मराठी ब्लॉग / वेबसाईट विश्वातली ‘अजरामर’ ठरावी अशी एक कविता आहे …
मुळात कविता उत्तम आहे या बद्दल वादच नाही पण ती कविता ज्या पद्धतीने ‘टाईप’ करुन प्रकाशीत झाली त्यानेच तर सगळा घोट्टाळा झाला ना !
ही कविता प्रथम ‘मिसळपाव – www.misalpav.com’ या संकेत स्थळावर (वेबसाईट) २००९ साली प्रसिद्ध झाली होती, तिथे ती खूप गाजली नव्हे चक्क हा:हा: कार उडवणारी ठरली !
असे हे अमौलिक रत्न झाकलेले थोडेच राहणार ! ही कविता त्त्या वेळेच्या प्रथे प्रमाणे ( फेसबुक , व्हॉट्सअॅप नव्हते तेव्हा) ‘ईमेल फॉरवर्ड्स’ द्वारा घरा घरात पोहोचली म्हणले तर फारसे वावगे ठरणार नाही .
(नंतर असाच मान दै.सकाळ च्या मुक्तपीठा वरच्या ब्रह्मे (ल्युना वाले) आणि सप्तर्षी बाईं (मांजर वाल्या) यांना मिळाला… या मांजरवाल्या सप्तर्षी बाईंच्या ‘त्या’ अजरामर लेखाची तोंडओळख मी माझ्या ब्लॉग वर मागे करुन दिली होती .. मांजराची छ्ळवणूक ! )
संपर्क माध्यमे बदलत गेली तरी ही कविता कधीच मागे पडली नाही, आज पण ही कविता फिरून फिरून कधी फेसबुकच्या माध्यमातून तर कधी व्हॉट्सॅप च्या , आपल्या समोर येतच असते, आणि दरवेळी न चुकता २००९ साली घडवलेला ईतिहास पुन्हा पुन्हा निर्माण करत असते …
कविता मी किती वेळ वाचली असेल कोण जाणे पण प्रत्येक वेळी ही कविता वाचताना मी बरीच काळजी घेतो ! आजुबाजुला कोणी नाही याची पूर्ण खात्री करुन घेऊन मगच कविता (पुन्हा पुन्हा) वाचयाला घेतो .. जर आजबाजुला लोक्स असतील तर माझे हसणे ऐकून / बघुन गैरसमज व्हायचा ! चहा / कॉफी घेताना तर चुकून सुद्धा ही कविता वाचत नाही… चहा / कॉफी किबोर्ड वर सांडणे …हानीकारक है ।
कोणा श्री सुरेशचंद्र जोशीं यांनी ही मुळ कविता लिहली होती, कविता छानच आहे पण आपल्याला आवडलेली कविता शेअर करण्याच्या नादात या जोशींच्या कोणा मित्राने / नातेवाईकाने (जी ‘सतिश’ नामक व्यक्ती असून डोंबिवलीत राहते असा अंदाज आहे!) ही कविता २८/२/२००९ रोजी मिसळपाव या वेबसाईट वर टाकली (म्हणजे कविता टाइप केली) , झाले … इथेच तर गंमत झाली…
त्या काळात ‘मराठी’ टायपिंग आजच्या इतके सोपे नव्हते , नाना कसरतीं कराव्या लागायच्या. चार ओळींचा मजकूर ब्लॉग / वेबसाईट वर आणण्यासाठी घोटाभर रक्त आटायचे, त्या काळात ही टायपिंगला काहीशी अवघड कविता वेबसाईट वर डकवण्याच्या नादात सतिशभाऊंनी अनेक शुद्धलेखनाच्या गंमतीजमती केल्या किंबहुना त्या आपोआप होत गेल्या, पण टाइप केलेला मजकूर पुन्हा पुन्हा वाचून दुरुस्त करणे सतिश भाऊंना जमले नसेल किंवा ‘चालतेय , मजकूर कळल्याशी मतलब’ असे म्हणत सतिशभाऊंनी डकलली कविता साईट वर आणि …..
कळत नकळत त्यांनी मराठी भाषेला एक नवा साज चढवला !
मराठी काव्याच्या इतिहासात ‘मैलाचा दगड’ ठरावा असे काही त्यांच्या हातुन अभावितपणे निर्माण झाले !
केवळ टायपिंग मधल्या चुकां मुळे झालेली विनोद निर्मीती आहे ही. यात त्या मुळ कवीला दुखावण्याचा कोणताही हेतु नाही , तसेच ज्या व्यक्तिने ही कविता पोष्ट केली होती त्या व्यक्तीची चेष्टा करण्याचाही हेतु नाही . सर्व माहीती प्रसिद्धी स्थळ : मिसळपाव या संकेतस्थळा वरुन (वेब साईट) घेतली आहे , त्या वेबसाईट च्या निर्मात्यांचे, संपादकांचे, पोष्ट करणार्या लेखकाचे , कवी चे, त्या पोष्ट वर कॉमेंट देणार्या वाचक वर्गाचे मी आभार मानतो.
