अमेरिकेतल्या एका महिलेने मला प्रश्न विचारला होता ..

प्रश्ना मागची  पार्श्वभूमी :

जातक एका युनिव्हर्सिटी मधल्या एका संशोधन प्रकल्पा मधली ‘संशोधक सहाय्यक रिसर्च असिस्टंट’ ही जागा हवी होती , त्या संदर्भातली सर्व औपचारिकता जातकाने पूर्ण केली होती , आता वाट होती ती त्या प्रकल्पाचे प्रमुख डॉ अ‍ॅन्डरसन यांच्या ‘होकारा’ ची.

जातक डॉ अ‍ॅन्डरसन यांच्या निर्णयाची वाट पाहत होती पण दरम्यान जातकाला एका चांगल्या नोकरीची ऑफर  मिळाली. जातकाला नोकरी पेक्षा संशोधनातच जास्त रुची असल्याने जर ही रिसर्च पोष्ट मिळाली नाही तरच जातक नोकरीची ऑफर स्वीकारणार होती, पण अडचण अशी की जर डॉ अ‍ॅन्डरसन यांच्या कडून उत्तर मिळे तो पर्यंत थांबले तर हातात आलेली नोकरी निसटेल कारण ज्या कंपनी ने ही ऑफर दिली होती ती काही जास्त वेळ थांबू शकणार नाही.

सध्या समोर आहे ती नोकरी स्वीकारायची आणि नंतर जर रिसर्च पोष्ट मिळाली की नोकरी सोडायची असेही करता येणार नव्हते कारण या नोकरी साठी जातकाला बॉन्ड लिहून द्यावा लागणार होता त्यातल्या एका कलमान्वये जातकाला वर्षाच्या आत ती नोकरी सोडता येणार नव्हती.

आता जातका पुढे यक्ष प्रश्न उभा राहिला होता, धरलय तर चावतयं आणि सोडलं तर पळतयं  अशी परिस्थिती निर्माण झाली होती !

याच द्विधा मन:स्थितीत जातकाने विचारले:

“डॉ अ‍ॅन्डरसन कडून  उत्तर मिळणार आहे का ?  असल्यास हो असेल का?  केव्हा? “

प्रश्न वेळेचा तपशील:

जातक: स्त्री

प्रश्न वेळेची जातकाची स्थिती:

दिनांक: १९ ऑगष्ट २०१६

वेळ: २३:३५:४६ CDT

स्थळ : ओल्कहोमा सिटी Oklahoma City , OK, USA   ३५°२८’N ,  ९७°३१’W

 

या लेखाचा पहीला भाग:  मैं इधर जाऊं या उधर जाऊं? – १

 

या लेखाच्या पहिल्या भागात या प्रश्नाचे  उत्तर ‘पाश्चात्त्य होरारी’ पद्धतीने काय येते ते आपण पाहिले  ,  आपले अनुमान असे होते:

 • जातकाला प्रकल्पात काम करायची संधी मिळेल पण अगदी कमी कालावधी साठी. 
 • जातकाची ही नेमणूक कोणत्या ना कोणत्या कारणां मुळे (जातकाचा दोष असेल / नसेल) संपुष्टात येईल.
 • प्रकल्पात काम करायची संधी मिळाल्याने जातक सध्या हातात असलेली नोकरी स्वीकारणार नाही.
 • सप्टेंबर च्या तिसर्‍या आठवड्यात (१५ सप्टेंबर – २१ सप्टेंबर) निर्णय कळेल.

 


आता आपण याच प्रश्नाची उकल ‘नक्षत्र पद्धती’ नुसार करायचा प्रयत्न करू तसेच या केस चे पुढे काय झाले ते पण पाहू.


 प्रश्नशास्त्राचा एक प्राथमिक नियम: प्रश्न विचारणारी व्यक्ती जगाच्या पाठीवर कोठूनही प्रश्न विचारत असली तर त्या प्रश्ना साठीची प्रश्नकुंडली मात्र ज्योतिषी ज्या ठिकाणी आहे त्या स्थळाची आणि त्या वेळी ज्योतिषाच्या घड्याळ्यात किती वाजले आहेत त्या क्षणाची मांडायची असते!  

त्या मुळे जातकाने हा प्रश्न अमेरिकेतल्या ओक्लाहोमा सिटी ,अधून १९ ऑगष्ट २०१६ रोजी तिकडचे रात्रीचे २३:३५ वाजलेले असताना विचारलेला असला तरी मी तेव्हा भारतात, नाशिक इथे होतो आणि माझ्या घड्याळात सकाळचे १०:०५: ४६ वाजले होते आणि दिवस होता  २० ऑगष्ट २०१६ ! तेव्हा हेच स्थळ, हाच दिवस आणि हीच वेळ घेऊन आपल्याला प्रश्नकुंडली बनवावी लागेल.

जातकाचा नेमका प्रश्न काय आहे हे समजावून घेऊ.

जातकाच्या मनात रिसर्च पोष्ट आहे आणि ती जर मिळाली नाही तर आणि तरच जातका तिच्या हातात असलेली नोकरीची ऑफर स्वीकारणार आहे.  रिसर्च पोष्ट साठी निवड झाली / नाही झाली हे केव्हा कळेल हे सांगता येत नाही आणि त्यासाठी थांबावे तर नोकरीची ऑफर हातातून निघून जाईल असा तिढा आहे. रिसर्च पोष्ट मिळाली तर उत्तमच पण नाही मिळाली तर रिसर्च पोष्ट नाही आणि नोकरीही नाही अशी परिस्थिती निर्माण होऊ शकते तेव्हा जातकाला रिसर्च पोष्ट साठी निवड होणार आहे का हे माहिती करून घ्यावयाचे आहे . हा निर्णय होकारार्थी असेल तर जातक थांबायला तयार आहे आणि निर्णय नकारार्थी असेल तर जातक वाट न पाहता हातातली नोकरी स्वीकारून मोकळी होईल.


