माझ्या मागच्या ‘यक्षप्रश्न’ या पोष्ट्ला आपण सार्‍यांनी जो उदंड प्रतिसाद दिलात त्याबद्दल मी आपला अत्यंत आभारी आहे. या ब्लॉग पोष्ट च्या निमित्ताने वेगवेगळी मते , विचारसरणीं नोंदवल्या गेल्या आहेत. एकाच प्रश्नावर वाचक किती वेगवेगळ्या पद्धतीने आणि सखोल असा साधक बाधक विचार करु शकतात हे पाहून खरेच थक्क व्हायला झाले.

‘कॉमेंट्स’, ‘संपर्क फॉर्म’, ‘ईमेल’, ‘फोन’, ‘एसेमेस’, ‘फेसबुक’ अशा अनेक मार्गांनी वाचकांनी संपर्क साधला आहे, नव्हे पाऊस पाडला आहे!!!  मत नोंदवणार्‍या माझ्या सर्व वाचकांना मी व्यक्तीश: पोहोच दिल्या आहेत. काही जणांच्या बाबतीत, त्यांनी इमेल अ‍ॅड्रेस देताना टायपिंग च्या चुका केल्याने त्यांना पाठवलेल्या ईमेल्स बाऊंस झाल्या आहेत. त्यांनाही या ब्लॉग पोष्ट्च्या माध्यमातून पोहोच देत आहे.

हा विषय किती नाजूक, संवेदनशील आणि  जिव्हाळ्याचा आहे हेच यातून सिद्ध होते. हे पाहूनच ‘विवाह योग’ या एकाच विषयावर एक आगळावेगळा ग्रंथ लिहायचा संकल्प मी सोडला आहे, त्या साठी मला आपल्या सर्वांचे आशीर्वाद हवे आहेत.

विवाहा साठी पत्रिका तपासताना दोघांच्याही जन्मवेळां जास्तीत जास्त अचूक असणे गरजेचे असते. काही वेळा असे आढळले आहे की जन्मपत्रिका चांगली व्हावी म्हणून जन्मवेळ बदलवलेली असते उदा: मंगळाची पत्रिका  बिनमंगळाची करणे असे प्रकार होतात, त्यात मुलींच्या पत्रिकांच्या बाबतीत हे प्रमाण जास्त सापडते. माझ्या कडे अशी जन्मवेळ बदलून पत्रिका जरा ठाकठीक (?) करुन द्याल का? अशा निर्लज्ज विचारणां अधून मधून होत असतात, अर्थातच या अशा गलिच्छ विचारणां मी धूडकावतो हे वेगळे सांगायला नको.

काही वेळा जन्मवेळेतला अवघा 5-10 मिनिटांचा फरक संपूर्ण पत्रिका बदलवू शकतो. खासकरुन जेव्हा जन्मलग्न 25 ते 5 अशांवर असेल तेव्हा ही शक्यता जास्त असते, अशा बाबतीत जरा जास्त काळजीपूर्वक  तपासणी करावी लागते , पत्रिका ज्या व्यक्तीची आहे तीचे वर्णन उदा: चेहेरेपट्टी,शिक्षण, नोकरीचे क्षेत्र, आजारपणें / अपघात / शस्त्रक्रिया, परदेश गमन, स्थलांतर, कुटुंबात झालेले जवळच्या नातेवाईकांचे मृत्यू (आजी, आजोबा, काका,आत्या, मामा ) आई-वडिल व भावंडांबद्दलची माहिती उपलब्ध झाल्यास जन्मलग्नाची खात्री करुन घेता येते. जातकाच्या बाबतीत अनेक प्रश्न विचारुन जन्मवेळेच्या खुलासा करुन घेता येणे सहज शक्य असते पण दुसर्‍या पार्टीच्या बाबतित अशी सर्व माहीती उपलब्ध नसते आणि प्रश्न विचारुन माहीती मिळवण्यासाठी त्या दुसर्‍या पार्टीकडून  सहकार्य मिळेलच असे नाही. लोक भलत्या सलत्या शंका घेतात. शेवटी कोठेतरी आपल्याला लोकांच्या प्रामाणिकपणा वर विश्वास ठेवणे भागच पडते.

असे जरी असले तरी म्हणजे जन्मवेळेत काही मिनिटांची चूक – अनावधानाने झालेली / हेतुत: केलेली असली तरी महत्वाचे ग्रहयोग बदलत नाहीत.

