सध्या माझ्यापुढे एक यक्ष प्रश्न पडला आहे !

माझ्याकडे नेहमी येणारा एक जातक आहे , सध्या त्याच्या चिरंजीवांचे लग्न जमवण्याच्या खटपटीत आहे. ज्योतिषावर विश्वास असल्याने पत्रिका बघण्या बद्दल आग्रही होता  (पण आता नाही असे म्हणले पाहीजे!) आणि त्या संदर्भात वारंवार माझ्या कडे पत्रिकां जुळतात का ते तपासून बघायला यायचा.

माझे पत्रिका पाहाणे हे पंचांगातले 36 गुणवाले गुणमेलन नाही. ही 36 गुण वाली तपासणी अगदी म्हणजे अगदी टाकावू आहे  कारण या 36 गुण वाल्या गुणमेलन पद्ध्तीत प्रत्यक्षात दोन्ही पत्रिकां तपासल्या जात नाहीत फक्त वराचे आणि आणि वधूचे जन्मनक्षत्र विचारात घेतले जाते. त्यामुळे हे असे 36 वाले गुणमेलन निरर्थक आहे, ती शास्त्राच्या नावाखाली केलेली एक धूळफेक आहे , शुद्ध फसवणूक आहे . मी तर म्हणेन असे फालतू गुणमेलन  इ. करण्या पेक्षा पत्रिका बघितली नाही तरी चालेल!

मी विवाह साठी पत्रिका तपासताना:

प्रथम दोन्ही पत्रिकांचा स्वतंत्र अभ्यास करतो. त्यामध्ये प्रत्येकाचे आयुष्यमान, आरोग्याच्या समस्या, मानसिक कल (स्वभाव) , सुखसमाधानाचे प्रमाण, सांपत्तीक स्थितीचा अंदाज, सेक्स ड्राईव्ह, संतती यांचा समावेश असतो.

नंतर दुसर्‍या टप्प्यावर दोन्ही पत्रिकांमधल्या ग्रहांचे एकमेकांशी होणारे योग तपासतो,

उदा: एकाच्या पत्रिकेतला शुक्र दुसर्‍याच्या पत्रिकेतल्या शुक्र, मंगळ, रवी, शनी , हर्षल शी काय योग करतो. या प्रमाणे सर्व महत्वाच्या ग्रहांमधल्या शुभाशुभ योगांचा अंदाज घेतो.

या नंतर तिसर्‍या टप्प्यावर या दोन्ही पत्रिकांच्या अनुषंगाने खालील बाबी अनुकूल आहेत का ते तपासतो:

दोघांना आयुष्यमान किती आहे ? किमान 30 वर्षाचे तरी संसारसुख लाभावे हा विचार.
हा विवाह झाला तर उभयतांना संतती होईल का , त्यात काही समस्या तर निर्माण होणार नाहीत ना?
दोहोंचे स्वभाव जुळू शकतील का ? मनोमिलन राहील का? मानसीक आजारांची शक्यता आहे का?
काही व्यावहारीक तडजोडीं कराव्या लागल्या (तशा त्या प्रत्येक वैवाहीक जीवनात कराव्या लागताच म्हणा!) तर त्या कोणत्या प्रकारातल्या असू शकतील ?
आरोग्याच्या समस्येने संसार उद्ध्वस्त तर होणार नाही ना?
दोन्ही पत्रिकेतल्या आगामी महादशांचा विचार करुन विवाहोत्तर सांपत्तीक स्थिती कशी राहील?
इतर काहि अशुभ योग आहेत का? (विवाह बाह्य संबंध, व्यसनें, फसवणूक)

(36 गुण वाल्या गुणमेलनात यातले काहीही तपासले जात नाही !)

अर्थातच हे सर्व करायला बराच वेळ लागतो, मोठी मेहेनत आहे ही आणि ओघानेच खर्च ही जास्त येणार (!) पण मी माझ्या या जातकासाठी हे सर्व विनामूल्य करत आलो होतो.