 

 

या प्रश्नात कालनिर्णया पेक्षा ही जातकाला रिसर्च पोष्ट मिळते का नाही हाच कळीचा मुद्दा आहे तेव्हा आपण त्यावर लक्ष केंद्रित करू.

प्रश्न विचारता क्षणीच कुंडली मांडली आहे तेव्हा या कुंडलीतला चंद्र काय म्हणतो हे पाहावयास हवे.

चंद्र पंचम (५) स्थानात आहे , चंद्राची कर्क राशी लाभ (११) स्थानावर , चंद्र गुरुच्या नक्षत्रात , गुरु व्यय (१२) स्थानात , गुरुच्या राशी चतुर्थ (४) आणि सप्तम (७) स्थानांवर.

चंद्र: १२ / ५ / ४ , ७ / ११

हे स्थान शिक्षणाचे आणि ११ हे स्थान इच्छापूर्तीचे त्यामुळे चंद्र जातकाच्या प्रश्नाचा रोख बर्‍या पैकी दाखवत आहे. निदान जातकाच्या मनात शिक्षणा संदर्भात काही विचार आहेत हे तरी यातून स्पष्ट होत आहे.

चंद्रा ची साक्ष घेतल्या नंतर आपल्याला पाहावयाचा आहे तो प्रश्ना संदर्भातला प्रमुख भाव.

जातक एका युनिव्हर्सिटी मधल्या संशोधन प्रकल्पात रिसर्च सहाय्यक या पदा साठी उत्सुक आहे, डॉ अ‍ॅन्डरसन हे या संशोधन प्रकल्पाचे प्रमुख आहेत, जातकाला हे पद द्यायचे की नाही याचा निर्णय डॉ अ‍ॅन्डरसन घेणार आहेत आणि जातकाला या निर्णयाची प्रतीक्षा आहे.

सर्वप्रथम आपण ‘डॉ अ‍ॅन्डरसन यांचा निरोप ‘ या बाबत विचार करू. जातकाच्या बाबतीतला निर्णय डॉ अ‍ॅन्डरसन घेणार / कळवणार असले तरी ते हा निर्णय युनिव्हर्सिटी साठी घेत आहेत.  जसे एखाद्या नोकरीचे  नेमणूक पत्र ( अपॉईंटमेंट लेटर) त्या कंपनीच्या मनुष्यबळ विकास ( एच आर / पर्सोनेल) विभागाच्या प्रमुखाच्या सहीने / संमतीने मिळत असले तरी ते केवळ एक साधन आहे,  प्रत्यक्षात आपण त्या कंपनीत नोकरी करणार असतो त्या पर्सोनल मॅनेजर ची नोकरी करणार नसतो , आपला व्यवहार त्या कंपनीशी होत असतो, इथेही तसेच आहे, निर्णय घेणे , तो जातकाला कळवणे हा भाग जरी डॉ अ‍ॅन्डरसन हाताळणार असले तरी जातकाचा व्यवहार हा एका युनिव्हर्सिटी बरोबर आहे, अंतिम नतीजा / फळ  जातकाला निव्हर्सिटी मधल्या संशोधन प्रकल्पात रिसर्च सहाय्यक पद ‘ हेच अपेक्षीत आहे.

 इथे डॉ अ‍ॅन्डरसन यांचा निरोप ही बाब फारशी महत्त्वाची नाही, जातकाला प्रकल्पात काम करायची संधी मिळते का खरा महत्त्वाचा मुद्दा आहे , अशी संधी मिळाल्याचे डॉ अ‍ॅन्डरसन कळवतील का अन्य कोणी कळवेल हा मुद्दा गौण आहे. 

युनिव्हर्सिटी मधल्या संशोधन प्रकल्पातली रिसर्च असिस्टंट ची पोष्ट आहे, ह्या पदा साठी जातकाला काही विद्यावेतन ( स्टायपेंड) मिळणार आहे पण ही काही रूढ अर्थाने मानली जाते तशी नोकरी नाही आणि जातकाला मिळणारे विद्यावेतन हा काही पगार म्हणता येणार नाही, जातक रिसर्च करणार आहे (किमान रिसर्च ला साहाय्य तरी करणार आहे) हे एक प्रकारचे उच्च शिक्षण आहे कारण या रिसर्च च्या जोरावर जातकाला उच्च पदवी (पी एच डी) मिळू शकते. या अंगाने विचार करता जातका साठी ही एक उच्च शिक्षणाची संधी आहे.

उच्च शिक्षणा साठी आपण नवम (९) भाव विचारात घेतो.

जातकाचा व्यवहार हा एका युनिव्हर्सिटीशी येणार आहे, उच्च शिक्षणाचे केंद्र, विद्यापीठ इ बाबी आपण नवम (९) स्थाना वरून पाहतो.

आता त्या डॉ अ‍ॅन्डरसन यांच्या अंगाने विचार केला तर , हे त्या प्रकल्पाचे प्रमुख आहेत , त्यांच्या मार्गदर्शना खाली हा रिसर्च प्रकल्प आहे म्हणजे त्या अर्थाने डॉ अ‍न्डरसन हे गुरु आहेत. गुरु आपण नवम (९) स्थानावरूनच पाहतो.

म्हणजे कोणत्याही अंगाने विचार केला तरी आपल्याला नवम (९) भावालाच महत्त्व दिले पाहिजे असे दिसते

(केवळ जातक डॉ अ‍न्डरसन यांच्या कडून येणार्‍या उत्तराची (मेसेज) ची प्रतीक्षा आहे म्हणून तृतीय (३) स्थान वापरणे योग्य होणार नाही.)

