फुकट मिळाले …….कचर्‍यात गेले

गोष्ट तशी फार जुनी नाही, दोन वर्षापूर्वीचीच. त्या वेळी मी एक मोठ्या प्रतिष्ठित ज्योतिष (चर्चा) फोरम मध्ये सक्रिय होतो.

तेव्हा मी ज्योतिष विषयक मोफत सल्ला देत असे. असे करताना माझे दोन हेतु होते, आपल्या ज्ञानाची चाचणी घेणे, आपला अभ्यास योग्य दिशेने चालू आहे का याची खातरजमा करुन घेणे आणि त्याच बरोबर कोणा संकटातल्या, अडचणीतल्यांना थोडीफार मदत करुन दिलासा देणे.

पण लौकरच माझा भ्रमनिरास झाला!

हे मोफत सल्ला मागणारे (आता यांना फुकटेच म्हणायला पाहिजे) संकटात, अडचणीत असतीलही पण गरीब बिचारे , अडलेले नाडलेले मात्र असतीलच असे नाही. ज्यांना इंटरनेट परवडते आणि इंटरनेट वरच्या प्रत्येक फोरम वर  प्रश्न विचारत फुकटात मिळालेली उत्तरे गोळा करत फिरणे  हाच ज्यांचा उद्योग असतो त्यांना गरीब कसे म्हणायचे?

बरे हे फुकटे, एकदा मोफत भविष्य पदरात पडले रे पडले की अदृश्य होतात, मी वर्तवलेल्या भविष्याचे पुढे काय झाले ते मला कधी कळतच नाही, मग माझा अभ्यास बरोबर चालू आहे का हे कळायला ही काही मार्ग नाही,म्हणजे माझा दुसराही उद्देश्य असफल होतो.

असाच एका ‘फुकट्याचा’ किस्सा आपल्या समोर मांडतो.

या फुकट्या महाशयांनी प्रश्न विचारला…

Tue Apr 10, 2012 4:06 pm
… please read my chart and tell me is it the right time to move away from my native place and would i be able to get a job in next 2-3 months.

Thanks!

योगायोगाने त्याने ही पोष्ट केली त्या वेळी मी ऑनलाईनच होतो , मी (भोळसट पणाने) प्रामाणिक पणे त्याची कुंडली तयार केली, अर्धा तास अभ्यास केला , फक्त माझ्या नेहमीच्या पद्धती प्रमाणे जन्मवेळेची खातरजमा मात्र करत बसलो नाही .माझे उत्तर असे होते:

Tue Apr 10, 2012 6:20 pm
Assuming your birth time is reasonably accurate.

1> Chances of you getting a job are rather thin (almost nil) till July end 2012.
2> Between Aug 2012 to Nov 2012 some sundry job opportunities are there , job may not be of your liking.
3> Real break through will come in the last week Jan 2013 (24 Jan 2013 to 31 Jan 2013), this will put smile on your face.
4> Relocation, of course is needed.

महाशयांनी लगोलग आभार मानले जरुर:

Wed Apr 11, 2012 2:23 pm
Dear suhasg,

Thanks a lot for the analysis. I will definitely keep you posted on the developments.

Regards

मी ही गोष्ट विसरुन सुद्धा गेलो , मात्र या केस ची नोंद माझ्या डाटाबेस मध्ये होती, पुढे या महशयांनी त्याच फोरम वर दुसराच एक थ्रेड सुरु करुन पुन्हा एकदा फुकट सल्ल्याची भिक मागणे चालू केले

(इथून च्या पुढ्च्या सार्‍या पोष्ट या महाशयांनी दुसर्‍या थ्रेड वर केल्या आहेत,ज्या थ्रेड वर मी उत्तर दिले होते तो थ्रेड या महाशयांनी केव्हाच सोडून दिला होता)

Wed Aug 01, 2012 1:26 pm
I almost got the job last month. Damn…I missed it!!! Everything was going well, they liked my work and asked me to take a online test. ……… After two days  I  received an email saying you have not been selected for final rounds of interview. I just still can’t believe it.

बघा माझे एप्रिल 10 चे भविष्य “Chances of you getting a job are rather thin (almost nil) till July end 2012. ,,” बरोबर आले होते.कारण ऑगष्टच्या 1 तारखे पर्यंत हा बिनानोकरीचा होताच.  पण महाशयांना तसा फिडबॅक मला द्यावासा वाटला नाही.

असेच चार महिने गेले, महाशय परत अवतिर्ण झाले .. हे सांगायला..

Wed Dec 05, 2012 5:27 pm
Hi,

I am struggling to get a job since last 7 months. Luckily, i got a freelance project (foreign assignment) in september last week. …… Since then no luck in freelance projects or full time jobs.I am in creative field and slowly loosing interest in it. i am very confused about my career. would appreciate if someone can analyze my chart and advice.

बघा माझे एप्रिल 10 चे भविष्य “Chances of you getting a job are rather thin (almost nil) till July end 2012  ……Between Aug 2012 to Nov 2012 some sundry job opportunities are there , job may not be of your liking  job may not be of your liking.”  बरोबर आले होते. पण महाशयांना तसा फिडबॅक मला द्यावासा वाटला नाही.