पण झाले असे की, बर्‍याच वेळा या जातकाने आणलेल्या पत्रिका जमत नाहीत असे सांगावे लागले, मुलाचे लग्न लौकर ठरावे (ह्या जातकाला या बाबतीत तशी थोडी हास्यास्पद, अविचारी घाईच झाली होती.. पण तो वेगळा विषय आहे..) असे जातकाला वाटणे स्वाभावीक आहे पण त्यात ह्या पत्रिका पटत नाहीत हा एक मोठा अडसर होऊन राहीला आहे असा काहीसा गैरसमज जातकाचा झाला असेल असे वाटते, कारण एका अगदी अलीकडे आणलेल्या पत्रिकेच्या बाबतीत या जातकाने  “फार खोलात जाऊ नका वरवर बघून सांगा” असा आग्रह धरला होता, म्हणजे थोडक्यात “काहीही करा पण आता या वेळी आणलेली पत्रिका पटते आहे असे सांगा”.

पण हे असे करणे मला कसे शक्य होईल? अर्थातच मी त्याला नकार दिला, पत्रिका बघितली तर शास्त्रशुद्ध पद्धतीनेच बघणार, पत्रिका जे सांगेल ते बोलणार, कोणत्याही प्रकारे शास्त्राशी प्रतारणा करणार नाही, असे माझे मत ठाम होते. जातक काहीसा नाराज, निराश झाला असे तेव्हाच्या त्याच्या बोलण्यावरुन आणि त्याने फोन ज्या तर्‍हेने  ‘कट’ (आदळला) केला या वरुन लक्षात आले. पण मी तरी काय करणार, कोणा एकाचे लग्न जमावे ह्यासाठी शास्त्र नियम मोडायचे का ? एक व्यावसायिक म्हणून शास्त्राशी प्रामाणिक राहण्याच्या माझ्या भूमिकेशी मी ठाम होतो ,आहे आणि राहीन !

असाच काही काळ गेला, मला वाटते दोन एक महिने झाले असतील, हा जातक त्या काळात काही फिरकला नाही, ना फोन, ना इमेल. आणि एक दिवशी एकदम अचानक जातक बातमी सांगत आला की त्याच्या मुलाचे लग्न ठरले, अर्थात माझ्या साठी ही एक आनंदाचीच बातमी होती, मी जातकाचे व त्याच्या चिरंजीवाचे अभिनंदन करत सहजच त्याच्या भावी सुनबाई बद्दल विचारले. त्याने ही बर्‍याच कौतुकाने भरभरुन सांगीतले, साहजीकच आहे म्हणा, मुलाचे लग्न ठरल्याच्या आनंद त्याच्या चेहेर्‍यावरुन अगदी ओसंडुन वाहात होता. जातकाने आपणहुनच सांगीतले, “ पत्रिका अगदी वरवर बघितली  झाले , 20-22 गुण जुळताहेत, मुलाला मुलगी पसंत आहे, मुलीला मुलगा ! नोकरी, घरदार , कौटुंबिक स्थिती अगदी चांगली, मग काय , ठरवून टाकले लग्न! “

“चांगलेच झाले की” , माझे ह्याला काय ऑबजेक्शन असणार म्हणा, पत्रिका बघायची का नाही हा झाला पूर्णपणे जातकाचा वैयक्तीक मामला, त्याची सक्ती थोडीच करता येणार आहे. शेवटी म्हणतात ना  “ लग्नाच्या गाठी स्वर्गातच बांधलेल्या असतात !”

मात्र त्या मुलीचे नाव ऐकताच मला चटकन आठवले की ह्याच नावाची एक पत्रिका माझ्या संग्रहात आहे. अगदी गेल्याच महिन्यात दुसरे एक जातक त्यांच्या मुलासाठी याच नावाच्या मुलीची पत्रिका घेऊन आले होते,  नुकतीच त्या पत्रिकेची डेटा एंट्री केलेली असल्याने , नाव व ईतर गोष्टी लक्षात होत्या, तरीही खात्री करुन घेण्यासाठी मी माझ्या डेटाबेस मध्ये असलेली ती पत्रिका बघितली, हो , ती त्याच मुलीची होती जिच्याशी या माझ्या जातकाच्या मुलाचा विवाह ठरला आहे.