म्हणजेच नवम (९) भावाचा ‘सब’ तपासला पाहिजे,  नवम भावाचा सब आहे राहू

राहू चे कार्येशत्व असे आहे:

राहू लाभ (११) स्थानात, राहू ला राशी स्वामित्व नाही , राहू शुक्राच्या नक्षत्रात , शुक्र लाभात (११) , शुक्राच्या राशी नवम (९) आणि द्वितीय (२) स्थानी.

राहू रवीच्या राश्यात्मक युतीत, रवी लाभात (११), रवीची सिंह रास व्यय (१२) स्थानावर  , रवीचा नक्षत्रस्वामी केतू पंचमात (५) स्थानात, केतू ला  राशी स्वामित्व नाही

रवी: ५ / ११ / — / १२

राहू शुक्राच्या राश्यात्मक युतीत, शुक्र लाभात (११), शुक्राच्या राशी नवम  (९) आणि द्वितिय (२) स्थानांवर  , शुक्र स्वत:च्याच नक्षत्रात.

शुक्र: ११ /  ११ / २  , ९  / २  , ९

राहू वर चंद्राची दृष्टी , चंद्राचे कार्येशत्व आपण आधीच पाहिले आहे

चंद्र: १२ / ५ / ४ , ७ / ११

राहू रवीच्या राशीत , रवीचे कार्येशत्व आपण पाहिले आहे

रवी: ५ / ११ / — / १२

राहू चे एकंदर कार्येशत्व असे आहे:

राहू: ११ /  ११ / २ , ९ / —

युती रवी: ५ / ११ / — / १२

युती शुक्र: ११ /  ११ / २  , ९  / २  , ९

दृष्टी चंद्र: १२ / ५ / ४ , ७ / ११

राशी रवी: ५ / ११ / — / १२

नवमा (९) चा ‘सब’ राहू अशा प्रकारे ४, ९ , ११ या उच्च  शिक्षणा साठी आवश्यक तीन ही स्थानांचा कार्येश होत आहे , म्हणजे जातकाची इच्छा पूर्ती होण्याची शक्यता आहे .

उच्च शिक्षणासाठी आपण ४, ९ , ११ हे भाव विचारात घेणार असल्याने या भावांचे कार्येश ग्रह कोणते हे पण एकदा पाहून घेऊ.

चतुर्थ (४) स्थान:

चतुर्थ भावात एकही ग्रह नाही, गुरु चतुर्थेश आहे , गुरुच्या नक्षत्रात चंद्र आहे, म्हणजे चतुर्थ स्थानाचे कार्येश ग्रह असे असतील:

चतुर्थ (४) : — / —- / चंद्र / गुरु

नवम (९) स्थान:

नवम भावात एकही ग्रह नाही, शुक्र नवमेश आहे, शुक्राच्या नक्षत्रात स्वत: शुक्र आणि राहू आहेत. म्हणजे नवम स्थानाचे कार्येश ग्रह असे असतील:

नवम (९) : — / —- / शुक्र , राहू / शुक्र

लाभ (११) स्थान:

लाभात रवी , राहू, शुक्र आहेत, चंद्र लाभेश आहे, राहू च्या नक्षत्रात केतू आहे, रवीच्या नक्षत्रात बुध व गुरु आहेत, शुक्राच्या नक्षत्रात स्वत: शुक्र आणि राहू आहेत, चंद्राच्या नक्षत्रात कोणीही नाही . म्हणजे लाभ स्थानाचे कार्येश ग्रह असे असतील:

लाभ (११) : केतू, बुध , गुरु , शुक्र , राहू / रवी, राहू , शुक्र / — / चंद्र

सब लॉर्ड चा होकार ही पहिली पायरी , आता ही घटना नक्की घडणार आहे का हे आपल्याला दशा- अंतर्दशा – विदशा सांगतील.

 

 

प्रश्न विचारते वेळी जातकाला गुरु महादशा – शुक्र अंतर्दशा – मंगळ विदशा चालू आहे.

गुरु महादशा डिसेंबर २०२३ पर्यंत चालणार आहे

महादशा स्वामी गुरु चे कार्येशत्व असे आहे:

गुरु व्ययात (१२) आहे , गुरुच्या राशी चतुर्थ (४) आणि सप्तम (७) स्थानांवर आहेत , गुरु रवीच्या नक्षत्रात , रवी लाभात (११) , रवीची सिंह राशी व्यय (१२) स्थानावर म्हणजे गुरुचे कार्येशत्व:

गुरु: ११  / १२ / १२ / ४ , ७

म्हणजे लाभ (११) आणि चतुर्था (४) च्या माध्यमातून गुरु महादशा शिक्षणा साठी अनुकूल आहे. पण उच्च शिक्षणा साठी आवश्यक असलेले नवम (९) स्थान काही या गुरु कडे नाही.

गुरु स्वत:च्याच सब मध्ये आहे.

इथे आणखी एक महत्त्वाचा मुद्दा !

गुरु दशम (१०) पण अत्यंत प्रबळ कार्येश होत आहे ! कसा? 

दशम स्थाना कडे पाहिले तर लक्षात येते की दशम स्थानात एकही ग्रह नाही त्यामुळे दशमेश बुध दशमाचा कार्येश होतो, बुधाच्या नक्षत्रात ही ग्रह नाहीत त्यामुळे बुध हा एकमेव ग्रह दशमाचा कार्येश होत आहे असे जेव्हा होते तेव्हा ज्या ज्या ग्रहांचा बुध हा सब असेल ते ते ग्रह दशमाचे कार्येश होतील इतकेच नव्हे तर  त्यांचा दर्जा दशमेश बुधा पेक्षाही वरच्या दर्जाचा असेल.

