सुमारे दीड वर्षा पूर्वी  ‘आपण पण  एखादे पुस्तक प्रकाशीत करावे’ अशी सुरसुरी आली. आता मी पुस्तक लिहुन लिहुन कशावर लिहणार? ‘चुकला फकीर मशीदीत’ या म्हणी प्रमाणे ‘ज्योतिष’ हाच एक विषय मला असा वाटला की त्यावर मला पुस्तक लिहता येईल.

कदा ‘ज्योतिष’ या विषयावर पुस्तक लिहायचे ठरल्या नंतर नेमक्या कोणत्या विषयावर लिहायचे हे ठरवावे लागले. तसे मला बरेच विषय सुचले पण शेवटी मला काय वाटते त्यापेक्षा ज्यांच्या साठी हे पुस्तक लिहावयाचे त्या वाचकांना (गिर्‍हाईक !)  नेमके काय हवे आहे ते महत्वाचे! म्हणून माझ्या ब्लॉग वर मी ‘वाचकांचा कौल’ घेतला. फार उत्साहवर्धक प्रतिसाद मिळाला. बहुतांश वाचकांच्या पसंती नुसार , ‘केस स्ट्डीज ‘ आणि ‘ग्रहयोग’ या विषयावर पुस्तके लिहायचे ठरवले.

ग्रहयोगावर इंग्रजीत त्यातही पाश्चात्य ज्योतिषांनी विपुल लिखाण केले आहे.  मराठीत या विषयावर माझ्या माहीती प्रमाणे श्री. व.दा.भटांनी लिहलेले एकमेव पुस्तक आहे, तेही बर्‍याच वर्षां पूर्वी लिहले गेले आहे. त्यामुळे ‘ग्रहयोगा’ वर पुस्तक लिहणे काळाची गरज वाटली. शिवाय या पुस्तकात मुद्दे अधिक स्पष्ट करुन सांगण्यासाठी काही केसस्ट्डीज टाकता येतील, तसेच ग्रहयोगांचा मानसशास्त्रीय अंगाने विचार मांडता येईल, जो मराठीत आत्तापर्यंत कोणी मांडला नाही. ग्रहयोग आणि कर्माचा सिद्धांत यांचीही सांगड घालता येईल. एकंदर सध्या बाजरात उपलब्ध असलेल्या ग्रहयोगां वरील पुस्तकां पेक्षा जरा वेगळे , जास्त सखोल माहीती असलेले, ग्रहयोगांचा अनेक अंगानी विचार केलेले, प्रॅक्टीकल असे हे पुस्तक हातोहात खपेल याबद्दल माझ्या मनात तीळमात्र शंका नव्हती (तशी ती आजही नाही) !

‘केस स्ट्डीज’ हा तर माझा खास प्रांत! मराठीत खासकरुन के.पी. मध्ये बरीच पुस्तके ‘केस स्ट्डीज’ वर आधारीत आहेत पण त्यातल्या केस स्ट्डीज मला कधीच पटल्या नाहीत, फारश्या उपयुक्त वाटल्या नाहीत, ज्या आहेत त्या फार त्रोटक आहे, नियमांचा सोयिस्कर अर्थ लावत कशाबशा जुळवलेल्या आहेत , अगदी के.पी. मधल्या ‘दादा’ मानल्या गेलेल्या लेखकांनीही हा उद्योग केला आहे.  काहीवेळा तर नियमांचा चुकीचा अर्थ  लावलेला आढळला आहे . तुलनेत माझ्या ब्लॉग वर ज्या अत्यंत विस्तृत केस स्ट्डीज मांडल्या आहेत त्या पद्धतीचे विवेचन कोणीच केलेले नाही. माझ्या केस स्ट्डीज वाचताना वाचकांना अगदी एखाद्या वर्गात बसून शिक्षका कडून सगळे समजाऊन घेत आहोत असा अनुभव येतो. ब्लॉग जरी अवघ्या १५ केस स्ट्डीज प्रसिद्ध झाल्या असल्या तरी माझ्याकडे  केस स्ट्डीज ना तोटा नाही !

केस स्ट्डीज बरोबरच प्रश्नशास्त्र हा विषय मुळापासून समजाऊन सांगणारी काही माहीती, के.पी. चे सर्व नियम एकत्र असे देऊन हे पुस्तक एक रेफरंस बुक म्हणून सिद्ध करता येईल. थिअरी सांगणारी पुस्तके काय हजारों आहेत पण एखादी पत्रिका घेऊन प्रश्न कसा सोडवला , उत्तर कसे मिळवले, ताडा – पडताळा कसा घेतला , हे अगदी खुलासे वार , स्टेप बाय स्टेप पद्धतीने सांगणारे एकही पुस्तक बाजारात नाही. तेव्हा अशा पद्धतीचे पुस्तक बाजारात आले तर त्याचा नव्याने ज्योतिष शिकणार्‍याला खूप लाभ होईल असे मला वाटले. (आज ही वाटत आहे !)

