सौ पद्मा , वय ७१, सुमारे ३६ वर्षे एका राष्ट्रीयकृत बँकेत अधिकारी म्हणून काम करुन सन्मानाने सेवानिवृ्त्त झाल्या आता आपल्या घरी आपल्या मुला- नातवंडां समवेत अतिशय आनंदी आयुष्य जगत होत्या.
त्या नोकरीत असतानाच मधुमेहाने त्यांच्या शरीरात प्रवेश केला होता पण ‘जस्ट , सुरवात आहे , फारसे गंभीर नाही , चहात थोडी साखर कमी टाकली की झाले “ असा गोड गैरसमज करून घेऊन त्यांनी चक्क या मधुमेहाला नाकारलेच म्हणा.
पुढची काही वर्षे सारे काही सामसुम होते , पद्माजी आपला मधुमेह केव्हाच विसरुन गेल्या होत्या , साहजीकच आहे म्हणा, हा मधुमेह आजारच असा आहे की त्याची ना ठोस अशी लक्षणें नसतात आणि तो झाला की लगेच त्याचा कोणता त्रास होत असतो.असे ही नाही ! काहीच कळत नाही, काहीच जाणवत नाही , पेशंट छान व्यवस्थित मजेत जगत असतो आणि आतून मधुमेहाने आपले काम जोरदारपणे चालू ठेवलेले असते , एकेक अवयव (कोणता अवयव वगळायचा, सगळ्याच अवयवांना गवसणी घालणार आजार हा !)
काहीच होत नाही, काहीच जाणवत नाही त्यामुळे आपल्याला मधुमेह झाला आहे हे कळताच सुरवातीला घाबरलेला , बावचळलेला पेशंट याच मुळे तर गाफील राहतो, अशी काही वर्षे निघून जातात. सुरवातीला डॉक्टरांनी सांगीतलेले आहार- विहाराचे , औषधांचे , तपासण्यांचे तंत्र सांभाळणारा पेशंट हलूहलू शिथील होतो, एकेक करत सगळे बासनात गुंडालुन ठेवले जाते. ‘कसला मधुमेह कसले काय ?” असली बेफिकीरी निर्माण होते.
आणि मग मधुमेह अशा बेसावध क्षणी आपली खेळी खेळतो.
पद्माजींच्या बाबतीत असेच झाले. एके दिवशी सकाळी घरातल्या अंगणात झाडांना पाणी घालताना त्यांच्या तळपायाला काही तरी बोचले , दगडाची अणकुचीदार धार, ताईंनी पायात घुसलेला तो लहानस टोकदार खडा उपसून फेकून दिला आणि काही झालेच नाही अशा थाटात त्यांचा नित्यक्रम सुरु ठेवला. पण प्रकरण एव्हढ्यावरच थांबते तर मधुमेह कसला ?
मधुमेहाने तळपायच्या संवेदना बर्याच कमी होतात त्यामुळे असे काही दुखले खुपलेले जाणवत सुद्धा नाही हा एक भाग आणि तसेही आपले सगळेच आपल्या पायां कडे खास करून तळपायां कडे फारसे लक्ष देत नाहीच. आपण आपल्या चेहेर्या कडे , केसां कडे जितके लक्ष देतो त्याच्या एक शतांंश लक्ष सुद्धा आपल्या तळपाया कडे देत नाही, फारच काही दुखायला लागले तर काही लक्ष देणार आणि दिले तरी “किरकोळ आहे , होईल बरे , याला कसले औषध ‘ असे समजून आपण चक्क त्याकडे दुर्लक्ष करतो , पद्माजींनी नेमके हेच केले,
आपल्या तळपायाला झालेल्या या छोट्याश्या जखमेची त्यांनी दखल सुद्धा घेतली नाही पण पायाला झालेल्या या छोट्याश्या जखमेने काही दिवसातच मोठे स्वरूप धारण केले , जखमेच्या जागी आता फुगवटा निर्माण झाला , तो वाढला आणि काळा निळा पडायला सुरवात झाली आणि मग पद्माजींना जाग आली त्या डॉक्टरां कडे धावल्या खर्या पण तो पर्यंत फार फार उशीर झाला होता. पायाला झालेल्या या जखमेत ‘गॅगरीन’ झाले होते आणि त्याला उपचार नाहीत. हे बिष सगळे अंगभर पसरु न देणे इतकेच काय ते करता येते आणि ते करायचे म्हणजे ज्या भागात गॅगरीन झाले आहे तो भाग चक्क कापून टाकायला लागतो. पद्माजींच्या बाबतीत हेच झाले , त्यांना त्यांचे पाऊल गमवावे लागले, शस्त्रक्रिया करुन त्यांचे एकेकाळचे नाजूक , कोमल चरकमल कापून टाकावे लागले. आज एक अपंग म्हणून पद्माजी घरातल्या घरात कशाबशा हिंडतात. आपल्याला मधुमेह आहे हे आता त्यांना मान्य आहे !
