माझ्या बद्दल थोडेसे

सप्रेम नमस्कार

 

र्वप्रथम, माझ्या वेबसाइटला भेट दिल्या बद्दल मी आपले आभार मानतो, मला खात्री आहे माझी वेबसाईट तुम्हाला आवडली असेल.

मी मूळचा सांगलीचा, शिक्षण बी.ई. (इलेक्ट्रिकल), गेली तीस वर्षे मी इंजिनियर म्हणून वेगवेगळ्या क्षेत्रात काम करत आहे. दरम्यान च्या काळात विदेशात काही वर्षे काम करण्याची संधीही मिळाली. प्रोसेस कंट्रोल , इंस्ट्रूमेंटेशन, इंडस्ट्रीयल अ‍ॅटोमेशन, रियल टाइम ऑपरेटींग सिस्टीम्स, हाय एंड एंबेडेड सिस्टीम्स, SCADA Systems ही माझी स्पेशलायझेशन्स आहेत. प्रगत 32 बीट मायक्रोप्रोसेसर्स (ARM 7, CORTEX , PowerPC, MIPS etc) चा माझा खास अभ्यास असून फझी लॉजीक, न्यूरल नेटवर्क, पॅटर्न मॅचिंग तंत्राज्ञानाचा वापर करुन बरेच सॉफ़्टवेअर लिहले आहे.

सध्या माझा मुख्य व्यवसाय ‘कॉर्पोरेट ट्रेनर / सॉफ़्टवेअर कन्सलटंट ‘ असा आहे. विप्रो. केपीआयटी कमीन्स, सासकेन, आयगेट पटनी, आयडीईएमआय, हरमन (JBL), टाटा मोटर्स, क्रॉम्प्टन ग्रीव्हज असे माझे क्लायंट्स आहेत. पुणे विद्यापीठा तर्फे परिक्षक म्हणुन ही काम बघतो.

ज्योतिषशास्त्राचा माझा परिचय तसा जुनाच म्हणजे महाविद्यालयीन काळा पासूनचा पण तेव्हा फार सखोल असा अभ्यास नव्हता, पुढे २००५ साला पासून मात्र या विषयातली गोडी वाढली, जरा जास्त अभ्यास सुरू केला, सुदैवाने त्याच काळात कै. श्रीधरशास्त्री मुळ्ये यांचे मार्गदर्शन लाभले , गुरुकृपा झाली, एकेक ग्रंथ जमा होऊ लागले, आजमितीला माझ्याकडे फक्त ज्योतिषशास्त्रा वरचेच सुमारे ४०० ग्रंथ आहेत.

मी सुरवात केली आपल्या पारंपरिक ज्योतिष शास्त्राच्या अभ्यासाने, पुढे कृष्णमूर्ती पद्धतीची ओळख झाली, हर्षल , नेपच्यून व प्लुटो या ग्रहां बद्दल वाचायच्या निमित्ताने पाश्चात्त्य ज्योतिषशास्त्राचा ही प्रभाव माझ्यावर पडला. त्यांतूनच मग ‘कास्मोबायोलॉजी‘ व ‘युरेनियन अॅस्ट्रोलॉजी‘ चा अभ्यास सुरू झाला.

मला संगीताची खास आवड आहे, भारतीय शास्त्रीय संगीताचे काही धडे पुण्याला पं. अरविंद गजेंद्रगडकरांकडे गिरवण्याचे भाग्य मला लाभले , गाता गळा किंवा वाजवणारे हात लाभले नसले तरी परमेश्वरी कृपेने उत्तम ‘कान’ लाभले आहेत आणि पं. गजेंद्रगडकरांनी ते अगदी घोटून घोटून उत्तम तयार करवून घेतले आहे , ही पण एका गुरुकृपाच.

भारतीय शास्त्रीय संगीता बरोवरच, पाश्चात्य शास्त्रीय संगीतातही मला कमालीची रुची आहे, पण मला सगळ्यात जास्त आवडते , भावते , कळते ते ‘जॅझ (Jazz) ‘ प्रकाराचे संगीत. माईल्स डेव्हीस आणि ऑस्कर पीटरसन हे माझे अत्यंत आवडीचे कलाकार. आज माझ्या कडे उत्तमोत्तम संगीताचा मोठा म्हणजे सुमारे १२०० सी.डी.ज आणि ३०० (जुन्या) LP रेकॉर्ड्चा ही संग्रह आहे. Cadence VA-1 सारखा जगदविख्यात अ‍ॅम्लीफायर (pure Class A design) आणि तितकेच उच्च दर्जाचे Cadence Anina, Electrostatic स्पिकर्स माझ्या कडे आहेत.
संगीता बरोबरच चित्रकलेची आणि आर्किटेक्चर ची चांगली जाण आहे, कै. श्री. जयंत खरे (पुणे) आणि कै. दिव्यो महापात्रा (मधुबनी शैली) यांची ‘ओरिजिनल’ पेंटींग्ज माझ्या संग्रहात आहेत.

मी नाशिक येथे वास्तव्यास आहे,  ज्योतिष विषयक मार्गदर्शना साठी मला प्रत्यक्ष भेटू शकता किंवा फोन/ ईमेल व्दारा पण संपर्क साधता येईल.

आगामी काळात वेब बेस्ड (इंटरनेट च्या माध्यमातून) ‘ज्योतिष ‘ प्रशिक्षण वर्ग सुरु करण्याचाही मानस आहे, आपली या वर्गास येण्याची ईच्छा असल्यास किंवा त्या संदर्भात आपल्या काही सुचना , अपेक्षा असल्यास मला जरुर कळवा.

माझ्या वेबसाईटला नियमित भेट दया, आपला अभिप्राय कळवा, मी आपली वाट पाहतोय.

सध्या इतकंच,

शुभं भवतु

 

About सुहास गोखले

मी सुहास गोखले या वेब-साईटचा निर्माता. आपल्याला ज्योतिष विषयक मार्गदर्शन हवे असल्यास किंवा आपली एखादी सुचना / तक्रार असेल तर खाली दिलेल्या 'संपर्क फॉर्म' मध्ये माहीती भरुन पाठवल्यास मी ताबडतोब आपल्याशी संपर्क साधेन.
0