पत्रिका चांगल्या जुळणे म्हणजे ‘उत्तम वैवाहिक जीवनाची’ हमी असे ही नाही. काही गोष्टी अ‍जूनही आपल्या आकलना च्या बाहेरच्या आहेत , विज्ञान असो वा ज्योतिष या अशा गोष्टीं बाबत आपण अजूनही अंधारातच आहोत. मात्र जर दुर्दैवाने प्रतिकूल असे काही अटळच असेल तर पत्रिका चांगल्या जुळणार्‍यांच्या बाबतीत त्याचा परिणाम तुलनात्मकरित्या खुपच सौम्य असलेला दिसेल, ‘दगड पेक्षा वीट मऊ’ असे म्हणता येईल.

पत्रिका जुळणे म्हणजे विवाह यशस्वी होण्यासाठी अनुकूल पार्श्वभूमी आहे असा अर्थ घ्यायचा , त्या अनुकूलतेचा लाभ  करुन घेणे हे केवळ त्या उभयतांच्या सामंजस्यावरच बरेचसे अवलंबून असते.  उत्तम पीकपाण्या साठी, चांगली कसदार जमीन, उत्तम  दर्जाचे बियाणे, पाणीपुरवठा, खते, मशागत , अनुकूल हवामान एव्हडेच नव्हे तर तयार पीकाची कापणी, मळणी , सफाई करण्यासाठी चांगले मजूर वेळेवर भेटणे, मालची साठवणूक व्यवस्थित होणे, मालाची मार्केट पर्यंतची वाहतुक करण्यासाठी जलद व भरवशाची वाहतुक व्यवस्था वेळेत उपलब्ध होणे, माल बाजारात आणायची वेळ अचूक साधता येणे , चांगला भाव मिळणे व त्या कामासाठी भरवशाचा अडत्या भेटणे , या सार्‍या सार्‍यांची जरुरी असतेच असते. यातला एखादा जरी घटक कमी पडला तरी येणार्‍या पिकात कमतरता राहू शकते किंवा त्या पिकातून अपेक्षे एव्हढे उत्पन्न मिळणार नाही.

सुखी वैवाहिक जीवनासाठीही अनेक बाबीं एकाचवेळी अनुकूल असाव्या लागतात , पत्रिका बघताना , आपण त्यातले काही घटक जे दैवाधीन असता‌त, ते अनुकूल आहेत का नाही याची खातरजमा करुन घेत असतो, बाकीचे घटक जे बरेचसे प्रयत्नाधीन असतात, त्याबाबतीत उभयतांच्यातले सामंजस्य जास्त जबाबदार असते. विवाह निर्णय ही एक मोठी प्रक्रिया आहे,  पत्रिका तपासून घेणे हा त्या मोठया निर्णय प्रक्रियेचा केवळ एक हिस्सा आहे.

आयुष्यातल्या हा अत्यंत महत्वाचा आणि जोख़मीचा निर्णय घेताना जेव्हढी म्हणून ईनपूट्स , डेटा , माहीती मिळेल त्या सर्व मार्गांनी गोळा करुन मगच काय तो  साधक बाधक निर्णय घ्यायला हवा असे मला वाटते. पत्रिका तपासणे हे एक त्याच प्रकारचे ‘इनपुट’ आहे, पण महत्वाचे आहे.

या बाबतीत आपल्याला काही शंका असल्यास वा मार्गदर्शन ह्वे असल्यास संपर्क साधा , संपर्क फॉर्म भरताना आपला ईमेल अ‍ॅड्रेस अचूक भरावा हि विनंती.

शुभं भवतु


About सुहास गोखले

मी सुहास गोखले या वेब-साईटचा निर्माता. आपल्याला ज्योतिष विषयक मार्गदर्शन हवे असल्यास किंवा आपली एखादी सुचना / तक्रार असेल तर खाली दिलेल्या 'संपर्क फॉर्म' मध्ये माहीती भरुन पाठवल्यास मी ताबडतोब आपल्याशी संपर्क साधेन.
+1

सुहास गोखले administrator

मी सुहास गोखले या वेब-साईटचा निर्माता. आपल्याला ज्योतिष विषयक मार्गदर्शन हवे असल्यास किंवा आपली एखादी सुचना / तक्रार असेल तर खाली दिलेल्या 'संपर्क फॉर्म' मध्ये माहीती भरुन पाठवल्यास मी ताबडतोब आपल्याशी संपर्क साधेन.

2 प्रतिक्रिया

///////////////
 1. swapnil kodolikar

  सर कर्केचा गुरु फसवा असतो म्हणतात ते खरे आहे का ? तो वाईट फळे देतो असे म्हणतात .

  0
  1. सुहास गोखले

   स्वप्नीलजी,
   धन्यवाद.

   वेळे अभावी मी अशा प्रश्नांची उत्तरें देऊ शकत नाही क्षमस्व.

   शुभेच्छा.
   सुहास

   0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.