तर ही ती कविता !
हे राम !
(असे फक्त गांधीजीच म्हणाले नाहीत … खरे ना ?)
या कविते (?) वर आलेल्या काही निवडक प्रतिक्रिया ! (सर्व प्रतिक्रिया ‘मिसळपाव’ वरुन साभार )
“भयानक !!!
😀 =)) =D> <:p>”
“मराठीला पण आज हार्ट एटॅक आला असेल =))”
“भाषाशुद्धीचे आम्ही कट्टर विरोधक, पण आज आम्ही हरलो. :)”
“सतीशजी, तुम्म या कविततेचे वईद्मबन केलेअ अस्ते, त्री चल्ले अस्ते…..
पन असा सूद कं उगवला.. ओ….
एक्क चंग्ल्या कव्तेचे वत्तोले केलं
(कृपया समजून घ्य्यावे… )”
“धगांनी इतुअक्या लाअता धिल्य की मी गदबदा लोलून हअसून औओथ कोर्दे पदयची वेल अली…
सतिश यम्नि चुचु अनि अन्ज्लि तैंना कव्तिच्या एका फटकर्यात हर्वुन तकल…
हेहेहे कल्जि घेने =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =))”
“खुप्च चन कवित अहे . असेच ल्हित र्हा. लोक हस्ले त् र ह्सुदे त्यंआ स्व्तला क्विता क्र्ता येत नही म्ह्नुन ते दुस्र्याल ह्स्तात.
अनि ते तुम्ह ला हस्त नहित ते ‘कवि सुरेश्चन्द्रा जोशि’ ह्यन हस त अहेत. अशेच ल्हित रहआ.”
“आताच माझ्या मैत्रीणीला ही कविता पाठवली… ती हसता हसता पडली व शक्यतो तीचा हात मोडला…. कवी महाशय भरपाई द्या.. नाय तर ती केस करेल… वकिल आहे =))”
“कसं टाइप केलं हो?
ही कवीता वाचल्यावर मी अत्ता निविरुत्तीचा विचाअर कारतओ आहे.”
“एकु द्या मज बासरि त्य्य बाबुन्च्या बेतातु नी
— आहो एकच बासरी होती .. ती पण आताच मोडुन टाकली. . . कवीता वाचल्यावर. . .”
“प्रतिसाद वाचून अजून काही लिहावेसे वाटले नाही. 🙁
वारलो, खपलो, ठो, चाबूक बिबूक सगळे एकदम! =))”
“अर्धांगवायूच्या रुग्णांसाठी जिव्हेचे / वाचेचे व्यायाम म्हणून छान !!!!”
“सगळेच प्रतिसाद वाचायला नेहेमीच्या दसपट वेळ लागला, हसताना डोळे उघडे ठेवणंही कठीण झालं होतं. आधी ठरवलं होतं की कवितेसारखाच प्रतिसाद लिहायचा, पण लक्षात आलं, सुद्द लिवायलाच कमी वेळ आणि कष्ट लागतात.”
“हा धागा आज पहिल्यांदा वाचून हसून पुरेवाट झाली ..
मराठी पाउल पढते पुढे कार्यक्रमात सादर केली तर अख्खा महाराष्ट्र कोसळेल :)”
“सूद्दलेकनाची ही परमावदी पगून कळायचं बंद झालं बॉ!!!”
“हीच खरी शुद्ध भाषा! तुम्ही लिहिता ती पुण्या-मुंबईची काय मराठी आहे ? असुद कुतले ?”
“हलवले ते गवत लेका
गवत लेका हलवले का ?”
“हि कविता वाचली आणि……… आम्ही शरम सोडून दिली.”
आता ती मूळ कविता जशी कविवर्य जोशींना अभिप्रेत असावी तशी खाली देतो आहे.
आयुष्यभर नावडत्या नोकरीचं जोखड वागवून निवृत्त झालेल्या आणि आता थोडंसं निसर्गाशी एकरूप होऊन जगण्याची आकांक्षा ठेवणार्या एका वृद्ध कर्मचार्याची ही कविता!
शुभं भवतु
- ऑन लाईन (लाईव्ह स्ट्रीमिंग) ज्योतिष क्लास - March 24, 2020
- पुण्यात क्लास सुरु ! - February 29, 2020
- Lost & Found ! - February 26, 2020
- बासरीवाला ! - February 6, 2020
- निशाणी बदला… भाग्य बदला – ३ - February 6, 2020
- निशाणी बदला… भाग्य बदला – २ - February 5, 2020
- ‘निशाणी बदला… भाग्य बदला’ - February 5, 2020
- विठ्ठला कोणता झेंडा घेऊ हाती – भाग २ - January 23, 2020
- विठ्ठला कोणता झेंडा घेऊ हाती – भाग १ - January 22, 2020
- प्रश्नकुंडलीची वेळ - January 21, 2020