओक्साबोक्सी रडावे असे वाटले , नियतीचा खेळ किती क्रुर असतो ते आज कळले ! डोळ्यातल्या अश्रुंनी समोरचा कागद भिजला.

काय पाहीले होते मी त्या पत्रिकेत ?

भयंकर ! हो भयंकरच म्हणायचे , मी त्या बिचार्‍या फौजीचा मृत्यू पाहीला होता ! पत्रिकेत अगदी स्पष्ट दिसत होता आणि हे मी त्या माऊलीला कसे सांगायचे ?


खरेतर सुरवातीला ही नेहमीची रुटीन होरारी केस वाटली होती, दोन प्रतिनिधीं मध्ये योग होत नाहीत, नाही झाले तर घटना घडणार नाही इतकेच , आत्ता ही मला तसेच वाटले होते. पण अवध्या १ अंशात होणारा योग टाळून बुध वक्री काय होतो आणि मागे मागे जात सध्याची रास ओलांडून आणखी मागे स्ररकतो काय हे मला जरा विचित्र वाटले.

ज्या क्षणी मी प्लुटो आणि  बुधात योग होत आहेत हे बघितले तेव्हा मला खर्‍या धोक्याची जाणीव झाली.

जरा २ ते ७ जानेवारी दरम्यान होणारे ग्रहयोग पाहा.

२ जानेवारीला प्लुटो वक्री होणार आहे त्यानंतर ३ जानेवारीला मुलाचा प्रतिनिधी बुध जो वक्री अवस्थेत आहे , वक्री अवस्थेतल्या प्लुटो शी केंद्र योग करणार आहे, प्लुटो पंचम स्थानात असला तरी आपण त्याला मुलाचा प्रतिनिधी म्हणून विचारात घेताना साशंक होतोच अगदी नाईलाजाने आपण प्लुटो ला अशी मान्यता दिली होती पण आता ते विचारात न घेता पाहीले तर ?  हा केंद्र होता क्षणीच म्हणजे ६ / ७ जानेवारीला बुध स्तंभी होऊन ८ जानेवारीला तो स्तंभी अवस्थेतून मार्गी अवस्थेत येईल. ही कमालीची स्फोटक आणि विघातक ग्रहस्थीती आहे. बुध त्यावेळी धनु राशीत म्हणजे मुलाच्या चतुर्थ (४) स्थानात तर प्लुटो मुलाच्या लग्न (१) स्थानात , चतुर्थ स्थान हे कोणत्याही गोष्टीची अखेर मानली जाते आणि प्लुटो सारखा मृत्यू सुचक ग्रह ! म्हणजे या मुलाचे काही बरेवाईट ?

०५ जानेवारीला पाहा बुध (मुलगा) , शुक्र ( माऊली) , प्लुटो (मृत्यू) आणि गुरु (मुलाचा चतुर्थेश आणि माऊलीचा अष्टमेश ) सगळे २८ अंशात!

बुध हा बातमीचा कारक अशा अर्थाने तपासला तर बुध – शुक्र योग बातमी माऊलीला कळेल असे सुचित होते , बुध वक्री असल्याने आणि माऊलीच्या अष्टमात असल्याने ही बातमी शुभ कशी असू शकेल ?

हे सगळे हेच सांगत आहेत की ‘आईच्या भेटी साठी निघालेला हा फौजी जिवंतपणी आपल्या आईला भेटू शकणार नाही. त्याची आई त्याला भेटेल पण तेव्हा तो अमेरिकेच्या राष्टध्वजात लपेटलेला असेल’

आई – मुलाची अखेर गाठ  पडणार आहे पण ती अशी !

४ जानेवारी १९७१

‘व्हिएटनाम च्या युद्ध आघाडी वर लढताना फर्स्ट लुटेनंट मायकेल जॉर्ज स्मिथ यांना वीर गती प्राप्त झाली ‘

अशी बातमी  येऊन धडकली !

शुभं भवतु

 

 


About सुहास गोखले

मी सुहास गोखले या वेब-साईटचा निर्माता. आपल्याला ज्योतिष विषयक मार्गदर्शन हवे असल्यास किंवा आपली एखादी सुचना / तक्रार असेल तर खाली दिलेल्या 'संपर्क फॉर्म' मध्ये माहीती भरुन पाठवल्यास मी ताबडतोब आपल्याशी संपर्क साधेन.
+2

सुहास गोखले administrator

मी सुहास गोखले या वेब-साईटचा निर्माता. आपल्याला ज्योतिष विषयक मार्गदर्शन हवे असल्यास किंवा आपली एखादी सुचना / तक्रार असेल तर खाली दिलेल्या 'संपर्क फॉर्म' मध्ये माहीती भरुन पाठवल्यास मी ताबडतोब आपल्याशी संपर्क साधेन.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.