इथे बुध कोणत्याही ग्रहाचा सब नाही ! अशी जेव्हा परिस्थिती येते तेव्हा आपल्याला सब सब पातळी वर जावे  लागते ,  बुध कोणता ग्रहाचा सब सब लॉर्ड आहे ते तपासायचे, इथे गुरु ह्या एकमेव ग्रहाचा सब सब बुध आहे. त्यामुळे गुरु दशमाचा (१०) ‘अ’ दर्जाचा कार्येश होतो.

गुरु चे सुधारीत कार्येशत्व असे असेल

गुरु: १०, ११  / १२ / १२ / ४ , ७

आता गुरु चे  १०, ११ हे कार्येशत्व  पाहता , गुरु उच्च शिक्षणा पेक्षा नोकरी साठीच जास्त अनुकूल आहे असे दिसते.

गुरु च्या महादशेत सध्या शुक्राची अंतर्दशा चालू आहे आणि ती  १ जुलै २०१८ पर्यंत चालणार आहे , जातकाच्या प्रश्नाच्या जो काही सोक्ष मोक्ष लागणार आहे तो या एक वर्षातच.

अंतर्दशा स्वामी शुक्राचे कार्येशत्व आपण आधीच पाहिले आहे

शुक्र: ११ /  ११ / २  , ९  / २  , ९

शुक्राच्या नक्षत्रात स्वत: शुक्र आहे आणि इतर कोणताही ग्रह नसल्याने शुक्राला पोझिशनल स्टॅटस मिळाले आहे , त्या नुसार शुक्र ज्या ज्या भावांचा सब आहे त्या त्या भावांचा शुक्र प्रथम दर्जाचा कार्येश होणार आहे,

शुक्र षष्ठम (६) भावाचा सब आहे या नात्याने शुक्र षष्ठम (६) भावाचा प्रबळ कार्येश होत आहे.

शुक्रा चे सुधारीत कार्येशत्व असे असेल

शुक्र: ६, ११ /  ११ / २  , ९  / २  , ९

शुक्र ६, ११   चा ‘अ’ दर्जाचा व २ चा ‘ब’ दर्जाचा कार्येश आहे ,  शुक्र उच्च शिक्षणा साठीच्या नवम (९) भावाचा ‘अ’ दर्जाचा कार्येश आहे. म्हणजे हा शुक्र  उच्च शिक्षण आणि नोकरी दोन्ही कामां साठी समान अनुकूल आहे. पण २, ६, ११ चा विचार करता शुक्र नोकरी साठी जास्त अनुकूल आहे. 

अंतर्दशा स्वामी शुक्राचा सब शनी आहे , या शनी चे कार्येशत्व असे आहे:

शनी द्वितीय (२) स्थानात आहे, शनीच्या राशी पंचम (५) आणि षष्ठम (६) स्थानांवर , शनी स्वत:च्याच नक्षत्रात

शनी: २ / २ / ५ , ६ / २ , ६

म्हणजे शुक्राचा सब  शनी हा उच्च शिक्षणाच्या बाबतीत काहीच  साहाय्यकारी नाही उलट तो २ , ६ च्या माध्यमातून नोकरी साठी बळ पुरवणार आहे.

जातका कडे सध्या एका नोकरीची निश्चित अशी संधी (ऑफर) आहे याची इथे नोंद घेणे गरजेचे आहे.

पण शुक्राची दशा  जुलै २०१७ पर्यंत आहे , हा साधारण एक वर्षाचा काळ आहे , रिसर्च पोष्ट  का नोकरी याचा जो काही फैसला होणार आहे तो येत्या महीना – दोन महिन्यात लागणार आहे.

तेव्हा केवळ शुक्राची अंतर्दशा उच्च शिक्षणा साठी अनुकूल आहे यावर अनुमान काढता येणार नाही कारण तसा हा शुक्र नोकरीसाठी जास्त अनुकूल आहे!

नक्की काय होणार या साठी आपल्याला या शुक्राच्या अंतर्दशेत येणार्‍या विदशा तपासल्या पाहिजेत.

सध्या शुक्राच्या अंतर्दशेत मंगळाची विदशा चालू असून ती १४ आक्टोबर २०१६ पर्यंत चालू आहे.

विदशा स्वामी मंगळाचे कार्येशत्व असे आहे:

मंगळ द्वितीय (२) स्थानात , मंगळाच्या राशीं अष्टम (८) आणि तृतीय स्थानी (३) , मंगळ शनीच्या नक्षत्रात आहे,

शनी द्वितीय (२) स्थानात , शनीच्या राशीं पंचम (५) आणि षष्ठम (६)  स्थानी आहेत

मंगळ: २ / २ / ५ , ६ / ३ , ८

मंग़ळ शनी च्या अंशात्मक युतीत असल्याने शनीचे कार्येशत्व पण मंगळाला मिळणार आहे.

मंगळाचा सब राहू आहे;

मंगळाचा सब राहू उच्च शिक्षणा साठी अनुकूल असला तरी , स्वत: विदशा स्वामी तृतीय (३) आणि अष्टम (८) भावांच्या माध्यमातून उच्च शिक्षणाच्या कमालीचा विरोधी आहे. शिवाय २ , ६ च्या माध्यमातून मंगळ ही नोकरी साठी अनूकुल आहे! 

जातक सध्या युनिव्हर्सिटी कडून येणार्‍या संदेशाची वाट पाहत आहे तो संदेश या मंगळाच्या विदशेत येऊ शकेल असे तृतीय (३) स्थानाचे  मंगळाचे कार्येशत्व सुचवत आहे पण त्याच बरोबर तृतीय (३) आणि अष्टम (८)  स्थानाचे कार्येशत्वा मुळे या मंगळाच्या विदशेत जातकाचे उच्च शिक्षणाचे स्वप्न साकार होणार नाही.

