सुधाकरजींचे  बोलणे पूर्ण व्हायच्या आत सुधाताईंना पण अगदी तसाच त्रास सुरु झाला …

चेहेर्‍यावरचे भाव क्षणार्धात बदलले.  चेहेरा ओढला गेला, डोळ्यांची  बुबळे वर सरकली,

सगळे अंग थरथरायला लागले, सगळ्या अंगातुन  घामाच्या धारा वाहायला लागल्या,

मान वाकडी झाली, दातावर दात वाजायला लागले..

 

ला काही कळलेच नाही , हा काय प्रकार आहे. आधी बस मध्ये सुधाकरजींना असे अ‍ॅटॅक सदृष्य काहीतरी झाले आणि आत्ता सुधाताईंना पण आणि दोन्ही वेळा  त्या  xxxx देवीचा विषय निघाला होता ! हा काही योगायोग नक्कीच नाही. काहीतरी झोल आहे हे माझ्या लक्षात आले. पण हे विचारायचे कसे?

सुधाताई लगेच सावरल्या , काही क्षण असेच गेले. ही शांतता भंग पावली ती दरवाज्यावरच्या बेल ने. निरंजन आणि प्रणोती एकत्रच आले. त्यांच्या आगमनाने वातावरणात एकदम बदल झाला.

निरंजन ने मला एक स्माईल दिले ,

“अंकल , आलोच जरा फ्रेश होऊन”

सुधाकरजींनी मला खूण करुन  मघाशी आणि बस मध्ये जे काही घडले ते या दोघांना काही सांगू नका असे खुणावले.

मी दबक्या आवाजात विचारले

“पण का?”

“हा विषय निघाला की त्या दोघांना पण असाच त्रास होतो!”

“बापरे, सुधाकरजी, सॉरी मी हे असे विचारायला नको पण हा काही अनुवंशीक प्रकार आहे का?”

“नाही, जरा वेगळेच आहे, नंतर कधीतरी सांगतो, आत्ता हा विषय नको”

मी सर्द झालो. आता मलापण तसले काही होते की काय अशी भिती उगाचच मनाला चाटून गेली!

मी ओळखले काहीतरी विचित्र आहे, ह्या मागे काहीतरी अघटीत , अतर्क्य असे निश्चितच काही तरी आहे. काय प्रकार असावा हे जाणुन घ्यायची आलेली कमालीची उबळ दाबून धरावी लागली . एक  शिष्टाचार पाळायचा म्हणुन तो विषय टाळायचा ठरवले.

निरंजन आणि प्रणोती दोघेही आय.टी. वाले आणि मी ही  एके काळी आय.टी. वाला होतो त्यामुळे आमच्या गप्पा छान रंगल्या.

काकूंनी केलेले कर्नाटकी पद्धतीचे दडपे पोहे, मिरगुंड आणि वरतुन फर्मास फिल्टर काप्पे, साला दिल खुष झाला.. मी घड्याळ्यात पाहात म्हणालो,

“सुधाकरजी, आठ वाजले की, मी येतो आता, मला आता निघालेच पाहीजे”

“ओ मिस्टर, असे कसे जाता येईल तुम्हाला, आज रात्रीचे जेवण करुनच जा कोठे जायचे ते”

“मला ही आवडले असते हो पण एका बरोबर नेमकी डिनर अपॉईंटमेट्च आहे माझी आज दहा वाजताना, ती टाळता येणार नाही, थोडा बिझनेस चा मामला आहे ना. पुन्हा कधी तरी जुळवून आणूया ना हा योग”

“बरे मग पुण्यात किती दिवस आहात?”

“उद्याचा गुरुवार आणि परवाचा शुक्रवार माझा ट्रेनिंग प्रोग्रॅम आहे त्या PPPP मध्ये, तो झाला की शुक्रवारी संध्याकाळीच नाशिकची ची बस पकडणार”

“कॅन्सल, संध्याकाळची बस कॅन्सल, परवाच्या संध्याकाळी तुम्ही आमच्या इथे डिनरला येणार आहात”

“अहो पण..”