एकदा विषय ठरल्या वर पुढचा प्रश्न उभा राहीला तो म्हणजे पुस्तक ‘मराठी’ का ‘इंग्रजी’ मध्ये? मी मराठी आणि इंग्रजीत सारख्याच सफाईने लिहू शकतो त्यामुळे मला भाषेची अडचण वाटली नाही. ‘मी मराठी , बोलेन मराठी ‘ हे सगळे ठीक असले तरी दुर्दैवाने, मराठी वाचक वर्ग अत्यंत कमी आहे! त्या तुलनेत इंग्रजीतल्या पुस्तकाला बराच मोठा वाचक वर्ग लाभेल हे तर निश्चितच आहे. भाषेचे प्रेम असले तरी कोठेतरी ‘अर्थकारण’ हे बघावेच लागतेच ना?
क्या करु पापी पेट का सवाल हैं ।

त्यामुळे सुरवातीला तरी ‘इंग्रजी’त पुस्तकें लिहावयाचे ठरवले. वाचकांचा प्रतिसाद पाहून नंतर मराठी भाषांतरीत आवृत्ती चे बघता येईल असा विचार केला.

उत्साहात ‘ग्रहयोगा’ वरच्या पुस्तकाचे दोन चॅप्टर लिहून पण झाले, १० केस स्ट्डीज लिहुन झाल्या…  पण पुस्तक प्रकाशीत करायचे म्हणजे कोणी प्रकाशक गाठला पाहीजे ना? मग शोध सुरु झाला प्रकाशकाचा.

पुणे – मुंबई इथल्या काही प्रकाशकांशी संपर्क साधला. काही प्रकाशक फक्त ‘मराठी’ मधलीच पुस्तके प्रकाशीत करत असल्याने त्यांनी माझ्या इंग्रजी पुस्तकाला नकार दिला. काही जण  ज्योतिषावरच्या पुस्तका बाबत निरुत्साही होते. एक – दोघां प्रकाशकांची तयारी दिसली पण त्यांना ‘ग्रह योग’ हा विषय नको होता, ह्या विषयावरचे पुस्तक खपणार नाही असे त्यांचे मत होते. त्यांनी मला ‘ साडे-साती’, ‘उपाय-तोडगे’, ‘वास्तु दोष’ ,’ विवाह / संतती/ धन लाभ योग’ असे विषय सुचवले अर्थात मला या विषयांवर लिहावयाचे नव्हते.

पुस्तक इंग्रजीत असल्याने आता मराठी प्रकाशकां पेक्षा महाराष्ट्रा बाहेरच्या प्रकाशकांकडे गेलेले बरे असा विचार करुन मी दक्षिण आणि उत्तर भारतातल्या काही प्रकाशकांचे दरवाजे ठोठवायला सुरवात केली.  इथेही तेच झाले , दक्षिणेकडचे प्रकाशक ‘नाडी ज्योतिष’ या या एका विषया पलीकडे काही बघायला तयारच नव्हते. त्यांच्या मते ‘नाडी ज्योतिष’ हा एकदम हॉट्ट विषय आहे. उत्तर भारतातल्या प्रकाशकांचे काही फारसे वेगळे नव्हते, त्यांना जुन्या संस्कृत पोथ्यांवर (भृगु संहिता, जातक अमुक, जातक तमुक इ.) ) आधारीत पुस्तकांतच जास्त रस होता, त्यात  ‘मिश्रा’, ‘शर्मा’ ‘त्रिवेदी’ ‘शुक्ल’, ‘वर्मा’  ‘प्रकाश’ अशी आडनावे नसलेले लोक्स ज्योतिषावर लिहू शकतात यावर त्यांचा विश्वासच बसत नव्हता. ‘उपाय – तोडगे’ आणि ‘वास्तु’ या विषयांची मागणी यांनीही केली.

या सगळ्यात जवळजवळ सहा महीने गेले….

शेवटी एक उत्तर भारतातल्या एका बड्या प्रकाशनाने पुस्तक प्रकाशीत करायची तयारी दर्शवली. पृष्ठ संख्या २०० पेक्षा जास्त पण ३०० पेक्षा कमी,   कव्हर डीझाईन तुमचे तुम्ही करा, लेआऊट, ग्राफिक्स, टाईपसेटींग आणि प्रुफरिडिंग तुम्हीच बघा , फायनल आऊटकम पिडीएफ आणि कव्हर अ‍ॅडोबी किंवा कोरेल सॉफ्ट्वेअर मध्ये असावे इतक्याच अटी होत्या.