मंगळा नंतर राहू विदशा येणार आहे ती मार्च २०१७ पर्यंत चालेल . राहू चे कार्येशत्व आपण आधीच पाहिले आहे ,

राहू चे एकंदर कार्येशत्व असे आहे:

राहू: ११ /  ११ / २ , ९ / —

युती रवी: ५ / ११ / — / १२

युती शुक्र: ११ /  ११ / २  , ९  / २  , ९

दृष्टी चंद्र: १२ / ५ / ४ , ७ / ११

राशी रवी: ५ / ११ / — / १२

मग जातकाचे उच्च शिक्षण या राहूच्या विदशेत सुरू होणार का ? दिसते तर तसे आहे.

इथे जरा थांबून विचार करा

दशा स्वामी गुरु  उच्च शिक्षणा पेक्षा नोकरीला जास्त अनुकूल आहे.

अंतर्दशा स्वामी शुक्र उच्च शिक्षणा पेक्षा नोकरी साठी जास्त अनुकूल आहे.

विदशा स्वामी मंगळ उच्च शिक्षणा च्या कमालीचा विरोधी आहे

विदशा स्वामी राहू उच्च शिक्षणा साठी खूप अनुकूल आहे

पण राहूची विदशा १४ आक्टोबर २०१६  ते ३ मार्च २०१७ ला म्हणजे अवघी काही महिन्यांची आहे,

समजा या राहूच्या विदशेने हात दिला आणि जातकाचे उच्च शिक्षण सुरू झाले तरी राहू ची विदशा फक्त काही महिन्यांची आहे , राहू विदशा संपल्या नंतर काय? रिसर्च प्रकल्प असा काही महिन्यांत संपत नसतो तेव्हा राहूच्या पुढच्या काही विदशां पण उच्च शिक्षणा साठी अनुकूल असायला हव्यात.

राहू च्या पुढची विदशा गुरु ची आहे , गुरु  नोकरीलाच जास्त अनुकूल आहे.

गुरु च्या पुढची शनी विदशा तर पूर्णपणे नोकरी साठीच अनुकूल आहे.

पुढची बुधाची विदशा  ११ व १० च्या माध्यमातून  नोकरी साठीच अनुकूल आहे.

पुढची केतू विदशा  ११ आणि शनीच्या माध्यमातून नोकरी साठी अनुकूल आहे.

शुक्र अंतर्दशा इथे संपते.

त्यानंतर येणारी रवी अंतर्दशा देखील ५, ११ , १२ च्या माध्यमातून उच्च शिक्षणा साठी प्रतिकूल आहे.

या सार्‍याचा विचार करता आपल्या लक्षात येते की एक राहूची विदशा सोडता कोणताही विदशा उच्च शिक्षणा साठी अनुकूल नाही,

रिसर्च पोष्ट चे काही मनासारखे होणार नाही, तेव्हा ते विसर आणि सरळ हातात आहे ती नोकरी ची ऑफर स्वीकार असे जातकाला सांगायचे का ?

वाटते तर तसेच पण मग त्या पाच एक महिन्यांच्या राहू च्या विदशेचे काय ? उच्च शिक्षणा साठी इतकी प्रबळ विदशा अशीच वाया जाणार का? या विदशेत काहीच घडणार नाही का?

मोठा गुंता झाला आहे हे खरेच

या क्षणी मी आधी केलेले पाश्चात्त्य पद्धतीने केलेले अ‍ॅनालायसिस आठवले, तिथे आपण बघितले की बुध ( प्रकल्प ) आणि  शुक्र (जातक) यांच्यात युती होते तेव्हा बुध स्तंभी होता आणि युती नंतर अवघ्या दोन एक दिवसांत बुध वक्री होणार आहे. तेव्झा तसेच शुक्र (जातक) आणि चंद्र (नोकरी) यांच्यात कोणताही योग होणार नाही. या ग्रहस्थिती वरून आपण असे अनुमान काढले होते:

 • जातकाला प्रकल्पात काम करायची संधी मिळेल पण अगदी कमी कालावधी साठी. 
 • जातकाची ही नेमणूक कोणत्या ना कोणत्या कारणां मुळे (जातकाचा दोष असेल / नसेल) संपुष्टात येईल.
 • प्रकल्पात काम करायची संधी मिळाल्याने जातक सध्या हातात असलेली नोकरी स्वीकारणार नाही.

ते आता या नक्षत्रपद्धती तल्या अनुमानांशी जोडले तर एक धक्कादायक बाब समोर येत आहे !

बुध – शुक्र युती म्हणजे उच्च शिक्षण सुरू म्हणजेच जातकाची राहू अंतर्दशा

बुध युती होता क्षणीच वक्री होणे म्हणजेच राहू विदशा संपणे

असे साम्य आपल्याला दिसत आहे.

याचा अर्थ काय घ्यायचा ?

मंगळाच्या विदशेत जातकाला युनिव्हर्सिटी कडून होकार मिळेल, आणि राहूच्या अंतर्दशेत जातक या प्रकल्पावर रूजू होईल. पण जातकाची नेमणूक काही अटींची पूर्तता होण्यावर अवलंबून राहील असे एखादे कलम त्यात असेल आणि त्या अटीं पूर्ण न झाल्याने राहू ची विदशा संपता संपताच म्हणजे अवघ्या चार एक महीन्यात जातकाची नेमणूक रद्द होईल. किंवा काही रिसर्च प्रकल्पांत होते तसे सुरू झालेला प्रकल्प पैशा अभावी गुंडाळला जातो तसे इथे काही होण्याची शक्यता असू शकते व त्यामुळे ही जातकाची नेमणूक रद्द / खंडीत होऊ शकते. किंवा जातकच काही कारणां मुळे ही रिसर्च पोष्ट सोडून देईल.

राहू च्या विदशेत शेवटी येणारी मंगळाची सुक्ष्मदशा आपल्या ३, ८ या कार्येशत्वाच्या प्रभावा मुळे जातकाची रिसर्च पोष्ट संपुष्टात आणेल!