त्या मुलीची पत्रिका बघताच मी दचकलो, ते अशा साठी की विवाहाच्या दृष्टीने अनेक अशुभ योगानीं भरलेली अशी ती पत्रिका एकदम निकृष्ठ दर्जाची आहे, मी डेटाबेस मध्ये ती पत्रिका ‘प्रतिकूल विवाहाची शक्यता’ असा टॅग लावूनच साठवली होती. आता अशी पत्रिका असलेल्या मुलीशी विवाह संबंध जोडणे इष्ट नाही असे माझे मत.  पत्रिका इतकी अशुभ आहे की लगेच फोन करुन जातकाला ला सावध करावे असे मला प्रकर्षाने वाटले. पण दुसर्‍याच  क्षणी मला जातकाचे मागच्या दोन प्रसंगातले बोलणे आठवले. जातक माझा हा सल्ला कितपत खिलाडू वृत्तीने व गांभिर्याने घेईल अशी मोठी शंका मनात आली. तेव्हा बोलताना , जातक (कारण नसताना!) इतका अगतीक झालेला दिसला कि त्याचा रोख आता , बस्स झाले, आता पत्रिका वगैरे काही बघायची नाही किंवा बघितलीच तर शॉर्ट्कट मारायचा असा दिसला होता. किंवा असेही असेल की त्याला आता माझ्या ज्योतिष विषयक कॅपॅबिलिटीज बद्दल संदेह आला असेल म्हणून या वेळेला त्याने दुसर्‍या एखाद्या ज्योतिष्याकडून पत्रिका तपासून घेतली असेल! (डिसक्लेमर: दुसर्‍या ज्योतीषाकडे जाणे हा जातकाचा स्वयंनिर्णयाचा हक्क आहे, तो त्याने वापरला तर त्यात वावगे काहीच नाही, त्याचा मला राग नाही, व्यवसाय  म्हणले की अशा गोष्टी होत राहणार), ते काहीही असो, मी अस्वस्थ मात्र जरुर झालेलो आहे.

जातकाला सावध केले तर काय होईल, जातकाच्या प्रतिक्रिया साधारण अशा असू शकतील:

1. आम्ही शब्द दिलाय, आता माघार नाही, जे काय व्हायचे ते होऊ दे.

2. आम्ही पत्रिका बघायच्या नाहीत असे ठरवल्यामुळे आता पुन्हा हा विषय नको, आम्ही आता त्या वाटेला फिरकणार सुद्धा नाही.

3. आम्ही दुसर्‍या गुरुजींना पत्रिकां दाखवल्या आहेत, त्यांनी 22 गुण जमतात असे सांगीतले आहे , मग प्रश्नच मिटला, आम्हाला जास्त खोलात जायचेच नाही.
4. बघा , मुलाचे लग्न ठरल्याची बातमी काय दिली , हे निघाले मोडता घालायला, चांगले बघवतच नाही लोकांना,  ह्यांना पत्रिका तपासल्या दिल्या नाहीत ना म्हणून नाराज झालेले दिसतात त्यातूनच हे असले सुचले असणार !

अशी हिंट दिल्यानंतर ही जातक ती ऐकेलच असे नाही, ती धुडकावून तो त्याच्या मुलाचे लग्न त्याच मुलीशी लावेल (हि शक्यता जास्त) पण अशी हिंट देऊन मी जातकाच्या मनात एक वळवळणारा किडा सोडतोय असे तर नाही? हा संशयाचा किडा त्याला पोखरत राहील , जरा कुठे खुट्ट झाले की त्याला माझे शब्द आठवत राहतील त्याचा आनंद नष्ट होईल. पुढची काही वर्षे तो भितीच्या , संशयाच्या टांगत्या तलवारी खाली राहील…. त्याचे काय?

आणि आता जातकाला अशी ‘हिंट’ नाही दिली तर, काय होईल? :

1. हा विवाह होइल, जरी माझ्या अंदाजानुसार हे विवाह-बंधन प्रतिकूल असे असले तरी माझे भविष्य चूकू शकते (निदान यावेळी तरी ते चुकावे!)  , कदाचित मला पत्रिकेत जे काही दिसले त्या प्रमाणे काही होणारही नाही, चांगला सुखाचा संसार करतील दोघे. त्यांचा संसार सुखाचा व्हावा अशीच माझी ईश्वरचरणी प्रार्थना असेल.

