मी जेव्हा शाळा- कॉलेजात शिकत होतो तेव्हा ‘ध्यान’ हा शब्द मला फक्त ऐकून माहीती होता. पण ध्यान म्हणजे नक्की काय ते माहीती नव्हते. हे काहीतरी ‘जंगलात / हिमालयात’ जाऊन करायचे असते किंवा संसारापासून लांब जाऊन (पळून जाऊन करायची कसली तरी आध्यात्मिक साधना आहे असे काहीसे माझे अज्ञान होते आणि ते असे असणे स्वाभाविक होते कारण त्या काळात आजच्या सारखा ‘योगा’ हा शब्द प्रचलित नव्हता!

मी इंजिनियरिंग कॉलेजच्या शेवटच्या वर्षाला असताना सांगलीत एके दिवशी ‘भावातित ध्यान या महर्षी महेश यांच्या ध्यानपद्धतीवर दोन दिवसांची कार्यशाळा झाली. पहील्या दिवशी हे म्हणजे काय ते सांगणार होते आणि दुसरे दिवशी रोख ५०० रुपये घेऊन ते शिकवणार होते ! तेव्हाचे ५०० म्हणजे आजचे ३००० तर नक्कीच ! इतकी फी देऊन हे असले काही शिकणे याचा विचारही करु शकलो नसतोमाझ्या इंजिनियरींग ची शेवटच्या आख्ख्या वर्षाची फी रुपये ३६० च्या आसपास होती ! पण पहिल्या दिवशीचे व्याख्यान मोफत असल्याने त्याला गेलो होतो.

मला आता त्या व्यक्तीचे नाव आठवत नाही पण कोणीतरी बालासुंदरम किंवा तत्सम नावाची साऊथ ची व्यक्ती होती. त्याने सुमारे दोन तास ‘ध्यान’ म्हणजे काय भारतातली ध्यानपद्धती , पतंजली योग सुत्रे .ध्यानाचे कोणते लाभ होतात , ध्यान करण्याच्या कोण कोणत्या पद्धती आहेत हे सांगत त्यात सगळ्यात चांगली आहे असे ठासून सांगीतले !त्या हॉल मध्ये सुमारे १०० एक लोक्स होते पण मी एकट्यानेच उठून उभे रहात विचारले होते :

“का ?”

त्यावर त्याने उत्तर दिले होते
“Because it works! कारण ते काम करते!”

आणि त्याला समर्थन म्हणून अनेक प्रसिद्ध फिरंगी सेलेब्रिटीज ची मोठ्ठी यादी वाचून दाखवली ! वर म्हणला
“हे इतके प्रसिद्ध लोक्स TM करत आहेत म्हणजे ते चांगलेच आहे ते काम पण करते आहे!”

हे समर्थन मला काही पटले नाही मी सरळ स्पष्ट पणे विचारले,

“कदाचित हा तुमच्या मार्केटींग चा प्रभाव असावा, बाकीचे ध्यान वाले त्यात काहीसे कमी पडले असे म्हणता येईल. TM च सगळ्यात चांगले हे सिद्ध करायला ते पुरेसे नाही आपल्या कडे काही तुलनात्मक माहिती असेल तर सांगा”

यावर त्या व्यक्तीची सटकली ! एकदम तिरसटलेया सारखे बोलायला लागला …

“तु लहान आहेस , कॉलेजात जाणारा मुलगा दिसतोस नसत्या शंका घेऊ नकोस…”

मी आणखी पीळ भरला ..

“मला दिसते की माझ्या या रोख ठोक प्रश्ना मुळे (तेव्हा मी point blank हा शब्द वापरला होता) आपण अडचणीत आला आहात आणि म्हणूनच चिडला आहात मघाशी ध्यानाचे लाभ सांगताना ‘रागा वर नियंत्रण मिळवता येते’ असे बोललात पण माझ्या एका साध्या प्रश्नावर आपण चिडता यावरुन आपल्याला स्वत:लाच या TM चा म्हणावा तसा लाभ मिळालेला दिसत नाही मग दुसर्‍यांना कसला लाभ मिळवून देणार?“

“तुम्ही कार्यक्रम संपल्यावर भेटा आपण सविस्तर बोलू “

असे म्हणून त्याने वेळ मारुन नेली.

कार्यक्रम संपल्या नंतर मी त्याला गाठायचा प्रयत्न केला पण बालासुंदरम शिताफीने गायब झाला. अर्थात दुसर्‍या दिवशीच्या प्रत्यक्ष TM क्लास मी जाणे शक्यच नव्हते नंतर कळले की अवघ्या सात – आठ लोक्स नी तो कोर्स केला !

यथावकाश माझे शिक्षण पूर्ण झाले आणि मी नोकरी निमित्ताने पुण्यात आलो. सांगलीच्या तुलनेत पुणे बरेच मोठे शहर ध्यान , योग या असल्या विषयांवर सतत कोणती ना कोणती व्याखाने , चर्चासत्रे कार्यशाळा चालूच असतात. पण कामाच्या रगाड्यात त्यांना जाणे जमले नाही. नाही म्हणायला अय्यंगार योग इंस्टीट्यूट मधला एक प्राथमिक कोर्स करुन काही योगासने शिकून घेतली.

सांगलीतला TM बद्दलचा अनुभव फारसा चांगला नव्हता मला तर ते मार्केटींग चे एक गिम्मिक वाटले होते. पण १९८९ मध्ये अशाच एका च्या कार्यशाळेला जाण्याचा योग आला, सकाळ मध्ये जाहीरात वगैरे केली होती योग शिक्षक म्हणून कोणीतरी पी. वासुदेव !

अरे देवा पुन्हा साउथ इंडियन!

क्रमश:

शुभं भवतु 


About सुहास गोखले

मी सुहास गोखले या वेब-साईटचा निर्माता. आपल्याला ज्योतिष विषयक मार्गदर्शन हवे असल्यास किंवा आपली एखादी सुचना / तक्रार असेल तर खाली दिलेल्या 'संपर्क फॉर्म' मध्ये माहीती भरुन पाठवल्यास मी ताबडतोब आपल्याशी संपर्क साधेन.
+1

सुहास गोखले administrator

मी सुहास गोखले या वेब-साईटचा निर्माता. आपल्याला ज्योतिष विषयक मार्गदर्शन हवे असल्यास किंवा आपली एखादी सुचना / तक्रार असेल तर खाली दिलेल्या 'संपर्क फॉर्म' मध्ये माहीती भरुन पाठवल्यास मी ताबडतोब आपल्याशी संपर्क साधेन.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.