“ते काही नाही, आमचे ऐकायचे”

“निरंजन, परवाच्या दिवशी संध्याकाळी तू यांना पिक अप कर”

“येस डॅड, गोखले ती ‘ PPPP’ म्हणजे फेज थ्री मध्येच ना”

“हो”

“डन , मी फेज थ्री मधल्या कॅम्पस मध्येच असेन त्या दिवशी, आपण एकत्रच येऊ, मी कॉल देतो तुम्हाला”

“कशाला इतका त्रास..”

“त्रास? गोखले काही एक बोलायचे नाही, आता बोलू ते एकदम डीनरच्या वेळी “

….

….

एकदा का माझे ट्रेनिंग सेशन्स सुरु झाले मी मला बाकीचे काही सुचत नाही, मी, माझे स्टूडंट्स आणि मी शिकवत असलेला विषय या पलीकडचे बाकी काही नाही. आत्ताही तसेच झाले , दुसरे दिवशी माझा ट्रेनिंग प्रोग्रॅम सुरु झाला आणि मी त्या सुधाकरजींना पार विसरुन गेलो.

शुक्रवारी अगदी सकाळीच निरंजनचा फोन आला तेव्हा लक्षात आले आज संध्याकाळी यांच्याकडे डिनर ला बोलावले आहे.

शुक्रवारचा माझा  ट्रेनिंग प्रोग्रॅम संपतो न संपतो तोच निरंजनचा एसेमेस “गेट वर थांबलो आहे , सिल्वर कलर मारुती बलेनो…”

मस्त डिनर झाले , सुधाताईंनी काय बेत केला होता महाराजा.. पथ्यपाणी विसरुन मी ‘ओ’ येईस्तो जेवलो.

जेवण झाल्या नंतर , आम्ही , म्हणजे मी, सुधाकरजी आणि निरंजन त्यांच्या टेरेस वर निवांत पसरलो. चंची फिरली.

निरंजनच्या हातातला लॅपटॉप बघून सुधाकरजी म्हणाले,

“बाजूला ठेव ते , बघावे तेव्हा हातात हे ड्बडे नाहीतर फोन, बस ना जरा निवांत गप्पा मारायला”

“तुमच्या गप्पा चालू द्या , मी इथेच आहे ना, जरा काही अर्जंट ईमेल्स चेक करायच्या राहील्यात त्या बघतो मग तुम्हाला जॉईन होतो”

आमच्या गपा चालू राहील्या, अधुन मधुन निरंजन पण एखादी कॉमेट मारायचा असे मस्त मजेत चालले होते…

अचानक सुधाकरजी थोडे गंभीर होत म्हणाले..

“गोखले , तुम्हाला सांगतो म्हणालो होतो नाही का?”

“काय ?”

“आपले ते हे हो”

इथे सुधाकरजींनी डोळे वर केले, जीभ बाहेर काढली , मान वाकडी केली!

माझ्या लक्षात आले, त्या दिवशी बस मध्ये घडलेल्या प्रकारा बद्दलच !

“अरे हो, काय नेमके झाले होते हो”

“त्याच्या मागे मोठी लंबी स्टोरी आहे..”

सुधाकरजींनी स्टार्ट घेतला..

समोरचा  लॅपटॉप खटकन बंद करत , निरंजन जरा नाखुषीनेच म्हणाला.

“डॅड! नका तो विषय काढू , आपल्या सगळ्यांना कीती त्रास होतो ते माहीती आहे ना?”

“त्रास तर परवाच झालाय, नाशिक हुन येताना बस मध्ये , सुधाला पण झाला त्याच संध्याकाळी, आता पुन्हा नाही होणार लगेचच..”

“डॅड आणि हे तुम्ही मला आत्ता सांगताय?”

“कशाला तुला घाबरुन सोडायचे बेटा , आणि तुम्हालाही त्रास सुरु झाला तर?  म्हणून काही सांगीतले नाही”

“तरीही डॅड , प्लीज नका ना हा विषय काढू”

“काही होत नाही रे,  आणि मी या गोखले साहेबांना प्रॉमीस जे करुन बसलोय “

“बघा हं, डॅड मी वॉर्न करतोय”

“हो रे ..”