2. पण दुर्दैवाने , मला जी भिती वाटते आहे त्याप्रमाणे घडले तर? तर मात्र मला फार टोचणी लागून राहील, सतत खंत वाटत राहील. मी माहीती असून गप्प बसलो, निदान मी  जातकाला वेळीच पूर्वसूचना द्यायला हवी होती,  कदाचित जातकाने सावध होऊन , सेकंड ओपीनियन म्हणून पत्रिका दुसर्‍या एखाद्या जाणकारा कडून  सखोल तपासून घेऊन,  मगच काय तो साधकबाधक निर्णय घेतला असता तर संभाव्य धोका टळला ही असता , ही दुर्दैवी वेळ आली नसती.

हे सर्व नुकतेच घडले असल्याने, माझ्या मते अजूनही वेळ गेलेली नाही, जातकाच्या सांगण्यानुसार , नुसतीच बोलणीं तर झाली आहेत, साखरपुडा अजून व्हायचाय. आता जर जातकाने ठरवले तर अजूनही नकार देऊन माघार घेता येण्यासारखी परिस्थिती आहे.

पण मला मात्र यक्ष प्रश्न पडला आहे काय करावे?

आपल्यापैकी कोणाला काही सुचवायचे असल्यास कृपया ‘संपर्क फॉर्म’ च्या माध्यमातून मला आपले मत जरुर कळवा.

जर जातकाला हे सांगून सावध करावे असे बहुमताने ठरले तर मग जातकाची प्रतिक्रिया काय असेल, याच विचार न करता मी जातकाला सावध करेन.

पण जर आपल्यापैकी बर्‍याच जणांना असे वाटले कि “आता या प्रकारणात काही करता येणार नाही, जातकाचा  पत्रिकेवर किंवा सुहास गोखले यांच्या ज्योतिषावर  विश्वास नाही म्हणा  किंवा आता त्याला फार खोलात जायचे नसेल,  काहीही असेल , जातकाने निर्णय घेतला आहे, मुली कडच्यांना शब्द दिला असेल , आता आपण काय करणार? तेव्हा या परिस्थतीत मौन बाळगणे योग्य, अज्ञानात सुख ! जे व्हायचे ते होईल, तो आणि त्याचे नशिब!”

तर मग……… “ मैं चूप रहूंगा !.”

शुभं भवतु


About सुहास गोखले

मी सुहास गोखले या वेब-साईटचा निर्माता. आपल्याला ज्योतिष विषयक मार्गदर्शन हवे असल्यास किंवा आपली एखादी सुचना / तक्रार असेल तर खाली दिलेल्या 'संपर्क फॉर्म' मध्ये माहीती भरुन पाठवल्यास मी ताबडतोब आपल्याशी संपर्क साधेन.
+1

सुहास गोखले administrator

मी सुहास गोखले या वेब-साईटचा निर्माता. आपल्याला ज्योतिष विषयक मार्गदर्शन हवे असल्यास किंवा आपली एखादी सुचना / तक्रार असेल तर खाली दिलेल्या 'संपर्क फॉर्म' मध्ये माहीती भरुन पाठवल्यास मी ताबडतोब आपल्याशी संपर्क साधेन.

6 प्रतिक्रिया

///////////////
 1. Joshi / CMT Pune

  Dear Suhas Ji ,

  Many times our Life we come to a situation where it becomes difficult to take any decision , whether positive or negative .

  However I personally feel that , not everyone is blessed with the Power and knowledge of Astrology .

  God / the Super Power that we all believe has assigned you a work to guide people who need your help in giving them Correct advice

  For their Future opportunities / problems .

  I also believe that , very rarely we get opportunity to stand by our Basic Values and Ethics .

  Today you have one such opportunity . Pls. do sound your friend on facts .

  Let them take a decision in advance and avoid future problems .

  Once you inform them , you are relieved from your moral responsibility .

  Trust above matches with your views .

  All the best .

  Niranjan Joshi .

  0
 2. Hitachintak

  I would suggest to look their Patrikas again in detail. Are the predictions you have made for them from their horoscope were correct? If yes, in that case, the horoscope is accurate without errors. Informing/not informing without very much surity will be a gamble.
  After confirming this, if you are very much sure about your prediction then inform them directly or indirectly by any means. This way you are doing your job. Remember, Krishna told Arjuna to take part in the battle against their relatives!! The point is to do their job or Dharma without a question of outcome and I feel it is your Dharma to inform them for their benefit.
  The rest will happen as per the choice of God!

