“वो तो मेरा फर्ज है, हां , और एक बात केहेना भूल गया , हमारे युसुफमियाँ, सुबह से ड्रायव्हींग करते करते
और इस बदतमीज गाडी से लडते लडते काफी थके हुए मालूम पडते है ,
तो उन्हें यहाँ पर थोडा आराम करने दे, मेरा बेटा अब्दुल आपको ले जायेगा”
“ठिक आहे”
“वो देखो, अब्दुल मियाँ , आपके लिए गाडी ले के पधारे”
बाहेर बघितले तर खरेच एक पांढरी शुभ्र , प्रशस्त, रुबाबदार शेव्हर्ले उभी होती…
“अरे अब्दुल , हो गयी क्या तैयारी’
“जी, अब्बू , सब तैयार है”
“आईये बेहेनेजी, पधारिये , आपके लिए गाडी तैयार है”
आम्ही सामाना सकट गाडीत बसलो, अब्दुल पण गाडीत बसणार इतक्यात , उस्मान चाचा म्हणाले..
“बेटा अब्दुल, आप को तो सब मालूम हैं, फिर भी जरा होशीयारीसे, बाकी सब अल्लाह की मर्जी”
आमच्या चेहेर्यावरचे प्रश्नार्थक भाव ओळखत उस्मान चाचा म्हणाले..
“भाईसाब , डरने की कोई बात नहीं. मै तो ऐसाही कह रहाँ था, वो क्या है, रात का समय और हमारे अब्दुलमियाँ है जरा बेअकल, जवाँ खून है, तेज तर्रार गाडी दौडाने में माहीर है, इसलिए बाकी कुछ नही, आप बेफिक्र रहिये”
अब्दुलने गाडीला स्टार्टर मारला तेव्हा घड्याळात रात्रीचे दहा वाजले होते…
गाडी चिपळूण च्या बाहेर पडे पर्यंत आम्हा चौघांना चांगल्याच डुलक्या लागल्या होता, दिवसभर झालेली फरफट आणि त्याचा आलेला शीण आपला प्रभाव दाखवल्या शिवाय थोडाच राहणार.
किती वेळ गेला होता कोणास ठाउक , मला जाग आली तो अब्दुलच्या हाकांनी..
“साहब..साहब”
अब्दुल हाका मारत होता..
मी पुढच्या सीट वर होतो आणि तशी माझी झोप चांगलीच सावध असल्याने पहील्याच हाकेला मला जाग आली, डोळे उघडले, बघतो तो काय , गाडी त्या निर्जन भागात रस्त्याच्या कडेला थांबली होती. बापरे, म्हणजे ही पण गाडी बंद पडली का?
“अब्दुल, काय झाले रे, गाडी बंद पडली की काय?”
“जी नहीं, गाडी तो ठीक है, इसे कुछ नहीं हुवा”
“मग गाडी थांबवली का?”
‘साब, गुस्ताफी मुआफ, लेकिन आपको बाकी सब को निंद से जगाना होगा”
“का रे “
“बताता हूँ , जरा सबको आवाज दो”
मी हाका मारताच सगळेच घडपडत जागे झाले..
‘काय झाले, आले का देवस्थान “
“नाही, आपण अजून वाटेतच आहोत”
“सगळ्यांना हाका मारुन जागे का केले? गाडी का थांबली , बंद पडली की काय , अरे देवा, आता काय करायचे?” एकच कलकलाट झाला!
“तसे काहीही झालेले नाही, या अब्दुलनेच तसे करायला सांगीतले, त्यालाच विचारु”
इतके सगळे होई पर्यंत अब्दुल गाडी बाहेर येऊन बॉनेट ला टेकून चक्क विडी ओढत ऊभा होता, मी गाडी बाहेर आलो, पाठोपाठ निरंजन.
“काय रे अब्दुल , काय झाले”
अब्दुल ने विडी विझवली आणि म्हणाला..
“देखो, सब ध्यानसे सुनिये, जो बात मै कहने जा रहाँ हूँ वो ठिक तरह से समझो”
“पण काय?”
“बताता हूँ , बहेनजी , दिदीजी आप भी सुन रहें हो ना?“
सुधा आ वासुन पाहात होती तर प्रणोती घाबरुन पांढरी फट्ट पडलेली दिसत होती, कोणत्याही क्षणीं ती रडायला सुरवात करेल असे मला वाटले, मी निरंजन ला खूण करुन गाडीत प्रणोती जवळ बसायला सांगीतले.