बाकी तपशील पण लगेच ठरला पुस्तक ५.५ इंच x ८.५ इंच आकारातले,  रंगीत कव्हर, काळा- पांढरा मजकूराची ३५० पाने, साधा ट्रेड पेपर, कागदी बांधणी , पुस्तकाची छापील किंमत रु ४००.

मी खुष झालो , शेवटी भेटला एक प्रकाशक! आता काय झालोच मी लेखक ! त्या खुषीत मी ‘ओय , चेतन भगत , देख आ रहा हुँ मैं ‘ अशी आरोळी (मनातल्या मनात!) ठोकून  ही झाली. तशा आरोळ्या नंतरही (पुन्हा, मनातल्या मनात) मारुन झाल्या चेतन भगत च्या जागी ‘अमिश त्रिपाठी’, ‘अमिताव घोष’, ‘अनिता नायर’, ‘अनुजा चौहान’,  ‘अरविंद अडीगा’, ‘अ‍श्विन सांघी’, ‘चित्रा दिवाकरुणी’, ‘झुम्पा लाहीरी’, ‘मंजिरी प्रभु’, ‘विकास स्वरुप’, ‘विक्रम चंद्रा’ , ‘रोहिंटन मिस्त्री’…. जेव्हढी आठवतील तेव्हढी नावे घेऊन झाली …  कुण्णा कुण्णाला सोडले नाही… “…देख आ रहँ हूँ मैं … “
पण कसचे काय …

हे म्हणजे ‘घी देखा लेकिन बडगा नहीं देखा’ यातलाच प्रकार होता!

क्रमश:

शुभं भवतु


About सुहास गोखले

मी सुहास गोखले या वेब-साईटचा निर्माता. आपल्याला ज्योतिष विषयक मार्गदर्शन हवे असल्यास किंवा आपली एखादी सुचना / तक्रार असेल तर खाली दिलेल्या 'संपर्क फॉर्म' मध्ये माहीती भरुन पाठवल्यास मी ताबडतोब आपल्याशी संपर्क साधेन.
+1

सुहास गोखले administrator

मी सुहास गोखले या वेब-साईटचा निर्माता. आपल्याला ज्योतिष विषयक मार्गदर्शन हवे असल्यास किंवा आपली एखादी सुचना / तक्रार असेल तर खाली दिलेल्या 'संपर्क फॉर्म' मध्ये माहीती भरुन पाठवल्यास मी ताबडतोब आपल्याशी संपर्क साधेन.

8 प्रतिक्रिया

///////////////
 1. Santosh

  सुहासजी,

  मला वाटत ह्याच कारणास्तव बर्याच ज्योतिष लेखकांनी त्यांची पुस्तके स्वतः प्रकाशित केली असावीत.

  तुमच्या पुस्तक प्रकाशनाला शुभेच्छा, तुमचे पुस्तक लवकर प्रकाशित होवो आणि आम्हा वाचकांना लवकरात लवकर वाचायला मिळोत.

  संतोष सुसवीरकर

  0
  1. सुहास गोखले

   धन्यवाद श्री. संतोषजी,

   ज्योतिषावरच्या पुस्तकाचा खप तसा कमी असतो, एखादी प्रिंट अवघी ३००-५०० प्रतिंची असू शकते त्यामुळे प्रकाशकाला त्यात फारसा नफा होत नाही , त्यामुळेच कदाचीत प्रकाशक पुस्तके छापायला नाखुष असावेत. मी बहुदा ई-बुक पद्धतीचे पुस्तक प्रकाशीत करेन. त्याची किंमत अगदी अल्प म्हणजे १०० च्या आतबाहेर असेल जी सगळ्यांना परवडु शकेल , अर्थात इतके कमी किंमत ठेवून सुद्धा ती द्यायला जीवावर येणारे लोक आहेतच ते कॉपी करणार हे गृहीत धरले आहेच!

   सुहास गोखले

   0
 2. shrikant jinral

  तुम्ही ई-पुस्तक पब्लीश करणार आहात.आनंद झाला.पण हार्ड काॅपी संग्रही ठेवणारे खुपच आहेत.स्वतःच पब्लीश केलेत तर खुपच रीस्पाॅन्स मिळेल.प्रत्येक जोतिष्याला मार्गदर्शक असे पुस्तक निश्चितच आवडेल.

  0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.