मधुमेह आणि पाय कापावा लागणे हे दारूण आणि क्रुर सत्य आहे , वास्तव आहे, आणि सुमारे 30 ते 40 % मधुमेह्यांच्या वाट्याला हे दु:ख येते असा अंदाज आहे ! जगभरात दर 8 सेकंदाला एका मधुमेही व्यक्तीचा पाय शस्त्रक्रिया करुन कापावा लागतो इतके हे भिषण वास्तव आहे. भारतात दरवर्षी सुमारे दोन लाख (आणि हा आकडा लहान नाही !) मधुमेही व्यक्ती आपला पाय गमावत आहेत. एकूण मधुमेह्यांत 25% जणांच्या पायाला ‘डायबेटीक फूट अल्सर’ होतोच आणि त्यातल्या बहुतांश लोकांना आपला पाय कापून घ्यावा लागतो.
मधुमेहा मुळे बरेच अवयव क्षतीग्रस्त होतात , डोळे ( अंधत्व येणे) , हृदय (स्ट्रोक (), किडनी (डायलिसीस), मेंदू (अल्झायमर) , पाय (फूट अल्सर , गॅगरीन) आणि यात पाया संदर्भात तक्रारी असलेल्यांची (आणि पाय कापवा लागलेल्यांची ) संख्या सगळ्यात जास्त आहे!
अर्थात आज मला मधुमेह झाला , उद्या माझा पाय कापावा लागेल असे समजून घाबरायचे नाही. हे असे लगेचच होत नाही. मधुमेह तुम्हाला बराच अवधी देत असतो, त्या अवधीतच हालचाल करून मधुमेहाला नियंत्रणात आणावे लागते , साखर 90 – 110 च्या घरात आणावी लागते. ह्या कडे दुर्लक्ष केले , चालढकल केली तर मात्र मधुमेह आपला हिसका दखवतोच दाखवतोच त्याला दया , माया ,क्षमा , शांती , करूणा, वात्सल्य काहीही नाही !
दीर्घकाळ मधुमेह आणि त्यातही दीर्घकाळ रक्त शर्करेचे प्रमाण (200+) राहणार्या व्यक्तींना हा फार मोठा धोका आहे.
आणि बहुतांश मधुमेही इथेच फसतात !
लक्षणे नाहीत , त्रास नाहीत (आणि कोणा एका दिवसात मधुमेह बरा असला नुस्का वापरल्याने आलेली गाफिलता !) व्यायाम नाही , तपासण्या नाहीत , काही तरी थातुरमातुर पथ्य ( चहात अर्धा चमचा साखर कमी केली आहे ना!) असे करुन हे सगळे मधुमेही शहामृग वाळूूत डोके खुपसून निवांत बसलेले असतात.