“तो सुनिये, यहां से आगे, कुछ दो -अढाई किलोमीटर पर एक काफी बडा, पुराना बरगद का पेड है, इसी के कारन इस जगह को , वो क्या कहते, हां याद आया ‘वडाचा माळ’ कहते है, जब हम उस पेड के करीब पहुँचेंगे तब मै एक ही लब्ज बोलूंगा ‘संभालो’ ठीक से सुन लो, मैं बोलूंगा ‘संभालो” , बस्स उसके बाद आपमेंसे किसीके भी मुँ से एक भी लब्ज नही निकलना चाहिये, एक भी लब्ज, चाहे कुछ भी हो , पहाड टुटे या आसमां गिरे, एक भी लब्ज मुँह से बाहर नही आनी चाहीये , उसके बाद , कुछ एक- ढेड किलोमीटर आगे चलने के बाद , मैं बोलूंगा ‘जाने दो’ , क्या कहाँ मैंने ? ‘जाने दो’ , बस्स उसके बाद समझो हम खतरे के बाहर हो गये, अब आप जो चाहे बोल सकते हो, चिल्ला सकते हो, कुछ भी कर सकते हो. लेकिन याद रखाना ‘संभालो’ और ‘जाने दो’ के बिच का जो फासला है उस दौरान एक भी लब्ज किसिकेभी जुबाँ से बाहर नही आनी चाहीये, चाहे कुछ भी हो जाये , कुछ भी.”
“ हे असे का?”
“ गुस्ताफी मुआफ साहब , इस वख्त कुछ मत पुछो, ना आप हमे कुछ पुछे , ना मै आपको कुछ जवाब दुँ , अजिब है लेकिन ये कुछ ऐसाही है”
“बापरे…”
“हाँ, और एक बात , अपने मोबाईल फोन बंद रख्खो, सायलेंट मोड नहीं, व्हाईब्रेशन मोड पे नही , बिल्कुल बंद होने चाहीये, ये तो आप अभी इसी वक्त किजियेगा..”
इतक्या वेळ हे सगळ ऐकत थरथरत बसलेली सुधा सगळे बळ एकवटून ओरडली..
“नाही…. आपण परत जाऊ, आत्ताचा आत्ता, अब्दुल गाडी फिरव चिपळूण कडे’
आम्ही सारे थक्क झालो,
“बहेनजी , वैसे डरने की कोई बात नाहीं, बस जरासी सावधानी, बाकी कुछ नहीं, कुछ नहीं होगा, हम है ना”
“नको, मला भिती वाटते, निरंजन चल आपण परत जाऊ”
“आई , काही होणार नाही, आता इतका सगळा त्रास सहन करुन इथे पर्यंत आलोच आहोत ना , मग आता थोडक्या साठी.. “
निरंजन आणि प्रणोती जवळजवळ एकदमच म्हणाले.
मी ही म्हणालो..
“सुधा असे घाबरण्या सारखे काही नाही, नसावे, मी आहे , निरंजन आहे, काहीही होणार नाही, तू वाटल्यास डोळे गच्च मिटून घे.”
“बहेनजी, अगर हम उस दौरान बिल्कुल चुप रहें तो अल्ला कसम कुछ भी नहीं होगा”
“सुधा ऐक माझे , काही नाही होणार , नातवंड पहायचेय ना?”
ही मात्रा एकदम लागू पडली! सुधाने डोळे मिटून घेत मान डोलावली आणि अब्दुल ने गाडीला स्टार्टर मारला…
थोडाच वेळ गेला असेल,
अब्दुल दबक्या आवाजात म्हणाला,..
“आप लोग सुन रहे हो ना? वो देखो, सामने वो बडा वाला बरगद का पेड दिखाई दे रहा है, मेरी बात याद है ना, जैसे ही हम उस बरगद के पेड के करीब पहूचेंगे मै ‘संभालो‘ ऐसा बोलूँगा, याद हैं ना”
“हो’ आम्ही सगळे , सुधा सोडून, एकदम एका स्वरात म्हणालो,
“ठिक है, और जबतक मैं ‘जाने दो’ ऐसा नहीं केहेता , कोई भी , कुछ भी बोलेगा नहीं, आप सब बिल्कुल चुप रहोगे, आप समझ रहें ना?”
“हो”
पुन्हा एकदा सगळे एकदमच ओरडलो..
“और एक चीज, गाडी की सारी खिडकियाँ मैंने लॉक करके रख्खी है, वो खुलेगी भी नहीं, फिर भी खिडकी खोलने की कोशीश मत करो, गाडीके सामने वाले और पिछे वाले वायपर्स अपने आप चालू- बंद हो सकते है, इसे बेदखल करो.घबराने की कोई बात नही , कुछ नहीं होगा”
निरंजन आणि प्रणोतीने सुधाला गच्च धरुन ठेवले होते तरीही एक हिसडा देत ती एकदम एखाद्या मतीमंदा सारखी जोरात किंचाळली ….
“हय्याएऐ , हो हॅ हो ह्यॅ ह्यॅ हो ही ऑ ऑ हंयायी !”
“आई शांत हो, काही होणार नाही आम्ही आहोत ना? फक्त आता काही बोलू नकोस, डोळे गच्च मीट आणि डोके खाली घालून बस, चिडी चुप्प , काही होणार नाही”
अब्दुल ने गाडीचा वेग वाढवला , गाडी आता त्या वडाच्या झाडा पासुन अवघ्या तीनशे – चारशे मीटर वर आली असेल नसेल, रात्रीच्या अंधारात त्या झाडाची फक्त भयंकर विस्मयकारक बाह्याकृती दिसत होती ! बापरे केव्हढे अवाढव्य झाड होते ते, काय तो अक्राळ विक्राळ पसारा!