आपले अनुमान असे आहे:  

जातका युनिव्हर्सिटी ची पोष्ट स्वीकारेल आणि काम चालू करेल.

पण विहित कालावधीत अटींची पूर्तता न झाल्याने किंवा पैसा (फंडस) अपुरा पडल्याने वा अन्य कोणत्या कारणा मुळे  जातकाचे रिसर्च असिस्टंट पद संपुष्टात येईल.

जातक मग नाईलाजाने दुसरी नोकरी स्वीकारेल (आत्ता हातात असलेली नोकरी केव्हाच निसटून गेलेली असणार) .

 या अनुमाना संदर्भात आणखी काही विचार करू.

महादशा स्वामी दशमाचा (१०) ‘अ’ दर्जाचा कार्येश आहे. त्यामुळे गुरु ची महादशा चालू असे पर्यंत तरी जातकाला नोकरी करणे लाभदायक असेल , उच्च शिक्षणासाठी गुरु प्रभावहीन असल्याने या महादशेत उच्च शिक्षण होणे अवघड आहे , असफलता मिळण्याची मोठी शक्यता आहे.

मग त्या शुक्राचे काय तो तर नवम (९) भावाचा म्हणजे उच्चशिक्षणा बद्दलच्या प्रमुख भावाचा ‘अ’ दर्जाचा कार्येश आहे ना? तो फळें देणार नाही का?

 शुक्र फळ देणारच ती ही नवम (९) भावाचीच देणार पण नवम भाव म्हणून उच्च शिक्षण असेच असले पाहिजे असे अजिबात नाही. नवम भावाच्या कार्यक्षेत्रात (पोर्ट फोलिओ) उच्च शिक्षणा बरोबरच इतर अनेक बाबीं येतात जसे लांबच्या अंतरावरचा प्रवास, अध्यात्म, परदेशी व्यक्ती/संस्थां बरोबरचा व्यापार इ.त्यामुळे शुक्राच्या अंतर्दशेत जातकाला नवम भावाचे उच्च शिक्षण हे फळ न मिळता कदाचित दूरच्या अंतरावरचा प्रवास, स्थलांतर अशी फळे मिळण्याची शक्यता जास्त आहे.  

दशा स्वामी गुरु हा व्यय (१२) स्थानाचा कार्येश,  व्यय स्थान हे केवळ खर्चाचे स्थान असेच नाही तर व्ययस्थाना वरुन इतर अनेक गोष्टींचा बोध होतो जसे गुप्त शत्रु , तुरंगवास, अनोळखी प्रदेश, बंदिस्त जागा इ. जर व्ययस्थानचे हे फळ आणि नवम स्थानाचे स्थलांतर हे फळ एकत्र केले तर जातक नोकरी व्यवसाया निमित्त वा अन्य कारणा मुळे सध्याचे वास्तव्याचे ठिकाण सोडून कोठेतरी दूर राहावयास जाईल असा तर्क करता येईल. नाहीतरी परदेशगमना साठी आपण ३ , ९, १२  या स्थांनाचा तर विचार करतो , (यातले ३ हे स्थान कुटुंबियां पासून दूर या अर्थाने वापरले जाते , इथे जातक एकटीच राहात आहे , कुटुंब अजून अस्तित्वात नसल्याने , या ३ स्थानाला फारसे महत्त्व राहणार नाही.

नक्षत्र पद्धती नुसार कालनिर्णय करताना केवळ ‘सब लॉर्ड’ ने सुचवले म्हणजे घटना घडणारच असे अजिबात नाही, ती केवळ एक शक्यता असू शकते, या सब –लॉर्ड च्या म्हणण्याला नजिकच्या काळात येणार्‍या ‘दशा – अंतर्दशा-विदशां’ नी पण होकार दिला पाहीजे. पण याने ही भागणार नाही,  नजिकच्या काळात येणार्‍या दशा – अंतर्दशा-विदशेचा होकार मिळाला म्हणजे घटना घडेल असे ही नाही फार तर घटना घडण्याची शक्यता वाढली आहे असे म्हणता येईल. ‘सब लॉर्ड आणि दशा-अंतर्दशा-विदशेच्या जोडीला अनुकूल गोचर भ्रमणाची साथ जेव्हा मिळेल तेव्हा आणि तेव्हाच घटना घडेल असे काहीसे खात्रीने सांगता येईल.

तेव्हा या पायरी वर आपल्याला गोचरीचा कौल घेतला पाहीजे त्याशिवाय आपल्या तर्का ला बळकटीं मिळणार नाही हे निश्चित.

आता आपण प्रश्न विचारल्या वेळे पासुनच्या कालावधी पासुन ते येणार्‍या पाच-महिन्यातली गोचर भ्रमणें तपासू , प्रश्न कुंडली आहे त्यावर विचार करतोय त्यामुळे सामन्यत: जन्मकुंडली साठी आपण जशी / ज्या प्रमाणे गोचर तपासतो तसे इथे करता येणार नाही , आपल्याला फक्त रवीचे गोचर भ्रमण बघायचे.

आपली महादशा गुरु ची आणि अंतर्दशा शुक्राची आहे त्यानुसार आपल्याला रवी चे गोचर भ्रमण

गुरु ची रास – शुक्राचे नक्षत्र किंवा शुक्राची रास – गुरु चे नक्षत्र असे हवे आहे.

आपला अपेक्षित कालावधी , शुक्राच्या अंतर्दशा (त्यातही राहू ची विदशा) म्हणजे २० ऑगष्ट ते १ जुलै २०१८ असा आहे.