  May god help all..!!

  0
 3. Prashant

  Dear Suhasji,
  You have listed 4 possibilities in which your ‘jatak’ will react. The first three imply that he may just choose to ignore your advice and go his own way which he is anyway doing now. The fourth may strain your relation with him which you should not be worried since you are doing your duties in his best interests and you have nothing to gain or lose out of it. Moreover since you have not been charging any fees from this gentleman.

  I would suggest not to hesitate to spell out your opinion even though this may violate your professional ethics as your are voicing your concerns in his best interests especially if this is a ‘kuyog’ which could be avoided.

  This way you will at least feel gratified that you have done your duties and will not keep pricking your mind. The rest is up to almighty.

  Thanks for sharing your worries with us.
  Kalave lob asava.
  Aapla,

  Prashant

  0
 4. Lalita Jayant Chiplunkar

  Hello Sir
  Regarding to your case, I want to tell my opinion.
  First of all. that jatak seems to avoid any opposit opinion and hesitating for marriage.
  Secondly, if such sad event is to happen in the life of that boy, then we can not stop this. It should happen. And if the horoscope of that boy is good about seventh house, then this marriage will not happen. Life of that boy will be saved from such bad event. We have studied that two persons get married, when there life events match each other.
  Thirdly, our prediction will be wrong. Because, even though there may be accuracy of prediction upto 95%, that horoscope will come under remaining 5%.
  One more point should be noted that if that girl’s devine power or “purvasukrut” is very good, then her seventh house will become safe. Then not ot worry about this.
  So, I think, it will be wise decision not to tell anything about this to that parent, & to see whatever will happen.

  0
 5. आशुतोष बापट

  मला वाटतं तुम्ही हा प्रश्न प्रश्नकुंडलीच्या सहाय्याने सोडवावा. प्रश्नकुंडलीत तृतीयाचा उप. १, ३, ११ या भावांपैकी एकाचा कारक असेल तर तुम्ही तुमच्या मित्राला सल्ला देण्याचे धाडस कराल. लाभाचा उप. १०, ६, ४ या भावांपैकी कोणाचा कारक असेल तर तुमच्या मैत्रीत वितुष्ट येईल, तो उप. मंगळ, राहु असेल तर भांडणे गैरसमज होतील, इतर ग्रह असेल तर त्या त्या ग्रहाप्रमाणे वितुष्ट येईल. नवमस्थानचा उप. तुमच्या मित्राची प्रतिक्रिया दाखवेल, तो ३, १, ११ यांपैकी कोणाचा कारक असेल तर तुमचे म्हणणे तो मान्य करेल.

  0
  1. सुहास गोखले

   धन्यवाद आशुतोषजी, आपला के.पी. चा चांगला अभ्यास आहे असे दिसते. पण प्रश्नकुंडलीचे अ‍ॅनॅलायसिस करताना ‘सबजेक्टीव्ह’ राहून चालत नाही, उत्तरें चुकतात. या साठीच स्वत:चाच प्रश्नासाठी मी प्रश्नकुंडली मांडत नाही. एखादा सर्जन सुद्धा आपल्याच जवळच्या नातेवाइकावर शस्त्रक्रिया स्वत: न करता दुसर्‍या सर्जन कडून करवून घेतो किंवा एखाद्या न्यायाधिशाचे स्वत:चे नातेवाईक . मित्र , परिचयाचे लोक ज्या केस मध्ये गुंतलेले असतात त्याच केस ची सुनावणी तो न्यायाधिश करत नाही (करता येत नाही) , हे काहीसे तसेच आहे. स्वत:च्याच (ह्या असल्या प्रकारच्या) समस्यांवर ऑबजेक्टीव्ह पद्द्ध्तीने विचार करण्याची क्षमता काहीशी कमकुवत झालेली असते.

   बाकी आपली सुचना , विचार अत्यंत स्वाहतार्ह आहेत यात शंकाच नाही. आपला अभिप्राय वाचून मला फार स्माधान वाट्ले.

   पुन्हा एकदा धन्यवाद

   सुहास

   0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.