असेच दोन अ‍डीच महिने गेले, महाशय परत अवतिर्ण झाले .. हे सांगायला..

Thu Feb 14, 2013 10:19 pm
….. My foreign client offered me a job and I have started working as a freelance artist. Also I’m getting work from other foreign sources. I received a job offer in Delhi, but the salary was peanuts….so i turned down the offer. A lot of things have happened this last month..Looks like my lagna lord mercury is helping me out ….!

बघा माझे एप्रिल 10 चे भविष्य “ Real break through will come in the last week Jan 2013 (24 Jan 2013 to 31 Jan 2013), this will put smile on your face.” बरोबर आले होते. पण महाशयांना तसा फिडबॅक मला द्यावासा वाटला नाही.

असाच एक महिना गेला, महाशय परत अवतिर्ण झाले .. हे सांगायला..

Fri Mar 22, 2013 6:09 pm

Today i have signed the appointment letter. And most likely i will be moving to West Africa next month. I am still pinching myself to make sure I am not in a dream..”

बघा माझे एप्रिल 10 चे भविष्य “ Real break through will come in the last week Jan 2013 (24 Jan 2013 to 31 Jan 2013), this will put smile on your face.” बरोबर आले होते. पण महाशयांना तसा फिडबॅक मला द्यावासा वाटला नाही.

असाच एक महिना गेला, महाशय परत अवतिर्ण झाले .. हे सांगायला..

Fri Apr 19, 2013 10:53 am
I have received my visa today. I’ m ready to fly Africaaa i ‘m coming ..”

बघा माझे एप्रि’ल 10 चे भविष्य “ Relocation, of course is needed.”.. .बरोबर आले होते. पण महाशयांना तसा फिडबॅक मला द्यावासा वाटला नाही.

इथे एक खुलासा करतो, मी दिलेल्या तारखा साधारण महिना दिड महिन्यानी अलिकडे होत्या , याचे कारण महाशयांच्या जन्मवेळत दहा मिनीटांची चुक होती.जर जातकाच्या आयुष्यातल्या घटनांच्या अनुरोधाने जन्मवेळ सुधारुन घेतली असती तर माझे टायमिंग रेझर शार्पच आले असते.

ती पत्रिका मी जेव्हा बघीतली तेव्हाच जातक परदेशात जाणार हे मला दिसले होते पण मी जरा हातचे राखून फक्त “Relocation, of course is needed.”  असे लिहले होते. कारण नोकरीसाठी वणवण भटकणार्‍याला नोकरी कधी मिळेल हे सांगणे महत्वाचे ,आत्तापासून त्याला परदेश गमनाची आशा का लावून ठेवायची?

पब्लीक फोरम वर तेही फुकट ज्योतिष सांगताना या मर्यादा येतातच. ते विचारत घेता , मी जे भविष्य वर्तवले होते ते बरोबर आले असेच म्हणायला हवे.

या महाशयांची पुढची पोष्ट पहा..

Wed Jun 26, 2013 2:19 pm
….

Mercury AD is making a complete turnaround in my life. I have got a job abroad and enjoying all the luxuries i was striving for…..

हा फिडबॅक या महाशयांनी मला दिला नाही तर दुसर्‍याच एका थ्रेड ,दुसर्‍याच कोणत्यातरी संदर्भात दिला आहे.

पण इतके सगळे चांगले होऊन सुद्धा फुकट ज्योतिषाची भिक मागणे चालूच आहे…ही त्याची पोष्ट पहा…

Sat Jul 20, 2013 4:59 pm
Hi,

I have been in abroad on a work visa since April 2013. I want to know about the chances of long term stay or even permanent settlement in abroad.

या फुकट्याचे पुढे काय झाले ते माहीती नाही, पण आजतागायत त्या महाशयांना कौतुक तर सोडाच एक साधा आभाराचा शब्द लिहीता आला नाही.

गरज सरो वैद्य मरो म्हणतात ते उगाच नाही.

हा एकच नाही, असे अनेक अनुभव माझ्या गाठीस आहेत ..

म्हणूनच मग मी एक निर्णय घेतला:  ‘मोफत भविष्य ! नाही सांगणार जा..

शुभं भवतु


About सुहास गोखले

मी सुहास गोखले या वेब-साईटचा निर्माता. आपल्याला ज्योतिष विषयक मार्गदर्शन हवे असल्यास किंवा आपली एखादी सुचना / तक्रार असेल तर खाली दिलेल्या 'संपर्क फॉर्म' मध्ये माहीती भरुन पाठवल्यास मी ताबडतोब आपल्याशी संपर्क साधेन.
0

सुहास गोखले administrator

मी सुहास गोखले या वेब-साईटचा निर्माता. आपल्याला ज्योतिष विषयक मार्गदर्शन हवे असल्यास किंवा आपली एखादी सुचना / तक्रार असेल तर खाली दिलेल्या 'संपर्क फॉर्म' मध्ये माहीती भरुन पाठवल्यास मी ताबडतोब आपल्याशी संपर्क साधेन.

2 प्रतिक्रिया

///////////////
  1. Medha Ramdharane

    namaskar sir, Jyotish vishyak margdarshan karayche kiti charges gheta? mala kahi prashan vicharayche hote.

    0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.