 

वर दिलेला रवीच्या गोचर भ्रमणाचा तक्ता पाहिला तर लक्षात येते की आपल्या अपेक्षीत कालावधीत रवी चे भ्रमण गुरुच्या राशीत ( धनु / मीन) होणार नाही, पण रवी शुक्राच्या तूळेतून भ्रमण करेल आणि तूळेत गुरु चे नक्षत्र आहे

हा कालावधी साधारण पणे   ८ नोव्हेंबर ते १६ नोव्हेंबर २०१६ या कालावधीत येतो.

जर आपण शुक्र – राहू ( अंतर्दशा – विदशा ) अशी साखळी जमवली तर याच रवीच्या तुळेतल्या भ्रमणार आपल्याला शुक्राची रास आणि राहू चे नक्षत्र मिळेल. हा कालावधी २४ ऑक्टोबर २०१६ ते ८ नोव्हेंबर २०१६ असा येतो.

राहू रवीच्या सिंह राशीत असल्याने , रवी ची रास आणि शुक्राचे नक्षत्र असे ही चालेल कारण सिंहेत शुक्राचे नक्षत्र आहेच , हा कालावधी येतो १ सप्टेंबर ते १३ सप्टेंबर २०१६.

१ सप्टेंबर ते १३ सप्टेंबर २०१६: या कालावधीत मंगळाची विदशा चालू असेल, मंगळ तृतीय (३) स्थानाचा बळकट कार्येश असल्याने या कालवधीत जातकाला युनिव्हर्सिती कडून रिसर्च पोष्ट बद्दल कळेल.

२४ ऑक्टोबर २०१६ ते १६ नोव्हेंबर २०१६ ( गुरु – शुक्र / शुक्र – राहू एकत्रित कालावधी): या कालावधीत राहू ची विदशा १४ ऑक्टोबर ला सुरु होणार असल्याने या कालावधीत जातक रिसर्च पोष्ट वर रूजू होईल.

राहू विदशा संपता संपता जातकाची ही नेमणूक या ना त्या कारणाने रद्द होईल किंवा जातकच स्वखुषीने ही पोष्ट सोडून देईल.

हा प्रकार राहू विदशेत मंगळाच्या सूक्ष्मदशेत म्हणजे २८ फेब्रुवारी ते ९ मार्च , २०१७ या कालावधीत होण्याची शक्यता आहे.

या वेळेला रवी चे भ्रमण शनी च्या कुंभेत , राहु च्या नक्षत्रातून होत असेल , आता इथे शनीचा संबंध कसा काय पोहोचतो ? उत्तर सरळ आहे , पत्रिकेत मंगळ आणि शनी अंशात्मक ( २ अंश) युतीत आहेत म्हणजे शनी मंगळाची फळे देणार , म्हणजेच रवीचे भ्रमण शनी – राहू ऐवजी मंगळ – राहू असे ही म्हणता येईल. राहू च्या दशेत – मंगळाच्या सुक्ष्मदशेत हा प्रकार घडणार याला हे रवीचे गोचर दुजोरा देत आहे !
मग या सार्‍यां वरुन जातकाला काय सांगायचे ?

१) १ सप्टेंबर ते १३ सप्टेंबर २०१६ या कालावधीत युनिव्हर्सिटी कडून होकार येईल.
२) २४ ऑक्टोबर २०१६ ते १६ नोव्हेंबर २०१६ या कालावधीत जातक आपल्या रिसर्च असिस्टंट या पदावर रूजू होईल.
३) जातकाची ही नेमणूक फार काळ टिकणार नाही, २८ फेब्रुवारी ते ९ मार्च , २०१७ या कालावधीत या ना त्या कारणाने जातकाची नेमणूक संपुष्टात येईल.
४) त्या नंतर जातकाला नोकरी मिळेल आणि ह्या नोकरीच्या निमित्ताने जातकाला स्थलांतर कदाचित देशांतर करावे लागेल.
५) आगामी काळ जातकाला उच्च शिक्षणासाठी लाभदायक नाही, नोकरीत राहणेच योग्य ठरेल.

पडताळा:

आपण अनुमान केल्या प्रमाणेच  घडलेे!

१) १३ सप्टेंबर २०१६ रोजी जातकाला युनिव्हर्सिटी कडून ई-मेल मार्फत होकार मिळाला.
२) जातकाने ते स्वीकारले आणि त्याच बरोबर हातात असलेल्या नोकरीला नकार कळवला.

पण आपण अंदाज केला होता तसेच झाले , हा प्रकल्प अगदी सुरवाती पासुन अडचणीत सापडला, नेमणूक पत्र देऊनही युनिव्हर्सिटी ने जातकाला लगेच रुजू  करुन घेतले गेले  नाही. नेमणूक पत्र मिळाल्या नंतर महीनाभराने जातक या प्रकल्पावर रुजू झाली

३) १७ ऑक्टोबर २०१६ जातक  रिसर्च असिस्टंट या पदावर रूजू झाली.
४) ०१ फेब्रुवारी २०१७ जातकाला “पुरेशा निधी अभावी संशोधन प्रकल्प रद्द / स्थगित करावा लागत असल्याने , तिची नेमणूक २८ फेब्रुवारी २०१७ रोजी समाप्त होईल’ असे पत्र मिळाले. 

५) २८ फेब्रुवारी २०१७ नंतर जातक काही काळ घरी बसून होती.  मे २०१७ मध्ये तिला दुसरी नोकरी मिळाली ( गुरु – शुक्र – गुरु – बुध !) आणि या नोकरी निमित्त तिला कॅनडा मध्ये देशांतर करावे लागले.