आम्ही सगळेच त्या झाडा कडे टक लावून बघत होतो इतक्यात अब्दुल जवळजवळ किंचाळलाच …
“या परवरदिगार कर दे मदत….’ संभालो’!”
पुढच्या घटना इतक्या वेगात घडल्या की आजही त्यांपैकी कोणती घटना आधी कोणती नंतर याची संगती लागणे अवघड आहे. मला आठवतेय ते असे आणि इतकेच….
‘संभालो’ नंतर अब्दुल ने गाडीचा वेग आणखी वाढवला, गाडी जास्तीत जास्त शे-दोनशे मीटर पुढे आली असेल नसेल तोच …
अब्दुल ने सर्व शक्ती एकवटून ब्रेक मारला , टायर्स चा महा प्रचंड कर्णकर्कश्य आवाज करत गाडी थांबली. गाडी शेव्हर्ले च होती म्हणून थांबली तरी , दुसरी कोणती मारुती फिरुती असती तर केव्हाच स्कीड होऊन उलटली असती. हा दणका इतका जोरात होता की मागच्या सीट वरचे सगळे पुढच्या सीट वर आदळले, मी जो पुढे ड्रायव्हर साईड ला होतो, पुढच्या ग्लोव्ह कंपार्ट्मेट वर नाकावर आदळलो…
काही क्षणात आम्हाला सगळ्यांना अब्दुलने गाडी का थांबवली ते कळले, समोर हेड लाईट्स च्या प्रखर झोतात . हो, अगदी रस्त्याच्या मधोमध गाडी समोर दोन्ही हात पसरुन चक्क….
आमचे व्याही …………म्हणजेच निरंजनचे सासरे ……………….म्हणजेच प्रणोतीचे वडील…………………………. मनोहर पंत उभे होते!
काय होते ते कळायच्या आत प्रणोती किंचाळली ..
“बाबा ? तुम्ही इथे कसे?”
क्रमश:
शुभं भवतु
- ऑन लाईन (लाईव्ह स्ट्रीमिंग) ज्योतिष क्लास - March 24, 2020
- पुण्यात क्लास सुरु ! - February 29, 2020
- Lost & Found ! - February 26, 2020
- बासरीवाला ! - February 6, 2020
- निशाणी बदला… भाग्य बदला – ३ - February 6, 2020
- निशाणी बदला… भाग्य बदला – २ - February 5, 2020
- ‘निशाणी बदला… भाग्य बदला’ - February 5, 2020
- विठ्ठला कोणता झेंडा घेऊ हाती – भाग २ - January 23, 2020
- विठ्ठला कोणता झेंडा घेऊ हाती – भाग १ - January 22, 2020
- प्रश्नकुंडलीची वेळ - January 21, 2020
फारच रहस्यमय
धन्यवाद श्री. अविनाशजी
सुहास गोखले
Apratim likhan sir.
Utkantha khup vadhali aahe
धन्यवाद श्री. आनंदजी
सुहास गोखले
आगागा;—काय धडगत नाही ।
Khatarnak…..asha kititari jaga astil nahi……
pan aplyakade halli andhshraddha mhanun anubhav ghenaryana vedyat kadhale jate…aani jeva swatala anubhav yetat teva yoga yog/manasik rog ase uttar dile jate
aplya purvajanche anubhav padtalun na pahata tyana ashikshit ani andhashradhalu samajale jate.
aso pan khup chan katha(?) ahe.
pramod
धन्यवाद श्री. प्रमोदजी
आपण म्हणता ते बरोबर आहे. काही गोष्टी विज्ञानाच्या आकलाना बाहेर आहेत !
सुहास गोखले
थोडे अद्भूत, थोडे गूढ
धन्यवाद श्री.दर्शनजी
सुहास गोखले
श्री सुहासजी,
एक कमालीची गुढ वातावरण निर्मिती केलीयेत. तुमच्यातल्या लेखकाला मनापासुन दाद! नेहमीप्रमाणेच पुढील भागात काय होणार याची उत्सुकता आहे!
श्री. राहुल जी,
मन:पूर्वक आभार. आपल्या सारखे रसिक आणि जाणकार वाचक हेच माझे प्रेरणास्थान, आपल्या या अशा पाठींब्यामुळेच मला नविन काही लिहण्याची प्रेरणा मिळते.
सुहास गोखले
मी एक गूढ जगता विषयी आवड ठेवणारा मनुष्य आहे .आपली लिखाण शैली जबरदस्त आहे –पुढील भाग वाचायला उत्सुक -आपला च —भोला मिलींद
धन्यवाद श्री. मिलिंदजी,
हा विषय आहेच तसा. या कथेचे शेवटचे दिन भाग सोमवारी आपल्याला वाचावयास मिळतील. बस्स थोडीशी प्रतिक्षा.
सुहास गोखले
tufaan..
धन्यवाद श्री. कौशलजी
सुहास गोखले