यांना काही सांगायला गेले की हे लोकच म्हणातात ‘ ह्यॅ , त्याचे काय , रोज एक गोळी चालू आहे , ते रामदेव बाबांचे चालू आहे , काय होणार नाही , कंट्रोल मध्ये आहे सगळे आणि माझ्या आजीला वीस वर्षे मधुमेह होता तिला काही खुट्ट सुद्धा झाले नाही, उगाच काहीतरी सांगून घाबरवू नका”
पद्माजी असेच काहीतरी म्हणत होत्या ना?
******************
सोबत दिलेले चित्र अत्यंत सौम्य आहे , प्रत्यक्षातले फोटो अत्यंत भयानक आहेत , काळजाचा थरकाप करणारे आहेत, ते पहायला सिंहाचे काळीज लागेल,. माझ्या सरख्या ‘दगडी चाळ’ वाल्या माणसाला देखील ते पाहायचे धाडस नाही !
****************
- ऑन लाईन (लाईव्ह स्ट्रीमिंग) ज्योतिष क्लास - March 24, 2020
- पुण्यात क्लास सुरु ! - February 29, 2020
- Lost & Found ! - February 26, 2020
- बासरीवाला ! - February 6, 2020
- निशाणी बदला… भाग्य बदला – ३ - February 6, 2020
- निशाणी बदला… भाग्य बदला – २ - February 5, 2020
- ‘निशाणी बदला… भाग्य बदला’ - February 5, 2020
- विठ्ठला कोणता झेंडा घेऊ हाती – भाग २ - January 23, 2020
- विठ्ठला कोणता झेंडा घेऊ हाती – भाग १ - January 22, 2020
- प्रश्नकुंडलीची वेळ - January 21, 2020
Dear Suhasji,
Very sad story but I too have seen a few person’s who had amputation which was not just limited to foot but also involved some portion of leg. Diabetes as you rightly said, affects toes, fingers, eyes, kidneys and other vital organs. I don’t know if the health ministry of both central and state government is creating enough awareness among people about diabetes and its long term consequences. They also need to educate people about ignoring the ‘Ramban Upay’ as advertised by quacks. It is a good that you are discussing these complications on your blog.
Thanks and Regards,
Prashant
धन्यवाद श्री प्रशांतजी ,
मधुमेह हा असा आजार आहे की तो शरीरातली सर्व अवयव बाधित करतो , अगदी डोक्याच्या केसा पासून ते पायाच्या नखा पर्यंत . या आजराची गंमत अशी की तो झाला आहे हेच मुळात कळत नाही आणि मधुमेहाची कॉम्प्लिकेशन्स सुद्धा एकदम गंभीर पातळी वर आल्या खेरीज लक्षात येत नाही , यात अधली मधली स्टेजच नसते. बहुतेकांना हा आजार इतर कोणत्या कारणा साठी ( मोतिबिंदू , रुट कनाला वा तसम सर्जरी , विमा उतरवताना, नोकरीत जॉईन होताना ) केलेल्या तपासण्या मधून लक्षात येतो. वास्तवीक मधुमेह आहे का नाही याची बेसीक तपासणी अवघ्या 100 रुपयांत होते पण लोक तितकेही कष्ट घेत नाहीत.
मधुमेह आहे हे तपासणीत कळले तरी त्याचा कोणताच त्रास लगेच होत नसल्याने लोक पण या कडे फारसे गांभिर्याने पाहात नाहीत.
मी माझ्या स्वत:च्या अनुभवातून काही लिहीत आहे ते वाचून काही जणांना तरी सावध करता आले तरी या मेहेनतीचे फळ मिळाले असे मी समजेन. समाजा कडून आपण बरेच घेत असतो परत्फेड मात्र करत नाही, माझे लेखन हे अशीच परतफेड करायचा एक अल्पसा प्रयत्न आहे
आपल्या सारखे काही जागरुक वाचक आहेत हे मी माझे भाग्य समजतो.
शुभेच्छा
सुहास गोखले .