“सुधाकरजी , निरंजन म्हणतोय त्यात पॉईंट आहे, कसले प्रॉमिस न कसचे काय, त्रास होणार असेल काही सांगत बसू नका, आपल्याला बोलायला इतरही बरेच विषय आहेतच की”

“नाही, आता विषय निघालाच आहे तर सांगतोच आता..”

निरंजन ने खांदे उडवले आणि समोरच्या लॅपटॉप मध्ये डोके खुपसले..

आणि सुधाकरजी सुरु झाले…

२००१ साली निरंजनचे लग्न झाले, प्रणोती सारखी जोडीदार मिळायला जबरदस्त पुण्याई लागते , मागच्या जन्मी मोठी तप:श्चर्या केली असणार बेट्याने. आम्ही सगळेच खूष होतो. म्हणजे आज ही आहोतच!

निरंजनच्या  लग्नाला बघता बघता दोन वर्षे झाली, काळ कसा भुर्र्कन उडून जातो नाही. मी आणि सुधा मनात मांडे खात होतो, मुलाचे लग्न झाले आता मांडीवर नातवंड खेळेल असे वाटत होते पण अजून काहीच चाहूल नव्हती. कोठेतरी काळजीचे ढग तरंगायला सुरवात झाली. अशीच आणखी तीन वर्षे गेली , निरंजनच्या लग्नाला आता पाच वर्षे झाली, पाळणा हलायची कोणतीच चिन्हे दिसेनात, आता मात्र सगळ्यांच्याच जीवाला घोर लागला. डॉक्टरांच्या कडच्या चकरा सुरु झाल्या , दुनियाभरच्या टेस्ट करुन झाल्या, सगळे रिपोर्ट नॉर्मल, दोघांत कोणताही दोष नाही, डॉक्टर समजावत होते दोघेही निर्दोष आहेत पण असे होते- होते काही केसेस मध्ये, आपल्याला थोडी जास्त वाट पहावयास लागेल असे दिसते. सध्या चालू असलेली हार्मोन्स ची ट्रीटमेंट नक्की यश देईल.

पण काहीही उपयोग झाला नाही. काळजी वाढत गेली. इकडे सुधाने उपास तपास म्हणू नका , उपाय – तोडगे म्हणू नका करायचे काही एक शिल्लक ठेवले नव्हते, दहाबारा ज्योतिषांचे उंबरठे झिजवून झाले, कोणी सांगेल तो कसलाही उपाय करायचा सपाटा सुरु होता, डोळ्यातून आसवे निघाली नाहीत असा एकही दिवस गेला नसेल. इकडे निरंजन आणि प्रणोतीचा पण धीर खचत चालला होता. आमची इतकी खेळकर , हसतमुख प्रणोती पण पार कोमेजुन गेली, चेहेर्‍यावरची रयाच  गेली तिच्या, निरंजनची ही चिडचीड वाढली होती.

आणि अचानक एके दिवशी ….

क्रमश:

शुभं भवतु


About सुहास गोखले

मी सुहास गोखले या वेब-साईटचा निर्माता. आपल्याला ज्योतिष विषयक मार्गदर्शन हवे असल्यास किंवा आपली एखादी सुचना / तक्रार असेल तर खाली दिलेल्या 'संपर्क फॉर्म' मध्ये माहीती भरुन पाठवल्यास मी ताबडतोब आपल्याशी संपर्क साधेन.
+1

सुहास गोखले administrator

मी सुहास गोखले या वेब-साईटचा निर्माता. आपल्याला ज्योतिष विषयक मार्गदर्शन हवे असल्यास किंवा आपली एखादी सुचना / तक्रार असेल तर खाली दिलेल्या 'संपर्क फॉर्म' मध्ये माहीती भरुन पाठवल्यास मी ताबडतोब आपल्याशी संपर्क साधेन.

6 प्रतिक्रिया

///////////////
  1. Gorakshnath Kale

    Lai bhari suhasji . Aplya website cha mi sabhsad zalo aahe .bhari watate tumche lekh vachlyavar

    0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.