 

 

समाप्त 

 

शुभं भवतु 

 

 


About सुहास गोखले

मी सुहास गोखले या वेब-साईटचा निर्माता. आपल्याला ज्योतिष विषयक मार्गदर्शन हवे असल्यास किंवा आपली एखादी सुचना / तक्रार असेल तर खाली दिलेल्या 'संपर्क फॉर्म' मध्ये माहीती भरुन पाठवल्यास मी ताबडतोब आपल्याशी संपर्क साधेन.
+3

सुहास गोखले administrator

मी सुहास गोखले या वेब-साईटचा निर्माता. आपल्याला ज्योतिष विषयक मार्गदर्शन हवे असल्यास किंवा आपली एखादी सुचना / तक्रार असेल तर खाली दिलेल्या 'संपर्क फॉर्म' मध्ये माहीती भरुन पाठवल्यास मी ताबडतोब आपल्याशी संपर्क साधेन.

10 प्रतिक्रिया

///////////////
  1. सुहास गोखले

   धन्यवाद श्री योगेशजी,

   नक्षत्र पद्धती असो किंवा पाश्चात्त्य पद्धती, नियमा नुसार हाताळली की अशी अचूक उत्तरे मिळवता येतात. ज्योतिषशास्त्रात तर्काला मोठा वाव आहे त्याचा योग्य वापर करता आला तर पत्रिकेतून बरीच माहीती उकरुन बाहेर काढता येते

   सुहास गोखले

   0
 1. श्री. धिरज अनंतराव जोशी

  वाह ! सर. अगदी नवख्या ज्योतिष विद्यार्थ्यांना ही समजेल अशी आपली विश्लेषण पद्धती आहे. वैयक्तिक मला पारंपारिक पद्धत कळते. त्यामुळे पहिल्या भागात काही अडचण आली नाही. सर्व समजलं. पण दुसऱ्या भागात नक्षत्र पद्धत म्हटले की शंकास्पद होतो. पण काहीही अडचणी शिवाय इत्थंभूत समजले.
  आपल्या केस स्टडीज कुठल्याही संशोधन ग्रंथापेक्षा कमी नाहीत. कालांतराने प्रकाशीत व्हाव्यात!
  शुभेच्छा आणि धन्यवाद!😊

  0
  1. सुहास गोखले

   धन्यवाद श्री धिरज जी

   केस स्ट्डीज हे कोणताही विषय शिकण्याचे एक उत्तम साधन आहे , यात थिअरी आणि प्रॅक्तीकल यांचा सुरेख संगम असतो. मॅनेजमेंट सायन्स, मेडीकल सायन्स अशा क्षेत्रात केस स्ट्डीज चा अत्यंत प्रभावी वापर केला जातो पण ज्योतिषशास्त्रात अशा सविस्तर केस स्ट्डीक अभावानेच पहावयास मिळतात ही उणीव भरुन काढायचा मी एक स्वल्प प्रयत्न केला आहे. आपल्याला या लेखनाचा लाभ झाला हे वाचूण समाधान वाटले.

   शुभेच्छा

   सुहास गोखले

   0
 2. Sudhanva Gharpure

  Suhasji,

  Mind boggling analysis, fantastic. Such an accurate indications given by both methods, un-believable !!! And yet to be believed since it’s your experience.

  I read your cases. The way you analyse the cases, hats off.

  Many so called self proclaimed pandits and shiromanis will have siezers after reading your posts !!!

  Bravo.

  0
  1. सुहास गोखले

   धन्यवाद श्री सुधन्वा जी

   अर्थातच माझ्या कडे आलेल्या जातकाचीच ही केस आहे, जसे घडले तसे लिहले आहे. प्रत्येक वेळी अगदी असेच खणखणीत बंद्या रुपया सारखे यश मिळेलच असे नाही पण आपण प्रयत्न करत राहायचे.

   माझ्या केस स्ट्डीज ह्या हे शास्त्र शिकवण्याच्या हेतुनेच जास्त विस्तार पूर्ववक लिहलेल्या असतात, जेणे करुन ज्यांना हे तंत्र अवगत करुन घ्यावयाचे आहे तयंना त्याचा थोडा का होईना लाभ व्हावा.

   मॅनेजमेंट सायन्स , मेडीकल सायन्स या क्षेत्रात केस स्ट्डीज चा मोठ्या प्रमाणात वापर होतो, ज्योतिषशास्त्रात मात्र अशा केस स्ट्डीज अभावानेच सापड्तील, ही उणीव भरुन काढायचा माझा हा लहानसा प्रयत्न आहे इतकेच,

   मी नक्षत्र पद्धती आणि पाश्चात्त्य पद्धती एक साथ वापरतो, कोणती एक पद्धती चांगली / वाईट असे सिद्ध करयाचा माझा प्रयत्न नाही, काही प्रश्नांची उत्तरे (आणि कालनिर्णय हा भाग) नक्षत्र पद्धतीने चांगली मिळतात तर काही प्रश्नां साठी (आणि बारीक तपशीला साठी ) पाश्चात्त्य पद्धती जास्त योग्य वाटते , जसा प्रश्न असेल तशी पद्धती निवडता आली पाहीजे, एकाच पद्धतीचा पोकळ अभिमान बाळगण्यात चूक होते आहे असे माझे मत आहे.

   शुभेच्छा

   सुहास गोखले

   0
 3. Varsha

  माझा अजूनही म्हणावा तसा अभ्यास वगैरे काही नाही. प्रचंड उत्सुकतेपोटी वाचायला सुरवात केली.
  शिकायची इच्छा आहे पण सध्या तेवढा वेळ देता येईल असे वाटत नाही. पण हे असे लेख वाचले कि शिकायची इच्छा मात्र जास्त प्रबळ होते

  0
  1. सुहास गोखले

   सुश्री वर्षाजी

   धन्यवाद , वेळ थोडा उपलब्ध झाला तरी चालेल पण त्यात नियमीत पण असला पाहिजे, ही एक कलाच आहे , जितका रियाझ कराल तितकी ती अधीक आत्मसात होते.

   शुभेच्छा

   सुहास गोखले.

   0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.